Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : सध्या समाजात वाढलेली नकारात्मकता दूर करून मानवता आणि आनंदाची निर्मिती करण्यासाठी संपूर्ण जुलै महिना ‘मंथ ऑफ काइंडनेस’ (दयाळूपणाचा महिना) म्हणून राबवण्याचा एक अनोखा संकल्प प्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सोडला आहे. या मोहिमेत प्रत्येकाने दररोज किमान एक चांगली कृती करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. जगभरात अशा प्रकारची संकल्पना पहिल्यांदाच संगमनेर तालुक्यात राबवली जात असून, या संदर्भात यशोधन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर माहिती दिली. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, जागतिक युद्ध, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि नकारात्मक बातम्यांमुळे समाजात चिंतेचे वातावरण आहे, ज्याचा विपरीत परिणाम पुढील पिढीवर होत आहे. हे…
विशेष प्रतिनिधी / मुंबई “देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती, त्यानंतर सीटचोरी केली जाऊ लागली, मग पक्षचोरी केली जाऊ लागली, आस्थेची चोरी केली जात आहे आणि आता तर सर्वात मोठा धोका उभा ठाकला आहे. हे सरकार आता नागरिकताही चोरी करू लागलं आहे, हा गंभीर धोका ओळखा. नागरिकता नाकारून तुमचे मानवी हक्क आणि अधिकार नाकारले जात आहेत, म्हणून वेळीच सावध व्हा आणि लोकशाही वाचवण्यासाठी आवाज बुलंद करा,” असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणाच्या प्रभारी मीनाक्षी नटराजन यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने टिळक भवन येथे “लोकशाही वाचवा निर्धार सभा” आयोजित करण्यात आली होती.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर: अवैध मुरूम आणि माती वाहतुकीबाबत जाब विचारल्याच्या रागातून हा हल्ला झाला असून, यामध्ये तलवारीचाही वापर करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावात ही धक्कादायक घटना घडली. समजलेल्या माहितीनुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक असलेले फिर्यादी संदीप घुगे (वय ४३) हे रात्री जेवण करून घराबाहेर शतपावली करत असताना, दोन मोटारसायकलवरून सहा जण तेथे आले. त्यातील एका गाडीवर विशाल हौशीराम खेमनर (रा. अंभोरे), प्रवीण ठकाजी पुणेकर व सुदर्शन शिवाजी श्रीराम (दोघे रा. डिग्रस) हे होते. विशाल व प्रवीण यांनी घुगे यांना पाहताच पिस्तूल उपसून ‘तुझा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने रविवारी (५ जुलै) सायंकाळी सहा वाजता एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यापारी असोसिएशन हॉल येथे होणाऱ्या या कार्यक्रमात ‘तापलेल्या पृथ्वीची गोष्ट’ या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ प्रा. डॉ. गुरुदास नुलकर प्रकाश टाकणार आहेत. हवामान बदलाचे चटके संपूर्ण जगाला बसत असताना, या संकटाची दाहकता आणि त्यामागील शास्त्रीय कारणे समजून घेणे गरजेचे झाले आहे. याच उद्देशाने आयोजित या व्याख्यानात डॉ. नुलकर हे सामान्य नागरिकांना पर्यावरण संवर्धनात कशी भर घालता येईल, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन करतील. सत्यशोधक विचार मंच आपल्या प्रबोधनपर उपक्रमांसाठी ओळखला जातो. मंचाचे समन्वयक संदीप…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने चांगला राहील. महत्त्वाच्या व्यक्तींशी किंवा कार्यालयीन अधिकारी वर्गाशी चर्चा करताना अत्यंत सजग राहा. व्यावसायिक योजनांमध्ये काही सकारात्मक बदल करावे लागतील, ज्यासाठी अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. कुटुंबातील वातावरण धार्मिक राहील. वृषभ – आज कामाच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या संदर्भात परदेश प्रवासाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तीर्थक्षेत्री जाण्याचा तुमचा संकल्प आज तडीस जाऊ शकतो. दिवसाच्या उत्तरार्धात मात्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा जवळच्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. मिथुन – आज विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. नेहमीपेक्षा अतिरिक्त किंवा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा मनात प्रबळ होईल. घरातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलिसांचा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक कारनामा समोर आला असून, दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला चक्क २० वर्षांचा दाखवून तब्बल पाच महिने जेलमध्ये ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर निष्काळजीपणामुळे न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर तीव्र शब्दात प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून तपासी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणावरून आता मानवाधिकार आयोग देखील चौकशी करण्याची शक्यता असून पोलीस प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. एवढा गंभीर प्रकार घडत असताना संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे चिमुकलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याला आज शंभर दिवस उलटूनही आरोपी अद्याप सापडलेला नाही, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी तपासातून अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर न आल्याने त्यांनी बुधवारी विधिमंडळात या विषयावर पुन्हा एकदा जोरदार आवाज उठवला. या संवेदनशील प्रकरणासंदर्भात आमदार तांबे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याची विनंती केली होती. तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः पीडित कुटुंबाची…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या मागणीला अखेर मोठे यश आले आहे. नगर परिषदेकडून या ऐतिहासिक कामासाठी अधिकृत निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, संगमनेर शिवजयंती उत्सव युवक समिती आणि शहरातील शिवभक्तांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. २६ मार्च २०२१ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्याकडे शिवसेनेच्या वतीने कतारी यांनी निवेदन देत यासंबंधीची मागणी केली होती. