Author: Annant Ppangarkar
सरकारचा मदतीच्या घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात मदत नाही : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची सरकारवर टीका
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दोन वर्षानंतर प्रथमत:च मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होत असली तरी जास्तीच्या झालेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकारने त्याच्या पाठीशी उभा राहण्याची गरज आहे. मात्र सध्याच्या सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस सुरू असून प्रत्यक्षात मदत मिळत नसल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री थोरात बोलत होते. राज्य साखर संघाचे संचालक आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, डॉ. हसमुख जैन, डॉ. जयश्री थोरात आदी यावेळी उपस्थित होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये लाटले, असा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. या आरोपांवरुनच बच्चू कडू यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत रवी राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांमध्ये सुरू असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या दोन आमदारांमधील वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आधी मंत्रिमंडळाचा रखडलेला शपथविधी, आता बहुचर्चित रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जाते. अशा पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यात सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयामुळे पक्षांतर्गत असलेली नाराजी समोर आलेली नव्हती. मात्र आता गुवाहाटी वरून झालेल्या आरोपामुळे आमदार बच्चू…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नेवासे तालुक्याच्या पाहणी दौऱ्यात राज्याच्या महसूलमंत्र्यांना प्रवरासंगम पासून काही अंतरावरील मंगळापूर गावात चक्क वाळू उपश्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन लोखंडी बोटी आढळून आल्या. मंत्र्यांच्या दौऱ्यातच वाळू तस्करीचा मुद्दा समोर आल्याने संतापलेल्या विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी बोटी जप्त करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. अहमदनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच वाळूतस्करी प्रश्नी लक्ष घातले. विखे पाटील यांच्या भूमिकेमुळे वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंत्री विखे जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसह नेवासे तालुक्यातील नुकसानीची पाहणी करत होते या पाहणे दरम्यान त्यांना प्रवरा संगम पासून काही अंतरावर असलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकारी तरुणीस पदोन्नतीचे अमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात हा प्रकार घडला. कॉलेज रोड परिसरात असलेल्या एका नामांकित रेस्टॉरंटमधील वरिष्ठ सहकार्याने आपल्या कनिष्ठ सहकारी तरुणीस पदोन्नतीचे आमिष दाखवून हे कृत्य केले असल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून स्पष्ट झाले. गत बुधवारी पीडित तरुणी कामावर असताना आरोपीने तिला गाठून पदोन्नती मिळवून देण्याचे आमिष दाखवत पंचवटीत एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस स्थानकामध्ये आरोपी सागर मधुकर कदम (वय 29 वर्ष) याच्या विरोधात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अस्मानी संकट आल्यावर सरकारचे कर्तव्य असते की, शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचे नाही. मात्र आपल्याकडील निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आणि घोषणांची अतिवृष्टी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. शिवसेना फुटीनंतर रविवारी प्रथमतःच औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आणि बांधावरच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. आपल्या दौऱ्यात ठाकरे यांनी दहेगाव आणि पेंढापूर येथे जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना ठाकरे म्हणाले, राज्यात एकूणच घोषणांची अतिवृष्टी सुरू आहे. आणि अंमलबजावणीच नव्हे तर मी म्हणेल, या निर्दयी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अखिल भारतीय किसान सभेचे 23 वे अधिवेशन अकोलेमध्ये 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यान होत आहे. अधिवेशनाची सुरुवात पहिल्याच दिवशी जाहीर सभेने होणार असून या सभेमध्ये ओल्या दुष्काळा प्रश्न आरपार लढायचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली. सोमवारी 31 ऑक्टोबरला होत असलेल्या या सभेसाठी डॉ. अशोक ढवळे, पी. कृष्णप्रकाश, माजी आमदार जे. पी. गावित, किसन गुजर, आमदार विनोद निकोले, अर्जुन आडे, उमेश देशमुख आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. राज्य अधिवेशनापूर्वी किसान सभेची राज्यभर रीतसर गाव, तालुका व जिल्हा अधिवेशने घेण्यात आली असून जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडलेले ३०० प्रतिनिधी व किसान सभेचे…
