Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई, दि. २६ आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी विमानतळाच्या विकासाला गती दिली आहे. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत त्यांनी शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड आणि आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता दिली. यासोबतच, विमानतळाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण करण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी मंजुरी दिली. शिर्डी विमानतळाच्या कार्गो टर्मिनलचे काम जलद गतीने सुरू आहे. नाशिकपासून जवळ असल्याने कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना हे विमानतळ अधिक सोयीचे ठरेल. त्यामुळे संभाव्य गर्दी आणि नाशिक विमानतळाची क्षमता लक्षात घेऊन शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाला मान्यता देण्यात आली. या विकास योजनेत आठ वाहनतळे, दोन हेलिपॅड आणि टर्मिनलच्या आधुनिकीकरणाचा समावेश आहे. कुंभमेळ्यादरम्यान विमाने आणि हेलिकॉप्टरच्या वाहतुकीसाठी याचा मोठा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई बदलापूरमधील एका खासगी शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कोठडी मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात स्पष्ट आदेश देऊनही संबंधित 5 पोलिसांविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयाने शुक्रवारी (25 एप्रिल) पोलिसांना फटकारले. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर बदलापूर एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने पोलिसांना आदेश देऊनही पाच पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आलेल्या दिरंगाईवर गंभीर चिंता व्यक्त केली. इतकेच नव्हे, तर या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) हस्तांतरित करण्याचे आदेश न्यायालयाने 7 एप्रिल रोजी दिले होते. या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर  संगमनेर तालुक्यातील २०२५-३० यादरम्यान मुदत संपणाऱ्या १४४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण अखेर जाहीर करण्यात आले आहे. बुधवारी संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या उपस्थितीत सरपंच पदासाठी राखीव जागांची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. शुक्रवारी या ग्रामपंचायतीमधील महिला आरक्षण पदासाठीची सोडत काढण्यात आली. महिला आरक्षण निश्चित झाल्याने संगमनेर तालुक्यातील १४४ ग्रामपंचायतचे चित्र स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत गाव कारभारी निश्चित झाल्याने काही खुशी कही गम असे चित्र निर्माण झाले आहे. महत्त्वाच्या काही ग्रामपंचायतींचे सूत्रे महिलांच्या हाती जाणार असल्याने पुरुषांमध्ये निराशा बघावयास मिळाली. शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरक्षण सोडतीवेळी संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी मोठी गर्दी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर  राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाने जाहीर केलेल्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत गुणवत्तेच्या क्रमवारीत संगमनेर बाजार समितीने अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम, तर संपूर्ण नाशिक विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती सभापती शंकरराव खेमनर आणि सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली. महाराष्ट्र सरकारच्या पणन विभागाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्यातील तब्बल ३०५ बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी नुकतीच जाहीर केली. यासाठी निबंधक आणि सहाय्यक निबंधक यांनी कसून तपासणी करून विविध निकषांनुसार मूल्यांकन केले होते. या मूल्यांकनात २०२३-२४ या वर्षासाठी संगमनेर कृषी उत्पन्न…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर काश्मीर मधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या जिहादी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर शहरात शनिवारी, (२६ एप्रिल) भव्य तिरंगा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजासह शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत या संतापजनक घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. पहलगाम येथे झालेल्या अमानुष हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना धर्म विचारून, त्यांना कलमा वाचायला लावून त्यांचे कपडे उतरवून विटंबना केली. या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यातील शहीद बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि देशविघातक शक्तींना कठोर प्रत्युत्तर देण्यासाठी संगमनेरमधील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत या तिरंगा मोर्चाचे आयोजन केले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सोशल मीडियावर समर्थन केल्याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील दोघा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान शौकत पटेल (रा. चिंचेवाडी, साकुर, ता. संगमनेर) याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पहायला मिळतील दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणारे स्टेटस ठेवले होते. त्याचा मित्र मुजाहिद आरिफ पठाण (रा. साकूर, ता. संगमनेर, सध्या रा. अहमदनगर) याने हे स्टेटस लाईक करत समर्थन दर्शविल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या कृत्यामुळे समाजात अशांतता निर्माण होण्याची शक्यता असल्याने, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते अमित कुलकर्णी यांनी केलेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करत…

