Author: अनंत पांगारकर
आजचे राशीभविष्य गुरुवार २२ ऑगस्ट २०२४ मेष— धन स्थानातील हर्षल गुरु आज अगदी आनंदी दिवस दर्शवतात. दुपारनंतर मात्र चीडचीड वाढेल. एखाद्या अप्रिय घटनेमुळे मन अस्वस्थ होईल. वृषभ— जन्मस्थ मंगळ हर्षल मुळे मानसीक ताणतणाव वाढण्याची शक्यता. स्वस्थानी असलेला भाग्येश अचानक धनलाभ दर्शवतो. मिथुन— धन स्थानातील रवी आज पैशासाठी संघर्ष करायला लावेल. मित्रांबरोबर वादविवाद टाळा. नोकरीच्या ठिकाणी मानहानी होण्याची शक्यता. कर्क— धन स्थानातील बुध शुक्रामुळे आज नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. चतुर्थ स्थानातील चंद्र वाहन योग दर्शवतो. सिंह— आज सगळ्यांशी प्रेमाने वागाल. आज प्रवास योग संभवतो. पराक्रमातील चंद्र भावांबरोबरचे संबंध सुधारण्यास मदत करील. कन्या— जोडीदाराबरोबर वाद संभवतो. आर्थीक समस्या, चिंता दुर होतील. आनंदी…
बुधवार, २१ ऑगस्ट मुरूम उत्खननासंदर्भात पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारदाराच्या नातेवाईक व इतरांविरुद्ध गुन्ह्यात पंचनाम्यात तक्रारदाराला लाभ मिळवून देण्यासाठी पंचा समक्ष दोन लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एसीबीने रंगेहात पकडले आहे. सचिन भागवत सानप (वय ३९ वर्ष) रा. एमएसजी अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक चार जुना नगर नाका, बीड असे बीडच्या लाचखोर मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचखोर सानप याला लाच लचकत च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून शिवाजीनगर (बीड) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाच लुचपतकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या नातेवाईक व इतरांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात मुरूम उत्खननासंदर्भात गुन्हा दाखल…
बुधवार, २१ ऑगस्ट संगमनेर – पथविक्रेता संरक्षण कायद्यानुसार संगमनेर नगरपालिका हद्दीतील नोंदणीकृत पथ विक्रेता समितीची निवडणूक मंगळवारी बिनविरोध पार पडली आहे. आठ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सात सदस्यांची निवड बिनविरोध झाली असून एक जागा रिक्त राहिली आहे. निवड झालेल्या सदस्यांमध्ये दीपक भानुदास साळुंखे (इतर मागासवर्ग), संतोष गंगाधर मुर्तडक, (सर्वसाधारण), महेंद्र मांगीलाल शर्मा (सर्वसाधारण), दीपा सोमनाथ सोनुले (सर्वसाधारण महिला राखीव), सुगंधा किसन धाकतोडे (अनुसूचित जाती महिला राखीव), संजय वसंतराव बागले (विकलांग) व नर्गिस शब्बीर आत्तार (अल्पसंख्यांक) यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण आणि पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४ नुसार श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सोमनाथ…
बुधवार, २१ ऑगस्ट बदलापूर येथील अत्याचार प्रकरणाचा राज्यभर निषेध सुरू असताना संगमनेरमध्ये देखील शिवसेना आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने रस्त्यावर उतरून ‘लाडक्या बहिणींना पैसे नको, सुरक्षा द्या’, अशा घोषणा देत राज्याच्या गृह खात्याचा निषेध करण्यात आला. महिला संपर्कप्रमुख बेबीताई लांडगे, विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संगमनेरमध्ये बुधवारी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी बदलापूर अमानवीय घटनेचा निषेध करत नराधम आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. तसेच पीडितांना न्याय देण्यास विलंब करणाऱ्या गृह खात्याचा घोषणा देत धिक्कार करण्यात आला. राज्याच्या गृहमंत्री पदावर कार्यरत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ सपशेल अपयशी ठरला असल्याचा आरोप…
