Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन| संगमनेर: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या घटनेचे तीव्र पडसाद संगमनेरमध्ये उमटले आहेत. या क्रूर घटनेच्या निषेधार्थ आणि अत्याचारीत सर्वच बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने भव्य ‘कॅन्डल मार्च’ काढण्यात आला. संगमनेर बसस्थानक परिसरातून निघालेल्या या मोर्चात महिला आणि तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. कॅन्डल मार्च प्रांत अधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर येथे उपस्थित लहान मुलींच्या हस्ते प्रांताधिकारी अरुण उंडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या घटनेचा निषेध करत नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी लावून धरली.…

Read More

बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २ लाख १४ हजार ९३ मतांच्या विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत त्यांना एकूण २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या २२ उमेदवारांसह ‘नोटा’ला केवळ ४८३७ मतांवर समाधान मानावे लागले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ च्या निवडणुकीत प्रस्थापित केलेला १ लाख ६५ हजार २६५ मताधिक्याचा विक्रम सुनेत्रा पवार यांनी मोडीत काढला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, मात्र २२ अपक्ष उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत केलेले नियोजन यशस्वी होईल, मात्र अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम राखावा लागेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण कमी होईल. व्यवसायात भागीदारांकडून चांगले सहकार्य मिळेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रवासाचे योग येतील. मिथुन: आजचा दिवस धावपळीचा राहू शकतो. नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील, पण निर्णय घेताना घाई करू नका. नातेवाईकांशी जुन्या मुद्द्यावरून वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात…

Read More

छत्रपती शिवरायांचे गुरू कोण? ते शिवकालीन लढायांचे सूत्रधार कोण? याविषयींच्या वायफळ चर्चा घडवून आणणार्‍या बुवा आणि बाबांचा कोण सुळसुळाट सध्या देशाभर आहे. येनकेन प्रकारेन छत्रपतींच्या मागे त्यांच्या पुण्याईला किंमत न देण्याची ही स्पर्धा होय. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा जो काही पराक्रम केला तो ब्राह्मणांच्या सहभागाशिवाय नव्हता, असं दाखवण्याची सुरू असलेली अहमहिका ही केवळ छत्रपतींची बदनामीच नव्हे, तर त्यांना कमी लेखण्यासाठी केलेला कटच होय. शिवरायांविषयी गरळ ओकणार्‍यांबाबत सत्ताधारी सातत्याने मूग गिळून राहिल्याने त्याचा गैरफायदा देशातील शिवरायांच्या द्वेषींनी घेतला. वादग्रस्त टिपण्ण्या करायच्या आणि सत्ताधार्‍यांना अडचणीत आणणार्‍या वातावरणापासून लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा हा प्रयत्न होय. मग कधी राज्यपाल यावर बोलत, तर कधी मंत्री.…

Read More

मुंबई: महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून, या संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल सरकारने तातडीने सार्वजनिक करावा, अशी आग्रही मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय समितीने १६ मार्च २०२६ रोजी आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यानंतर १० एप्रिल रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती स्थापन करून जनतेकडून ३० एप्रिलपर्यंत यावर आक्षेप आणि मते मागवण्यात आली होती. मात्र, ज्या अहवालावर मते द्यायची आहेत, तो मूळ अहवालच सरकारने अद्याप लोकांसमोर ठेवलेला नाही, याकडे पक्षाने लक्ष वेधले आहे. या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित…

Read More

अहिल्यानगर: जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेली पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत टंचाईग्रस्त भागांवर सतत देखरेख ठेवली जात असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील ३४ गावे आणि १६२ वाड्या-वस्त्यांना ३० टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका संगमनेर, पारनेर आणि नगर तालुक्यांना बसला असून तेथे अनुक्रमे १०, १३ आणि ६ टँकर तैनात करण्यात आले आहेत. एकूण ६४ हजार ५८६ नागरिक या टँकर सुविधेवर अवलंबून आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाने टँकरच्या खेपांचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे केले असून मंजूर ९०.९२ खेपांपैकी ८८ खेपा पूर्ण केल्या जात…

