Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुकेवाडी येथील आग्नेश्वर मळा येथे घरफोडीची मोठी घटना समोर आली आहे. शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास विठ्ठल भानुदास शिंदे (वय ५३) यांच्या बंद घराची कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला.   घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने घरातील ४ लाख ४० हजार रुपयांचा साडेतीन तोळ्यांचा राणीहार, १ लाख २० हजार रुपयांचा १ तोळ्याचा नेकलेस, १ लाख २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन साखळ्या, १ तोळ्याची आणखी एक सोन्याची साखळी, अर्धा तोळ्याचे कानातील जोड, सोन्याचे ओम पान, कानातील बाळी, नाकातील नथ, मोरणी आणि चांदीचे जोडवे व छल्ला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा कणा ठरणाऱ्या नाशिक-पुणे थेट रेल्वे मार्गासाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार असून नाशिक-पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर सकाळी नऊ वाजता तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. संगमनेर, सिन्नर, अकोले, नारायणगाव, जुन्नर, मंचर, खेड आणि चाकण या संपूर्ण पट्ट्यातील जनतेच्या हक्काच्या या रेल्वेसाठी सर्वपक्षीय नागरिक, युवक आणि महिला या आंदोलनात पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहेत. नाशिक-पुणे-मुंबई या गोल्डन ट्रँगलच्या विकासासाठी नाशिक-पुणे रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी १९९८ पासून या थेट रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापासून ते केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महारेलपर्यंत केलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्याचे गोदावरी व कृष्णा खोरे जलसंपदा मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नाशिक-पुणे रेल्वे मार्गासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्या या वक्तव्याचा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक-पुणे रेल्वे हा लाखो नागरिकांच्या विकासाशी थेट जोडलेला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अशा गंभीर आणि तांत्रिक प्रश्नावर वस्तुनिष्ठ भूमिका मांडण्याऐवजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी साईबाबांच्या नावाचा आधार घेत शिर्डी मार्गाला विरोध करणाऱ्यांवर अप्रत्यक्ष दडपण आणण्याचा प्रयत्न केला आहे. “शिर्डी रेल्वेला विरोध करणाऱ्यांवर साईबाबा कोपतील” अशा आशयाचे विधान करणे हे…

