Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : व्याजाचे पैसे मागितल्याच्या कारणातून झालेल्या बाचाबाचीची परिणती खुनामध्ये झाली होती. खुनाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या आरोपीची न्यायालयाने मुक्तता केली आहे. तसेच तुरुंगात असलेल्या आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश संगमनेरचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी दिले आहे. तुकाराम बुधा उघडे रा. उंचखडक खुर्द, ता. अकोले याने गावातील कैलास यशवंत घोडके याला नऊ ते दहा वर्षांपूर्वी व्याजाने दहा हजार रुपये दिले होते. घोडके याने ही रक्कम उघडे यांना परत केली होती. मात्र त्यावरील व्याज दिलेले नव्हते, त्यामुळे तुकाराम उघडे हे घोडके यांच्याकडे व्याजाची मागणी करत असत. १ ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेच्या आणखी एक मानाचा तुरा रोवणारा राष्ट्रीय पातळीवरचा ऊस विकास पुरस्कार पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, व्हीएसआयचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते थोरात कारखान्यास प्रदान करण्यात आला. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी संगमनेरचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना मापदंड ठरला आहे. कारखाना आतापर्यंत अनेकदा राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्काराने गौरविला गेला आहे. मांजरी (पुणे) येथे झालेल्या वसंतदादा शुगर इन्सि्टट्युटच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नॅशनल फेडरेशन ऑफ को ओपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड यांच्यावतीने…

Read More

प्रवीण पुरो 🔹 रविवार विशेष विरोधी पक्षांची कोंडी करण्याचे नीच धंदे अजूनही भाजपच्या कंपूने थांबवलेले नाहीत. या आधी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी वापरले जात होते. आता ते शिवसेनेची कोंडी करण्यासाठी वापरले जाऊ लागले आहेत. देशात सर्वात मोठ्या मुंबई महानगरपालिकेत कोविड काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराचं निमित्त करत तक्रारखोर किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत इडीने आपलं काम सुरू केलं आहे. मुंबई महानगरपालिका आणि पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना आरोपीच्या पिंजर्‍यात पकडण्याचा प्रयत्न केला आहे. कोविड काळात चांगलं काम केल्याचं बक्षिस भाजपने सुरू केलं आहे. आपण नाही केलं ते इतरांनीही करू नये, असंच भाजपच्या नेत्यांना सांगायचं असावं. ज्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : ग्रामसभेत प्रश्न विचारल्याच्या कारणावरून राग अनावर झालेल्या गावातील सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी तीन आरोपींना अटक झाल्यानंतर उर्वरित आरोपींनी साठी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर झालेल्या ग्रामसभेमध्ये सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी बंद केलेल्या पाणीपुरवठा संदर्भात प्रश्न विचारला होता. इघे यांनी ग्रामसभेत विचारलेला प्रश्न सत्ताधाऱ्यांना रुचला नाही त्यामुळे त्यांनी त्याला ग्रामसभेतच धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर इघे आपल्या मित्रासोबत साकुर कडे जात असताना जवळच्या घाटामध्ये पंधरा-वीस जणांच्या टोळक्याने त्यांना गाठत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : जय हिंद महिला बचत गट आणि संगमनेर शहर महिला मंडळाच्या वतीने मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी “होम मिनिस्टर” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात व संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली. संगमनेर तालुक्यात महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध उपक्रम सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून बुधवारी (ता. २५) जानेवारीला सायंकाळी पाच वाजता जाणता राजा मैदान येथे न्यू होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यात प्रामुख्याने सिने अभिनेते क्रांती (नाना) मळेगांवकर व बाल गायिका सह्याद्री मळेगांवकर हे सादरकर्ते असणार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : ई फाइलिंगद्वारे सर्व न्यायालयांमध्ये केसेस दाखल करण्याचे निर्देश वकिलांना देण्यात आले आहे. जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयांसाठी ही ई-फायलिंग पद्धत संयुक्तिक ठरत नाही. ई-फायलिंग ही पद्धत अत्यंत किचकट, वेळखाऊ, खर्चिक व गुंतागुंतीची असल्याने ती जिल्हा व कनिष्ठ न्यायालयांसाठी बंधनकारक करण्यात येऊ नये, अशी मागणी शुक्रवारी अहमदनगर जिल्हा न्यायालयात करण्यात आली. त्यासाठी वकिलांनी लालफिती लावून कामकाज केल्याची माहिती बार असोशिएशनचे सचिव ॲड. गौरव दांगट यांनी दिली. न्यायालयामध्ये लागू करण्यात आलेल्या ई-फायलिंग पद्धतीला नगर बार असोसिएशनने विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात १७ जानेवारीला बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेत या संबंधीचा ठराव सर्वसंमतीने मंजूर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास उपनगरातील मालपाणी हॉस्पिटल जवळील महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला. एटीएम मशीनवर बसविलेल्या डिजिटल सुरक्षा यंत्रणेमुळे लगेचच चोरीच्या प्रयत्नातील दोघा आरोपीपैकी एक आरोपी घटनास्थळापासून