Author: Annant Ppangarkar

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत ‘संगमनेर सेवा समिती’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर, आता स्वीकृत नगरसेवक पदासाठीची नावे निश्चित करण्यात आली आहेत. सामाजिक कार्यकर्त्या रचना मालपाणी यांच्यासह सोमेश्वर दिवटे आणि जावेद पठाण यांची  स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागली आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी आज या नावांची अधिकृत घोषणा केली. या निवडीबाबत अधिक माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर २.० चा जाहीरनामा आणि शहराच्या विकासाचे एक विशेष व्हिजन घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली होती. यावर विश्वास ठेवून संगमनेरच्या ७० टक्के मतदारांनी सेवा समितीला मोठे यश मिळवून दिले आहे. या विजयामुळे आमची जबाबदारी वाढली असून कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने स्वीकृत नगरसेवक…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी स्वातंत्र्य युद्धात उडी घेऊन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामात मोठे योगदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करताना आपल्या तत्त्वांची मूल्ये जपत निष्ठा, शिस्त, काटकसर आणि नवनवीन धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्ते निर्माण केले. सहकार, शेती, शिक्षण, समाजकारण आणि पर्यावरण या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य सदैव प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असलेल्या प्रेरणास्थळ येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर…

Read More

सौ. दुर्गा सुधीर तांबे (माजी नगराध्यक्षा, संगमनेर) महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात काही व्यक्ती अशा असतात, ज्या केवळ एका पिढीचे नेतृत्व करत नाहीत, तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी विचारांचा वारसा निर्माण करतात. माझे वडील, ज्यांना आम्ही सर्वजण आदराने ‘दादा’ म्हणायचो, म्हणजेच स्व. तीर्थरूप भाऊसाहेब संतूजी थोरात हे अशाच प्रगल्भ नेतृत्वांपैकी एक होते. नेते, सहकारमहर्षी, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक अशा अनेक विविध क्षेत्रांतील अभ्यासू नेतृत्व म्हणून दादांनी स्वतःची ओळख निर्माण केली. आमचा थोरात परिवार अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ‘जोर्वे’ गावचा. जोर्वे हे केवळ एक गाव नाही, तर ती एक प्राचीन संस्कृती आहे. ज्या संस्कृतीचा उल्लेख ताम्रपाषाणयुगीन कालखंडाशी जोडला जातो, त्या मातीत दादांचा जन्म १२…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा असून कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभाचे योग असून कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल, फक्त रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून खाण्यापिण्यावर संयम ठेवावा लागेल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका, कारण कुटुंबातील सदस्यांचा सल्ला आज तुमच्यासाठी मोलाचा ठरेल. मिथुन: व्यापार करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीकारक असून नवीन संधी चालून येतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल आणि मित्रपरिवारासोबत प्रवासाचे बेत आखले जातील, मात्र संवाद साधताना स्पष्टता ठेवा. कर्क: आज कामाचा व्याप वाढल्याने थोडा मानसिक तणाव जाणवू शकतो, पण तुमची जिद्द तुम्हाला यश…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी किंवा माहितीअभावी अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना सविस्तर निवेदन दिले आहे. आमदार खताळ यांनी निवेदनात नमूद केले आहे की, त्यांच्या संगमनेर मतदारसंघासह संपूर्ण राज्यातील अनेक लाभार्थी महिलांकडून या योजनेसंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहेत. प्रामुख्याने ई-केवायसी प्रक्रिया करताना अनेक महिलांकडून अज्ञानामुळे किंवा तांत्रिक चुकीमुळे ‘घरामध्ये शासकीय कर्मचारी आहे’ हा पर्याय निवडला गेला आहे. यामुळे संबंधित…

Read More

नाशिक: सात वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावासाची आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. किशोर दिनकर सोनवणे (वय २९, रा. महाकाली चौक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २ मे २०१९ रोजी नाशिकमधील सिडको परिसरातील साईबाबानगर, महाकाली चौक येथे घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी घरासमोर इतर मुलांसोबत खेळत होती. यावेळी आरोपी किशोर सोनवणे याने घराच्या गच्चीवरून एक उशी खाली फेकली. मुलीला ती उशी घेऊन गच्चीवर येण्यास सांगून, तिच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत आरोपीने तिचा विनयभंग केला. मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर, अंबड पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाने’ लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या या ज्ञानकुंभाला गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ३ लाख ९ हजार ४७२ नागरिकांनी भेट दिली असून, संपूर्ण परिसर जनसागराने ओसंडून वाहत आहे. माजी कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ४० एकरच्या विस्तीर्ण परिसरात हे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री दिनेश ठाकूर, केंद्रीय पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण मलिक, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या…