Read More

आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जावान आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी किंवा बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम वेळ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जवळच्या नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः आहाराकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. वृषभ- आजचा दिवस संयम आणि शांततेने घालवण्याचा आहे. मानसिक स्थिरतेसाठी योग आणि ध्यानाचा सहारा घ्या. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा आणि घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नोकरी आणि व्यवसायात काही आव्हाने येऊ शकतात, परंतु…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर (प्रतिनिधी):  खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताची टंचाई भासू नये, यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने ३५७ मेट्रिक टन युरियाचा संरक्षित बफर स्टॉक विक्रीसाठी खुला केला आहे. कृषी विभागाच्या या नियोजनामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसे खत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चालू खरीप हंगामासाठी तालुक्याला एकूण ७०० मेट्रिक टन युरियाचा साठा मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३४९ मेट्रिक टन युरिया त्वरित उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, सध्या शेतीकामांचा वेग वाढल्याने युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही बाब लक्षात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा यासाठी नाशिक-पुणे रेल्वे कृती समिती संगमनेरच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जीएमआरटी हे रेल्वेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट मत मांडणाऱ्या डॉ. काकोडकर यांच्या समितीकडून रेल्वेच्या बाजूने सकारात्मक अभिप्रायाची अपेक्षा करणे म्हणजे आंदोलनाच्या तोंडावर जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, असा आरोप कृती समितीने केला आहे. त्यामुळे डॉ. काकोडकर यांना या समितीतून तत्काळ हटवावे, अन्यथा जनआंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा रोखठोक इशारा देण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यातील खोडद येथील ‘जीएमआरटी’ (GMRT) प्रकल्पाच्या कारणास्तव रेल्वे प्रकल्पात अडथळे निर्माण होत असताना, यावर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: राज्यभरात एसटी बसेसची अत्यंत केविलवाणी अवस्था झालेली असताना आणि प्रवाशांच्या भरमसाठ तक्रारी असताना, नाशिक-पुणे मार्गावरील बसेसला संगमनेर येथे थांबा मिळवण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आता आगामी आंदोलनाच्या तोंडावर कमिट्या स्थापन करून केवळ देखावा केला जात असून, हा जनतेच्या आंदोलनाची धार बोथट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीने केला आहे. परिवहन विभागातर्फे रेल्वेसंदर्भात समिती स्थापन करून जनतेची सरळ सरळ दिशाभूल केली जात आहे. जर राज्य सरकारला हा मार्ग खरोखरच करायचा होता, तर महारेलकडे वर्ग केलेले १ हजार कोटी रुपये माघारी का बोलावले, असा रोकडा सवाल कृती समितीने विचारला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजच्या दिवशी कामाचा ताण अधिक राहील, तरीही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा नाहक वाद निर्माण होऊ शकतात. वृषभ – आजचा दिवस भाग्याचा आणि मनःशांती देणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि कौशल्याचा योग्य वापर कराल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल आणि मानसन्मान वाढेल. कौटुंबिक वातावरण अत्यंत प्रसन्न राहील. मिथुन – थांबलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतील. नवीन धाडसी निर्णय घेण्यासाठी आणि मनोरंजनासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक बाबतीत मात्र उधळपट्टी टाळावी आणि आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी. कर्क – कामाच्या ठिकाणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली असून आमदार अमोल खताळ आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या प्रकल्पातील तांत्रिक अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाच्या प्रस्तावित संरेखनामुळे (अलाईनमेंट) खोडद येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (GMRT) प्रकल्पावर होणाऱ्या संभाव्य परिणामांमुळे कामात विलंब होत असल्याचे रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या तांत्रिक समस्येवर योग्य तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: संगमनेर शहरासह तालुक्यात आता सर्व विवाह सोहळे वेळेत आणि मुहूर्तावर पार पडणार असून रात्री १० वाजेनंतर डीजे व बँड वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालणारी नवी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.  विवाह सोहळ्यांमधील वाढता अनिष्ट पायंडा, वेळेचा अपव्यय आणि कायद्याचे होणारे उल्लंघन रोखण्यासाठी संगमनेर तालुका लॉन्स व मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष गोरख वसंतराव कुटे यांच्या पुढाकारातून आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत लॉन्स येथे आयोजित संयुक्त बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सध्या विवाह सोहळ्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत कर्कश्श आवाजात चालणारे हळदीचे कार्यक्रम आणि लग्नाची वेळ टळून गेल्यानंतरही निघणाऱ्या मिरवणुकींमुळे पाहुण्यांपासून ते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर:  ३३/११ केव्ही राजापूर उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी प्रमोद शिवराम हासे (रा. राजापूर, ता. संगमनेर) याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत महावितरणच्या कुरण शाखेचे सहाय्यक अभियंता दुर्गेश अनिल जगताप यांनी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी रात्री राजापूर कृषी फीडरवरील लोडशेडिंगच्या कारणावरून आरोपीने कार्यालयाच्या फोनवर संपर्क साधून कर्मचाऱ्याला धमकी दिली होती. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी आरोपीने राजापूर उपकेंद्रात जाऊन परस्पर गुंजाळवाडी येथील एबी स्विच अनाधिकृतपणे उघडला. तसेच ड्युटीवर असलेल्या यंत्रचालक कर्मचाऱ्याला धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला आणि वीज वितरण व्यवस्थेच्या सुरक्षिततेला धोका…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अकोले तालुक्यातील एका गंभीर प्रकरणात संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी (५ ऑगस्ट) आरोपी युवकाची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. किरण किसन सावंत असे मुक्तता करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून अवघ्या सहा महिन्यात या खटल्याचा न्यायालयाने निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा ठपका ठेवत अकोले पोलीस ठाण्यात किरण किसन सावंत या १९ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने आरोपीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, १० डिसेंबर २०२५ रोजी अकोले तालुक्यातील एक…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी ठरेल. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल आणि आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळा. वृषभ – आज तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश राहतील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता राहील. जुन्या मित्रांशी झालेली भेट मनाला प्रसन्नता देईल. मिथुन – आज मानसिक शांतता लाभेल. बौद्धिक आणि सर्जनशील कामांमध्ये यश मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. आर्थिक व्यवहारात मात्र थोडी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. बोलण्यावर संयम ठेवा. कर्क – आजचा दिवस सामान्य राहील.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अनंत पांगारकर | संगमनेर  सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संगमनेर नगर परिषदेच्या माध्यमातून बुधवारी शहराच्या नाशिक-पुणे मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. नेहमीप्रमाणे पालिकेच्या या कारवाया केवळ फार्स ठरत असून बुधवारची कारवाई देखील यातलाच प्रकार असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या कारवाया सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेरमध्ये फेरफटका मारत नेमकी राबविली जाणारी अतिक्रमण हटाव मोहीम कशी असते हे बघावे असा सूर उमटत आहे. अतिक्रमण मोहीम राबविताना निवडक अतिक्रमणांना हात लावू नये, आसपासची रस्ता अडविणारी अतिक्रमणे सोडून मध्येच एखाद्या व्यावसायिकाचे नुकसान करणे जेसीबीचा पंजा मारणे आणि अतिक्रमण मोहीम राबविल्याचा फार्स राबविणे हा येथील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अनंत पांगारकर | संगमनेर:  संगमनेर शहरातील देवाचा मळा परिसरात दोन दिवसांपूर्वी शहर पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई करत गोरगरिबांना मिळणारे शिधापत्रिकेवरील रेशनचे धान्य पकडले होते. मात्र मोठ्या प्रमाणात कागदपत्र रंगविण्यात आल्यानंतर देखील या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी पकडलेल धान्य शासकीय मालकीचे होते की ते काळया बाजारात विक्रीसाठी जात होते याचा खुलासा न झाल्याने पुरवठा महसूल आणि पोलीस यांच्या संदर्भात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. संगमनेर शहरालगतच्या शहर आणि गुंजाळवाडी सीमेवर एका बड्या हॉस्पिटल जवळ पोलीस पथकाने केलेली ही कारवाई सुमारे सात-आठ तास सुरू होती. कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन ट्रक, एक छोटा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. रुपाली चाकणकर यांच्यानंतर पक्षाने पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातीलच नेतृत्वावर विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. मुंबईतील शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला प्रफुल पटेल, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत महिला आघाडीची कमान वैशाली नागवडे यांच्याकडे सोपवण्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले. वैशाली…

