Author: Annant Ppangarkar

अमोल शेलकर – (राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्र – TEAM RGSS) विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर झालेली ही पहिलीच जनतेतील निवडणूक होती. या निकालाने हे सिद्ध केले आहे की, संगमनेरच्या मतदारांनी विधानसभेला झालेली चूक वेळीच दुरुस्त करून साहेबांनी गमावलेला जनाधार पुन्हा व्याजासकट, एका भव्यदिव्य विजयाच्या रूपाने त्यांच्या पदरात टाकला आहे. साहेब म्हटले की एकनिष्ठ, पक्षनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठतेचा संगम, हेच या विजयाने पुन्हा अधोरेखित केले. २०२४ ला झालेला तो राजकीय अपघात मागील वर्षभरात कोणीही विसरू शकले नव्हते. शहर असो की गाव, साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते एका योग्य संधीची वाट पाहत होते. अखेर नगरपालिकेच्या निमित्ताने ही संधी चालून…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सत्तेची खुर्ची गाजण्यापूर्वीच ‘सेवेचा झाडू’ हातात घेतला आहे. “निवडणूक संपली, आता केवळ विकास आणि स्वच्छता” हा संदेश देत नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी संगमनेरच्या हायटेक बसस्थानक परिसरासह मुख्य रस्त्यांचे विद्रुपीकरण दूर करून स्वच्छतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. रात्री रस्ते धुतले, सकाळी झाडू मारला: असा झाला ‘ॲक्शन प्लॅन’- विजयाचा उत्सव साजरा झाल्यावर विश्रांती घेण्याऐवजी नवनिर्वाचित नगरसेवकांनी रात्रीच कामाला सुरुवात केली. नाशिक-पुणे महामार्गावरील ऑरेंज कॉर्नर ते बसस्थानक हा मुख्य रस्ता रात्रीच पाण्याने स्वच्छ धुऊन काढण्यात आला.…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्या सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांचे आज सोमवारी (२२ डिसेंबर) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांत्वन केले. यावेळी बिबट्यांचा वाढता वावर आणि हल्ले रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हायटेक यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या भागात बिबट्यांची घनता अधिक आहे, तिथे थर्मल ड्रोन, नाईट व्हिजन कॅमेरे आणि ५०० हून अधिक ट्रॅप कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय वन विभागाच्या ताफ्यात २२ नवीन गस्ती वाहने आणि ५ अत्याधुनिक गन दाखल होणार असून, ही विशेष मोहीम पुढील…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरच्या राजकीय रणांगणात आज पुन्हा एकदा ‘थोरात-तांबे’ नावाचा डंका वाजला असून, नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाने प्रस्थापित नेतृत्वाची पकड किती मजबूत आहे, हे सिद्ध केले आहे. संगमनेरच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, कारण हा विजय केवळ एका नगरपरिषदेची सत्ता मिळवण्याचा नसून, तो संगमनेरच्या अस्मितेवर आणि विकासाच्या मॉडेलवर जनतेने दिलेली मोहोर आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि युवा नेते आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘संगमनेर सेवा समिती’ने विरोधकांच्या रणनीतीचे अक्षरशः धिंडवडे काढत ३० पैकी २७ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा केवळ एक राजकीय अपघात होता, हे संगमनेरच्या मतदारांनी…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर नगरपरिषद निवडणुकीमध्ये आज रविवारी सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या मतमोजणी मध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर सेवा समितीने आपल्या पहिल्याच विजयानंतर जोरदार खाते उघडले आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या निवडणूक निकालामध्ये सेवा समितीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होताना दिसत असून महायुतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत चुरस निर्माण करता आली नसल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निवडणूक निकालातून संगमनेर सेवा समितीचे उमेदवार सीमा खटाटे, भारत बोऱ्हाडे, सौरभ कासार, शोभा पवार, प्राची काशीद, किशोर पवार, विश्वास मुर्तडक, डॉ. अनुराधा सातपुते, वनिता गाढे, गजेंद्र अभंग, नितीन अभंग, मालती डाके, दिपाली पंचरिया, गणेश गुंजाळ यांनी…

Read More

‘नावात काय आहे? गुलाबाला दुसर्‍या कुठल्याही नावाने हाक मारली तरी त्याचा सुगंध तसाच राहतो’, जगाला तत्व देणार्‍या विल्यम शेक्सपीयरच्या ‘रोमिओ अ‍ॅण्ड ज्युलिएट’ या प्रसिध्द नाटकातील ही अजरामर रचना. नावापेक्षा व्यक्तीचा किंवा वस्तूंचा खरा गूणधर्म, मूल्य आणि स्वरूप महत्वाचं असतं. नाव बदललं तरी त्याचा गूण बदलत नसतो. विल्यम शेक्सपीयरच्या या तत्वज्ञानाची फारकत सध्या भारताच्या मध्यवर्ती सरकारने घेतली आहे. मागल्या सरकारने देशातील विविध ठिकाणं, संस्था, योजनांना दिलेली नावं काढण्याचा खोडसाळपणा या सरकारने सुरू केला आहे. इतिहास पुसून काढताना इतिहासाची पानं आम्ही सांगू तशीच असतील, असं कोणी सांगण्याचा प्रयत्न केला तर? त्याला जगात वेडं ठरवलं जाईल. पण भारतात ते खुलेआम सुरू आहे. हे…