Read More

अहिल्यानगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त येत्या ३१ मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. आता ही बैठक मुंबई येथे होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर, चौंडी येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करून या उपक्रमांना अधिक गती देण्याचा सरकारचा विचार होता. यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी देखील सुरू होती. मात्र, अनपेक्षितपणे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. बैठक रद्द करण्यामागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर गुरुवार, दि. २४ एप्रिल – लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या पत्रकार रमजान नजीर शेख याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील फिर्यादी यांच्याकडे खडी वाहतूक करणारे चार ट्रक आहेत. २० मार्च २०२५ रोजी तलाठी अक्षय ढोकळे यांनी दोन ट्रकवर खोटी कारवाई करून प्रत्येकी एक लाख तेवीस हजार रुपये दंड आकारला होता. अर्जदार रमजान शेख हे मांडवे गावात पत्रकार म्हणून काम करतात. त्यांनी फिर्यादीला तलाठी अक्षय ढोकळे यांच्याशी भेट करून देण्याची मध्यस्थी केली, जेणेकरून ‘सेटलमेंट’ करता येईल. मात्र, तलाठी लाच मागणार, या विचाराने फिर्यादीने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर  अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहे. मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये ९ मे २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अहिल्या नगर जिल्ह्यात सर्वत्र या आदेश लागू असतील. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेत यात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या या आदेशाचा भंग करत कायदा व सुव्यवस्थेला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – लाचेची रक्कम स्वीकारताना संशय आल्याने शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने फिल्मी स्टाईलमध्ये पलायन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि. २४) बागलाण तालुक्यातील ततानी येथे घडली. जितेंद्र खंडेराव सोनवणे (वय ४५) असे फरार मुख्याध्यापकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचला असताना सोनवणे यांनी कार्यालयातील टेबलावर लाचेची रक्कम ठेवून मागच्या दरवाजाने धूम ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ३३ वर्षीय असून ते आश्रमशाळेत रोजंदारी शिक्षक आहेत. त्यांची स्वतःची पिठाची गिरणी आहे. त्यांना ततानी शासकीय आश्रमशाळेतील धान्य दळणाचे कंत्राट मिळाले आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर  जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संगमनेर शहर ठाकरे शिवसेनेच्या वतीने बुधवारी (२३ एप्रिल) सायंकाळी तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी बोलताना, पूर्वी काँग्रेसच्या काळात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जनता वैतागली होती, त्यामुळे त्यांनी भाजपला सत्तेवर आणले. मात्र, भाजपच्या काळातही पुलवामा आणि पहलगामसारखे हल्ले होत असतील, तर जनतेला भाजपलाही घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले. शहरप्रमुख पप्पू कानकाटे आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनीही पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत देशातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी जम्मू-कश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा संगमनेर शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी (दि. 23) तीव्र निषेध नोंदवण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवर कॅण्डल मार्च काढण्यात आला, कॅण्डल मार्चमध्ये सहभागी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘अतिरेक्यांना फाशी द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कॅण्डल मार्चमध्ये माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे अध्यक्ष जयश्री थोरात यांच्यासह संगमनेर तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, जय हिंद युवा मंच, महाविकास आघाडी, पुरोगामी संघटना आणि समविचारी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘फाशी द्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर  सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या संगमनेर तालुक्यातील १४४ ग्रामपंचायतीच्या आरक्षणासाठी आज (बुधवार, २३ एप्रिल) दुपारी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी राखीव असलेल्या जागांची सोडत काढण्यात आली. शुक्रवारी (२५ एप्रिल) प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महिला आरक्षण निश्चित केले जाणार आहे. आरक्षण सोडतीवेळी संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आरक्षण सोडतीनंतर कुठली ग्रामपंचायत कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाली यांची चर्चा सुरू होती. दरम्यान आता कुठल्या ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठीचे आरक्षण पडते याकडे लक्ष लागले आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेले ग्रामपंचायत निहाय आरक्षण… बघा यादी

