Author: Annant Ppangarkar

संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर बुद्रुकमधील सर्वे नं. १०६ (४४२) येथील गेल्या ४०-५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या शेकडो कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाव्यात यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी काल (सोमवार १४ जुलै) राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत तांबे यांनी संगमनेरमधील रहिवाशांच्या जमिनीच्या या गंभीर प्रश्नावर सविस्तर चर्चा करत तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली. महसूल मंत्र्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहे नेमका प्रश्न? संगमनेर बुद्रुक, सर्वे नं. १०६ (४४२) येथील अनेक कुटुंबे गेल्या चार ते पाच दशकांपासून त्यांच्या प्रत्यक्ष…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम आणि नागरिकांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आज (सोमवारी, १४ जुलै) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संगमनेरच्या विविध आरोग्यविषयक प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांची प्रमुख उपस्थिती होती.  खताळ म्हणाले, बैठकीत संगमनेरच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये १०० खाटांचे अत्याधुनिक स्त्री रुग्णालय मंजूर करण्याच्या मागणीसह, घुलेवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे, तसेच चंदनापुरी, धांदरफळ खुर्द आणि तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामीण…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहरात दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दिव्यांग भवनाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची व त्यासाठी नगरपालिकेने नेहरू गार्डनजवळ दिव्यांग भवनासाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.  गणेशनगर येथील नगरपालिका योग भवनात आयोजित एका कार्यक्रमात आमदार खताळ यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात-पाय, कॅलिपर्स आणि दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, डॉ. संदीप कचोरिया, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे शहर प्रमुख कैलास कासार, जालिंदर लहामगे यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार खताळ यांनी आपल्या राजकीय प्रवासात संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांग…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी: अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच त्याला विरोध आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून घेतलेला आहे. सरकारने कायदा मंजूर करून घेतला असला तरी काँग्रेसचा विरोध कायम असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या काळ्या कायद्याची होळी केली जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जनसुरक्षा कायद्यामागचा हेतूच मुळात काळा आहे. या कायद्याचा फायदा फक्त…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त नाशिक:  निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी लोकसंख्येनुसार सदस्य संख्या आरक्षणासह निश्चित केली आहे. ही सदस्य संख्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे, यामुळे आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, जामखेड, राहाता, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदे, पाथर्डी, देवळाली प्रवरा, शिर्डी या ११ नगरपरिषदा आणि नेवासे नगरपंचायत अशा एकूण १२ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका प्रस्तावित आहेत. सर्वाधिक ३४ सदस्य श्रीरामपूर नगरपरिषदेत असतील, तर नेवासे नगरपंचायतीमध्ये सर्वात कमी १७ सदस्य असणार आहेत. निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम- सध्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  मुंबई/संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम निधीअभावी रखडले असून, गेल्या वर्षभरापासून शासनाकडून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे स्मारकाचे स्वप्न अजूनही अपूर्णच असल्याची खंत आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पावसाळी अधिवेशनात शासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. गेल्या वर्षी तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक तालुक्यात एक कोटी रुपये खर्चून शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर संगमनेर बस स्थानकावर स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली आणि नगरपालिकेने निधीसाठी प्रस्तावही पाठवला. सुरुवातीला, जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) च्या बैठकीत हा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील निमोण आणि तळेगाव परिसरातील दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या भोजापूर धरणाचे पाणी आता थेट दुष्काळी भागापर्यंत पोहोचणार आहे.  आमदार अमोल खताळ यांनी रविवारी (आज) भोजापूर धरणाचे जलपूजन केले आणि ग्रामस्थांसोबत भोजापूर पूरचारीची पाहणी केली. यामुळे अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या या भागाला आता टँकरमुक्त पाणीपुरवठा होण्याची आशा निर्माण झाली आहे. यावेळी बोलताना, आमदार खताळ यांनी विश्वास व्यक्त केला की, आता भोजापूर धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी तळेगाव आणि निमोण या दुष्काळी भागातील जनतेला त्यांच्या हक्काने मिळेल. यापूर्वी निवडणुका जवळ आल्या की केवळ टँकरने चारीमध्ये पाणी आणून दाखवले जात होते, मात्र आता ही परिस्थिती बदलणार…

