Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन कोल्हापूर: देशातील प्रमुख शिक्षणसंस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि ‘पद्मश्री’ पुरस्कारविजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे ढासळली होती. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि राजकारण या सर्वच क्षेत्रांत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्र आणि देशभरात अनेक दर्जेदार शैक्षणिक संस्थांची स्थापना करून लाखो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची द्वारे खुली करून दिली. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठारभागाची पाण्याची गरज भागवणारे आणि बोटा परिसरासाठी वरदान ठरणारे कोटमारा धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणात मुबलक जलसाठा निर्माण झाल्यामुळे बोटा, आंबीदुमाला, कुरकुटवाडी यांसह लगतच्या गावांमधील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ३) दुपारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. १९९३ मध्ये उभारणी झालेल्या १५५ एमसीएफटी क्षमतेच्या या धरणावर परिसरातील शेती आणि पिण्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात असताना निसर्गाच्या कृपेने झालेल्या चांगल्या पावसामुळे रविवारी रात्री हे धरण पूर्ण भरून वाहू लागले. याप्रसंगी बोलताना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरातील एका व्यावसायिकाकडे पाकिस्ताननिर्मित कथित ‘ग्लोरी’ ब्रँडच्या सौंदर्यवर्धक क्रीमची विक्री होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, देशाची सुरक्षा, स्वाभिमान आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केली आहे. सूर्यवंशी यांनी या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या संगमनेर शहर पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलिसांचे विशेष अभिनंदनही केले आहे. तसेच प्रशासनाने या गंभीर प्रकरणाच्या तपासात वेळ काढूपणा केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, कथितरित्या पाकिस्तानमध्ये उत्पादित…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, फार्मर आयडी आणि ई-केवायसी (e-KYC) कामासाठी संगमनेर तहसील कार्यालयात येणाऱ्या ग्रामीण भागातील वयोवृद्ध शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून ई-केवायसी डेस्कवरील संबंधित कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांना तासंनतास ताटकळत राहावे लागत असून त्यांची कामे प्रलंबित राहत आहेत. ही गैरसोय तातडीने न थांबल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र ‘घंटानाद आंदोलन’ छेडले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील ६० ते ७० वयाचे शेतकरी दररोज तहसील कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. मात्र, या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडे अकोले…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन शिर्डी: राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत शिर्डीच्या उप माहिती कार्यालयाचा डॉ. मीरा ढास यांनी सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला. २००८ मध्ये मंत्रालयातून उपसंपादक म्हणून शासकीय सेवेस प्रारंभ करणाऱ्या डॉ. ढास यांनी यापूर्वी पुणे, लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे विविध प्रशासकीय पदे यशस्वीरीत्या सांभाळली आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची सदिच्छा भेट घेतली; यावेळी गाडीलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. विविध समाजमाध्यमे आणि प्रभावी संवाद कौशल्याच्या माध्यमातून शासनाच्या जनकल्याणकारी योजना तसेच साईभक्तांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सकारात्मकरीत्या पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असा विश्वास डॉ. ढास…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि आर्थिक लाभाचे योग बनत आहेत. कौटुंबिक वातावरणात आनंदाचे क्षण निर्माण होतील. वृषभ – आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस अतिशय चांगला राहील. थांबलेली कामे मार्गी लागतील आणि धनलाभाची शक्यता आहे. आरोग्याची थोडी काळजी घेणे गरजेचे आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन – व्यवसायात किंवा नोकरीत नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल आणि प्रवासाचे बेत ठरतील. मन प्रसन्न राहील आणि सकारात्मक विचारांमुळे यश मिळेल. कर्क – कामाचा ताण थोडा वाढू शकतो, परंतु तुमच्या संयमामुळे सर्व…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मुकुंद चिलवंत यांनी आज स्वीकारला. