Author: Annant Ppangarkar

अहिल्यानगर: राजूर आणि अकोले परिसरातील विद्युत रोहित्रांमधील कॉपरची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचे कॉपर आणि गुन्ह्यात वापरलेली १५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण १५,६५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये कोहंडी (ता. अकोले) येथील धरणाजवळील एक विद्युत रोहित्र अज्ञात चोरट्यांनी उघडून त्यातील ३,५०,००० रुपये किमतीची कॉपर चोरून नेली होती. याप्रकरणी स्वप्नील सुरेश कोकणे यांनी राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. अकोले परिसरात अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- “काम केलंय, कमाल करूया” ही केवळ घोषणा नसून शहराच्या सर्वांगीण प्रगतीचे एक प्रबळ व्हिजन आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक राजेश मालपाणी यांनी केले. नवनियुक्त नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि नगरसेवकांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात मालपाणी यांनी शहराच्या विकासासाठी वैयक्तिक जबाबदारीवर भर दिला. ते म्हणाले की, ‘व्हिजन २.०’ यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे, कारण प्रगती ही केवळ प्रशासकीय निर्णयावर अवलंबून नसून ती लोकसहभागातून निर्माण होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जे. एफ. केनेडी यांच्या प्रसिद्ध वाक्याचा संदर्भ देत त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, शहराने माझ्यासाठी काय केले…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  लोकशाहीत नागरिकांना जसे मूलभूत अधिकार आहेत, तसेच काही कर्तव्येही आहेत. संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ लोकप्रतिनिधी नव्हे, तर जनतेचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. पारदर्शकता वाढवण्यासाठी आता प्रत्येक नगरसेवकाचे काम आणि त्याचे मूल्यमापन थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा आमदार सत्यजित तांबे यांनी केली. संगमनेरच्या नूतन नगराध्यक्ष डॉ मैथिली तांबे आणि नूतन नगरसेवकांनी शनिवारी आपल्या पदाचा पदभार हाती घेतला, यावेळी तांबे बोलत होते. राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, उद्योजक राजेश मालपाणी मनीषा मालपाणी गिरीश मालपाणी आदी यावेळी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या लोकशाहीत विचारांची देवाणघेवाण आणि निरोगी राजकीय स्पर्धा अभिप्रेत होती. मात्र, आज राज्याच्या राजकारणात जे काही सुरू आहे, ते अत्यंत विदारक आहे. सत्तेसाठीची ही जीवघेणी स्पर्धा आणि निष्ठावंतांचा गळा घोटण्याची वृत्ती महाराष्ट्राला एका चुकीच्या वळणावर घेऊन जात आहे, अशा शब्दांत माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सद्य राजकीय स्थितीवर आपली तीव्र चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी राज्यातील अस्थिर राजकारणावर भाष्य करतानाच संगमनेरच्या सुसंस्कृत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत राज्यातील हा ट्रेंड संगमनेरमध्ये येऊ न देता संगमनेरने आपले वेगळेपण जपण्याचे आवाहन केले. संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  स्त्री स्वतःचे आणि समाजाचे भविष्य घडवते, या विचारांना स्मरून मी संगमनेरच्या सेवेसाठी सज्ज आहे, असे भावनिक उद्गार संगमनेरच्या नवनियुक्त नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी काढले. संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित सभेत त्या बोलत होत्या. प्रियदर्शनी इंदिरा गांधी भवनांमध्ये संगमनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांनी नगराध्यक्ष खुर्चीवर बसून आपला पदभार स्वीकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, जर्मनीच्या माजी खासदार क्लोडिया नॉलटे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर विकासाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आता याच विकासप्रक्रियेत भर घालत संगमनेर शहरातील नागरिकांसाठी आमदार सत्यजित तांबे यांनी एक मोठा दिलासा मिळवून दिला आहे. आमदार तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर नगरपालिकेत थकीत मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफीसाठी ‘अभय योजना’ अखेर सुरू झाली असून, यामुळे शहरातील हजारो मालमत्ताधारकांना सुमारे २ कोटी रुपयांच्या शास्तीकरातून मुक्तता मिळणार आहे. अधिवेशनातील आवाज आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट- नगरपरिषद कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील शास्तीमुळे सामान्य नागरिकांवर कराचा मोठा बोजा पडत होता. अनेकदा नागरिक शास्तीची रक्कम भरत असूनही ती घरपट्टीमध्ये समाविष्ट केली जात नव्हती, ज्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत होता. हा तांत्रिक…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक असून रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम संधी मिळेल. तुमच्या स्वभावातील जिद्द आणि आत्मविश्वास यामुळे कठीण कार्ये सहज साध्य होतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे तितकेच गरजेचे आहे अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. कौटुंबिक वातावरण सुखाचे राहील आणि संध्याकाळचा वेळ आनंदात जाईल. वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अनावश्यक खर्चावर मर्यादा घालणे भविष्यातील बचतीसाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक घट्ट होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी पाळा. मिथुन: नशिबाची साथ लाभल्यामुळे आज तुमचे मनोबल वाढलेले दिसेल. व्यवसायात नवीन प्रयोग किंवा करार करण्यासाठी अनुकूल परिस्थिती…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या ‘जलजीवन मिशन’ आणि ‘घरकुल’ यांसारख्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अत्यंत संवेदनशीलपणे होणे आवश्यक आहे. या योजना केवळ कागदावर न राहता, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी आणि त्यातील त्रुटी तातडीने दूर कराव्यात. कामात दिरंगाई किंवा निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही, अशा कडक सूचना आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिल्या. संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित विविध विभागांच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत बोलताना आ. खताळ म्हणाले की, जेव्हा ग्रामीण भागातील नागरिक…

