Author: Annant Ppangarkar
संगमनेर – शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळा आज राज्यातील इतर आश्रम शाळांसाठी एक आदर्श मॉडेल ठरली आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत, ज्यामुळे त्यांना मोठी संधी मिळाली आहे, तसेच नव्याने होत असलेल्या वस्तीगृह आणि ट्रेनिंग सेंटरमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना अधिक चांगली संधी मिळेल, असा विश्वास माजी शिक्षण मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. कोळवाडे येथे जय हिंद आदिवासी आश्रम शाळेचा वर्धापन दिन, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि फादर रॉबर्ट यांच्या…
अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील २९० उमेदवारांच्या शासकीय नियुक्ती आदेश वितरणाच्या कार्यक्रमाचे स्थळ बदलण्यात आले आहे. हा कार्यक्रम आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऐवजी पालकमंत्र्यांच्या कार्यालयातून आयोजित केला जाणार आहे. राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) शिफारस झालेले आणि अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या एकूण २९० उमेदवारांना हे नियुक्ती आदेश वाटप करण्यात येणार आहेत. हा महत्त्वाचा कार्यक्रम आता जनसेवा कार्यालय, लोणी–हसणापूर रोड, लोणी बुद्रुक, ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथे शनिवारी (दि. ४ ऑक्टोबर) सकाळी १०.३० वाजता पार पडणार आहे. यापूर्वी हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना या…
संगमनेर – निळवंडे धरण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील वितरिकांची कामे आणि कालव्याशेजारील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज (शुक्रवार दि. ०३ ऑक्टोंबर) घुलेवाडी येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्च्याचे नेतृत्व करताना आमदार सत्यजित तांबे यांनी जलसंपदा विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, येत्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. आंदोलनावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, पांडुरंग पाटील घुले, रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, दत्ता कोकणे, विष्णुपंत रहाटळ, विलास कवडे, सचिन दिघे, मारुती कवडे, सुमित पानसरे ,रमेश नेहे, सनी ठोंबरे, अक्षय दिघे, संतोष नागरे, आनंद वर्पे, निर्मला राऊत, संतोष हासे, सुहास आहेर, किरण रोहम, प्रदीप हासे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन दसरा आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्त घोषित केलेल्या मद्य विक्री बंदीच्या दिवशीही नियम मोडत अवैध विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे. विभागाने श्रीरामपूर शहरातील दोन वाईन शॉपवर छापे टाकून १२,४४,३४५/- किमतीचा अवैध मद्यसाठा व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत किशोर भूतकर, अनिल भूतकर, आणि अरुण अक्षय काळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध मद्य विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, छाप्यांमध्ये सापडलेले ‘सेंट्रल वाईन्स शॉप’ हे एका माजी नगरसेवकाच्या नावावर असल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी…
मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही दानधर्मात खर्च कराल. सामाजिक स्नेहमेळावे आणि सहली तुम्हाला आनंद देतील. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या. वृषभ (Taurus): तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. इच्छा पूर्ण होण्याचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. मिथुन (Gemini): प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला तणाव कमी होईल. कामात बदल केल्यास फायदा होईल. कामात प्रगती दिसून येईल. कर्क (Cancer): दूरचा प्रवास टाळा, कारण प्रकृती आज साथ देणार नाही. पैशाच्या बाबतीत काळजी घ्या. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. सिंह (Leo): तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आज तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर चांगला प्रभाव टाकेल. कामात तुमची क्षमता वाढलेली दिसेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या प्रयत्नांचे कौतुक…
अहिल्यानगर – राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील २९० पात्र तरुणांना शासकीय नोकरीची संधी मिळाली आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले जाणार आहे. या एकूण २९० नियुक्तींपैकी १८१ जणांना अनुकंपा तत्त्वावर तर १०९ उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) लिपिक पदांसाठी नियुक्ती मिळणार आहे. अनुकंपा तत्त्वावर निवड झालेल्या १८१ उमेदवारांमध्ये गट ‘क’ मधील ६७ आणि गट ‘ड’ मधील ११४ उमेदवारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यात गती दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले की,…
संगमनेर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची आज केवळ देशालाच नाही, तर जगालाही गरज आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार घेऊन एक मोठी लोकचळवळ उभी करावी लागेल, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. जयहिंद लोक चळवळीच्यावतीने महात्मा गांधी यांची १५६ वी जयंती, लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त संगमनेर येथे आयोजित भव्य प्रभात फेरीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, उत्कर्षा रुपवते, डॉ. मैथिलीताई तांबे आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले की, जुलमी ब्रिटिशांविरुद्ध महात्मा गांधी यांनी भारतातील सर्व…
