Author: Annant Ppangarkar

गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या आजचे राशिभविष्य मेष – आज कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतील आणि मेहनतीचे चांगले फळ दिसेल. कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद साधताना संयम ठेवा. आर्थिक नियोजन नीट केल्यास फायदा होईल. वृषभ – आज खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, अनावश्यक खरेदी टाळा. कामात स्थिरता राहील आणि जुन्या प्रलंबित बाबी मार्गी लागतील. जोडीदारासोबत शांत वेळ घालवता येईल. मिथुन – आज संवादातून अनेक प्रश्न सुटतील, तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल. प्रवासाचा योग संभवतो आणि नवीन ओळखी होऊ शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्क – आज भावनिक निर्णय घेताना थोडा विचार करा, मन अस्वस्थ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मंत्रालयातील विविध कामांच्या निमित्ताने मुंबईत गेलेले आमदार अमोल खताळ यांनी मूळचे संगमनेरचे असलेले टॅक्सीचालक महेश चकोर यांच्या टॅक्सीतून प्रवास करत आपुलकीने संवाद साधला. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा कार्यकर्ता ही आपली ओळख त्यांनी मुंबईसारख्या महानगरातही जपली असून, त्यांच्या या साधेपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महेश चकोर हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत टॅक्सी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. आमदार खताळ मुंबईत आल्याचे समजताच चकोर यांनी त्यांना आपल्या टॅक्सीतून प्रवास करण्याचा आग्रह धरला. त्यांच्या प्रेमळ आग्रहाखातर आमदार खताळ यांनी कोणतीही पदाची प्रतिष्ठा आड न आणता टॅक्सीतून सफर केली. या प्रवासादरम्यान आमदार खताळ यांनी चकोर यांच्या कुटुंबाची, व्यवसायाची आणि मुंबईतील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व खासदार सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या प्रती फाडण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत बाळासाहेब थोरात यांनी संबंधितांवर जोरदार टीका केली आहे. लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र ते व्यक्त करताना सुसंस्कृतपणा आणि राजकीय शिष्टाचार जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीमध्ये कोणत्याही पुस्तकातील विचारांशी मतभेद असू शकतात आणि त्यावर टीका करण्याचा किंवा असहमती व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, त्यासाठी संबंधित पुस्तक वाचून त्यातील विचार समजून घेत वैचारिक चर्चा करणे अपेक्षित असते. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पुस्तकाच्या प्रती फाडण्यासारखे कृत्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि साठवणुकीविरुद्ध महसूल प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिज भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईत खांडगाव आणि निमज परिसरातून लाखों रुपयांचा वाळूसाठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी दोन वेगवेगळ्या ठिकाणी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खांडगाव येथील फाट्यापासून खांडेश्वर मंदिर रोडच्या आतील बाजूस एका ठिकाणी विनापरवाना मोठा वाळूसाठा करून ठेवल्याची गुप्त माहिती महसूल पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार कार्यालयाच्या भरारी पथकाने आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी खांडगाव परिसरात छापा टाकून पाहणी केली. यावेळी मंगेश बाबू केदारी याच्या मालकीच्या जमिनीवर कोणतीही पूर्वपरवानगी किंवा परवाना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनने दाखल एका फसवणुकीच्या गुन्ह्यात महत्त्वाची कारवाई करत जप्त केलेले १८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड फिर्यादीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाच्या आदेशानुसार परत केले आहेत. नोव्हेंबर २०२५ दरम्यान तेजस मारुती परदेशी या संशयिताने फिर्यादी चंद्रशेखर विलास शिंदे यांच्या मुलीचा विश्वास संपादन करून तिच्याकडील सोन्याचे विविध दागिने घेतले होते. मात्र, ते दागिने परत न करता त्यांची परस्पर विल्हेवाट लावून विश्वासघात केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार ११ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण १८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड जप्त…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरमध्ये बॅनरबाजीचा कांगावा करण्यापेक्षा नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे. आमदार अमोल खताळ यांच्या विकासकामांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आधी काँग्रेसच्या सत्ताकाळातील विकासशून्य कारभाराचा हिशोब द्यावा, अशा शब्दात शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी करत काँग्रेस पुढाऱ्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आमदार खताळ हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले संघर्षशील नेतृत्व असून त्यांना सामान्यांच्या अडचणींची जाणीव आहे. ते संगमनेरच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवून केवळ बॅनरबाजीचा मुद्दा उपस्थित करणे म्हणजे जनतेचे लक्ष विकासापासून विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, खताळ यांच्यावर टीका करून आपले राजकीय अस्तित्व टिकविण्याचा हा केविलवाना प्रयत्न असल्याचे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. दुसऱ्यांना सल्ले देणे…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जावान राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखण्यात यश येईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग मोकळे होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – आजचा दिवस शांततेने पार पाडावा. कामाच्या ठिकाणी काही किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे. संयम बाळगल्यास सर्व गोष्टी अनुकूल होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. प्रवासाचे योग आहेत. मिथुन – बौद्धिक कामांमध्ये यश मिळेल. मित्रांच्या भेटीगाठी आनंद देतील. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मनावरचा ताण कमी होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळी चांगली बातमी कानावर पडेल. कर्क – कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतता नांदेल. आई-वडिलांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यात महसूल विभागाने लक्षवेधी धडक कारवाई करीत वाळू तस्करांविरोधात उघडलेल्या मोहिमेत चार गुन्हे दाखल करून सुमारे ५० वाळूतस्करांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून ११ लाख ९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षातील महसूल विभागाची ही मोठी कारवाई ठरली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचा गैरफायदा घेत काही अधिकारी व कर्मचारी रजेवर असल्याचा फायदा उठवत वाळूतस्करांनी प्रवरा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारच्या जनता दरबारात आणि जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आढावा बैठकीत दिलेल्या कठोर कारवाईच्या निर्देशांनुसार तहसीलदार धीरज मांजरे यांनी महसूल पथकांना कारवाईच्या सूचना दिल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील मदिनानगर भागात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या पथकाने मोठी धडक कारवाई करत गोवंश कत्तलीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ३ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (१७ नोव्हेंबर २०२६) सकाळी ९:१५ ते १०:१५ या वेळेत संगमनेर शहरातील मदिनानगर, गल्ली नं. ०२ मधील मतीन बशीर कुरेशी याच्या पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या खात्रीशीर खबऱ्याच्या माहितीनुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपी मतीन बशीर कुरेशी (वय १८ वर्षे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यात सध्या प्रत्यक्ष विकासकामांपेक्षा गावोगावी बॅनरबाजी करून विकास झाल्याचे आभासी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमदार अमोल खताळ यांनी या दिखाऊपणातून बाहेर पडून प्रत्यक्ष विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे, असा सडेतोड सल्ला माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद वर्पे यांनी दिला आहे. माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विकासकामांवर स्वतःच्या नावाचे लेबल लावून श्रेय लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप वर्पे यांनी केला. तसेच पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या दूरदृष्टीतून आणि प्रयत्नांतून सुरू असलेल्या कामांचेही श्रेय स्वतःकडे घेऊन टेंभा मिरवणे थांबवावे, असे त्यांनी स्पष्ट केले. वडगावपानमधील ॲसिड हल्ल्याचा आरोपी अजूनही मोकाट असल्याचा मुद्दा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर मोठी छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १४०० किलो गोमांस आणि कत्तलीचे साहित्य असा एकूण ४ लाख २२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि अंमलदार अतुल लोटके, गणेश लबडे, प्रकाश मांडगे, अमोल आजबे, संभाजी कोतकर यांचे पथक संगमनेर शहर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरमध्ये शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त माजी पदवीधर आमदार सुधीर तांबे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. संगमनेर तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने नवीन रोड (इंदिरा गांधी मार्ग) आणि बस स्थानकासमोर आज मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना तालुकाप्रमुख अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख अमित चव्हाण यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. बाळासाहेबांनी मराठी…

