Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज | अनंत पांगारकर दीर्घकाळ मुदतवाढ मिळालेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसा अखेर तब्बल 109 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीत प्रथमताच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली थोरात विरोधक निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. 28 एप्रिलला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी अखेरचा दिवस होता. राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घातल्याचे दिसते. त्यामुळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: उभी हयात सामाजिक योगदान देणारे ज्येष्ठ नागरिक हे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहेत. ज्या संस्कृतीमध्ये संवेदनशीलतेने ज्येष्ठांना सन्मान दिला जातो, ती संस्कृती जगाला विश्वशांतीची दिशा देणारी ठरेल, असे प्रतिपादन प्राचार्य भगवान जोशी यांनी केले. इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर तर्फे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या ५० नागरिकांना आधारवड कृतज्ञता समारंभात छत्री व काठी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सोमनाथ कळसकर गुरुजी होते. व्यासपीठावर इनरव्हील डिस्ट्रिक्टच्या अध्यक्ष रचना मालपाणी, अध्यक्ष वृषाली कडलग, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सेक्रेटरी ज्योती पलोड आदी उपस्थित होते. अनिता कोदे व विजय कोदे यांनी छत्री व काठी दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: शुक्रवारी (7 एप्रिल) जागतिक आरोग्य दिनानिमित्त लायन्स क्लब संगमनेर सफायर, माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक, नॅशनल इन्ट्रीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वॉकेथॉन (चालण्याची) स्पर्धेचे आयोजन केल्याचे एमजेएफ ला. गिरीश मालपाणी, ला. श्रीनिवास भंडारी, सफायर अध्यक्ष उमेश कासट, सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी यांनी सांगितले. सहा गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहे. स्पर्धेत वय वर्ष 45 ते 55, वय वर्ष 56 ते 65, वय वर्ष 66 ते 75 या वयोगटातील पहिल्या तीन पुरुष आणि महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकास रोख 1100/- रुपये, मेडल आणि प्रशस्तीपत्रक,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील साडेसहा लाख लाभार्थ्यांना रेशन दुकानांच्या माध्यमातून आनंदाचा शिधा कीट वाटप करण्यात येणार आहे. या योजनेत रेशन दुकानदारांनी पारदर्शकता ठेवत तत्परतेने कीटचे वाटप करावे, अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिल्या. राहातामधील खंडोबा चौक येथे आनंदाच्या शिधा कीट वाटपाचा कार्यक्रम महसूलमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, पुरवठा अधिकारी श्री.खरात, रेशन दुकानदार राजू वायकर तसेच स्थानिक पदाधिकारी मुकुंदराव सदाफळ, भाऊसाहेब जेजुरकर, अॅड. रघुनाथ बोठे, नानासाहेब बोठे, कैलास सदाफळ, चंद्रभान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँक, नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक आणि जी एस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सोनेतारण घोटाळ्यानंतर आता सोने मूल्यांकनकार गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याचा प्रवरा सहकारी बँकेतील 38 लाख 44 हजार 422 रुपयांचा फसवणुकीचा घोटाळा समोर आला आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शहाणे याच्यासह नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात बँकेचे संगमनेर शाखेचे व्यवस्थापक सुदाम किसन शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बँकेने नेमलेल्या अधिकृत मूल्यांकनकार जगदीश शहाणे याच्यामार्फत कर्जदाराने दिलेल्या सोन्याची शुद्धता तपासणी करून ते खरे किंवा खोटे याची खात्री केल्यावर सोन्याचे मूल्यांकनाचे तपासणी व ते खरे असल्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर राज्य पातळीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवसेनेची पुनर्बांधणी सुरू झाली आहे. संगमनेरसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्षाची कार्यकारिणी नव्याने जाहीर झाल्यानंतर “आता जिंकेपर्यंत लढायचं” हा आदेश मानत नवे पदाधिकारी कामाला लागले आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये शाखा बांधणीचा धडाका सुरू झाला असून एकाच वेळी १५ प्रभागांमध्ये १५ शाखांचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिली. संगमनेरमध्ये एकाच दिवसात पंधरा शाखांचा शुभारंभ प्रथमत:च होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना बांधणीला संगमनेरमध्ये वेग आल्याचे मानले जाते. या संदर्भात कतारी म्हणाले, आगामी काळात शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संघटनात्मक बांधणी नव्याने करून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर सहकारात दिशादर्शक आणि अनुकरणीय ठरलेल्या संगमनेरमधील सेवा सोसायट्यांनी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून उचललेल्या कर्जफेडीची परंपरा कायम ठेवली आहे. मार्च अखेर ८८ टक्के वसुली देत जिल्ह्यात संगमनेर प्रथम क्रमांकावर राहिला आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वसुलीमध्ये अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्याने सर्वाधिक वसुली दिल्याने तालुका प्रथम क्रमांकावर राहिला. याशिवाय तालुक्यातील ५७ सेवा सोसायट्यांनी जिल्हा बँकेला शंभर टक्के वसुली दिली असल्याची माहिती तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी दिली. सहकारातील दिवंगत नेते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील सहकाराची पायामुळे भक्कम केल्याने तालुक्यात विकासाचे जाळे निर्माण झाले आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: मनोरुग्णाचा झटका आल्याने दिवस-रात्र अन्न पाणी न देता त्याला दोरीने बांधून ठेवत मनोरुग्णाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या महिलेवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे हा प्रकार घडला असून सारंगधर गंगाधर पावसे (वय ६० वर्ष) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या संदर्भात त्यांच्या पत्नीने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून माधुरी प्रभाकर गोडसे (रा. लहीत लिंगदेव, ता. अकोले, हल्ली मु. आठरके वस्ती, हिवरगाव पावसा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात माहिती अशी, फिर्यादी माहेरी गेल्यानंतर तिचा पती सारंगधर गंगाधर पावसे यांना २९…

Read More

रविवार विशेष ○ प्रवीण पुरो सावरकरांच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपेयींचा शिवरायांवरील प्रेमाचा उमाळा कमालीचा आगलावा ठरला आहे. सावरकरांच्या बदनामीच्या निषेधार्थ गौरव यात्रेची घोषणा करणाऱ्या या पक्षाला छत्रपतींची बदनामी चालली. त्यांच्या गौरवार्थ यात्रा काढावीशी वाटली नाही. यावरून या मंडळींचा हेतू किती कलुषित आहे हे स्पष्ट होतं. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची गेल्या आठवड्यात एक पत्रकार परिषद होती. अदानीच्या संकटातही राज्यातील वाढत्या उद्योगाची स्थिती सांगण्यासाठी ते पत्रकारांना माहिती देत असावेत, असं वाटल्याने सर्वच जण या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते. पण अदानींच्या उद्योगाऐवजी सावरकरांचं तुणतुणं वाजवण्याच्या त्यांच्या या पत्रकार परिषदेने सगळेच आश्‍चर्य व्यक्त करत होते. राज्य सरकारच्या सावरकर गौरव यात्रेची भलामण करता करता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून २०२४ पर्यत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. गावपातळीवर या योजनेची अंमलबजावणी करताना गावात जावून योजनेतील त्रृटी दूर कराव्यात,‌ वेळ पडली तर पुन्हा सर्वेक्षण करा, एकाच कंपनीचे पाईप खरेदी करण्याची सक्ती मात्र करू नका, अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनांच्या कामांचा गावनिहाय आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी आमदार लहू कानडे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक पदाधिकारी दिपक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात आणि देशात हुकूमशाही पद्धतीने सध्या कारभार सुरू आहे. भाजप जाती-जातीत आणि धर्मामध्ये फुट पाडून राजकीय पोळी भाजत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम सुरू आहे. हे लोक देशातील लोकशाही आणि संविधान संपवण्याचे काम करत असून, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे याचाच भाग आहे. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी भाजपाच्या धर्मांध व्यवस्थेला उखडून टाका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. पटोले म्हणाले, मनुवादी व्यवस्थेने अन्नदाता, गरीब माणूस, छोटे दुकानदार यांना बरबाद करण्याचे काम केले. मोदी- अदाणींचा संबंध काय? अदाणींच्या कंपनीत शेल कंपन्यांचे २० हजार कोटी रुपये कुठून आले? फक्त अदानीलाच देशातील आणि परदेशातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज देश सध्या एका वेगळ्या संक्रमणातून जात आहे. सार्वभौम लोकशाही व्यवस्था आणि संविधानाला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्याने संविधान वाचावं, लोकशाही वाचावी या उद्देशाने काँग्रेसने राज्यात वेगवेगळी आंदोलने सुरू केली असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी मधुकरराव नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत मिलिंद कानवडे होते. नवले म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही जगातील सर्वात सामर्थ्यवान राज्यघटना असून सध्या याच घटनेच्या तत्त्वांची पायमल्ली होत आहे. विरोधात बोलणाऱ्या विरोधकांचा आवाज बंद करण्याचे काम लोकशाहीला घातक असून सर्वांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज स्वतःला महाविकास आघाडीचे नेते म्हणून घेणारे सोयीनुसार राजकारण करत आहे. पदवीधर निवडणुकीत त्यांना महाविकास आघाडी आठवली नाही, तेव्हा ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. आत्ताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोचा वापर करत पोपटपंची करणारे महाविकास आघाडीशी तरी प्रामाणिक आहेत का? असा सवाल राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत २७ कोटी रुपयांचा नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व एक कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. अध्यक्षस्थानी बापूसाहेब गुळवे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मावळत्या