संगमनेर – संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (१ ऑक्टोबर) अवैध दारू वाहतुकीविरोधात एकाच दिवशी मोठी मोहीम राबवून तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. धडक कारवाईत पोलिसांनी ३,८१,४६०/- रुपये किमतीची विदेशी आणि देशी दारू आणि ती वाहतूक करण्यासाठी वापरलेली दोन वाहने जप्त केली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात वेदांत वाईन्सच्या चालक मालकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार पो.कॉ. बाळासाहेब गुंजाळ, पो.हे.कॉ. गणेश लोंढे, पो.हे.कॉ. संतोष खैरे आणि पो.ना. राहुल डोके यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. विशेष म्हणजे, अवैध विक्री आणि पुरवठा…
मुंबई – राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्याकरिता १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची राज्य निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे. असा आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम: सूचना प्रसिद्धी- संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर २०२५ रोजी वृत्तपत्रात आरक्षण सोडती संदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. आरक्षण सोडत आणि अधिसूचना- १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत- प्रारूप आरक्षणावर १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम आरक्षण प्रसिद्धी- प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून…
संगमनेर – संगमनेर शहरात बुधवारी (०१ ऑक्टोबर) सकाळी भररस्त्यातून एका ३० वर्षीय विवाहित महिलेचे ‘फिल्मी स्टाईल’ अपहरण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील रंगारगल्लीतील शनी मंदिर ते जाजू पेट्रोल पंप दरम्यान ही घटना घडली असून, घटनेनंतर तातडीने सूत्रे हलवत पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा व अपहृत महिलेचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली आहे. भरदिवसा शहराच्या मध्यभागी ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिकेच्या वतीने रस्त्यांची साफसफाईचे काम करणारी ३० वर्षीय महिला बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिर ते जाजू पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काम करत होती. त्याच वेळी, जिथे रंगारगल्ली परिसर चारचाकी वाहनातून आलेल्या काही तरुणांनी तिला…
मेष – प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. काहींना प्रवासाचे योग येतील. आजच्या शुभ दिवशी तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. वृषभ – तुमची दैनंदिन कामे वेळेत पूर्ण होतील. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी कमी होतील. कामामध्ये स्थिरता आणि समाधानी भावना राहील. मिथुन – कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या हिमतीवर काम करणे योग्य ठरेल. वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा मानसिक शांतता भंग होऊ शकते. कर्क – भागीदारीच्या व्यवसायात किंवा कामात सुयश लाभेल. तुम्हाला नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल, जो भविष्यात फायदेशीर ठरेल. सिंह – खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. वाहने जपून चालवावी लागतील. कन्या -…
संगमनेर: राजापूर (ता. संगमनेर) येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलेल्या वैभव हासे याच्या पत्नीसह सासरच्या चार जणांना संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. २५ ऑगस्ट २०२५ रोजी राजापूर येथील रहिवासी वैभव नवनाथ हासे यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मृत वैभव यांची पत्नी माधुरी वैभव हासे, सासरे शिवाजी तुकाराम वाडेकर, बाळासाहेब तुकाराम वाडेकर, मेहुणा तुषार शिवाजी वाडेकर (सर्व रा. चास-पिंपळदरी, ता. अकोले) यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी सर्व आरोपींनी संगमनेर येथील जिल्हा व सत्र…
मेष – कामाची अधिकता राहील. सरकारी कामांमध्ये यश मिळेल. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. वृषभ – आज धन लाभाच्या संधी आहेत. वेळेचा आणि ऊर्जेचा योग्य वापर करा. जुन्या कामांचे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील. मिथुन – गुरुजनांचे आशीर्वाद लाभतील. धार्मिकतेकडे कल राहील. आपल्या शब्दाला आज उचित प्राधान्य मिळेल. कर्क – यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. सिंह – जिद्दीने एखादे महत्त्वाचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात यश मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. कन्या – आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे चिंता कमी होतील. नियोजनाने आणि संयमाने कामे मार्गी लागतील. तूळ – नवीन ओळखी होतील आणि आर्थिक चिंता मिटेल.…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळाच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (30 सप्टेंबर) केली आहे. यासोबतच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत आणि दीर्घकालीन उपाययोजना दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसानीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 60 लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, पहिल्या टप्प्यात 2 हजार 215 कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. ही मदत देण्यासाठी केवायसीच्या अटी शिथिल करून ॲग्री स्ट्रक्चर रेकॉर्डच्या आधारे दिली…
