Author: अनंत पांगारकर

मुंबई, विशेष प्रतिनिधी राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीच्या कोट्यातून ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत थोरात यांच्या नावावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, त्यांच्या नावामुळे अहिल्यानगर जिल्ह्याला दिल्लीच्या राजकारणात मोठी संधी मिळण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया २६ मार्चपासून सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहेत. या जागेसाठी सुरुवातीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची चर्चा झाली होती, तर शिवसेनेनेही या जागेवर आपला दावा सांगितला आहे. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसने आपला उमेदवार देण्याचा विचार सुरू…

Read More

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अलाईनमेंटवरून (मार्ग निश्चिती) सुरू असलेला तांत्रिक पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. हा रेल्वे प्रकल्प कोणत्याही अनावश्यक वळणाशिवाय मूळ आराखड्यानुसार सरळ मार्गानेच व्हावा, या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अधिवेशनात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आणि तांत्रिक बाजू तपासण्यासाठी केंद्रातील तज्ज्ञ सल्लागारांची एक विशेष उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे. ही समिती पुढील ३ ते ४ महिन्यांत आपला सविस्तर अभ्यास अहवाल सरकारला सादर करेल. पुणे आणि नाशिक या दोन प्रमुख औद्योगिक शहरांना जोडणारा हा प्रकल्प…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  साखर कारखानदारी हा राज्याच्या आणि केंद्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वाचा स्तंभ आहे. या माध्यमातून सरकारला दरवर्षी हजारो कोटींचा महसूल मिळतो. मात्र, बदलत्या परिस्थितीनुसार या क्षेत्राला दर दहा वर्षांनी नैसर्गिक किंवा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा कठीण काळात सरकारने कारखानदारीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. सरकारने साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे, एमएसपी (आधारभूत किंमत) ४ हजार रुपये करावी, बिगरव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि पेट्रोलला सक्षम पर्याय असलेल्या इथेनॉलला योग्य भाव द्यावा, अशा विविध प्रोत्साहनपर योजना तातडीने राबवाव्यात, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  बालरंगभूमीच्या माध्यमातून संगमनेर येथे आगामी काळात विविध कार्यशाळा आणि उपक्रम आयोजित करण्यात येणार असून, हे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिले जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा बालरंगभूमीच्या अध्यक्षा तथा ख्यातनाम अभिनेत्री ॲड. नीलम शिर्के-सामंत यांनी केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संगमनेर शाखेतर्फे दि. ग. सराफ विद्यालयातील बंडूलाल बाफना सभागृहात आयोजित १७ व्या कला स्पर्धा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. बाल शिक्षण मंडळाच्या सचिव नीलाताई जोशी आणि संगमनेर नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजयकुमार दळवी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना नीलम शिर्के यांनी कलेच्या माध्यमातून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर : पाथर्डी शहरातील माणिकदौंडी चौक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गावठी कट्ट्याचा धाक दाखवून एका युवकाला मारहाण करत त्याची दुचाकी आणि रोकड लुटणाऱ्या दरोडेखोरांना पाथर्डी पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. या धाडसी कारवाईत पोलिसांनी पाचपैकी तिघा आरोपींना अटक केली असून, यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, माणिकदौंडी चौक परिसरातील फ्लेक्स व्यावसायिक अमिर हबिब शेख हे २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बॅनर लावण्यासाठी घराबाहेर पडले असता, त्यांच्या दुचाकीची वायर तोडत असलेल्या पाच संशयितांना त्यांनी हटकले. यावेळी आरोपींनी शेख यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद संगमनेरमध्ये उमटले आहेत. राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्र (TEAM RGSS) यांच्या वतीने संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी तातडीने पावले उचलून न्याय मिळवून द्यावा, अशी भावना यावेळी उपस्थित समर्थकांनी व्यक्त केली. पुणे येथे तुषार दामगुडे नामक व्यक्तीने हनुमंत पवार यांच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये अशा हिंसक घटनांना स्थान नसून हा हल्ला लोकशाही मूल्यांवर झालेला मोठा आघात आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला असून पोलीस…

Read More

दैनिक राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जावान असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल, मात्र जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा. आर्थिक बाबतीत आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा असून गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घेणे हिताचे ठरेल. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल आणि नवीन करारातून लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला तुम्हाला आज मोठ्या संकटातून वाचवू शकतो. मिथुन: आजचा दिवस संमिश्र फलदायी असेल. कामाचा…

Read More

मुंबई: संगमनेर शहराच्या सुनियोजित विकासाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आणि ‘व्हिजन २.०’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने संगमनेर सेवा समितीच्या नगरसेवकांचा मुंबई महानगरपालिका अभ्यास दौरा सुरू आहे. शहराच्या भविष्यातील गरजा ओळखून आधुनिक नागरी सुविधा आणि प्रगत व्यवस्थापन प्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या विशेष दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आणि नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह संगमनेर सेवा समितीचे सर्व नगरसेवक व नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ वॉर्ड कार्यालयाला भेट दिली. यावेळी प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि वेगवान निर्णयांची प्रक्रिया समजून घेण्यावर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त निर्मित ‘शतक’ या चित्रपटाला देशभरात मोठा प्रतिसाद मिळत असताना, संगमनेरमधील मालपाणी मल्टीप्लेक्समध्ये अद्याप हा चित्रपट प्रदर्शित न झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा महायुतीच्या वतीने चित्रपटगृह व्यवस्थापकांना निवेदन देऊन तातडीने शो सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालपाणी मल्टीप्लेक्सच्या व्यवस्थापकांची भेट घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रदीर्घ समाजकार्याचा इतिहास आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे, हा ‘शतक’ चित्रपटाचा मुख्य उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले. स्थानिक प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता असूनही तो प्रदर्शित…

Read More

संगमनेर | अनंत पांगारकर –  संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गोवंश हत्या आणि अवैध मांस विक्रीचे प्रमाण वाढल्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील सराईत कसाई आणि गो-तस्करांच्या विरोधात कठोर कायदेशीर पावले उचलून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) आणि ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्याला असलेला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी गोवंश हत्या रोखणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अनेकदा कारवाया…

Read More