Read More

मेष : आजचा दिवस उत्साहाचा राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल, पण खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा. वृषभ : आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मानसिक शांततेसाठी योगा किंवा ध्यानाचा आधार घ्या. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य आहे. मिथुन : मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. व्यापारात धनलाभाचे योग आहेत. बोलण्यावर संयम ठेवा. कर्क : नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. सिंह : नशिबाची साथ लाभेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. प्रवासाचे योग आहेत, जो तुमच्यासाठी सुखद ठरेल. कन्या : आज सावध राहण्याची गरज आहे. वाहन जपून चालवा. कोणत्याही वादात पडू नका. आरोग्याची…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, रविवारी (दिनांक २१ डिसेंबर) ही प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी दिली आहे. मतमोजणी सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाने १० टेबलांची व्यवस्था केली असून संपूर्ण मोजणी एकूण ८ फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीला सकाळी दहा वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरुवात होणार असून मतमोजणीच्या फेऱ्यांचे नियोजन प्रभागांनुसार करण्यात आले आहे.  पहिल्या फेरीत प्रभाग १ व २ ची मोजणी होईल, तर दुसऱ्या फेरीत प्रभाग ३, ४…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज  अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोहारे-मिरपूर येथील श्रीक्षेत्र आवजीनाथ बाबा देवस्थान परिसरात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नांदूर शिंगोटे–कोल्हार राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्राद्वारे आणि दूरध्वनीवरून संपर्क साधून पाठपुरावा सुरू केला आहे. संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील आवजीनाथ बाबा मंदिराच्या विकासासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत आहेत. गेल्या वर्षी ५० लाख रुपयांच्या निधीतून भक्त निवासाची उभारणी व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे भाविकांच्या संख्येत मोठी…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी उद्या रविवारी, (२१ डिसेंबर) सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल परिसरात पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने क्रीडा संकुल परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले असून अनेक रस्ते सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मतमोजणीच्या दिवशी सुरक्षिततेच्या कारणास्तव खालील मार्गांवरून सर्व वाहनांना व नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे-  ईदगाह मैदान ते नेहरू गार्डन: हा संपूर्ण रस्ता मतमोजणीच्या दिवशी बंद राहील. शहर पोलीस स्टेशन ते संजय गांधी नगर: या दरम्यानचा रस्ता बॅरिकेडिंग करून पूर्णतः बंद असेल. वकील कॉलनी व अभंग मळा: या भागातून…

Read More

संगमनेर | अनंत पांगारकर संगमनेर नगरपरिषदेच्या रखडलेल्या तीन जागांसाठी आज (शनिवारी) रणधुमाळी उडाली आहे. या तीन जागांसाठी आज सकाळीच शांततेत मतदान सुरू झाले असून सकाळी साडेनऊ पर्यंत ६.६१ टक्के मतदान झाले होते. तर नगराध्यक्षपदासह २७ जागांसाठी २ डिसेंबरला मतदान झाले आहे. उद्या रविवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर संगमनेर शहराच्या स्थानिक राजकारणाची आगामी दिशा स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्यात होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने या निकालातून शहराचा ‘किंग’ कोण ठरणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुमारे ११,४२६ मतदार आज ९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद करणार असून, उद्या रविवारी (२१ डिसेंबर) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. या निवडणुकीत…