प्रशांत गुंजाळ (लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक असून संगमनेर न्यायालयात वकील आहेत) सन 2014 च्या मे महिन्यामध्ये मी एका पक्षकाराचे घटस्फोटाचे प्रकरण संगमनेरच्या न्यायालयात दाखल करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तत्कालिन न्यायाधीशांनी माझ्या असं निदर्शनास आणून दिले की, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये जवळपास शंभर घटस्फोटाची प्रकरणे न्यायालयात निवाड्यासाठी दाखल झाली आहेत. माननीय न्यायाधीश साहेबांनी त्यावर चिंता व्यक्त करत एक भिती बोलून दाखविली होती. दुर्दैवाने आता ती भिती आता खरी होताना दिसत आहे. गत दोन दशकांच्या कालावधीत वेगवेगळ्या कारणांनी समाजातील एकत्र कुटूंब पध्दती लयाला गेली. याच काळात एकत्र कुटूंब पध्दती जावून विभक्त कुटूंब पध्दती समाजात निर्माण झाली. याचे धोके आता…
मुंबई । प्रविण पुरो (लेखक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत) प्रिय पवार साहेब, गेल्या काही वर्षांपासून देशातील बदलत्या राजकीय वातावरणाची आपणास पूर्ण जाणीव असेल. विशेषत: महाराष्ट्रात या राजकारणाने घेतलेल्या निचत्तम पातळीने भाजप वगळता आपण सारेच घायाळ झालो आहोत. 2014पासून महाराष्ट्र एका वेगळ्या वळणावर आहे. लोकशाही नावाची संकल्पना ही केवळ नावापुरती शिल्लक राहिली असल्याचं आपण आणि आपल्या पक्षासह काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे. विरोधकांना जगणं मुष्कील करून ठेवण्याच्या या कृतीची करावी तितकी निर्भत्सना कमीच आहे. हे करतं कोण? घडवतं कोण? हे आपण जाणता. यात आपले कार्यकर्ते असलेले मंत्री अनील देशमुख, नवाब मलिक, सहकारी मित्र असलेले संजय राऊत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी पत्नीने माहेराहून पाच लाख रुपये आणावेत, या कारणासाठी तिचा छळ करुन खून केल्याच्या आरोपातून पती सुरेश पंकज बिबवे याच्याबरोबर सर्व आरोपींची संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर तालुक्यातील निमज येथे २०१७ मध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात सुजीत पावसे याच्या तक्रारीवरुन विवाहितेचा पती सुरेश बिबवे, सासरा पंकज लक्ष्मण बिबवे, अमोल पंकज बिबवे, मंगल पंकज बिबवे, अविनाश लक्ष्मण बिबवे, सुरेखा अविनाश बिबवे, वच्छला लक्ष्मण बिबवे आणि लक्ष्मण बुवाजी बिबवे यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना अटक करत तत्कालिन पोलीस निरीक्षक…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लंम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव पुशधनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकट्या संगमनेर तालुक्यामध्ये लम्पी चर्मरोगाने मृत झालेल्या पशुधनाची संख्या मंगळवारपर्यत ६५ वर गेली आहे. यापैकी ४२ पशुधनाचे नुकसान भरपाईचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले असून उर्वरित प्रस्ताव दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली. राज्यात उद्भवलेल्या गो व महिप वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तालुकास्तरीय समितीची बैठक संगमनेरमध्ये तहसीलदार निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीसाठी गटविकास अधिकारी अनिल नागणे, सहाय्यक आयुक्त डॉ. जे. के. तिटमे, पशुधन विकास अधिकारी डॉ. नितीन जोंधळे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ऑक्टोंबरमध्ये झालेल्या पावसामूळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला केल्या आहेत. तसेच येत्या दोन दिवसात मंत्री स्वत: नुकसानग्रस्त तालुक्यांची पाहणी करणार असून यावेळी सर्व शासकीय यंत्रणेने उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल, पशु संवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेत अतिवृष्टीमूळे जिल्ह्यात झालेले नुकसान, पशुधनावरील लंम्पी आजार, आनंदाचा शिधा किट वाटपाचा आढावा घेतला. बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, जिल्हा कृषी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जोर्वे येथे एकविरा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी अंगणवाडीतील मुलांसोबत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे असले तरी अनेक लोकांना दिवाळीचा आनंद घेता येत नाही. याच हेतूने लहान बालकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी या चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य आणि दिवाळीचा फराळ वाटप करीत एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी या चिमुकल्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत तरुणांनी ग्रामस्थांच्या मदतीने लोकसहभागातून गावातील अंगणवाडी डिजिटल बनविली. अनोखा आदर्श घालून देत डिजिटल बनविलेल्या या अंगणवाडीला जयश्री थोरात यांनी भेट दिली आणि डिजिटल अंगणवाडीचे कौतुक केले.