संगमनेर – यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ढाकणी या गावी एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या दुःखद घटनेत पीडित मुलीचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली आहे. या क्रूर कृत्याविरोधात संगमनेरच्या पद्मशाली समाज मंडळ, आणि महिला पद्माशाली समाज मंडळच्यावतीने सोमवारी तीव्र संताप आणि निषेध व्यक्त करण्यात आला. समाज बांधवांमध्ये या घटनेमुळे प्रचंड रोष असून, दोषी आरोपीला फाशीची कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हा निषेध नोंदविण्यात आला. पद्मशाली समाज मंडळाचे अध्यक्ष गणेश सायन्ना मादास आणि महिला पद्माशाली समाज मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मी दत्तात्रय इटप यांच्या नेतृत्वाखालील…
संगमनेर – ब्रिटन आणि जपानलाही मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था २०२५ च्या मध्यात ४ ट्रिलियनचा टप्पा ओलांडून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याने भारत एक आश्वासक गुंतवणूक केंद्र बनला आहे. याच बळावर, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) नुसार म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता (AUM) ७५.१९ लाख कोटींवर पोहोचली असून, महिन्याला एसआयपी (SIP) द्वारे येणारी रक्कम २८,२६५ कोटी असल्याने, हा उद्योग लवकरच शंभर लाख कोटींच्या उंबरठ्यावर असेल, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन अर्थतज्ज्ञ सुनील कडलग यांनी केले. ‘सहकारातून समृद्धी’ या अभियानांतर्गत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘चला अर्थसाक्षर होऊयात’ या विशेष अर्थसाक्षरता कार्यशाळेचे सोमवारी…
संगमनेर – मत चोरी ही संविधानद्रोही कृती असल्याचा आरोप करत, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली “मत चोर, गद्दी छोड” स्वाक्षरी अभियान देशभरात सुरू केले आहे. या अभियानाचा शुभारंभ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेरमधून सोमवारी करण्यात आला. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सी.डब्ल्यू.सी.चे (वर्किंग कमिटी) सदस्य आणि राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागातर्फे ही सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. काँग्रेसच्यावतीने हाती घेतलेल्या या अभियानामुळे आगामी काळात मत चोरीच्या मुद्द्यावरून राज्यात आणि देशात काँग्रेसकडून तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बंटी यादव, प्रदेश महासचिव…
मेष – आजचा दिवस मिश्र फलदायी राहील. आरोग्याच्या तक्रारी किंवा तणाव जाणवू शकतो. संताप वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामात अडथळे येऊ शकतात. प्रवासाचा योग आहे. वृषभ – आजचा दिवस काळजीपूर्वक राहण्याचा आहे. नवीन कामे सुरू करणे टाळावे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल. जोडीदाराच्या उत्तम साथीमुळे घरातील वातावरण आनंदी राहील. मिथुन – आजचा दिवस उत्तम जाईल. घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमचा सहभाग महत्त्वपूर्ण असेल. कर्क – आजचा दिवस काहीसा तणावयुक्त जाऊ शकतो. नोकरीत अधिकारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सिंह – आज नियोजनबद्ध काम झाल्यामुळे समाधानी राहाल. महिलांना थोडी अधिक कामे करावी लागतील. कन्या – आज तुम्हाला उत्तम गृहसौख्य लाभेल.…
संगमनेर – आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आय लव संगमनेरच्या वतीने नवरात्रीनिमित्त आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम २४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत शहरातील तब्बल १६ ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमांमध्ये हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगमनेर शहरातील महिलांना खेळ, स्पर्धा, प्रश्नोत्तरे आणि लकी ड्रॉ अशा मजेदार उपक्रमांचा आनंद घेता आला. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यात प्रामुख्याने राजेशाही पैठणी, कुकर, मिक्सर, गृहउपयोगी साहित्य व इतर आकर्षक भेटवस्तू यांचा समावेश होता. यावेळी शहरातील सर्व कार्यक्रमांना माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, शरयूताई देशमुख, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिलीताई तांबे हे आवर्जून उपस्थित राहिले.…
माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती संगमनेर – सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने जयहिंद लोक चळवळीच्यावतीने संगमनेर शहरात भव्य प्रभात फेरी आणि सामूहिक भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी, (2 ऑक्टोबर) होणाऱ्या या कार्यक्रमात महात्मा गांधीजी यांची वेशभूषा केलेले 200 विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी होणार आहेत, तर विविध शाळांमधील 600 विद्यार्थी सामूहिक भजन सादर करून राष्ट्रपित्यांना आदरांजली वाहतील. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या गांधीजींची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या निमित्ताने, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी माहिती दिली की,…