Read More

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता घेऊन येईल. जोडीदारासोबतचा संवाद सुधारेल आणि भावनिक बंध मजबूत होतील. आर्थिक क्षेत्रात भविष्यातील गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी चांगला काळ आहे, परंतु घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा. व्यवसायात धनलाभाचे उत्तम योग असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. वृषभ – आजचा दिवस संतुलन आणि स्थैर्य घेऊन येईल. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि समाधान राहील. धार्मिक कार्यात किंवा अध्यात्मात मन रमल्याने मानसिक शांती मिळेल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते आणि आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल. मिथुन – कामाच्या ठिकाणी तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. नवीन प्रकल्प किंवा महत्त्वाची जबाबदारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  धुळे: पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांच्यावर धुळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. न्यायालयाने दिलेल्या एका तक्रारीच्या अर्जात सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४० हजार रुपये लाच स्वीकारताना पीएसआय साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई अविनाश सादरे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या सासऱ्यांच्या नावावर असलेल्या मौजे वलवाडी येथील घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करून एका फायनान्स कंपनीकडून सुमारे ३६ लाख १० हजार रुपयांचे गृहकर्ज काढून फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी तक्रारदाराच्या सासऱ्यांनी धुळे न्यायालयात फौजदारी अर्ज…

Read More

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आले असून अध्यक्षपदी समीर शाह, सचिवपदी संकेत काजळे तर खजिनदारपदी मोहित मंडलिक यांचा पदग्रहण सोहळा रविवारी (२ ऑगस्ट) पार पडला.  सामाजिक बांधिलकी जपत सेवा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्या ४३ व्या पदग्रहण समारंभ सोहळ्यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल जयेशभाई पटेल, आमदार सत्यजित तांबे, उद्योजक राजेश मालपाणी आणि सहाय्यक प्रांतपाल भागनाथ काटे आदी मान्यवर प्रमुख म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात मागील वर्षाचे अध्यक्ष विश्वनाथ मालाणी व सचिव सौरभ म्हाळस यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: सोशल मीडियावरून आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून सार्वजनिक शांतता भंग करणे आणि जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणे श्रीरामपूरमधील एका सराईत गुन्हेगाराला चांगलेच महागात पडले आहे. श्रीरामपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भात मंगळवारी (४ ऑगस्ट) श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. श्रीरामपूरच्या प्रभाग क्रमांक २ मधील रहिवासी आणि सराईत गुन्हेगार अज्जू उर्फ अजिम अन्वर पठाण याने आपल्या ‘ajjupathan998’ या इंस्टाग्राम आयडीवरून सार्वजनिक शांतता धोक्यात येईल असा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याचे समोर आले. या माहितीच्या…

Read More