Read More

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे अस्तित्व काळाच्या मर्यादा ओलांडून पिढ्यान्‌पिढ्या प्रेरणा देत राहते. हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे असेच एक झंझावाती व्यक्तिमत्त्व! बाळासाहेब म्हणजे केवळ एक नेता नव्हते, तर मराठी माणसाच्या अस्मितेचा बुलंद आवाज होते. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी जिद्द, हिंदुत्वाविषयीची ठाम भूमिका, मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढण्याची निर्भीड वृत्ती आणि कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे! १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना करून त्यांनी मराठी माणसाला संघटित होण्याची ताकद दिली. सामान्य माणसाच्या मनातील असंतोषाला त्यांनी संघर्षाची दिशा दिली. शिवसेना ही केवळ राजकीय संघटना न राहता ती प्रत्येक शिवसैनिकाच्या स्वाभिमानाची, निष्ठेची आणि अस्मितेची ओळख…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मागील काळात केवळ माणसांची जिरवाजिरवी करण्याचे राजकारण झाले, आपण मात्र जमिनीत पाणी जिरविण्याला आणि विकासकामांना प्राधान्य देत आहोत असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे शिवसेना शाखेचा शुभारंभ तसेच सभा मंडपासह जगदंबामाता मंदिर अशा सुमारे १ कोटी ६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार अमोल खताळ आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार खताळ म्हणाले की, तालुक्यात लवकरच जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार असून, गावोगावी बंधाऱ्यांची दुरुस्ती व खोलीकरण करून पाणीसाठा वाढविण्यावर भर दिला जाईल. आपण कशा पद्धतीने काम करतो…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरात अलीकडच्या काळात वाढलेल्या घरफोड्या आणि गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत आमदार सत्यजीत तांबे थेट अ‍ॅक्शन मोडमध्ये आले. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी सोमवारी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये विशेष बैठक घेत पोलिसांना धारेवर धरले. गुन्हेगारांचा तातडीने बंदोबस्त करा, अन्यथा खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत त्यांनी विनानंबर प्लेट वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. या महत्त्वपूर्ण बैठकीला पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी दुष्काळी परिस्थितीची झळ पाहता चोरी व घरफोड्यांच्या घटनांमध्ये आणखी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ‘समान काम, समान वेतन’ या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील कर्मचाऱ्यांनीही मंगळवारपासून (दि. १७ नोव्हेंबर) न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या सामूहिक निर्णयानुसार, मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील जिल्हा व तालुका न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, या मागणीसाठी हे बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला अहिल्यानगर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आणि जिल्ह्यातील चारही कर्मचारी संघटनांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. संघटनेचे अध्यक्ष अंकुश सांगळे आणि कार्यकारी सचिव रविंद्र सूर्यपुजारी यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकारी…

Read More

प्रवीण बागडे काही माणसे काळाच्या ओघात विस्मृतीत जातात, तर काही माणसे काळालाच आपली दखल घ्यायला भाग पाडतात. त्यांच्या विचारांशी सहमत असणारे आणि असहमत असणारे असे दोन्ही वर्ग असतात; परंतु त्यांच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करणे कोणालाही शक्य नसते. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे अशाच वादळी व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. त्यांच्या आवाजात आक्रमकता होती, शब्दांत धार होती, भूमिकेत ठामपणा होता आणि राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची विलक्षण क्षमता होती. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण करताना, केवळ एका राजकीय नेत्याला अभिवादन करणे नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासातील एका महत्त्वपूर्ण पर्वाचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेवर तीव्र संताप व्यक्त केला असून, आमदार रोहित पवार यांना संयमाचा सल्ला दिला आहे. सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियावरील आपल्या विस्तृत पोस्टमधून राजकारणातील वाढत्या निष्ठूर प्रवृत्तीवर बोट ठेवले आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीचे आणि परस्परांमधील विश्वासाचे नाते आपण अतिशय जवळून पाहिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील काही वर्षांतील राज्याच्या राजकारणातील अनेक चढ-उतारांमध्ये अजितदादांनी देवेंद्रजींना खंबीर साथ दिली. अनेकदा स्वतःच्या राजकीय सोयीपेक्षा दिलेला शब्द महत्त्वाचा मानून, स्वकीयांचा विरोध पत्करूनही त्यांनी देवेंद्रजींच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. देवेंद्र…

Read More

मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जावान राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी सांभाळाव्यात. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे हिताचे राहील. वृषभ – आजचा दिवस आर्थिक दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यावसायिक प्रवासाचे योग आहेत, जो फलदायी ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. मिथुन – आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल आहे. अभ्यासात मन लागेल आणि यश संपादन कराल. मित्रपरिवाराची साथ लाभेल. नवीन विचारांमुळे कामात नाविन्य आणू शकाल. संध्याकाळी मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आहे. कर्क – आज कौटुंबिक जीवनात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात दत्तदिमंदिराजवळ एका जुन्या घरात घरफोडीची घटना घडली आहे. योगेश शांताराम जोशी (वय ३६ वर्षे, व्यवसाय: शेती, रा. जोर्वे, ता. संगमनेर, जि. अ.नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दिनांक १४ नोव्हेंबर) रात्री नऊ ते १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरांनी गावातल्या दत्त मंदिराच्या पाठीमागे सुरक्षा भिंतीच्या आत असलेल्या जुन्या घराच्या सुरक्षा भिंतीवरून आत प्रवेश केला. कडी लावलेल्या दरवाज्याची कडी काढून कपाटाच्या लॉकचे नुकसान करत चोरांनी कपाटात कापडी पिशवीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि वैयक्तिक रोख रक्कम असा एकूण ४२,५०० रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय…

Read More