Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शेतातील मातीचा भराव सुरू ठेवण्यासाठी कारवाईची भीती दाखवून १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने एका वनपालाला रंगेहात पकडले आहे. जहीर सिराज शेख (वय ४७) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित वनपालाचे नाव आहे. रविवारी (दि. २५) दुपारी माळेगाव येथील हॉटेल शिवकृपा येथे सापळा रचून तक्रारदाराकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. एसीबीने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, तक्रारदाराची कोऱ्हाळे खुर्द येथे ४ हेक्टर शेतजमीन आहे. अलीकडील पावसामुळे शेतातील माती वाहून नीरा नदीत गेल्यामुळे त्यांनी नदीपात्रातील माती पुन्हा शेतात टाकण्याचे काम सुरू केले होते. मात्र, गत २६ सप्टेंबर रोजी वनपाल जहीर शेख…

Read More

आजच्या दिवसाचे राशिभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी जुळवून घ्यावे. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. धार्मिक ग्रंथांच्या वाचनात वेळ जाईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. वृषभ – आजचा दिवस खर्च आणि आराम यांच्यात संतुलन राखण्याचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी, विशेषतः पोटाची जुनी तक्रार डोके वर काढू शकते. मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवावा लागेल. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवावा. मिथुन – आज मित्रांकडून आणि ओळखीच्या व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेलेधन हाती येऊ शकते. मुलांच्या अभ्यासामुळे काहीशी चिंता वाढू शकते. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि कागदपत्रे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ग्रामीण भागातील गरजू महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत, माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने एक अत्यंत दिलासादायक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांसाठी नॉर्मल म्हणजेच प्राकृतिक प्रसूती असो वा सिझेरियन (शस्त्रक्रिया) असो, दोन्ही प्रकारच्या प्रसूती पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत. केवळ प्रसूतीच नव्हे, तर गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात गर्भाची योग्य वाढ, प्रकृतीची तपासणी आणि कोणत्याही गुंतागुंतीशिवाय प्रसूती व्हावी, यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या चारही सोनोग्राफी तपासण्या देखील पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पाच हजाराहून अधिक एएनसी रुग्ण महिलांनी प्रसूतीपूर्व सेवांचा लाभ घेतला आहे;…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- गेल्या चाळीस वर्षांत विविध सत्तास्थाने मिळूनही संगमनेर शहरातील संजय गांधी नगर आणि वडार वस्ती परिसरातील नागरिकांच्या घरांचा व मालकी हक्काचा प्रश्न सुटू शकला नाही, अशी खरमरीत टीका करत या भागातील रहिवाशांच्या घरांचे उतारे त्यांच्या नावावर करून देण्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. शहरातील वडार वस्ती व संजय गांधी नगर येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. निवडणुकीपुरता मतांसाठी वापर करून मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना रोखून आता नागरिकांच्या मनातील भीती दूर केली जाईल आणि त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आपण कटिबद्ध राहू, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. यापूर्वी तत्कालीन महसूलमंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करत १५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतील कासारवाडी-खांडगाव प्रवरा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून नदीपात्रात टिप्परमध्ये वाळू भरत असताना सनी संजय चव्हाण आणि अमोल संजय जोंधळे या दोघांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान पोलिसांनी टाटा कंपनीचा टिप्पर आणि वाळू असा एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील खांजापूर येथे अग्नेश्वर मंदिराच्या कामावरून झालेल्या वादातून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी पंचायत समिती सदस्य अशोक बबन सातपुते हे शनिवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास खांजापूर गावातील अग्नेश्वर मंदिर येथे मंदिराचे सुरू असलेले बांधकाम पाहण्यासाठी गेले होते. त्याच वेळी तेथे असलेल्या पोपट शिवाजी सातपुते यांनी “देवाचे काम चालू आहे, एवढे पैसे लागणार नाहीत, हे सगळे पुढारी पैसे खातात” असे विधान केले. अशोक सातपुते यांनी “तुम्ही अशी काही बदनामी करू नका व फालतू चर्चा करू नका”…

Read More

प्रवीण पुरो – सत्ता मिळावी म्हणून मराठा समाजाला गोंजारणं, ती राबवता यावी म्हणून त्यांच्यात फूट पाडून त्यांना आपलंसं करणं, संकट आलं की त्या समाजाच्या नावाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची धार कमी करण्याचं कारस्थान रचणं, सत्ता स्पर्धेत कोणी आलं की त्याचे समाजाच्या नावाखाली पाय ओढणं, अशा कुटील कारस्थानांचा गोतावळा गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात उभा करण्यात आला आहे. इथे सत्तेतील सहकारी एकनाथ शिंदे यांनाही सोडलं जात नाही. सत्तेच्या स्पर्धेतून त्यांनी माघार घ्यावी यासाठी जरांगे यांच्या नेतृत्वाखालच्या आंदोलनाचा खुबीने वापर करून घेणं या गोष्टी राज्यात इतक्या खुबीने घडवल्या जात आहेत की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. ५०० कोटींच्या कथित फंडाची गोष्ट याच पद्धतीत…