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कमी पटसंख्येच्या कारणावरून राज्यभरातील हजारो शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या धोरणाचा निषेध म्हणून छात्रभारती संघटनेने राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना काळा आकाश कंदील भेट पाठविला आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्याने ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी गैरसोय होणार आहे. दूरवर असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी जाणार नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी सरकारच्या या धोरणामुळे मुकण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्यास या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने छात्रभारती संघटनेने सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहा बाहेर जाणार असल्याने छात्रभारती संघटनेने अनेक शाळांवर जाऊन यासंबंधीच्या सर्वे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जाणता राजा म्हणून ओळख असलेले शरद पवार केंद्रात कृषी मंत्री होते. या पवारांनीच राज्यातील सहकारी साखर कारखानदारी संपविली. अशी गंभीर टीका राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकमध्ये केली. नाशिक साखर कारखान्याच्या पळसे येथील गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मंत्री विखे बोलत होते. विखे पाटील म्हणाले, पवार कृषिमंत्री असताना पंधरा वर्षांपूर्वीच साखर कारखानदारी संदर्भात निर्णय व्हायला हवे होते. इथेनॉल बद्दल धोरण राबवायला हवे होते. त्यांनी त्यावेळी योग्य धोरण राबविले असते तर आज राज्यातील साखर कारखाने कवडीमोल भावाने विकले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सहकारी साखर कारखानदारीत अवघ्या देशासाठी अनुकरणीय ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आणि विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने साखर कारखानदारीत वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव देणारा साखर कारखाना म्हणून या कारखान्याने राज्यभरात ख्याती मिळविली आहे. या कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट ऊस विकासाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. याशिवाय या कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनादेखील गोवा येथे एका कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यकारी संचालक म्हणून गौरविण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सांत्वनपर भेटीच्या चढाओढीनंतर अखेरीस संगमनेर तालुक्यातील त्या विजेच्या दुर्घटनेत मृत पावलेल्या चार भावंडांच्या वारसांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी चार लाख रुपये मदतीचे धनादेश शुक्रवारी देण्यात आले. राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा बर्डे कुटुंबीयांची भेट घेतली. संगमनेर तालुक्यातील खंदरमाळच्या वांदरकडा येथे वीजवाहक तार पाण्यात पडल्याने झालेल्या दुर्घटनेत अनिकेत अरूण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे व विराज अजित बर्डे या चार कुमारवयीन भावंडांचा मृत्यू झाला होता. या मृत मुलांच्या वारसांना मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी चार लाख रुपयांचे धनादेश आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बापानेच आपल्या स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नातीवर झालेल्या या अत्याचाराची मुलाविरोधात आजीनेच तक्रार दिल्याने हा प्रकार समोर आला. या विकृताची पत्नी दहा वर्षापूर्वीच त्याला सोडून गेली आहे. त्यावेळेपासून दोन नातवंड व त्यांच्या वडील मुलाचा सांभाळ फिर्यादी करत आहे. मोलमजुरी करुन ही वृध्दा मुलगा आणि नातवंडाचा सांभाळ करते. आरोपी कामधंदा न करता घरीच असतो. गेल्या आठवड्यात नातीने आपल्या पोटात दुखत असल्याची तक्रार आजीकडे केली. त्यामुळे आजीने तिला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात तपासण्यासाठी नेले. तेथून औषधे घेवून घरी आल्यानंतर आजीने नातीस पोट दुखण्याचे कारण विचारले असता…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गोमातेपासून आपणास दूध मिळते. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या दुग्ध व्यवसायावर चालतो. वसुबारसेला गोमातेचे पूजन करणे ही आपली परंपरा व संस्कृती आहे. जसा बैलपोळा साजरा होतो तशीच संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात वसुबारस साजरी होत असते. मात्र यावर्षी लंम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी कारण पशुधनाचे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे महत्त्व असल्याचे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघामध्ये अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते गाय पूजन करून वसूबारस साजरी करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, संचालक विलास कवडे, संतोष मांडेकर, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, फायनान्स…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क म्युच्युअल फंडाला गुंतवणूकदारांची पसंती मिळत असल्याने त्यात गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. येत्या चार ते पाच वर्षांत हा उद्योग १०० लाख कोटींचा होईल आणि भारत शक्तीशाली अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असताना गुंतवणूकदार संपत्ति निर्माण करतील असा आशावाद आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ सुनील कडलग यांनी व्यक्त केला. घारगाव येथे साईनाथ उद्योग समूहाच्या दिपावली निमित्त आयोजित स्नेहबंध मेळाव्यात कडलग प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईनाथ उद्योग समूहाचे संस्थापक बजरंगशेठ वाकळे उपस्थित होते. प्रास्तविक भाषणात साईनाथ उद्योग समूहाचे संचालक सुदिप वाकळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. समाजातील प्रत्येक घटक अर्थसाक्षर झाल्यास जीवनातील समस्या दूर होतील व संपत्ती निर्माण होईल…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दीपावलीच्या पहील्या दिवशी वसुबारसेला म्हणजेच गोपाष्टमीला शुक्रवारी सकाळी संगमनेरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने गो ग्राम परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात ही गो ग्राम परिक्रमा आणि गो पूजन सकाळी सात वाजता पार पडले. वसुबारसेला अतिशय श्रद्धेने गोमातेचे पूजन केले जाते, अशा पवित्र गोमातेचे रक्षण करणे हे आपले हिंदू धर्मीय म्हणून प्रथम कर्तव्य आहे. सद्यस्थितीत देशभरात हजारोंच्या संख्येने गोमातेची कत्तल होत असल्याने तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गोमातेला सांभाळणं शेतकऱ्याला आर्थिक दृष्टीने परवडत नसल्याने तो कसायांना गाई विकतो. शहरात आपल्याला गाई पाळणे शक्य नाही परंतु शेतकऱ्यांच्या गाई वाचवणं आपल्या हातात आहे. गोमाता कामधेनु आहे.…