Read More

नेवासा | महाराष्ट्र संवाद न्यूज वीज चोरीच्या कारवाईत तडजोड करून दंड कमी करण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, त्यापैकी ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे.  या कारवाईत किरण गजेंद्र मोरे (वय ३४, सहाय्यक अभियंता, महावितरण उपविभाग नेवासा) आणि शिवकुमार नारायण आचारी (वय ४७, प्रधान तंत्रज्ञ, महावितरण नेवासा ग्रामीण) या दोन लोकसेवकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, या प्रकरणातील तक्रारदाराचे नेवासा शहरात राहते घर व पाण्याचा प्लांट आहे. २२ डिसेंबर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंगबाजीचा उत्साह वाढत असला तरी, नायलॉन मांजाचा धोका पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री व वापरावर शहरात कडक बंदी घालून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी ‘राहुल गांधी समर्थक संघाच्या’ (RGSS) वतीने संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास गोरे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. RGSSने दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नायलॉन मांजा हा प्लास्टिक मिश्रित आणि अविघटनशील असल्याने तो सहजासहजी तुटत नाही. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या गळ्याला हा मांजा अडकून गंभीर दुखापत होण्याच्या किंवा मृत्यू होण्याच्या घटना दरवर्षी घडत असून मानवी जीव धोक्यात आला…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  राज्यात यंदा रब्बी हंगामासाठी निसर्गाची साथ लाभल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या आहेत. मात्र, पिके ऐन जोमात असतानाच राज्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी कृषिमंत्री तथा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. “शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता शासनाने तातडीने सर्वत्र युरिया उपलब्ध करून द्यावा,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यावर्षी संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांसह कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार अमोल खताळ यांनी मांडलेला विकासाचा ‘धडाका’ आता कोट्यावधी रुपयांच्या दाव्यात रूपांतरित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने गेल्या अवघ्या एका वर्षात तब्बल ८४८ कोटी ९७ लाख रुपयांचा भरघोस निधी खेचून आणण्यात आ. खताळ यांना यश आले आहे. यामुळे मतदारसंघातील प्रलंबित कामांना मोठी गती मिळाली आहे. ग्रामीण विकासाचा कणा असलेले रस्ते मजबूत करण्यासाठी आ. खताळ यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४५ कोटी तर जिल्हा वार्षिक योजनेतून १६ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे पावसाळ्यात तुटणारा गावांचा संपर्क आणि…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबींमध्ये नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे, फक्त आहारावर थोडे नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित असलेल्या मालमत्तेच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, मात्र अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास अधिक फायदा होईल. मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नात्यात गोडवा टिकून राहील. मिथुन -…

