Author: Annant Ppangarkar

अहिल्यानगर : शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेली संत्री चोरून नेणाऱ्या एका अट्टल चोराला नगर तालुका पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख २० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, यामध्ये चोरीची संत्री, रिकामे कॅरेट आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दशमीगव्हाण येथील शेतकरी पोपट पांडुरंग म्हस्के यांनी त्यांच्या शेतात संत्री विक्रीसाठी नेण्याकरिता ११० रिकामे कॅरेट ठेवले होते. १९ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश करून संत्र्यांची चोरी केली. २० फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता शेतकरी शेतात गेले असता, त्यांना ९८ कॅरेटसह झाडांवरील फळे चोरीला गेल्याचे लक्षात आले. शेतात टेम्पोच्या टायरचे निशाण आढळल्याने त्यांनी…

Read More

अहिल्यानगर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका युवतीवर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून सध्या अभिषेक कळमकर फरार असल्याचे समजते. फिर्यादीनुसार, शिरूर तालुक्यातील पीडित युवती तीन महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात असताना तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिषेक कळमकर यांच्याशी संपर्क साधला होता. नोकरीची गरज असल्याचे सांगितल्यानंतर कळमकर यांनी तिला कागदपत्रांसह भेटीसाठी बोलावले. एमआयडीसी परिसरातील स्वतःच्या शाळेत कामाला लावून देतो असे सांगून त्यांनी पीडितेचा विश्वास…

Read More

झरेकाठी वार्ताहर: संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील आकांक्षा रवींद्र निकम ही तरुणी अहिल्यानगर येथे कामानिमित्त जात असताना झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाली आहे. अपघातात तिला गंभीर दुखापत झाली असून सध्या तिच्यावर अहिल्यानगरमधील झोपडी कॅन्टीन परिसरातील मॅक्स सुपर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आकांक्षा बोल्हेगाव फाटा येथील एमआयडीसीमध्ये कंपनीच्या कामासाठी जात असताना, एका भरधाव मोटरसायकलने आणि विटांनी भरलेल्या डंपरने तिला जोरदार धडक दिली. या अपघाताची भीषणता मोठी असून डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे, तर संबंधित मोटरसायकल चालक मदत करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आकांक्षाचे वडील रवींद्र चांगदेव निकम यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली…

Read More

आजचे राशीभविष्य: २१ फेब्रुवारी २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाजू भक्कम राहील, मात्र गुंतवणुकीचे निर्णय घाईत घेऊ नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, पण वादाचे प्रसंग टाळण्यासाठी शब्दांवर ताबा ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल आणि मुलांकडून एखादी शुभवार्ता समजू शकते. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मिथुन: बौद्धिक कामात गुंतलेल्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल आणि नवीन योजना…

Read More

पुणे : शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका १३ वर्षीय मुलीवर तिच्या आईच्याच मित्रानो लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी तत्परता दाखवत २९ वर्षीय आरोपी ज्ञानेश्वर रायरीकर याला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलीची आई विधवा असून आरोपी ज्ञानेश्वर हा त्यांचा जुना मित्र असल्याने कुटुंबाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. याच विश्वासाचा गैरफायदा घेत, मुलीला शाळेत सोडण्याचे आमिष दाखवून आरोपीने तिला डीपी रोड परिसरात नेले. तिथे शाळेत पोहोचवण्याऐवजी त्याने गाडी थांबवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा मुलीला शाळेत पोहोचायला अर्धा तास उशीर झाला. मुलगी घरी परतल्यानंतर आईने…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना समोर आली असून, अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी सुरेश विठ्ठल सानप (वय ३४, रा. तिगाव) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:१५ ते २:३० वाजेच्या दरम्यान सानप कुटुंबीय घराशेजारील शेतात ज्वारी कापणीचे काम करत होते. हीच संधी साधून अज्ञात आरोपीने त्यांच्या बंद घराच्या मुख्य गेटचे कुलूप व कोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील ५ हजार रुपये किमतीची साडेतीन ग्रॅमची सोन्याची नथ आणि ३५ हजार रुपये…