Read More

मेष – आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडू शकतात, पण त्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. घाईघाईत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात, त्यामुळे संयम ठेवा. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवा. वृषभ – आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला आहे. धनलाभाचे योग आहेत. व्यावसायिक कामात प्रगती होईल. घरातील वातावरण आनंदी राहील, मात्र बाहेरचे अन्न खाणे टाळावे कारण पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. मिथुन – आज तुम्हाला बुद्धी आणि कौशल्याचा वापर करावा लागेल. नवीन लोकांशी संपर्क होईल जो भविष्यात फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबत असलेल्या जुन्या कुरबुरी संपतील. प्रवासाचे बेत आखले जातील. कर्क – आजचा दिवस थोडा संयमाचा आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज: संगमनेर तालुक्याच्या जनतेने ४० वर्षे प्रेम दिले, आम्ही कष्टाने निळवंडे धरण, थेट पाईपलाईन आणि रेल्वे मार्ग मंजूर करून घेतला. मात्र, आता हाच विकासाचा वारसा उध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू असून ज्यांनी रेल्वे पळवली, त्यांना ओळखा आणि तालुका वाचवण्यासाठी वेळीच एकत्र या, असे प्रखर आवाहन माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. संगमनेर सेवा समितीच्यावतीने गणेशनगर येथे आयोजित नगरपालिका निवडणुकीच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगराध्यक्ष व उमेदवार असलेले…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग परिसरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी वनविभागाला मोठे यश आले आहे. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने अत्यंत धाडसी मोहीम राबवत आतापर्यंत तीन बिबट्यांना जेरबंद केले. सुरुवातीला घटनेच्या दुसऱ्या दिवशी पकडण्यात आलेल्या बिबट्यानंतर पुन्हा एका बिबट्याला गुंगीचे औषध (डॉट) देऊन पकडण्यात आले, तर एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे पकडलेल्या बिबट्यांची संख्या जवळेकडल मध्ये तीन वर गेली आहे. काही दिवसांपूर्वी जवळेकडलग येथील अवघ्या चार वर्षांच्या सिद्धेश कडलग या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. शासनाने या घटनेची गंभीर दखल…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज सहकार, शेती, शिक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत ‘संगमनेर मॉडेल’ राज्यासमोर ठेवणारे माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. तालुक्यातील युवकांना स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी हक्काची जागा मिळावी, या उद्देशाने ९ अद्यावत अभ्यासिका उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडली आहे.  या उपक्रमाचा शुभारंभ म्हणून राजापूर येथे ग्रामविकास २५१५ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ३० लाख रुपये निधीतून साकारल्या जाणाऱ्या अभ्यासिकेचे भूमिपूजन युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार ही ओळख जपत लोकनेते बाळासाहेब थोरात…

Read More

अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज: अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) चंदनाची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नाशिकहून श्रीरामपूरच्या दिशेने चंदनाची लाकडे घेऊन जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारची पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचून झडती घेतली. या धडाकेबाज कारवाईत ५ लाख ७० हजार रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अवैध चंदनाची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले होते. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला होता.  गुरुवारी (१८ डिसेंबर) एलसीबीचे…

Read More

अहिल्यानगर: जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शाळांमध्ये मतदान केंद्रे आहेत, अशा शाळांना शुक्रवार १९ डिसेंबर आणि शनिवार २० डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सुट्टी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील राहाता वगळून उर्वरित संगमनेर, शिर्डी, राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी या नगरपरिषदा आणि नेवासा नगरपंचायत या ठिकाणी २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी मतदानाच्या एक दिवस अगोदर, म्हणजेच १९ डिसेंबर रोजीच केंद्रांवर दाखल होणार आहेत. निवडणूक कामात कोणताही अडथळा येऊ…

Read More

मेष: कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराशी संवाद वाढवा. मिथुन: नवीन कामाची संधी मिळेल. मानसिक शांतता लाभेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कर्क: आजचा दिवस धावपळीचा ठरेल. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. सिंह: आत्मविश्वासात वाढ होईल. व्यापार-उद्योगात फायदा होईल. रखडलेले धन परत मिळण्याची शक्यता आहे. कन्या: नोकरीत बढतीचे योग आहेत. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरासाठी काही खरेदी कराल. तूळ: प्रवासाचे योग आहेत. नशिबाची साथ मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. वृश्चिक: आरोग्य आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. गुपित गोष्टी कोणाशीही…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज: राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी ‘संगमनेरचा राजू’ या इन्स्टाग्राम अकाऊंट चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘संगमनेरचा राजू’ या इन्स्टाग्राम आयडीवरून मंत्री विखे पाटील आणि आ. अमोल खताळ यांच्या नावाचा वापर करून आक्षेपार्ह सब-टायटलसह काही व्हिडिओ आणि मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. या पोस्टमध्ये दोघांची प्रतिमा मलीन करण्याचा आणि बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या.  भाजपचे ज्येष्ठ नेते…

Read More

अकोले (प्रतिनिधी): अनेक प्रयत्न आणि प्रशासकीय पाठपुरावा करूनही अकोले तालुक्यातील अवैध दारूविक्री थांबत नसल्याने दारूबंदी समितीचे सदस्य तथा प्रसिद्ध समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांनी प्रशासकीय यंत्रणेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत आदेश देऊनही पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा निषेध नोंदवत कुलकर्णी यांनी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. तसेच, पुढील बैठकीपर्यंत परिस्थिती न सुधारल्यास समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या पत्रात दिला आहे. हेरंब कुलकर्णी यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, संगमनेर, ठाणगाव आणि घारगाव येथील दुकानांतून दररोज अकोल्यात अवैध दारूचा पुरवठा होतो. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सहस्त्रबुद्धे यांना वारंवार…

Read More