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाचे तत्कालीन शहर प्रमुख सध्याचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शिवजयंती उत्सव समिती व शिवभक्तांकडून या स्मारकांसाठी सातत्याने निवेदने देऊन पाठपुरावा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीसाठी हालचालींना वेग आला आहे. या प्रकल्पांसाठी नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी विशेष पुढाकार घेतला असून, संगमनेर नगर परिषदेने या कामासाठी अधिकृत निविदा प्रसिद्ध केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून, दोन्ही महापुरुषांच्या भव्य स्मारकांचा मार्ग मोकळा झाला आहे. नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर बस स्थानकाच्या आवारात प्रस्तावित चौथर्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंधरा फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. हा पुतळा ब्राँझ गनमेटल या धातूपासून बनविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, शिवाजी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सद्यस्थितीत असलेल्या…
आजचे राशिभविष्य मेष : आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा आणि नवीन संधींचा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून आपणास सहकार्य मिळेल आणि कामाचे कौतुक होईल. आर्थिक प्राप्तीचे नवीन मार्ग खुले होतील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान टिकून राहील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे, तरीही खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. वृषभ : आजचा दिवस संयमाचा आहे. व्यावसायिक कामात काही अडचणी येऊ शकतात, परंतु आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण त्या नक्कीच सोडवू शकाल. घरातील सदस्यांच्या आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी लागेल. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासातील एकाग्रता महत्त्वाची ठरणार आहे. संध्याकाळच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील ‘कृषी गौरव फर्टिलायझर्स’वर कृषी विभागाने मोठी कारवाई करत २१ लाख ८० हजार ४८६ रुपये किमतीचा २ हजार ३४ गोण्यांचा बेकायदेशीर आणि निकृष्ट खतसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी आस्थापनेचे मालक किरण चंद्रकांत दौंडकर यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित दुकानाचा खत विक्री परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. कृषी विभागाच्या पथकाने १५ जून २०२६ रोजी शिंगवे तुकाई येथील एमआयडीसी मधील प्लॉट क्र. बी-५६ वर असलेल्या या आस्थापनेची अचानक तपासणी केली होती. या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: नाशिक-पुणे रेल्वे मार्ग बदलल्याच्या निषेधार्थ संगमनेरकरांनी आता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेकांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली पुणे, चाकण, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर ते नाशिक असा रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला होता. या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून भूसंपादन प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यात आली होती, तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी ७०० कोटी रुपयांहून अधिक रक्कमही वाटप झाली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनेक बैठका घेऊन सुपीक जमीन, वनक्षेत्र आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे एका बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात अर्जुन शिरसाठ हा युवक जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली असून, या पहिल्याच मानवी हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काकडवाडी येथील मुळे वस्तीवरील शांताराम मुळे यांच्या घराजवळील शेतात, एका गवताळ कोरड्या भागात हा बिबट्या दबा धरून बसला होता. अर्जुन शिरसाठ हा युवक आपल्या मोटरसायकलवरून प्रवास करत असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. या प्राणघातक हल्ल्यातून अर्जुन अत्यंत सुदैवाने बालंबाल बचावला आहे. त्याच्या पाठीवर बिबट्याच्या नखांचे ओरखडे उमटले असून त्याला तातडीने घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि ऊर्जा देणारा ठरेल. नोकरी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टाचे योग्य ते चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. केवळ आर्थिक व्यवहारात घाईगडबडीने निर्णय घेणे टाळावे आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक नियोजनाला सर्वाधिक प्राधान्य देणे आवश्यक आहे. पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी नको असलेल्या खरेदीवर नियंत्रण ठेवा. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. आज कोणाकडूनही अवाजवी अपेक्षा ठेवू नका, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून पावले टाका. मिथुन: तुमच्या संवादकौशल्यामुळे आज तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. रखडलेली देणी किंवा अडकलेले पैसे…