Read More

मुंबई: नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या आर्थिक संबंधांच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावले आहे. पुढील आठवड्यात त्यांची चौकशी होण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून हा चाकणकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात आणि प्रतिभा चाकणकर यांच्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे संशयित व्यवहार आढळले आहेत. समता नागरी सहकारी पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहारांशी संबंधित सुमारे ३ ते ५० कोटी रुपयांची उलाढाल प्रतिभा चाकणकर यांच्या बँक खात्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, याच पतसंस्थेत…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सुखद राहील, मात्र जोडीदारासोबत बोलताना संयम ठेवा. वृषभ: आज तुम्हाला भाग्याची खंबीर साथ मिळेल. प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान लाभेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यातून भविष्यात चांगला नफा मिळू शकतो. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन: आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढा. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांशी संवाद साधताना वादाचे प्रसंग टाळा. गुंतवणूक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक भोंदू कॅप्टन अशोक खरात याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याला पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात आले. अवतार पूजेच्या नावाखाली व्यावसायिकाला एक कोटीहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या अशोक खरातला न्यायालयाने चार मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. व्यवसाय जगभरात विस्तारण्याच्या इच्छेचा गैरफायदा घेत आरोपी खरातने एका व्यावसायिकाला १ कोटी ११ लाख रुपयांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले. आहे. आरोपीने फिर्यादीला ‘अवतार पूजा’ करण्याचे आमिष दाखवून ईशान्येश्वर मंदिर परिसरात बोलावले आणि तिथे बनावट साप दाखवून मृत्यूची भीती घातली. ही पूजा पूर्ण करण्यासाठी २१ देशांत जावे लागेल, अन्यथा नागदंश होऊन मृत्यू होईल, अशी भीती…

Read More

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसतो न बसतो, तोच केंद्र सरकारने सामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे आपले क्रूर धोरण पुन्हा एकदा राबवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुका संपताच महागाईचा भडका उडाला असून, १ मेपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक, छोटे दुकानदार आणि रेस्टॉरंट चालकांचे कंबरडे मोडले असून, ऐन उन्हाळ्यात महागाईची ही झळ जनतेला सोसावी लागणार आहे. व्यावसायिक सिलेंडर मध्ये झालेल्या दरवाढीचा फटका आता सामान्य कुटुंबाच्या हॉटेल आतील खाद्यपदार्थांना बसणार आहे. नव्या दरवाढीनुसार, राजधानी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता ३०७१.५० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईतही हे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, पुणे: पुण्यातील चंदननगर भागात एका तरुणाने प्रेमप्रकरणातील वादातून २२ वर्षीय तरुणीचा ब्लेडने गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे असे जखमी तरुणीचे नाव असून, तिची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे.  याप्रकरणी तरुणीचा भाऊ भगतसिंग दोहरे याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही नगर रस्त्यावरील एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. त्यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते, मात्र अलीकडे त्यांच्यात खटके उडत होते. बुधवारी, २९ एप्रिल रोजी तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने पठारे वस्ती येथील…