आर्थिक वर्षासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने संगमनेर तालुक्याला दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करतानाच तालुक्याने महसूल वसुलीचा नवा उच्चांक तयार केला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात संगमनेर तालुक्याची १४१% वसुली झाली असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेताना दिसत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी संगमनेर विभागाला १५ कोटी ६९ लक्ष रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ मार्च अखेर हे उद्दिष्ट ओलांडत संगमनेर तहसीलने तब्बल २२ कोटी २० लाख रुपयांची महसूल वसुली केली आहे. टक्केवारी मध्ये हा आकडा १४१% इतका आहे. गत आर्थिक वर्षात देखील संगमनेर तालुका महसूल विभागाने १२५% वसुली पूर्ण करण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करता राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा निर्णय महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. या जनहितार्थ निर्णयामुळे जनतेला दिलासा मिळेल असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला. वार्षिक बाजार मुल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जगंम मालमत्तेचे सरासरी दर निश्चित करण्यात येतात. यावर्षी क्रेडाई, विकासक व इतर सामान्य नागरिकांकडून जमीन व इमारत या मिळकतींचे दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात येऊ नये अशी विनंती राज्य शासनास करण्यात येत होती. या निवेदनांचा सकारात्मक विचार करुन रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर: जिल्ह्यात २९ मार्च ते ११ एप्रिल २०२३ या कालावधीत सण, उत्सव, जयंती, साजरे होणार आहेत. पोलीस भरती परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या आदेशानुसार वरील कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अहमदनगर शहर व संपूर्ण जिल्हा हद्दीत सण, उत्सव, सभा, आंदोलने त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही किरकोळ घटनावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात २९ मार्च ते ११ एप्रिल २०२३ या कालावधीत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून सुरु असलेल्‍या विविध व्‍यक्तिगत लाभाच्‍या योजनांपोटी संगमनेर तालुक्‍यातील १९ हजार १२३ लाभार्थ्‍यांना मार्च २०२३ अखेर १ कोटी ५३ लाख २४ हजार रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या विशेष प्रयत्‍नांमुळे हे अनुदान लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍यात वर्ग झाले आहे. राज्‍य शासनाच्‍या माध्‍यमातून विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी केली जाते. सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय दिव्‍यांग निवृत्‍ती वेतन योजना, राष्‍ट्रीय कुटूंबलाभ योजना अशा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील देवस्थान परिसर सुशोभीकरण कामांसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात देण्यात आलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मोठा निधी मिळवला असून तालुक्यातील प्रत्येक गावातील वाडी वस्तीसाठी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. आ. थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या मागणीवरून व पाठपुराव्यातून तालुक्यातील विविध गावांकरता प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२२-२३ अंतर्गत जिल्हास्तरावरील नवीन कामांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी राम नवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आजी-माजी मंत्र्यांसह विद्यमान आमदारांच्या सहभागामुळे शोभा यात्रेची रंगत आणखी वाढली होती. श्रीराम नवमी निमित्ताने विश्व हिंदू परिषद बजरंग दल, दुर्गावाहिनी-मातृशक्ती आयोजित शोभायात्रेला अभिनव नगर मधील श्रीराम मंदिरात सायंकाळी साडेपाच वाजता हनुमान चालीसा व आरतीने सुरुवात करण्यात आली. गीता परिवाराच्यावतीने यावेळी हनुमान चालीसांचे वाटप करण्यात आले. बस स्थानक परिसरात रामराज्य प्रतिष्ठानने केलेली विद्युत रोषणाई पाहण्यासाठी संगमनेरकरांनी गर्दी केली होती. शोभायात्रेत सुरुवातीला सनई चौघडे, घोडे, उंट, लहान मुले श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : नाशिकच्या नवरचना माध्यमिक विद्यालयातील संस्कृत विभागप्रमुख आणि संगमनेर स्वायत्त महाविद्यालयाच्या संस्कृत संशोधन केंद्रातील विद्यार्थिनी शकुंतला मुदलियार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केले आहे. त्यांनी संगमनेर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील माजी विभाग प्रमुख डॉ. रुपाली कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदवी प्राप्त केली. याबद्दल शकुंतला मुदलियार यांचे संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. अरुण गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र तासिलदार, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भावे, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ, महाविद्यालयाचे कुलसचिव संतोष फापाळे आदींसह प्राध्यापक उपस्थित होते. प्रोफेसर गायकवाड म्हणाले, शकुंतला मुदलियार यांनी विद्यार्थी दशक संगमनेर महाविद्यालयात…

Read More