Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: दरवर्षी नवनवीन आणि अभिनव उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या संगमनेर येथील प्रसिद्ध ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’ने यंदाच्या गणेशोत्सवात ‘डिजिटल इंडिया’ आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कागदी पावती पुस्तकांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्गणी संकलनासाठी ‘डिजिटल पावती पुस्तक’ वापरणारे बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळ हे संगमनेर शहरातील पहिलेच मंडळ ठरले आहे. गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कागदी पावत्या छापल्या जातात. मात्र, डिजिटल युगाची गरज ओळखून मंडळाचे मार्गदर्शक व नगरसेवक योगेश (चिकू) जाजू यांच्या संकल्पनेतून हे विशेष मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. आता मंडळाचे कार्यकर्ते घरोघरी आणि दुकानांमध्ये जाताना पावती पुस्तक न नेता मोबाईलमधील ॲपद्वारे वर्गणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेरमध्ये अवैध दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठे कारवाई केली. संबंधित ठिकाणी सातत्याने कारवाया झाल्याने आरोपींच्या आस्थापना कायमस्वरूपी सील करण्याची मागणी दारूबंदी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. संगमनेर शहरात गोवा बनावटीची व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली बनावट दारू विक्री करणाऱ्यांविरोधात संगमनेरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ६ ऑगस्ट रोजी मोठी कारवाई केली. या कारवाईत ‘रॉयल इम्पॅक्ट’ व्हिस्कीचे ३४ बॉक्स, विविध नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट दारू बनवण्याचे साहित्य आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पथकाने शिवाजी नगर, वडजे मळा परिसरातील…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. व्यापाऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता असून जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. मन शांत ठेवण्यासाठी नामस्मरण किंवा ध्यानधारणा करणे फायदेशीर ठरेल. वृषभ – आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे नियोजनबद्ध रीतीने काम करणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आणि विनाकारण खर्च करणे टाळा. कौटुंबिक जीवनात लहान-सहान कारणांवरून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा दर्जा ढासळत असून शासन नवीन शिक्षक भरती करण्याऐवजी शिक्षकांना अतिरिक्त ठरवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत असल्याचा घणाघाती आरोप ‘छात्र भारती’ विद्यार्थी संघटनेने केला आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणा विरोधात हजारो विद्यार्थी मोर्चाने रस्त्यावर उतरले होते. यात विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. बदलत्या शैक्षणिक धोरणांविरोधात छात्र भारतीने तीव्र आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन संगमनेरचे प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून देत त्वरित कार्यवाहीची मागणी केली आहे. गेल्या १२ वर्षांपासून राज्यात योग्य प्रमाणात शिक्षक भरती न झाल्यामुळे शिक्षण व्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे. यावर मार्ग काढण्याऐवजी…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारा ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील आणि जवळच्या लोकांचे पूर्ण सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल. आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. फक्त घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा आणि आरोग्याची योग्य काळजी घ्या. वृषभ – आजचा दिवस संयम आणि शांततेने घालवण्याचा आहे. मनामध्ये अनेक प्रकारचे विचार एकाच वेळी येतील, ज्यामुळे थोडे मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. आर्थिक बाबींमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबत संवाद चांगला ठेवल्यास नात्यातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: आश्वी परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या एका धक्कादायक घटनेत अज्ञात दोन भामट्यांनी एका ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. आश्वी-प्रतापपूर रस्त्यावरील आंधळे पेट्रोल पंपाजवळ बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली असून, या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतापपूर येथील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय शकुंतला गंगाधर चतुरे या आंधळे पेट्रोल पंपाजवळ चहाची टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास त्या दुकानात असताना दोन अज्ञात इसम तेथे आले. त्यांनी चहा मागण्याच्या बहाण्याने शकुंतला यांच्याशी संवाद साधला. दुकानात आणि आसपास गर्दी नसल्याचा फायदा घेत या भामट्यांनी अचानक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर (प्रतिनिधी): नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरलेला निसर्गरम्य ‘तामकडा’ धबधबा प्रवाहित झाला असून या तामकड्याचे जलपूजन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. हिरव्यागार वनराईच्या कुशीतून वाहणारा हा पांढराशुभ्र धबधबा परिसरातील नागरिकांसह प्रवाशांसाठी मोठा आनंददायी ठरत आहे. जलपूजनानंतर बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, अकोले व संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य परिसर आहे. बाळेश्वर पर्वतावरून वाहणाऱ्या नदीमुळे घाटातील हा सुंदर तामकडा निर्माण झाला असून पावसाळ्यात तो पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. नाशिक-पुणे महामार्गावरून प्रवास करताना अनेक पर्यटक व नागरिक या ठिकाणी थांबून निसर्गाचा आनंद घेतात.