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात साध्या पण उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुकुंद चिलवंत यांना माहिती व जनसंपर्क विभागातील विविध स्तरांवर काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे. मंत्रालय, मुंबई येथील वृत्तचित्र शाखेत कार्यरत असताना त्यांनी शासनाच्या विविध विकासात्मक उपक्रमांचे प्रभावी दृकश्राव्य दस्तावेजीकरण, जनजागृतीपर माहितीपट निर्मिती तसेच जनसंपर्कविषयक विविध उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. अहिल्यानगर येथे पदभार स्वीकारण्यापूर्वी ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी चालवण्यात आलेल्या विशेष ३८ बससेवेच्या माध्यमातून संगमनेर एसटी आगाराने १० हजार भाविकांना सुरक्षित दर्शन घडवत तब्बल साडे २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. आषाढी यात्रेदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन संगमनेर आगारातून एसटी बसचे नियोजन करण्यात आले होते. या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ आणि ‘लालपरी’ या बसेसचा समावेश होता. गेल्या १० दिवसांच्या कालावधीत या बसेसनी ३८ हजार ५०० किलोमीटरचे अंतर कापून एकूण १३६ फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. या विशेष सेवेचा फायदा घेत तब्बल १० हजार २९ भाविकांनी सुखकर व सुरक्षित प्रवास करत पांडुरंगाचे दर्शन घेतले. भाविकांनी या नियोजनाबद्दल आणि…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या प्रयत्नांना आज यश लाभेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. आरोग्याची काळजी घ्या आणि खानपानावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आजचा दिवस संयम आणि धैर्याने काम करण्याचा आहे. व्यापाऱ्यांना पैशांच्या व्यवहारात विशेष काळजी घ्यावी लागेल. घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. संध्याकाळच्या वेळी थोडा विरंगुळा लाभेल. मिथुन – तुमच्या बुद्धिमत्ता आणि चातुर्यामुळे आज अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरीमध्ये वरिष्ठांची प्रशंसा मिळेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल जो भविष्यात फायदेशीर ठरेल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: खऱ्या नोटांच्या बदल्यात चौपट बनावट नोटा देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा संगमनेर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील जनता नगर परिसरात सापळा रचून पोलिसांनी १२ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या मोबदल्यात आठ लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवले होते. या बनावट नोटांच्या बंडलमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा लावून मध्ये ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ छापलेल्या खेळण्यातील नोटांचा वापर करून फसवणूक केली जात होती. पोलीस कॉन्स्टेबल सागर नागरे यांच्या फिर्याद दिली असून या प्रकरणी मयुर किशोर सिद्धपुरा (वय ३८, रा. खामगाव), उमेश कांबळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील सातवा मैल येथे रविवारी सकाळी अपघात घडला आहे. स्कार्पिओ आणि स्कुटी दुचाकीच्या या अपघातात आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथील रहिवासी असलेली आरुषी अनिल कर्पे ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे आपल्या स्कुटीवरून क्लाससाठी संगमनेरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. भंडारदरा परिसरामध्ये पर्यटनासाठी निघालेल्या एका भरधाव स्कॉर्पिओ (MH 10 DV 3447) कारने तिच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, आरुषीला या वाहनाने काही अंतर फरफटत नेले, यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या अंदाजानुसार, दुसऱ्या वाहनाला धोकादायक रीतीने ओव्हरटेक करत असताना स्कॉर्पिओचा वेग भरधाव होता. सदर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेरमधील एका दुकानावर धाड टाकून औषध प्रशासन आणि शहर पोलिसांनी मानवी आरोग्यास अत्यंत घातक असणाऱ्या १२ हजार ९०० रुपयांच्या बेकायदेशीर पाकिस्तानी ‘गोरी ब्युटी क्रीम’चा साठा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मिळालेल्या माहितीवरून संगमनेर शहर पोलिसांनी अहिल्यानगरचे औषध निरीक्षक सोमनाथ मुळे आणि राहुल पांडे यांच्या मदतीने ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, विजय खुळे बाबासाहेब सातपुते विजय आगलावे सागर नागरे यांचा या पथकात समावेश होता. याप्रकरणी मोगलपुरा, शिकलकर लाईन येथील रहिवासी दुकानदार शाहिद रियाज शेख (वय ३६) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुकानाची पाहणी केली असता तेथे ‘मेड इन पाकिस्तान’ व ‘पाकिस्तान…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीर गोमांसाची वाहतूक करणारी एक इनोव्हा गाडी जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख रुपयांची इनोव्हा कार आणि २ लाख ७० हजार रुपये किमतीचे ९०० किलो गोमांस असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१ ऑगस्ट) रात्री १:५५ वाजेच्या सुमारास संगमनेर येथील जमजम कॉलनी क्रमांक १० च्या रस्त्याकडेला एक संशयास्पद इनोव्हा गाडी (क्र. MH 12 KA 4795) उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता या वाहनामध्ये मानवी आरोग्यास धोकादायक ठरेल अशा पद्धतीने गोवंशाचे कापलेले मांस भरलेले आढळले. पोलीस पथक जवळ…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावरून केलेल्या आवाहनाला राज्यभरातून, विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि पुणे परिसरातील तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याची तयारी अनेक युवक, विद्यार्थी आणि विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी संघटनांनी दर्शवली आहे. फ्रेंडशिप डेच्या संदेशातून आमदार तांबे यांनी “मित्र एकत्र आले तर मोठा बदल घडवू शकतो” हा संदेश देत आपल्या मित्राला टॅग करण्याचे आणि ९ ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट शेअर होत असून, अनेक विद्यार्थी आपल्या मित्रांसह…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरात अवैध गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने तो जवळ बाळगणाऱ्या तीन जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ किलो १३० ग्रॅम सुका गांजा, एक दुचाकी, आयफोन आणि इतर साहित्यासह एकूण २,३४,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर पोलिसांनी रविवारी (२ ऑगस्ट) मध्यरात्री ही कारवाई केली असून तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. संगमनेर शहरातील जनता नगर भागात असलेल्या एका घरात आरोपी गांजा बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब अशोक गुंजाळ यांनी तक्रार दिली…
प्रवीण पुरो केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण अभियानांतर्गत शैक्षणिक व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलाचे विपरीत आणि दीर्घकालीन परिणाम दिसायला लागले आहेत. नव्या पिढीसाठी विनाशाची दिशा दाखवणारा हा मार्ग असल्याने देशाची घडण अडचणीत आणू शकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या सहा वर्षांत शिक्षणातील हा बदल वरवर भौतिक वाटत असला, तरी तो स्पर्धेची दिशा रोखणारा, देशातील युवकांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा बनला आहे. जेव्हापासून हे घडतंय तेव्हापासून देश जागतिक शिक्षणाला पारखा होऊ लागला आहे. आगामी काळात यात सुधारणा न झाल्यास भारतीय शिक्षण व्यवस्था भीषण संकटात सापडेल, हे सांगायला नको. याचे नैसर्गिक परिणाम क्रयशक्तीवर होऊन रोजगाराच्या संधी हातून जातील. तरुणांच्या हातातील काम जाईल. दिल्लीमध्ये ‘जेन-झी’…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास घेऊन येईल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी पूर्ण करून घेणे फायदेशीर ठरेल. मित्र आणि कुटुंबाच्या सहकार्याने मोठी कामे पार पडतील. आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल. वृषभ – व्यवसायात धनलाभाचे उत्तम योग आहेत. भौतिक सुखांमध्ये वाढ होईल आणि अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. कामातील गुप्त गोष्टी आणि वादग्रस्त विषय योग्य रीतीने हाताळा. मिथुन – जिद्दीने आणि मेहनतीने काम केल्यास अपेक्षित यश मिळेल. जुने नातेवाईक आणि मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन योजना आखू शकाल, मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कर्क – दैनंदिन कामांमध्ये काही अडथळे येण्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: दलित, शोषितांचा आपल्या साहित्यातून आवाज बुलंद करणारे आणि हक्कांसाठी लढा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून मोठी क्रांती केली आहे. त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी असून लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून संगमनेर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अद्यावत स्मारक लवकरात लवकर साकारण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली. संगमनेर हायटेक बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तही त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी बोलताना डॉ. तांबे यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर येथील ‘मालपाणी हेल्थ क्लब’ येथे गुरुवारी ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या सत्रात उपस्थितांनी आर्थिक नियोजन आणि संपत्ती निर्मितीविषयक मार्गदर्शन घेतले. सुरत येथील प्रसिद्ध प्रशिक्षक व आर्थिक तज्ज्ञ पलक शाह यांनी या कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनातील सोपी उदाहरणे देत आर्थिक शिस्त, ध्येय-आधारित गुंतवणूक, महागाईचा प्रभाव, चक्रवाढ व्याजाची ताकद, एसआयपी, वारसा नियोजन आणि मृत्युपत्राचे महत्त्व यांसारख्या मुद्द्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन बालरोगतज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश सिकची यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपीठावर ‘एनजे वेल्थ’चे विभागीय प्रमुख विक्रमसिंह परदेशी, लेखापरीक्षक…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत धनलाभाचे योग आहेत, परंतु विनाकारण होणारा खर्च टाळणे गरजेचे आहे. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि उत्साह राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज व्यवसायात किंवा नोकरीत थोडे संयमाने काम करण्याची गरज आहे. घाईगडबडीत घेतलेले निर्णय नुकसान पोहोचवू शकतात. आर्थिक स्थिती मध्यम राहील, त्यामुळे जुन्या गुंतवणुकीवर भर द्या. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्याने गैरसमज दूर होतील. संध्याकाळच्या वेळी मानसिक शांतता लाभेल. मिथुन – आजचा दिवस सकारात्मक बदलांचा आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे वेगाने पूर्ण होतील.…