संगमनेर: तालुक्यातील ऐतिहासिक व स्वराज्य संकल्पभूमी पेमगिरी येथे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त ‘उत्सव माझ्या कुंकवाचा’ हा अनोखा महिला सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. जाकमत बाबा मित्र मंडळ, आदिशक्ती फाउंडेशन आणि शिवसेना महायुती यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात हजारो महिलांनी ऐतिहासिक महाकाय वटवृक्षाला सात फेरे मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनीही वटवृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. या सोहळ्यात धार्मिक परंपरेसोबतच महिला सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. आमदार खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ, पत्नी नीलम खताळ,…
संगमनेर: पुणे जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे डॉ. जयश्रीताई थोरात यांनी स्वागत केले असून, हा निकाल म्हणजे त्या निष्पाप चिमुकलीला मिळालेला खऱ्या अर्थाने न्याय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही निष्पाप बालकावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना समाजात किंवा कायद्यात कोणतीही दया दाखवली जाऊ नये, असे स्पष्ट करत अशा गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे, हाच ठाम संदेश या निर्णयातून समाजाला गेला असल्याचे डॉ. जयश्रीताई थोरात यांनी नमूद केले.
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शहरातील आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संगमनेरच्या प्रांताधिकार्यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध एक मोठी कारवाई केली आहे. पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्फत संगमनेर उपविभागातील गुन्हेगारांविरुद्ध पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी हा निर्णय दिला. त्यांनी उपविभागातील एकूण ८ सराईत गुन्हेगारांचा गुन्हेगारी आलेख तपासून त्यांना अहिल्यानगर जिल्हा, तसेच शेजारील जिल्ह्यांच्या सीमांमधून ६ महिने ते १ वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार (हद्दपार) करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांच्या गोटात खळबळ उडाली असून नागरिकांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये ही कठोर कारवाई करण्यात…
पुणे : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात अखेर आज पुण्याच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक आणि सर्वात मोठा निकाल दिला आहे. ६५ वर्षीय नराधम दोषी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी मरेपर्यंत फाशीची कठोर शिक्षा सुनावली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या आत संपूर्ण सुनावणी पूर्ण करून निकाल देणारा हा राज्यातील आजवरचा सर्वात जलद गतीने निकाली लागलेला पहिलाच खटला ठरला आहे. महाराष्ट्र दिनी, म्हणजेच १ मे रोजी नसरापूर येथे ही काळीमा फासणारी घटना घडली होती, ज्यानंतर अख्ख्या राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि समाजाला नवी दिशा देण्यासाठी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दिनांक १ जुलै) कोळवाडे येथे सकाळी १० वाजता भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गोरगरीब आणि आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कटिबद्ध असणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शबरी माता संघटना व सकल आदिवासी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने कोळवाडे येथील जय हिंद आदिवासी आश्रम शाळा परिसरात हा मेळावा पार पडणार आहे. या महत्त्वपूर्ण मेळाव्याला महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि संगमनेर तालुका युवक…
संगमनेर: नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला मंजुरी मिळालेली असतानाही केंद्र व राज्य शासन आणि लोकप्रतिनिधींनी जनतेची सातत्याने दिशाभूल केली आहे. हा महत्त्वपूर्ण रेल्वे मार्ग अचानक का रद्द करण्यात आला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या कामात झालेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला पाहिजे, अशी आक्रमक मागणी घारगाव येथे आयोजित बैठकीत करण्यात आली. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग पुन्हा मंजूर होईपर्यंत आता कोणत्याही राजकीय पक्षाचा आडोसा न घेता, थेट राजकारणविरहीत तीव्र जन-आंदोलन उभारण्याचा ठाम निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. दरम्यान, या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे पाठ फिरवल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, हा परिसरात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील…