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शेकडो वर्षांची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या संगमनेरच्या मानाच्या पहिल्या गणपती श्री सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळाच्या गणेशोत्सव २०२६ च्या अध्यक्षपदी रोशन आमले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. रंगारगल्ली येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात मंडळाच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करून नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी अभिजीत पाटणकर, तर उपाध्यक्षपदी संकेत काजळे व ऋषिकेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदाची जबाबदारी अक्षय ढोरे यांच्याकडे तर सहसचिवपदाची जबाबदारी प्रथमेश गरुडकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मंडळाच्या तिजोरीची धुरा खजिनदार देवेंद्र काळे व कैलास बुरसे सांभाळणार असून प्रकल्पप्रमुख…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर | अनंत पांगारकर गोवा बनावटीच्या आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दारूची अवैध तस्करी, विक्री व बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईत गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स, नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे आणि दुचाकी वाहन असा तब्बल ५ लाख ३८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (८ ऑगस्ट) रोजी रात्री संगमनेर शहरातील जनता राजा मैदानाजवळील शिवाजीनगर परिसरातील एका घरात गोवा राज्यातील प्रतिबंधित मद्याचा मोठा साठा असल्याची खात्रीशीर बातमी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. बातमीच्या आधारे पथकाने तातडीने रचून छापा टाकला. या कारवाईत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: नातवाला वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी घेतलेल्या आजोबांचा नातवासोबतच बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. पांडुरंग रखमा गुळवे (वय ६५) आणि सर्वेश संतोष गुळवे (वय १३, दोघेही रा. गुळवे वस्ती, सावरगाव तळ, ता. संगमनेर) अशी मृत झालेल्या आजोबा-नातवाची नावे आहेत. गुळवे वस्तीवर राहणाऱ्या गुळवे कुटुंबाच्या घराशेजारीच शेततळे आहे. रविवारी सायंकाळी सर्वेशचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. हा प्रकार त्याच्या मोठ्या बहिणीच्या लक्षात येताच तिने तात्काळ आरडाओरड केली. आवाज ऐकून जवळच असलेल्या आजोबा पांडुरंग गुळवे यांनी क्षणाचाही विचार न…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील आणि तुमचे निर्णय कौतुकास्पद ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्याने जुने मतभेद दूर होतील. आरोग्याची योग्य काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुम्हाला आर्थिक बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले धन परत मिळू शकते. व्यवसायात नवीन योजना राबवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. मनात सकारात्मक विचार ठेवा आणि नको त्या वादांपासून दूर राहा. मिथुन – आजच्या दिवशी बुद्धिमत्ता आणि चातुर्याच्या जोरावर तुम्ही अनेक कठीण कामे सहज पूर्ण कराल. समाजात मानसन्मान वाढेल. नवीन व्यक्तींशी झालेली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी रविवारी क्रांती दिनी संगमनेरमध्ये टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या दुपारी उशिरापर्यंत ही वाहतूक सुरळीत केली जात होती. तर आपल्या न्याय मागणीसाठी रस्त्यावर जनसागर उसळला होता. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी पूर्वी मंजूर झालेल्या सरळ रेल्वे मार्गासाठी जनआंदोलन उभे केले आहे. सत्यजित तांबे यांनी स्वतः समृद्धी महामार्गावर तर राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेरमध्ये हिवरगाव पावसा येथील टोल नाका येथे आंदोलन करण्यात आले. पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्यासह राहुल…
बाबरी मशीद पाडण्याचा विषय असो, की राम मंदिर उभारण्याचा. या दोन्ही विषयांमध्ये शक्य झालं तिथे पैशांवर हात मारण्याचा प्रकार अत्यंत खुबीने पार पाडला गेला आहे. चंपतराय बन्सल नावाच्या राम मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षाने राम मंदिराला पुरतं बदनाम करून टाकलंच. शिवाय रामाच्या नावाचं सोंग घेऊन धर्माच्या नावाने उत्तम ढोंग करू शकतो, असं उसने जगाला दाखवून दिलं आहे. प्रचंड माया जमवलेला हा चंपतराय म्हणतोय, “माझं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही… माझ्या मागे लागलात तर मी भल्याभल्यांना आडवं करेन,” असं धमकावत त्याने भाजपबरोबरच आरएसएसच्या नेत्यांनाही घेरलंय. कोट्यवधी रुपयांच्या चोरीचा ज्याच्यावर आरोप आहे, अशी व्यक्ती थेट आव्हान देऊ शकते, हे म्हणजे ‘सबकी उंगली…
