Author: Annant Ppangarkar
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : सहकार क्षेत्रातील अग्रेसर संस्था असलेल्या ‘सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड’ने गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, बँकेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ ९००१:२०१५ (ISO 9001:2015) मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनाचे सर्टिफिकेट हस्तांतरण आणि बँकेच्या अद्ययावत कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन नुकतेच माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, हे मानांकन बँकेच्या उच्च दर्जाच्या ग्राहक सेवा, कार्यपद्धती आणि अंतर्गत नियंत्रण प्रणालीचे निदर्शक आहे. बँक डिजिटलायझेशनचे धोरण स्वीकारून, विविध विभागांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करत ग्रामीण भागातील ग्राहकांना जागतिक दर्जाच्या…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील डोळासणे परिसरातील नागरिकांच्या निवासी वीज जोडणीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार अमोल खताळ पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत ओटीएसपी (OTSP) योजनेतून निवासी वीज जोडणीसाठी १० लाख १ हजार ७९७ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे निधी मंजूर होताच प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाल्याने गेल्या चार दशकांपासून वीजेची वाट पाहणाऱ्या डोळासणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पठार भागातील डोळासणे परिसरातील अनेक कुटुंबांना गेल्या चाळीस वर्षांपासून हक्काच्या निवासी वीज जोडणीपासून वंचित राहावे लागत होते. स्थानिक नागरिकांची ही मूलभूत गरज ओळखून आमदार अमोल…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: शहरातील पाईपलाईन रोड भागात पत्रकाराला बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीविरुद्ध तोफखाना पोलिसांनी आता कडक कायदेशीर कारवाई केली आहे. टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सततची दहशत लक्षात घेता पोलिसांनी या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे संघटित गुन्हेगारीविरोधी ‘कलम १११’ हे वाढीव कलम जोडले आहे. या कारवाईमुळे अहिल्यानगरमधील या सराईत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले असून नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर होण्यास मदत होणार आहे. गुरुवारी (२० ऑगस्ट) फिर्यादीचे सुपुत्र सार्थक थोरात हे आपल्या मारुती आल्टो कारने भिस्तबाग चौक ते एकविरा चौकाकडे जात होते. त्यावेळी मोपेड मोटरसायकलवरील चालकाने कारला पाठीमागून धडक दिली आणि…
आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस व्यवसाय आणि कामाच्या दृष्टीने प्रगतीचा आहे. कामातील पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. हाती घेतलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील आणि धनलाभाचे योग बनत आहेत. वृषभ – आज तुमचे मन नवीन योजनांकडे अधिक आकर्षित होईल. कार्यालयातील वातावरण उत्साही राहील आणि अध्यात्माकडे कल वाढेल. धार्मिक कार्यावर अथवा प्रवासावर खर्च होण्याची शक्यता आहे. मिथुन – कलात्मक आणि सर्जनशील कामांमध्ये आज विशेष यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. आरोग्याची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, तसेच महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कर्क – मनासारखी कामे करण्याची संधी मिळाल्याने मोठा आनंद होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या विचारांचे कौतुक करतील. कौटुंबिक वातावरणात…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन विशेष प्रतिनिधी / मुंबई: मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची शिस्त आणि गोपनीयता अबाधित राखण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. विविध मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये उसनवारीवर किंवा केवळ मौखिक आदेशाच्या आधारे नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी परिपत्रकाद्वारे जारी केले आहेत. अशा सर्व कर्मचाऱ्यांना येत्या १० सप्टेंबर २०२६ पर्यंत त्यांच्या मूळ जागी परत पाठवण्याची कारवाई पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, नियमबाह्य पद्धतीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर ही कडक पावले उचलण्यात आली आहेत. राज्यातील अनेक मंत्र्यांनी प्रशासकीय प्रक्रियेला बगल देत आपल्या सोयीनुसार इतर कार्यालयांतून अधिकारी आणि कर्मचारी स्वतःच्या…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कर्म म्हणजे केवळ जगण्याची धावपळ किंवा जबाबदारीची पूर्तता नसून, आपल्या वाट्याला आलेले प्रत्येक काम परमेश्वराला अर्पण करण्याची वृत्ती म्हणजे कर्मयोग आहे. कर्माच्या फळाची आसक्ती न ठेवता प्रत्येक कृतीतून अंतःकरणातील ईश्वराशी संवाद साधणे, हाच संत ज्ञानेश्वर माउलींच्या ज्ञानेश्वरीतील कर्मयोगाचा खरा गाभा आहे, असे प्रतिपादन गीता विशारद् डॉ. संजय मालपाणी यांनी केले. राजस्थान युवक मंडळाच्या वतीने आयोजित मनःशांती आणि जीवनविकास व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात डॉ. मालपाणी ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या व चौथ्या अध्यायाचे निरुपण करत होते. ‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ या विषयावर बोलताना त्यांनी कर्मापासून पळून जाण्याऐवजी कर्मातच साधना शोधण्याचा ज्ञानेश्वरीचा मार्ग उपस्थितांसमोर स्पष्ट केला. माणसाच्या आयुष्यात श्वास असेपर्यंत कर्म…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील खर्डा पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरोधात एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. सोमवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून तब्बल ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांना गुप्त बातमीदाराद्वारे बातमी मिळाली होती की, धाराशिवकडून बीडकडे जाणाऱ्या एका आयशर टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गाने घेऊन जाण्यात येत आहेत. या माहितीच्या आधारे खर्डा पोलिसांनी जातेगाव फाटा येथे तातडीने नाकाबंदी लावली.…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर शहरातील सह्याद्री कॉलेज शेजारी, ऑरेंज कॉर्नर परिसरात असलेल्या ‘बर्गेज कॅफे’मध्ये कॉलेजच्या मुला-मुलींना जास्तीचे पैसे घेऊन अश्लील चाळे करण्यासाठी बेकायदेशीरपणे जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहर पोलिसांनी सोमवारी (२४ ऑगस्ट) सकाळी पावणेअकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास या कॅफेवर बनावट ग्राहक पाठवून धाड टाकली आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीची खात्री करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत आणि पथकाने दोन सरकारी पंचांच्या समक्ष नियोजन केले. एका पंचाला बनावट ग्राहक बनवून एक हजार रुपयांची रोख रक्कम देऊन बर्गेज…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निमोण आणि सोनेवाडी येथील अनेक युवा कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या कामाची पद्धत, विकासकामे मार्गी लावण्याची तत्परता आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे निमोण व सोनेवाडी परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षाच्या माध्यमातून सामाजिक आणि विकासात्मक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार निमोण येथील अमोल आंधळे, विकास आंधळे, दीपक आंधळे, रवी शिंदे, आदेश शेळके, रिजवान पठाण, सुयोग आंधळे, सचिन मंडलिक, रितेश आंधळे, सुरज घुगे, हसन आत्तार,…
आजचे राशीभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने मन प्रसन्न होईल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यापारात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. आरोग्याची उत्तम साथ लाभेल. धनलाभाचे योग आहेत, परंतु विनाकारण होणारे खर्च टाळणे आवश्यक आहे. वृषभ- आज दिवसभरात संयम राखणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने समोर येऊ शकतात, परंतु तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने त्यावर मात कराल. आर्थिक व्यवहारात घाईगडबड करू नका. कौटुंबिक वातावरणात सुसंवाद राहील. जोडीदाराच्या विचारांचा आदर करा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. संध्याकाळी मनःशांतीसाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे फायदेशीर ठरेल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तालुक्यातील असंघटित आणि घरेलू कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या एका वर्षात तब्बल ८ हजार ६०० कामगारांच्या बँक खात्यावर विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून १० कोटी १६ लाख रुपयांचा निधी थेट वर्ग करण्यात आला असल्याची माहिती इंद्रजीत थोरात यांनी दिली. बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील सर्वांगीण विकासासोबतच गोरगरीब, निराधार, वृद्ध नागरिक व विधवा महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. याच उद्देशाने यशोधन कार्यालयात असंघटित व घरेलू कामगारांसाठी एक स्वतंत्र आणि अद्ययावत विभाग सुरु करण्यात आला असून, तिथे चार पूर्णवेळ…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक वडापाव दिनानिमित्त सोशल मीडियावर वडापावसोबत लसूण चटणी की तळलेली मिरची, असा प्रश्न विचारत पोस्ट केली. या पोस्टला प्रतिक्रिया देताना आमदार सत्यजीत तांबे यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुन्हा एकदा मांडला. ‘लसूण चटणी किंवा तळलेली मिरची? दोन्हीपैकी काहीही चालेल. फक्त पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेत हा वडापाव खाण्याची संधी मिळाली पाहिजे. यासाठीच आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत,’ अशी प्रतिक्रिया तांबे यांनी दिली. मात्र, या प्रतिक्रियेतून त्यांनी या रेल्वे मार्गाशी जोडलेल्या सर्वसामान्यांच्या भावना प्रभावीपणे मांडल्या. काहींसाठी वडापाव ही मौजमजा असेल पण, रेल्वेच्या अभावामुळे घरापासून लांब राहणाऱ्या तरूणांसाठी हीच उपजीविका आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा प्रयत्न राहील; मात्र आघाडी झाली किंवा नाही झाली तरी निमोण गटात शिवसेना शंभर टक्के निवडणूक लढवणार आणि जिंकणारच, असा वज्रनिर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख सचिन कोते-पाटील यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यात शिवसेनेची ताकद आणि ‘८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण’ हे सूत्र घराघरात पोहोचवून आगामी निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि तालुकाप्रमुख अमर कतारी व भीमाशंकर पावसे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात शिवसेनेच्या ‘झंझावात दौऱ्याला’ आणि आढावा बैठकांना धडाक्यात सुरुवात झाली आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: ‘जेन झी’ ही आपल्या राष्ट्राची मोठी संपत्ती व शक्ती असून, प्रगतीची पालखी या युवाशक्तीच्या बलशाली खांद्यांवरच पुढे न्यायची आहे. त्यामुळे तरुणाईने शिव्यांची नव्हे तर संतांच्या ओव्यांची संगत धरावी, असे आवाहन कीर्तनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांनी केले. राजस्थान युवक मंडळाच्या वतीने श्रावण मासानिमित्त मालपाणी लॉन्सच्या उत्सव सभागृहात आयोजित ‘मन:शांती व जीवनविकास व्याख्यानमाला’ सलग पाचव्या वर्षी सुरू असून, या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ‘विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’ या विषयावर त्या बोलत होत्या. या दीड तासाच्या कीर्तनाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. संतांच्या आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा व्याख्यानादरम्यान परांजपे यांनी भारतीय संस्कृती आणि इतिहासातील महान व्यक्तींचे दाखले दिले. अवघ्या ३९…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: वृत्तपत्रामध्ये विरोधी बातम्या छापल्याच्या रागातून आणि अपघाताच्या कारणावरून पत्रकारावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या तीन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज एमआयडीसी परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, समतानगर सावेडी येथील पत्रकार सुशिल थोरात (वय ४९) यांच्या कारला २० ऑगस्ट २०२६ रोजी सोनू कोहक याने मोपेडवरून धडक दिली होती. या अपघाताच्या कारणावरून तसेच विरोधी बातम्या लावल्याच्या रागातून सोनू कोहक, पप्पू मते, विकी ढवण, प्रशांत निक्रड आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी पहिलवानाने पत्रकार थोरात आणि त्यांच्या मुलास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सोनू…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि नवीन संधी चालून येतील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता राहील. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे, अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याची साथ उत्तम मिळेल. वृषभ आज मनात प्रसन्नता राहील आणि विचार सकारात्मक बनतील. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने मोठा दिलासा मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून पूर्ण सहकार्य लाभेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवा. मिथुन आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे डोके शांत ठेवून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठारभागातील कौठे मलकापूर येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी सरकारी गट क्रमांक १६२ मधील १०.८३ हेक्टर शासकीय जमीन हस्तांतरित करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या जमिनीवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती देण्याचे थेट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना दिले आहेत. या निर्णयामुळे कौठे मलकापूर येथील औद्योगिक वसाहतीच्या उभारणीचा मार्ग पूर्णपणे सुकर झाला असून, पठारभागातील हजारो स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या अपेक्षांना मोठे बळ मिळाले आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कौठे मलकापूर परिसरात एकूण २२७.५३ हेक्टर क्षेत्रावर भव्य औद्योगिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : बालवयातच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर प्रचंड हालअपेष्टा, बहिष्कार आणि अपमान सहन करूनही अजिबात निराश न होता जगाला आशेची संजीवनी देणारे संत ज्ञानेश्वर माऊली हेच आजच्या युगातील युवकांचे खरे आदर्श असायला हवेत, असे प्रतिपादन कीर्तन-प्रवचनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांनी केले. श्रावण मासानिमित्त राजस्थान युवक मंडळाच्या वतीने आयोजित ‘मनःशांती व जीवनविकास’ या पाचव्या सलग व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात मालपाणी लॉन्सच्या उत्सव सभागृहात त्या बोलत होत्या. ‘विश्व स्वधर्म सूर्य पाहो’ या विषयावर आधारित सुमारे दीड तासांच्या रसाळ व ओघवत्या प्रवचनातून त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संतांचे विचार ही आयुष्यभर पुरणारी शिदोरी असल्याचे सांगत, माणसाजवळ आर्थिक धनासोबत विचारांचे धन असेल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: जन आरोग्यम संचलित जाणीव फाउंडेशनच्या वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार २०२६ ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात जीवन गौरव पुरस्कार, दंडकारण्य अभियान पुरस्कार, लोकनेते बाळासाहेब थोरात समाज रत्न पुरस्कार, लोकनेते बाळासाहेब थोरात टीचर आयकॉन पुरस्कारांचा समावेश आहे. समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी जाणीव फाउंडेशनच्या वतीने ‘संगमनेर २०२६ पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवारी (३० ऑगस्ट) सकाळी ११ वाजता सह्याद्री महाविद्यालयातील के. बी. दादा देशमुख सभागृहात पार पडणार आहे. कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर…
प्रवीण पुरो जेनझींच्या जंतरमंतरवर झालेल्या ऐतिहासिक आंदोलनाचं कवित्व कमी होण्याचं नाव घेत नाहीये. या आंदोलनात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांवर अनन्वित अत्याचार आणि क्रूर कारवाई करूनही विद्यार्थ्यांनी राखलेल्या संयमाने हे आंदोलन यशस्वी पार पडलं. ‘राजीनामा आमच्या सरकारच्या कोषात नाही’, अशा मग्रुमीत असलेल्या मोदी सरकारला विद्यार्थ्यांच्या ताकदीपुढे नाक घासावं लागलं आणि गैर वागणार्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा लोकशाहीने दिलेला अधिकार विद्यार्थ्यांना प्राप्त झाला. मंत्र्याच्या राजीनाम्याने सारं काही अलबेल, असं मानण्याचं कारण नाही; मात्र वाह्यात मंत्र्यांना ताळ्यावर आणण्याचा मार्ग शाबूत आहे, याची जाण सत्ताधार्यांना करून देण्याची आवश्यकता होती. या एका राजीनाम्याने सत्तेची घमेंड मोडलीच, पण केंद्रात आणि राज्याराज्यात सत्तेच्या नशेने बेफाम झालेल्यांनाही या आंदोलनाने जमिनीवर…