बुधवार, २१ ऑगस्ट गृह विभागाने राज्यातील ८२ पोलीस निरीक्षकांच्या बढतीचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेला स्वतंत्र पोलीस उपाधीक्षक मिळाले आहे. तर गेल्या आठवड्यातच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांची देखील बढतीवर नाशिक पोलीस अकादमीत पोलीस उपअधीक्षक म्हणून बदली झाली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाजन यांच्या रिक्त झालेल्या जागी आता पोलीस अधीक्षक आता कोणत्या पोलीस निरीक्षकाला संधी देतात, याकडे लक्ष लागले आहे. आगामी सण, उत्सव आणि होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता संगमनेर शहर पोलीस ठाण्याला नवे पोलीस निरीक्षक मिळतात की महाजन यांच्याकडेच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार राहतो हे…
बुधवार, २१ ऑगस्ट पुणे : अल्पवयीन मुलीला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिला दारूपासून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या मैत्रिणीचा तर आरोपीच्या मित्राचा देखील सहभाग समोर आला आहे. शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या फिर्यादीवरून पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. नीचपणाचा कळस गाठणाऱ्या या घटनेबाबत अधिक माहिती अशी, पीडित मुलगी आणि आरोपी यांची ओळख झाली होती. या ओळखीतून आरोपी मुलाने तिला अमिष दाखवून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यासोबत तर प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर तिच्याशी गोड…
बुधवार, २१ ऑगस्ट पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण, नैतिक मूल्याची घसरण, व्यसनाधिनता यासारख्या कारणांमुळे समाजात गुन्हेगारी वाढत आहे. तरूणांचे प्रमाण यामध्ये वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यांच्या हातामध्ये बेड्या पडत आहेत. तरूणांच्या हातामध्ये नवनिर्मिती क्षमता आहे. समाजाचे भवितव्य तरूणांच्या हातामध्ये आहे. जीवन जगत असताना इतरांच्या दुःख, वेदना समजावून त्या कमी केल्यास निकोप आणि सुदृढ समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन विधी सेवा प्राधिकरणाच्या जिल्हा सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटिल यांनी केले. कलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थींचे मनोबल वाढण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने…
आजचे राशीभविष्य बुधवार २१ ऑगस्ट २०२४ या राशीसाठी आर्थिक लाभ तर इतर राशींसाठी… मेष— धनस्थानी गुरु, मंगळ, हर्षल युती आज छप्पर फाडके आर्थीक लाभ होण्याची शक्यता. तब्येतीला सांभाळा, पोटाचे आजार होण्याची शक्यता. वृषभ— नवीन वाहन घेण्याची ईच्छा असेल तर ती आज पुर्ण होईल. आज नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. मिथुन— राशी स्वामी बुध, रवी, शुक्राच्या युतीमधे पराक्रम स्थानी. आज आपल्या हातुन समाजासाठी काहीतरी मोठे कार्य होण्याची शक्यता. कर्क— आज राशीस्वामी अष्टमेशाबरोबर अष्टमस्थानी. सर्व स्वप्न पुर्ण होण्याचा दिवस. सिंह— आज तुमचा आत्मविश्वास तुम्हाला तुमचे स्वप्न पुर्ण करण्यास मदत करेल. दुपारनंतर उत्साही वातावरण, घरातील सगळे आज तुम्हाला मदत करण्यास उत्सुक असतील. कन्या— कोर्ट…
मंगळवार, २० ऑगस्ट मुंबई : बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश देत त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशीदेखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजण्यास सांगितले. ज्या…
आजचे राशीभविष्य – मंगळवार २० ऑगस्ट २०२४ मेष— कोर्ट कचेरीपासुन सावध रहा. ज्या विषयाची पुर्ण माहीती नाही त्यामधे पडु नका. वृषभ— आज सर्व काम मंद गतीने होतील. बहीणीसाठी खरेदीचा दिवस. आनंदी दिवस. मिथुन— आज प्रवासात दिवस जाईल. घरात आनंदी वातावरण राहील. शक्यतो जबाबदारीने वागा. कर्क— आज चारी बाजुने पैशाचा ओघ राहील. मित्र कंपनीकडुन फसगत होण्याची शक्यता. सिंह— आज सर्वाशी प्रेमाने वागाल. मानसीक ताणतणाव वाढेल. खबरदारी घ्या. कन्या— कारण नसताना चोरीचा आळ येण्याची शक्यता. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. पैसा कुठे अडकवू नका. तुळ— आज शक्यतो प्रवास टाळा. कोणाला जामीन राहु नका. फसगत होण्याची शक्यता. वृश्चीक— स्वतःचे घर घेत असाल तर आज…