Read More

नवी दिल्ली:  प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण आणि उच्चस्तरीय गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून त्यांनी आपली छाप पाडली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे कायद्याच्या क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आता संसदेत प्रतिनिधित्व करेल. ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासह एकूण चार जणांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाली आहे. ॲड. निकम यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत संधी मिळाली आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांचे नाव १९९३ च्या मुंबई…

Read More

‘हिंदी भाषिकांना मुंबईत मारणार्‍यांनो, हिंमत असेल तर ऊर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात कुत्रा देखील वाघ असतो, कोण कुत्रा कोण वाघ स्वत:च ठरवा. महाराष्ट्राच्या बाहेर या आपटून आपटून मारू, तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? तुम्ही आमच्या पैशावर जगत आहात, तुम्ही कोणता कर भरता? कोणते उद्योग तुमच्याकडे आहेत? अशी दर्पोक्ती करणारा निशिकांत दुबे हा राज्यातल्या सरकारचा मानद जावई वाटू लागला आहे. त्याच्या या वक्तव्याने ज्याचं मस्तक भडकणार नाही, तो मराठी कसला? अनेक वर्षं महाराष्ट्रात राहणार्‍या असंख्य अमराठी तरुणांनी या मानद जावयाची चांगलीच उतरवली आहे. मराठीमध्ये मानद या पदनामाला अनन्यसाधारण महत्व आहे. एकार्थी ही व्यक्ती वर्तणुकीने कशीही असली तरी तिला दोष द्यायचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर येथील भूमिगत गटार दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या अतुल पवार आणि जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी भेट घेऊन सांत्वन केलं. या दोन्ही कुटुंबांना सरकारकडून तातडीने आणि जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन थोरात यांनी दिलं. कोल्हेवाडी रोड येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर थोरात यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, नितीन अभंग, निखिल पापडेजा, गणेश मादास, जावेद पठाण, लाला बेपारी, अंबादास आडेप, वैष्णव…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहरातील भूमिगत गटार दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या अतुल पवार यांच्या कुटुंबीयांना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ३० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी आमदार खताळ यांनी मदतीचे आश्वासन देतानाच, या घटनेतील दुसरा मृत रियाज जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांनाही शासनाच्यावतीने भरीव मदत मिळवून देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शनिवारी आमदार खताळ यांनी मदिनानगर येथील जावेद पिंजारी आणि संजय गांधीनगरमधील रतन पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.  संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भूमिगत गटाराच्या चेंबरमधील मैला काढताना अतुल पवार याचा मृत्यू झाला, तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना रियाज पिंजारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्तसेवा  संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदार संघर्ष समितीने नाशिक विभागाचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) नाशिक यांच्याकडे धाव घेतली आहे. प्रदीप भाऊसाहेब कुटे यांनी दाखल केलेला फेर-ऑडिट अर्ज (रिव्हिजन अर्ज ९७/२०२४) त्वरित फेटाळून लावण्यात यावा आणि ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी तात्काळ परत करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील रिट याचिका क्रमांक १२६०४/२०२४ च्या अनुषंगाने हे निवेदन देण्यात आले आहे. ८१ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप आणि ठेवीदारांचे हाल ठेवीदारांनी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल ८१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. संस्थेचे चेअरमन, व्यवस्थापक आणि इतर २१ आरोपी या गैरव्यवहारात सामील आहे. गोरगरीब…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता शशिकांत शिंदे यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, पक्षाकडून यावर अधिकृत शिक्कामोर्तबही करण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यामुळे आणि शशिकांत शिंदे यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या संघटनात्मक बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाची ही एक महत्त्वपूर्ण रणनीती मानली जात आहे. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्तसेवा  संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील भूमिगत गटार साफसफाईच्या कामात ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे घडलेल्या दुर्घटनेत अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी या दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित ठेकेदारांना तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनात केली आहे. तसेच, या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अतुल पवार याच्या कुटुंबीयांना नियमानुसार शासनाकडून ३० लाख रुपये आर्थिक मदत मिळत आहे. मात्र, जीव धोक्यात घालून पवार याला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या रियाज पिंजारी याच्या कुटुंबीयांनाही शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी:  अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांचे महाघोटाळे आणि बोगस भरती झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे राज्य सरकारने मोठी कारवाई करत ट्रस्टचे सध्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली, तसेच दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांची अपसंपदा जप्त केली जाईल, असे स्पष्ट केले. देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हा मुद्दा स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत मांडला होता. लंघे यांनी उघड केले की, ट्रस्टच्या विश्वस्तांनी बनावट ॲप्स तयार करून लाखो भाविकांकडून पूजेसाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्तसेवा संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे एकाच दिवशी पती-पत्नीचा गूढ मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीचा मृतदेह शेततळ्यात, तर पतीचा मृतदेह घरात संशयास्पदरीत्या आढळला आहे. हा घातपात आहे की आत्महत्या, याबाबतचे गूढ कायम असून, आश्वी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रेवजी मुरलीधर गायकर (वय ६०) आणि त्यांच्या पत्नी नंदा गायकर (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत. रेवजी गायकर हे एका शिक्षण संस्थेत नोकरीला होते आणि तीन वर्षांपूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. शेती आणि निवृत्ती वेतनावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली असून, सर्वांचे विवाह झाले आहेत. मुली सासरी असतात, तर…