काही अंतरावर पकडण्यात पोलिसांना यश आले. तर दुसऱ्या आरोपीला दुपारी उशिराने ताब्यात घेण्यात आले आहे. संगमनेरमध्ये गुन्हेगारांनी कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान दिले असून चोरी सारख्या घटना दररोज नित्यनेमाने घडत आहे. शहर व तालुक्यामध्ये दुचाकी चोरांनी उच्छाद मांडला असून चोरांचा शोध लावण्यास पोलीस अपयशी ठरत आहेत. सातत्याने घडणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलीस यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत वेळेत माहिती मिळाल्याने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. हल्ल्यातून बचावलेल्या या महिला अधिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आशा वाघ असे हल्ल्यात जखमी झालेल्या नायब तहसीलदार असलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. संजय गांधी निराधार योजनेचा पदभार त्यांच्याकडे आहे. शुक्रवारी (ता.२०) दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा हल्ला कोणी आणि कशासाठी केला याचा पोलीस यंत्रणा शोध घेत आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपास सुरू केला आहे. वाघ घरून जेवण करून आपल्या दुचाकीवरून कार्यालयात जात असताना रस्त्यात आडव्या आलेल्या एका चार चाकी वाहनातून उतरलेल्या एका महिलेसह…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : नगरपालिकेच्या ड्रेनेजचे काम करताना म्हाळुंगी नदीवरील स्वामी समर्थ मंदिरालगतच्या पुलास तडे गेल्याने पुल खचला. त्यामुळे पुलावरील रहदारी बंद करण्यात आली असल्याने परिसरातील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे खासदार साहेबांनी या पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका अल्पना तांबे यांनी केली आहे. या प्रभागातील माजी नगरसेविका तांबे यांनी शिर्डी मतदार संघाचे शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांची भेट घेत ही मागणी केली आहे. म्हाळुंगी नदीवरील पूल खचल्याने गेल्या काही महिन्यापासून वाहतुकीसाठी तसेच नागरिकांना पायी येण्या-जाण्यासाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे साईनगर, घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन या परिसरातील नागरिकांसह दिगंबर गणेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक / संगमनेर : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघातून त्यांना विविध शिक्षक संघटनांकडून मिळणारा पाठिंबा वाढत चालला आहे. राज्यातील ‘प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ’ यांनीदेखील तांबे यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून, त्याबाबतचे पत्रही त्यांनी दिले आहे. बुधवारी शिक्षक भारती आणि त्यापूर्वीच महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (MUST) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटना यांनी तांबे यांना पाठींबा जाहीर केल्याने अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधरचा गड काबीज करायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : नात्याला काळीमा फासत आपल्याच नात्यात असलेल्या सोळा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावास आणि तीस हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. छबन मच्छिंद्र खेमनर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांच्या समोर खटला सुरू होता. न्यायाधीश मनाठकर यांनी मंगळवारी या खटल्याचा निवाडा केला. छबन खेमनर याने आपल्याच नात्यातील सोळा वर्ष वय असलेल्या मुलीच्या घरी जात कोथिंबीर आणण्यासाठी आजच्या दिवस आमच्या शेतात चल. असे पीडित मुलीला आणि तिच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाविकास आघाडीने एका पत्रकार परिषदेद्वारे आपले विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केले आहे. बहुचर्चित ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले असून शुभांगी पाटील या मविआच्या उमेदवार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना देण्यात आली होती मात्र तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलगा आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या मतदारसंघात मोठे राजकीय रणकंदन माजले. आमदार तांबे यांचे निलंबन केल्यानंतर शिवसेनेने या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेल्या अपक्ष उमेदवार ॲड. शुभांगी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डी : मुंबई उच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांनी घेतलेल्या न्यायिक सेवा परिक्षेच्या निकालात ॲड. कु. तेजस्विनी सयाजीराव कोऱ्हाळे यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून निवड झाली आहे. कोपरगाव न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश सयाजीराव कोऱ्हाळे यांच्या त्या कन्या आहेत. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पदाच्या परिक्षेतील ६३ उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात कु. तेजस्विनी कोऱ्हाळे यांचा समावेश आहे. त्यांचे शालेय प्राथमिक शिक्षण न्यायडोंगरी, श्रीरामपूर, जळगाव येथे झाले असून इचलकरंजी येथील इचलकरंजी हायस्कूल (राजवाडा) येथील मराठी शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले आहे. तर औरंगाबाद येथील सरस्वती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते महाराष्ट्रात ३८,८०० कोटींपेक्षा जास्त विकासकामाकांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत रोड शोसुद्धा करणार आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या आजच्या मुंबई दौऱ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईत येतील. तर, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबई मेट्रो मार्ग २ ए आणि ७ चं उद्घाटन करतील. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात एका रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. या रोड शोमध्ये जवळपास एक लाख लोक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : साकुर-शिबलापुर रस्त्यावर मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचा बछड्याचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाला नसून तरसाच्या हल्ल्यात झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी साकुर शिबलापुर रस्त्यावर जिजाबा नागरे यांच्या शेतजमिनीलगत बिबट्याचे एक पिल्लू झोपलेल्या आवश्यक दिसले. त्यामुळे नागरिकांनी थोडे जवळ जात त्याचे निरीक्षण केले असता त्याच्या तोंडातून रक्तस्राव झाला असल्याचे आणि तो मृत असल्याची शंका आल्याने याची माहिती तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनास्थळी आलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचे बछडे चार महिने वयाचे असल्याचा आणि त्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढला. मृत बछड्याला ताब्यात घेत त्याची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे तपासणी केली असता या बछड्याचा मृत्यू हा वाहनाच्या धडकेने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी प्रचारात वेग घेतला असतानाच एकापाठोपाठ एक शिक्षक संघटना त्यांना पाठिंबा देत आहेत. शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस नेते आमदार सुधीर तांबे, सत्यजीत तांबे आणि कपिल पाटील यांच्यात महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर कपिल पाटील यांनी सत्यजीत तांबेंना पाठिंबा दिला. यापूर्वी तांबे यांना महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (मस्ट) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. नाशिक विभागातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून सुधीर तांबे यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते म्हणाले की, मी नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : भरधाव स्विफ्ट कार चालकाने नाशिक पुणे बाह्यवळण रस्त्यावर दोघा परप्रांतीय मजुरांना उडविल्याची घटना संगमनेरमध्ये मंगळवारी संध्याकाळी घडली. अपघातामध्ये दोघाही मजुरांचा मृत्यू झाला. संगमनेर शहराबाहेरून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. रस्त्यावर बॅरिकेट लावून काही मजूर हे काम करत आहेत. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मालपाणी इस्टेट जवळ या मार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कार चालकाने डिव्हायडरला लावलेले बॅरिकेट तोडून रस्त्यावर काम करणाऱ्या गिरीजा मुनसी तुरिया, वय 52 वर्ष आणि सुरेश चेतू खैरवार वय 55 वर्ष (दोघे रा. गहलोर बडकी, मरकाना बिहार) यांना गंभीर जखमी केले. अपघातात दोघेही मजुरांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर / संगमनेर : नगर जिल्ह्यातील चार शिक्षकांसह दोघा केंद्र प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात संगमनेर तालुक्यातील दोन शिक्षकांचा समावेश असून त्यांनी आपल्या जागेवर परस्पर डमी बेरोजगार शिक्षकांच्या नियुक्ती केल्याचे, तसेच कामात हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या सर्वांवर निलंबनाची कारवाई केली. सीईओ येरेकर यांनी यासंबंधीचे आदेश मंगळवारी काढले आहेत. या शिक्षकांच्या धक्कादायक करामती यामुळे समोर आल्या आहेत. यांच्यावर झाली कारवाई उपाध्यापक रमेश शिवाजी आहेर (कारेवाडी, संगमनेर), प्रभाकर सखाराम रोकडे (जवळे बाळेश्वर संगमनेर), उपाध्यापक मदन रंगनाथ दिवे (राहुरी), पारनेरचे केंद्रप्रमुख अविनाश गुलाबराव गांगर्डे, उपाध्यापक बाजीराव शंकर पानमंद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई – नासिक पदवीधर मतदार संघामध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसमध्ये वातावरण फारसे समाधानकारक नसल्याचे समोर आले आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची वाताहत झाली आहे. नासिक पदवीधरचे आमदार सुधीर तांबे यांनी उमेदवारी मिळून देखील अर्ज न भरणे आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करणे, उमेदवारीवरून काँग्रेस अंतर्गत असलेल्या दोन गटातील मतप्रवाहांचे जाहीरपणे प्रदर्शन होणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मौन बाळगणे यासह कारणा निमित्ताने काँग्रेसमधील वादही चव्हाट्यावर आला. या पार्श्वभूमीवर बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांचे कुटुंबीय व काँग्रेसमधील अनेक नेते भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) अन्वय प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. २९ जानेवारीच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. या आदेशा अन्वये २९ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही व्यक्तीस शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने…

Read More