अमोल शेलकर ९ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरून ‘भारत छोडो’ आंदोलनाची घोषणा झाली आणि संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या निर्णायक लढ्याला सुरुवात झाली. महात्मा गांधींनी दिलेला ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारा ठरला. ब्रिटिश सत्तेने प्रमुख नेत्यांना अटक करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला; मात्र नेतृत्वाला तुरुंगात डांबले तरी जनतेतील स्वातंत्र्याची भावना कैद करता आली नाही. उलट हे आंदोलन सामान्य भारतीयांच्या हातात गेले आणि ब्रिटिश साम्राज्याच्या पायाभरणीलाच हादरा बसला. ‘भारत छोडो’ आंदोलन अचानक निर्माण झालेले आंदोलन नव्हते. जवळपास दोन शतकांच्या ब्रिटिश राजवटीने भारतीय जनतेच्या आर्थिक, सामाजिक आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या प्रश्नावरून संगमनेर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाच्या मागणीसाठी पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीच्या वतीने आज रविवारी ऐतिहासिक चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी वेळप्रसंगी आमरण उपोषण करण्याची तयारी दर्शविल्याने या प्रश्नाला एक नवे वळण मिळाले आहे. कृती समितीने आमदार खताळ यांच्या बदलत्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत, त्यांना केवळ घोषणा व बैठकांपर्यंत न थांबता चक्काजाम आंदोलनात आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष सहभागी होण्याचे थेट आवाहन केले आहे. आमदारांच्या आमरण उपोषणाच्या भूमिकेनंतर आंदोलनात काय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. रेल्वे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुकेवाडी येथील आग्नेश्वर मळा येथे घरफोडीची मोठी घटना समोर आली आहे. शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास विठ्ठल भानुदास शिंदे (वय ५३) यांच्या बंद घराची कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने घरातील ४ लाख ४० हजार रुपयांचा साडेतीन तोळ्यांचा राणीहार, १ लाख २० हजार रुपयांचा १ तोळ्याचा नेकलेस, १ लाख २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन साखळ्या, १ तोळ्याची आणखी एक सोन्याची साखळी, अर्धा तोळ्याचे कानातील जोड, सोन्याचे ओम पान, कानातील बाळी, नाकातील नथ, मोरणी आणि चांदीचे जोडवे व छल्ला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा कणा ठरणाऱ्या नाशिक-पुणे थेट रेल्वे मार्गासाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार असून नाशिक-पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर सकाळी नऊ वाजता तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. संगमनेर, सिन्नर, अकोले, नारायणगाव, जुन्नर, मंचर, खेड आणि चाकण या संपूर्ण पट्ट्यातील जनतेच्या हक्काच्या या रेल्वेसाठी सर्वपक्षीय नागरिक, युवक आणि महिला या आंदोलनात पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहेत. नाशिक-पुणे-मुंबई या गोल्डन ट्रँगलच्या विकासासाठी नाशिक-पुणे रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी १९९८ पासून या थेट रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापासून ते केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महारेलपर्यंत केलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्याचे गोदावरी व कृष्णा खोरे जलसंपदा मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नाशिक-पुणे रेल्वे मार्गासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्या या वक्तव्याचा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक-पुणे रेल्वे हा लाखो नागरिकांच्या विकासाशी थेट जोडलेला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अशा गंभीर आणि तांत्रिक प्रश्नावर वस्तुनिष्ठ भूमिका मांडण्याऐवजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी साईबाबांच्या नावाचा आधार घेत शिर्डी मार्गाला विरोध करणाऱ्यांवर अप्रत्यक्ष दडपण आणण्याचा प्रयत्न केला आहे. “शिर्डी रेल्वेला विरोध करणाऱ्यांवर साईबाबा कोपतील” अशा आशयाचे विधान करणे हे…
आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जावान आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी किंवा बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम वेळ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जवळच्या नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः आहाराकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. वृषभ- आजचा दिवस संयम आणि शांततेने घालवण्याचा आहे. मानसिक स्थिरतेसाठी योग आणि ध्यानाचा सहारा घ्या. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा आणि घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नोकरी आणि व्यवसायात काही आव्हाने येऊ शकतात, परंतु…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर (प्रतिनिधी): खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताची टंचाई भासू नये, यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने ३५७ मेट्रिक टन युरियाचा संरक्षित बफर स्टॉक विक्रीसाठी खुला केला आहे. कृषी विभागाच्या या नियोजनामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसे खत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चालू खरीप हंगामासाठी तालुक्याला एकूण ७०० मेट्रिक टन युरियाचा साठा मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३४९ मेट्रिक टन युरिया त्वरित उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, सध्या शेतीकामांचा वेग वाढल्याने युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही बाब लक्षात…