Read More

अहिल्यानगर- कोपरगाव शहर परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये अवैधपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पथकाने कोपरगाव परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई यशस्वी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध गॅस रिफिलिंग केंद्रांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश भोये यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकामध्ये पोलीस अंमलदार दीपक मेढे, राहुल द्वारके, राहुल डोके, सतिश भवर, सुनिल मालणकर आणि चालक भगवान धुळे यांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव ते संजीवनी कॉलेज रोडवरील एका कॉम्प्लेक्सच्या मागे मनोज चंद्रकांत…

Read More

राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी महाराष्ट्राची लाज आणि शरम अक्षरश: रस्त्यावर आणली आहे. पत्रकारितेच्या 35 वर्षांच्या काळात निवडणुकांची इतकी अधोगती आम्ही पाहिली नाही. गडबड केली तर हातची उमेदवारी जाईल, आचारसंहिता भंग केला तर पोलीस कारवाई होईल, अशा संविधानिक दडपणात होणार्‍या राज्यातील निवडणुका म्हणजे देशातील निवडणुकांचा आदर्श मानला जाई. पण गेल्या दहा वर्षांपासून निवडणुकांचं झालेलं अवमुल्यन पहाता निवडणुका म्हणजे केवळ बाजार झालाय, असंच म्हणता येईल. निवडणुकांतील वाढता काळाबाजार हे लोकशाहीचं अध:पतनच ठरलंय. याआधी महाराष्ट्रासारख्या राज्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन एव्हाना काहीसा बरा होता. पण विकासाच्या मुद्यापेक्षा लाळघोटेपणाला महत्व आल्यापासून महाराष्ट्र हे निवडणुकांसाठी नालायक राज्य ठरलं आहे. याची सर्वस्व जबाबदारी ही सत्ताधार्‍यांकडेच…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  ग्रामीण भागात आणि वनक्षेत्राच्या लगत राहणाऱ्या नागरिकांसाठी बिबट्याचा वावर हा आता केवळ भीतीचा विषय उरला नसून तो जीवघेणा ठरत आहे. शेतकरी, महिला आणि लहान मुले बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमावत असताना, शासन केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. संगमनेर तालुक्यातील अभियंता किरण सोमनाथ मैंदड यांनी या गंभीर प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्यमंत्र्यांपासून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ई-मेलद्वारे निवेदन धाडले आहे. तंत्रज्ञान असतानाही दिरंगाई का?- आजच्या आधुनिक काळात जिथे आपण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रांत करत आहोत, तिथे वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची पूर्वसूचना देण्यासाठी ‘कॅमेरा ट्रॅप्स’ आणि ‘मोशन सेन्सर’ यांसारख्या साध्या यंत्रणेचा वापर…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. भावंडांच्या मदतीने महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, मात्र घाईघाईत निर्णय घेणे टाळा. वृषभ: आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस फायदेशीर आहे. तुमची वाणी प्रभावी राहील, ज्यामुळे कठीण कामेही सुलभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि संध्याकाळी एखाद्या समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल. मिथुन: चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आज तुमची कल्पनाशक्ती विस्तारलेली असेल. नवीन विचार आणि योजना अंमलात आणाल. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही इतरांना प्रभावीत कराल. स्वतःच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे लक्ष द्या. कर्क: आज थोडा धावपळीचा आणि खर्चाचा दिवस असू शकतो. विनाकारण चिंता वाटण्याची शक्यता आहे, त्यामुळे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित आणि वैभवशाली’ शहर म्हणून ओळख असलेल्या संगमनेरला गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. शहरातील वाढती अमली पदार्थांची तस्करी, दहशत आणि चोऱ्यांच्या घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, ही गुन्हेगारी तातडीने थांबवावी, या मागणीसाठी शहरातील महिला पदाधिकारी कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात आज नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला तीव्र भावनांचे निवेदन देण्यात आले. शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात महिलांनी शहरातील विदारक परिस्थिती मांडली आहे. पोलीस निरीक्षक बारवकर यांनी महिलांच्या भावना जाणून घेत, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस पावले उचलण्याचे…