Read More

मुंबई, ११ जुलै २०२५:  आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संगमनेर येथे भुयारी गटार साफ करताना विषारी वायूमुळे दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात मांडली. याप्रकरणी संबंधित ठेकेदारांवर कारवाई झाली असली तरी देखील अपूर्ण काम असताना गटार जोडणाऱ्या आणि या घटनेला जबाबदार असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी तांबे यांनी यावेळी लावून धरली. आमदार तांबे यांनी संगमनेर मधील दुर्दैवी घटने संदर्भात सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. संगमनेर भुयारी गटार योजना २०१२ मध्ये मंजूर झाली होती, परंतु एसटीपीच्या जागेच्या वादामुळे हे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण होते.…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेरमधील मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्या सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळ या उत्पादनात भेसळ असल्याच्या पुण्याच्या कियान लॅबच्या अहवालाने खळबळ उडवून दिली आहे. या अहवालानुसार, गुळाच्या तपशीलामध्ये तफावत आढळली असून, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) घालून दिलेल्या नियमांनुसार त्याचे मानांकन नसल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान या संदर्भात वारंवार अहिल्यानगरच्या अन्न औषध प्रशासनाशी संपर्क करत कारवाईची मागणी करून देखील अन्न औषध प्रशासनाकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला जात आहे. घुलेवाडी येथील रहिवासी शंकर रावसाहेब ढमाले यांनी २८ मे २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. ढमाले यांनी १६ मे २०२५ रोजी सागर किराणा येथून गुळ खरेदी केला…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहरात सांडपाणी प्रकल्पाच्या भूमिगत गटार साफसफाई दरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत एका कर्मचाऱ्यासह स्थानिक तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी संगमनेर नगरपालिकेच्या एसटीपी प्रकल्पाचे मुख्य ठेकेदार मे. आर. एम. कातोरे अँड कंपनी आणि बी. आर. क्लिनिंगचे ठेकेदार अशा तिघांविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी कोल्हेवाडी रोडवरील गटार साफसफाईचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली होती.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज:  महायुती सरकारच्या कार्यकाळात दिवसेंदिवस लाचखोरीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. गलेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी कोणत्याही कामाच्या मोबदल्यात हल्ली लाखो रुपयांची लाच सर्वसामान्यांकडून मागत असल्याने या अधिकाऱ्यांना भिकेचे डोहाळे लागल्याचे दिसत आहे.  बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 6 लाख रुपयांची लाच घेताना गुरुवारी रंगेहाथ पकडले. सिमेंट रस्त्याच्या बिलापोटी आणि अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी कंत्राटदाराकडे एकूण 12 लाख रुपयांची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शासनाच्या नगर उत्थान योजनेंतर्गत सिमेंट रस्त्याच्या सुमारे 2 कोटी रुपयांच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी मुख्याधिकारी चव्हाण यांनी 3 टक्के दराने 6 लाख रुपयांची मागणी केली होती.…

Read More