Read More

आजचे राशिभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी उत्साही आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आला आहे. नोकरीच्या क्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून बाहेरचे खाणे टाळावे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. वृषभ – आजचा दिवस आर्थिक बाबतीत अत्यंत लाभदायक ठरेल. व्यवसायात नवीन लाभाचे मार्ग खुले होऊ शकतात. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि परस्पर समज वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्तम यश मिळवण्यासाठी अधिक एकाग्रतेची गरज भासेल. प्रवासाचे योग असून तो प्रवास सुखकर आणि फायदेशीर ठरेल. मिथुन – आज आपल्या वाणीत गोडवा राहिल्यामुळे अनेक कठीण कामे सहजतेने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील पठारभागाचा अपेक्षित विकास झाला नसल्याची खंत व्यक्त करत, या भागाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिली. महालवाडी, जवळे बाळेश्वरची शेंडेवाडी आणि वरुडी पठार येथील ढोरवाडी येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार खताळ यांच्या प्रयत्नातून ५३ लाख रुपये खर्चाच्या नवीन विद्युत रोहित्रांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी घारगाव महावितरणचे कनिष्ठ अभियंता संजय थोरात, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष शैलेश फटांगरे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार खताळ म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरही काही भागांत पुरेसा वीजपुरवठा नसणे दुर्दैवी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेले आरोपी जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी रात्रीच्या वेळी डीजे लावून, रस्त्यावर फटाके फोडत बेकायदेशीरपणे मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहरात घडला आहे. या घटनेमुळे सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाने याची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर डीजे जप्त करून डीजे मालकालाही गजाआड करण्यात आले आहे. दत्तनगर आणि टिळकनगर परिसरात घडलेल्या या प्रकरणात बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता अडवणे, मोठ्या आवाजात डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग करणे आणि रॅली काढून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात गाजत असलेल्या ‘मतचोरी’च्या मुद्यावर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारविरोधात जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘वोट बचाव, देश बचाओ’ या अभियानाला गती देण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी आमदार बाळासाहेब थोरात तीन दिवसांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. शनिवार २४ ऑक्टोबर ते सोमवार २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ते भोपाळ, रायसेन, विदिशा, राजगढ आणि सिहोर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा दौरा करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. केंद्रातील भाजप सरकारच्या काळात देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी आणि जातीयवादामुळे सर्वसामान्य नागरिक, तरुण आणि महिलांमध्ये प्रचंड…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या राजकीय, सहकार आणि कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तसेच संदीप उद्योग समूहाचे संस्थापक भानूदास एकनाथ कोतकर यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. भानूदास कोतकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केडगावचे सरपंच म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी नगर पंचायत समितीचे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि अहिल्यानगर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाने शिर्डी-पिंपळवाडी मार्गावरील रुई शिवारातील ‘हॉटेल न्यू सनराज’ येथे मोठी धडक कारवाई केली आहे. या धाडीत मध्यप्रदेश बनावटीचा तसेच महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला देशी-विदेशी दारू व बिअरचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला असून, एकूण ६ लाख १९ हजार ७२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बेकायदेशीर प्रकरणी तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे भरारी पथकाने रुई शिवारातील हॉटेल न्यू सनराज येथे ही कारवाई केली. यावेळी विवेक उर्फ जयनारायण मिसर (रा. गणेशवाडी, शिर्डी) याच्या ताब्यातून विविध नामवंत ब्रँडची देशी-विदेशी दारू, बिअर, मारुती सुझुकी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अनंत पांगारकर – राज्यभरात दुष्काळाचे सावट गडद झाले असून शेतकरी आणि नागरिक पाण्याचा एक-एक थेंब जपून वापरण्यासाठी धडपडत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याला शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केले असताना दुसरीकडे मात्र सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे निळवंडे धरणातून पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. मागील तब्बल ४० दिवसांपासून निळवंडे धरणाचे आवर्तन अविरत सुरू असून, आतापर्यंत साडेचार टीएमसी म्हणजे तब्बल ४ हजार ४१० दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेले आहे. ऐन दुष्काळाच्या तोंडावर सुरू असलेल्या या बेजबाबदार कारभाराविरोधात अकोले आणि संगमनेर तालुक्यातील जनतेमध्ये तीव्र संतापाचा लाव्हा उसळला आहे. पाण्याच्या या भयंकर नासाडीमुळे येत्या कडक उन्हाळ्यात संपूर्ण परिसराला भीषण पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. असे असतानाही…