Read More

संगमनेर, अनंत पांगारकर-  गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या राजकीय वर्तुळात अत्यंत चर्चेचा आणि दोन्ही आमदारांच्या ‘पत्रक युद्धा’चा विषय ठरलेली मालमत्ता करावरील शास्ती माफी अखेर प्रत्यक्षात उतरली आहे. संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीतील थकबाकीदार मिळकतधारकांसाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘अभय योजना’ लागू करण्यात आली असून, यामुळे शहरातील हजारो मालमत्ताधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील थकीत व्याजात (शास्ती) तब्बल ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली असून, प्रशासकीय पातळीवर झालेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी पदभार हाती घेताच त्यांच्या कार्यकाळातील अंमलबजावणी होणारा हा पहिलाच मोठा निर्णय ठरला आहे. गेली अनेक वर्ष संगमनेरकरांना अपेक्षित असलेला निर्णय तांबे यांच्या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  शुद्धता आणि गुणवत्तेसाठी महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेल्या राजहंस दूध संघाने आता बेकरी उद्योगात आपले पाऊल टाकले आहे. ‘राजहंस मिल्क अँड बेक्स’ अंतर्गत उत्पादित करण्यात आलेल्या विविध दर्जेदार बेकरी पदार्थांचा भव्य शुभारंभ माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयात आयोजित ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शना’च्या उद्घाटन सोहळ्यात या नवीन उपपदार्थांचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले. याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार उभा असून दूध व्यवसायामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. संगमनेरची ओळख आता ‘दुधाचा तालुका’ म्हणून सर्वदूर पोहोचली असून राजहंसने नेहमीच आपल्या उत्पादनांची…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – थोर स्वातंत्र्यसेनानी आणि अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, ज्यांना सहकारातील संत मानले जाते, त्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती येत्या सोमवारी, १२ जानेवारी २०२६ रोजी ‘प्रेरणा दिन’ म्हणून संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील गावोगावी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अमृत उद्योग समूहाच्या वतीने मुख्य अभिवादन कार्यक्रम सकाळी ९ वाजता अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे होणार आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली असून, यावेळी माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ…

Read More

आश्वी, प्रतिनिधी-  आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत आश्वी खुर्द येथील दोन महिलांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे. महांकाळेश्वर मंदिर परिसरात सापडलेली ३० हजार रुपये किमतीची सोन्याची वस्तू मूळ मालकिणीला परत करून त्यांनी माणुसकी जपली आहे. २७ डिसेंबर रोजी महांकाळेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या उज्वला भंडारे यांना सोन्याची एक मौल्यवान वस्तू सापडली. त्यांनी ही माहिती पती मनोज भंडारे यांना दिली. त्यानंतर पत्रकार संजय गायकवाड यांच्या मदतीने सोशल मीडियावर याबद्दल संदेश प्रसारित करण्यात आला. दरम्यान, १२ वीत शिकणाऱ्या श्रावणी जगताप या विद्यार्थिनीलाही त्याच वस्तूचा उर्वरित भाग सापडला होता. तिनेही या संदेशाला प्रतिसाद देत संपर्क साधला. योग्य चौकशीअंती सदर सोने कांताबाई दत्तात्रय मांढरे यांचे…

Read More

मेष – मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खुश राहतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, मात्र जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ असून जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. वृषभ – आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. धावपळीच्या कामांमुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढा. व्यवसायात नवीन करार करताना कागदपत्रांची नीट पडताळणी करा. नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. घरातील थोरामोठ्यांचा सल्ला घेतल्यास कठीण प्रसंगातून मार्ग काढणे सोपे होईल. मिथुन – मिथुन राशीच्या व्यक्तींना आज वैचारिक स्पष्टता जाणवेल. नवीन…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- पिंपळे पाझर तलावातून दोन्ही गावांसाठी रब्बी हंगामाचे पाणी शुक्रवारी (९ जानेवारी) सोडण्यात आले. आमदार अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन जलसंपदा विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या, ज्याची अंमलबजावणी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव आणि पारेगाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चिंचोली गुरव व पारेगाव परिसरात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पिंपळे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र, रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिके सध्या पाणीअभावी धोक्यात आली होती. पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. ही समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  व्यावसायिक कामासाठी घेतलेली हातउसनवार रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश (चेक) बँकेत न वटल्याने संगमनेर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चं. प्र. रघुवंशी यांच्या न्यायालयाने एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. परक्राम्य संलेख अधिनियमाच्या कलम १३८ अन्वये हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादी ज्ञानेश्वर माधव वर्पे हे संगमनेर शहरात ‘वर्पे इन्श्युरन्स अँड मल्टी सर्विसेस’ नावाचा व्यवसाय करतात. आरोपी सागर भाऊसाहेब गोपाळे (वय ३८ वर्ष, रा. धांदरफळ बुद्रुक) यांचा ‘श्री स्वामी समर्थ ट्रान्सपोर्ट’ नावाचा व्यवसाय असून गाड्यांच्या विम्याच्या कामामुळे या दोघांचा परिचय झाला होता. जून २०२२ मध्ये आरोपीने आपल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी फिर्यादीकडून १ लाख २५ हजार…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  कृषी क्षेत्र हे अत्यंत व्यापक असून यामध्ये संशोधनासह आर्थिक समृद्धीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातील नवनवीन माहितीसाठी ‘कळस कृषी प्रदर्शन’ हे संपूर्ण राज्यात लोकप्रिय ठरले असून, अमृतवाहिनीतील या प्रदर्शनाच्या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्यावतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आयोजित ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाचे’ शानदार उद्घाटन थोरात यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष…

Read More