Read More

मुंबई: राज्य सरकारने जून २०२४ मध्ये सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पडताळणी प्रक्रियेचा टप्पा ३० एप्रिल रोजी पूर्ण झाला असून, आतापर्यंत राज्यातील १ कोटी ८९ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली शेवटची मुदत संपल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. सुरुवातीला या योजनेसाठी एकूण २ कोटी ४३ लाख बहिणींनी नोंदणी केली होती, मात्र सखोल पडताळणीनंतर तब्बल ५४ लाख अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. योजनेच्या पारदर्शकतेसाठी गेल्या दीड वर्षांपासून विविध मार्गांनी निकषांची तपासणी केली जात आहे. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, निकषात बसत नसतानाही काही महिलांनी लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करत २१ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  सोमनाथ घार्गे यांची मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदी रवानगी झाली आहे, तर चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आता अहिल्यानगर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतील. या बदल्यांच्या सत्रात जालना येथून अजय के. बन्सल यांची महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा पोलीस अधीक्षक पदी, अमरावती ग्रामीणचे सिगुरी विशाल आनंद यांची धुळे पोलीस अधीक्षक पदी आणि नाशिक ग्रामीणचे बाळासाहेब…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: महाराष्ट्रात ‘दैवी शक्ती’ आणि ‘चमत्काराच्या’ नावाखाली सुरू असलेला अंधश्रद्धेचा बाजार पोलिसांनी उखडून टाकण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमधील कुख्यात भोंदू अशोक खरात याच्या अटकेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून, गेल्या ३० दिवसांत पोलिसांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतून एकूण १४ भोंदू बाबांना गजाआड केले आहे. गजाआड केलेल्या या भोंदूंचे अनेक प्रताप पोलीस तपासात समोर येत आहे. या भोंदूनी महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिकच्या अशोक खरातवर आतापर्यंत १० गुन्हे दाखल झाले आहेत. त्याने महिलांचे शोषण करण्यासाठी गुंगीकारक पदार्थांचा वापर केल्याची कबुली दिली असून, सध्या SIT (विशेष तपास पथक) या प्रकरणाचा सखोल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कायद्याची पायमल्ली करून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा लोणी पोलीस आणि अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात सुरू असलेल्या या काळ्या धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून एका बीएएमएस डॉक्टरसह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, रोख रक्कम आणि तीन आलिशान कारसह तब्बल २४ लाख ९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना पिंपरी निर्मळ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: राज्यात सध्या सर्वत्र उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढत असून, येत्या काही दिवसांत हा तडाखा अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प्रख्यात कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक असून अहिल्यानगर जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचे सावट असून, संगमनेर परिसरातही ही तीव्रता वाढण्याची…

Read More

प्रतिनिधी / उरण उरण तालुका रिक्षा युनियनचे संस्थापक, विद्यमान अध्यक्ष तथा नागाव-म्हातवलीतील ज्येष्ठ समाज कार्यकर्ते प्रफुल्ल किशोर पुरो यांचे सोमवारी दीर्घ आजाराने देहावसान झाले. मृत्यू समयी ते 75 वर्षांचे होते. वरीष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. प्रफुल यांच्या दुःखद निधनावर शोक व्यक्त करण्यासाठी उरणमधील रिक्षा वाहतूक दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती. प्रफुल पुरो यांच्या निधनाने रिक्षा चालक-मालकांचा आधार हरपला असून नागाव आणि म्हातवली क्षेत्रातील सामाजिक कार्यक्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. प्रफुल यांनी दीर्घकाळ समाजसेवा केली, असंख्य गरजू व्यक्तींना मदत केली आणि आपल्या सकारात्मक वृत्तीने त्यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले. त्यांचं साधं राहणीमान, प्रामाणिकपणा आणि समाजहितासाठी…

Read More

 मोहसीन शेख, संगमनेर – शहरातील दिल्ली नाका परिसरात मध्यरात्री एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. आयशर ट्रकचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकून रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या भेळीच्या हातगाडीला जोरदार धडक बसली. या अपघातात हातगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला. छत्रपती संभाजीनगरवरून येणाऱ्या आयशर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटल्याने ट्रक थेट हातगाडीवर जाऊन धडकला. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक तत्काळ बाहेर आले. घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातात भेळीच्या हातगाडीचे व आयशर ट्रॅकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:  तालुक्यातील वडगाव पान येथील ‘दत्तधाम सरकार’चा स्वयंघोषित भोंदू बाबा राजेंद्र बापू गडगे याच्या पोलीस कोठडीत संगमनेर न्यायालयाने आणखी दोन दिवसांची वाढ केली असून आता तो २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून आणि असाध्य आजार बरे करण्याचे खोटे आमिष दाखवून अनेक निष्पाप नागरिकांची आर्थिक व मानसिक फसवणूक केल्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने देण्यात आलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे या प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी गडगे याच्या आश्रम आणि निवासस्थानी दोनदा झाडाझडती घेतली असून, त्यातून पोलिसांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास आणि त्यांचे सर्वसमावेशक विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. संगमनेरच्या सय्यद बाबा चौकात कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला, मात्र याचवेळी आंदोलकांनी गायकवाड यांचे उपरोधिक आभार मानल्याने या विषयाची शहरात मोठी चर्चा रंगली आहे. वंचित बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने सोमवारी सायंकाळी संगमनेर येथील बहुचर्चित ठरलेल्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या वाचन चळवळीतून इतिहासाचा जागर करण्यात आला. सय्यद बाबा चौकात आयोजित…

Read More