Read More

आजचे राशीभविष्य- मेष – आज आरोग्याच्या काही तक्रारी जाणवण्याची शक्यता असून तुमचे मनोबल थोडे कमी राहू शकते. खर्च जास्त झाल्यामुळे मनात काहीशी चिंता राहील, त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. व्यापारी वर्गासाठी परिस्थिती सर्वसाधारण राहील, मात्र व्यवसायातील भागीदारीमध्ये काही मतभेद होण्याची शक्यता असल्याने शांत राहणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील किंवा जोडीदाराची चांगली मदत मिळाल्याने रखडलेली कामे मार्गी लागतील. वृषभ – आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून अतिशय लाभदायक ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील आणि जुन्या गुंतवणुकीतूनही चांगला धनलाभ संभवतो. नोकरी किंवा व्यवसायात तुमच्या प्रतिष्ठेत आणि सन्मानात वाढ होईल. नवीन प्रकल्पांवर काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरण गाजत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 500 कोटींच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलंच झोडलं आहे. एका माणसाला आधी स्वार्थासाठी जवळ केलं आणि मग बदनाम करण्यासाठी नियोजनावर प्रश्न उपस्थित करत पत्रकारांवरही या प्रकरणात दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं ते म्हणाले. सध्या महाराष्ट्रात एक ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. भाजपाचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भाजपाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या…

Read More

आजचे राशीभविष्य- मेष – आज तुमचे मन धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात अधिक गुंतलेले राहील. समाजात तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही तुमच्या कौटुंबिक वेळेचा आनंद घ्याल आणि कुटुंबासमवेत मजेत वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. मित्र आणि ओळखीच्या लोकांना भेटल्याने दिवस अधिक आनंददायी होईल. वृषभ – आजचा दिवस संमिश्र परिणामांचा असेल. महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी संयम आणि योग्य नियोजनाची आवश्यकता असेल. घाईघाईने घेतलेले निर्णय हानिकारक ठरू शकतात. प्रवासाचा योग बनत आहे, जो आनंददायक आणि फायदेशीर ठरेल. तुम्हाला मेहनतीचे योग्य परिणाम मिळतील, परंतु अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक असेल. मिथुन – आज घाईत महत्त्वाचे निर्णय घेणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राहता तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील वस्तीजवळ सुरू असलेल्या पोल्ट्री फार्ममुळे पसरणाऱ्या दुर्गंधी आणि माश्यांच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित पोल्ट्री फार्मवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुक्काम ठोकून आंदोलन करण्याचा थेट इशारा स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत दिनकर दशरथ शेळके आणि शिवाजी खंडू लहामगे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी तहसीलदार राहता यांना अधिकृत निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, आडगाव बुद्रुक येथील रहिवासी भागामध्ये सुरू असलेल्या पोल्ट्री फार्ममुळे परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. याचबरोबर माश्यांचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर नगरपालिका हद्दीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचा प्रकार समोर आला असून, आता या प्रकरणी महसूल विभाग आणि नगरपरिषद प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. बीएसएनएल (BSNL) कार्यालयाशेजारी आणि पोलीस कॉलनीसमोर असलेल्या भूमापन क्रमांक ८६/४१ मधील प्लॉटवर पसरलेले अतिक्रमण हटवण्यासाठी तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यासह नगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. शासकीय भूखंडावर झालेल्या अतिक्रमण संदर्भात शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रांताधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात नमूद केल्यानुसार, सदर ८६/४१ हा प्लॉट जिल्हाधिकारी यांच्या नावे असून तो तहसीलदार, तलाठी आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील जागृत आणि सर्व समाजासाठी प्रेरणास्थान असलेल्या श्री आवजीनाथ बाबा देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. लोहारे येथे आवजीनाथ बाबा यात्रा उत्सवानिमित्त दर्शन घेतल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी आमदार खताळ यांच्या हस्ते २० लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण उत्साहात पार पडले. खताळ म्हणाले, लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थान हे भाविकांच्या श्रद्धेचे मोठे केंद्र असून सध्या या देवस्थानाचा समावेश ‘क’ वर्गात आहे. त्याला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यास राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर विकासनिधी उपलब्ध होण्यास…

Read More