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाच्या दणदणीत विजयानंतर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विधानसभेच्या पराभवाचे आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला. “विधानसभेच्या निवडणुकीत झालेली चूक पुन्हा होऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे होते. अतिआत्मविश्वास आणि गाफीलपणा टाळल्यामुळेच हा विजय शक्य झाला,” असे थोरात म्हणाले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहे, या पार्श्वभूमीवर कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचा स्नेह मेळावा गुंजाळवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह नूतन संचालक, अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. थोरात म्हणाले,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. बसस्थानकासमोर जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि पाकिस्तानच्या हिरव्या झेंड्याचे दहन करून आपला संताप व्यक्त केला. यावेळी महायुतीच्यावतीने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले. निदर्शनांमध्ये शिवसेना, भाजप आणि आरपीआयचे तालुका आणि शहर स्तरावरील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महायुतीच्या नेत्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली की, दहशतवाद्यांना कठोर शासन करावे आणि त्यांच्या संघटनांना संपवण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत. हिंदू पर्यटकांवरील हा हल्ला केवळ एका विशिष्ट समुदायावर नसून संपूर्ण देशावरील हल्ला असल्याचे मत यावेळी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर व्यक्ती आणि संघटनांना बेकायदेशीर ठरवण्याचे अमर्याद अधिकार राज्य सरकारला देणाऱ्या प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) काल (मंगळवार,२२ एप्रिल) संगमनेरमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन केले. अकोले आणि संगमनेर तालुक्यातील हजारो श्रमिक या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले आणि त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. राज्य सरकार शहरी नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी हे विधेयक आणत असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात सरकारच्या धोरणांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या आणि आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेवर कारवाई करण्याचे प्रचंड अधिकार या विधेयकामुळे सरकारला मिळणार आहेत. सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर आज (बुधवारी, २३ एप्रिल) पहाटे पाच वाजता संगमनेरच्या भारत नगरमधील कादरी मस्जिदच्या मागील बाजूस गल्ली नंबर १ येथे एका वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संगमनेर मध्ये पोलिसांकडून सातत्याने कत्तलखाना चालकांवर कारवाया केल्या जात आहे. संगमनेर शहर पोलीस, पोलीस उपअधीक्षक आणि अहिल्यानगर च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून संगमनेर मधील कत्तलखान्यांवर सातत्याने छापेमारी केली जात आहे. यातून वारंवार या अवैधरित्या चालणाऱ्या कत्तलखान्यांमध्ये गोवंश जनावरांची हत्या होत असल्याचे समोर आले आहे. या शिवाय वारंवार तेच तेच आरोपी निष्पन्न होत आहेत. संगमनेर चे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर नगरपालिकेने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान’ स्पर्धेत संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्याचा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरी सेवा दिन २०२५ च्या निमित्ताने राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका तसेच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान’ अंतर्गत सन २०२३-२०२४ आणि सन २०२४-२०२५ या वर्षांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी वृक्ष संगोपन व संवर्धनासाठी ‘सीड बँक’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केली. कोकरे यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील बेलसोंडा वाडीजवळ पाण्याच्या टँकरचा टायर फुटल्याने तो सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत तुकाराम गोविंद घुले (वय ५०) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले सिताराम गणपत घुले हे गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना आज (मंगळवार, २२ एप्रिल) घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम घुले आणि सिताराम घुले हे दोघेही बेलसोंडा फाट्यावरून बेलसोंडा वस्तीकडे ट्रॅक्टरद्वारे पाणी घेऊन जात होते. दरम्यान, अचानक ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर थेट २०० फूट खोल दरीत कोसळला. ट्रॅक्टर दरीत कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून वस्तीतील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर  संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांची पदोन्नतीने बदली झाली असून ते आता अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी असतील. राज्यभरात तीसहून अधिक महसूलच्या अधिकाऱ्यांना शासनाने बढत्या दिल्या असल्याची माहिती समोर येत असून त्यात हिंगे यांचा समावेश आहे. हिंगे यांच्या रिक्त जागेवर अद्याप नवीन नियुक्ती करण्यात आली नसली तरी शासनाकडून बदल्यांचे आदेश अद्यापही सुरू असल्याने लवकरच संगमनेरच्या रिक्त जागेवर प्रांत अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असे संकेत मिळाले आहे. संगमनेरला येण्यापूर्वी हिंगे वाशीम येथे कार्यरत होते. लोकसभा, विधानसभा निवडणूक हिंगे यांच्या कार्यकाळात शांततेत पार पडली होती. सध्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी देखील ते निवडणूक निर्णय अधिकारी…

Read More