Read More

अहिल्यानगर: जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अपर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात १३ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) नुसार हे निर्बंध लादण्यात आले आहेत. नेमके काय आहेत निर्बंध?- या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे बाळगणे, एकत्र जमा होणे किंवा प्रक्षोभक कृती करणे यावर बंदी असेल. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता अबाधित राहावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. कोणाला मिळणार सवलत? सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींना या आदेशातून वगळण्यात आले आहे: धार्मिक विधी व…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  राजकारण आणि समाजकारणाच्या मैदानात एकमेकांना खंबीरपणे साथ देणारे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने पाहायला मिळाले. निमित्त होते संगमनेरच्या प्रतिष्ठेच्या ‘२६ व्या सहकारमहर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेचे’. जेव्हा दुर्गाताईंनी हातात चेंडू घेतला आणि समोर डॉ. सुधीर तांबे बॅटिंगसाठी सज्ज झाले, तेव्हा उपस्थितांच्या उत्साहाला उधाण आले. तांबे दांपत्याची ही खेळाडूवृत्ती पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (१ जानेवारी) आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने २६ व्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ माजी आमदार डॉ. सुधीर…

Read More

श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज- अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूरमध्ये जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदार याची बुधवारी हत्या करण्यात आली. जहागीरदार याची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ताब्यात घेतले आहे. ३१ डिसेंबर रोजी दुपारी जर्मन रुग्णालयासमोर झालेल्या या थरारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास, कब्रस्तान परिसरातील जर्मन रुग्णालयासमोर बंटी जहागीरदारवर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात बंटीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला अमिन गुलाब शेख हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि आर्म ऍक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असलेल्या राजापूर गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते भाऊसाहेब हासे यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामसभेत झालेल्या या निवडीमुळे राजापूरमध्ये उत्साहाचे वातावरण असून, तरुणांनी या निर्णयाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे. राजापूर हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या आणि मोठे बागायती क्षेत्र असलेले समृद्ध गाव आहे. या ऐतिहासिक गावात नागरी प्रश्नांची व्याप्ती मोठी असल्याने, गावातील छोटे-मोठे वाद पोलीस ठाण्यापर्यंत न जाता स्थानिक पातळीवर सामोपचाराने सुटावेत, अशी ग्रामस्थांची भावना होती. भाऊसाहेब हासे यांच्या जनसंपर्क आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन ऊर्जेचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश राहतील. आर्थिक गुंतवणुकीसाठी दिवस चांगला असून जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ – आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. प्रलंबित असलेली सरकारी कामे मार्गी लागतील. व्यापारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल. संध्याकाळी एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. मिथुन – आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. कामाचा ताण वाढल्यामुळे थोडा थकवा जाणवेल, त्यामुळे विश्रांती घेणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण…

Read More

श्रीरामपूर –  शहरातील वर्दळीच्या भागात आज दुपारी झालेल्या एका थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण श्रीरामपूर शहर हादरून गेले आहे. कब्रस्तानातील अंत्यविधी आटोपून घरी परतणारे राजकीय कार्यकर्ते असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जहागीरदार यांचा अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.  या घटनेनंतर कामगार हॉस्पिटल, सय्यद बाबा चौक आणि मौलाना आझाद चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या घटनेमुळे शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अडीचच्या सुमारास बंटी जहागीरदार हे त्यांचे मित्र अमीन हाजी यांच्यासोबत…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर नगर परिषदेच्या इतिहासात एक नवे सुवर्णपान ओढले जात आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला ‘प्रशासक काळ’ आता संपुष्टात येणार असून, नववर्षाच्या पहिल्याच शनिवारी (३ जानेवारी) नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारणार आहेत. या सोहळ्यासाठी संगमनेर पालिकेमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. २१ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतमोजणीत आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘संगमनेर सेवा समिती’ने विरोधकांची पालिकेतील सत्तेची सर्व स्वप्ने उद्ध्वस्त करत ऐतिहासिक विजय नोंदवला. डॉ. मैथिलीताई तांबे यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर संपूर्ण राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या…

Read More