Read More

अकोले: छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या अन्यायाविरोधात लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ज्या प्रेरणेमुळे त्या काळात सर्व समाज महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि स्वराज्याप्रति अतुलनीय निष्ठा दाखवली, त्या प्रेरणेचा शोध घेण्याची आज खऱ्या अर्थाने आवश्यकता निर्माण झाली आहे. आजचा समाज तोच असला, तरी शिवरायांच्या काळातील समाजातील विविध घटकांनी जी निष्ठा जपली, ती आजच्या समाजात तितकीशी दिसून येत नाही, असे प्रतिपादन अकोले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी केले. तालुक्यातील गणोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथे आयोजित शिवजयंती उत्सव, शाळेच्या संरक्षक भिंतीचा भूमिपूजन समारंभ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी अनिल…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यातील राजापूर येथील वीज उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आल्याने राजापूर, गुंजाळवाडी आणि वेल्हाळे परिसरातील वीज प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सततच्या पाठपुराव्यामुळे महावितरण प्रशासनाने या उपकेंद्रातील ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बदलून त्याठिकाणी १० एमव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित केला आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून नागरिकांची सुटका झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरातील वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त भार वाढल्याने शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. कमी दाबाने वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांचे शेतीपंप वारंवार बंद पडत होते, याचा थेट परिणाम पिकांना पाणी देण्यावर आणि शेती उत्पादनावर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या कवी अनंत फंदी खुल्या नाट्यगृहाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच याठिकाणी मराठी नाटकांचे प्रयोग सुरू होणार आहेत. ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकतीच आमदार सत्यजित तांबे यांच्या समवेत या नाट्यगृहाची पाहणी केली. संगमनेरची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेले प्रोत्साहन यामुळे या शहरात नाटक सादर करण्याची आपली अनेक दिवसांची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार असल्याचे दामले यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. नाट्यगृहाच्या भेटीदरम्यान प्रशांत दामले यांनी संपूर्ण वास्तूची बारकाईने पाहणी केली आणि अद्ययावत सुविधांबाबत काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  समाजातील अठरापगड जाती-धर्मातील जनतेला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. सामाजिक न्याय, समता, महिलांचा सन्मान, लोकशाही आणि शेतकऱ्यांप्रती असलेला आदर हे महाराजांचे जीवनकार्य आजही जगातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर केले.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळीच्यावतीने कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहात ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ हे महानाट्य सादर करण्यात आले. या महानाटकाने आजचा इतिहास आणि सध्याची सामाजिक स्थिती यावर जळजळीत भाष्य करत उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घातले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेरमध्ये ‘गांधी, नेहरू का नकोत?’ या विषयावर दैनिक लोकमत समूहाचे संपादक संजय आवटे यांचे रविवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक विचारमंचाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, व्याख्यानमालेच्या मालिकेतील हे दुसरे पुष्प आवटे गुंफणार आहे. ‘गांधी, नेहरू का नकोत?’ असा अत्यंत कळीचा आणि महत्त्वपूर्ण विषय या व्याख्यानासाठी निवडण्यात आला आहे. व्याख्यानाचा हा प्रबोधनात्मक कार्यक्रम येत्या रविवारी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता संगमनेरमधील पडतानी कॉम्प्लेक्स येथील व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये होणार आहे. संगमनेर लोकपंचायतने या कार्यक्रमाचे सौजन्य स्वीकारले आहे. सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत गांधी-नेहरूंच्या विचारांची प्रासंगिकता तपासून पाहण्यासाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.…

Read More

आजचे राशीभविष्य मेष  आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाजू भक्कम राहील, मात्र घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि जुन्या वादांवर पडदा पडेल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा हा उत्तम काळ आहे. वृषभ आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. धावपळीमुळे थोडा थकवा जाणवू शकतो. व्यावसायिकांना आज नवीन गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी मिळतील, पण व्यवहारांत पारदर्शकता ठेवा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि प्रिय व्यक्तींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. आज कोणत्याही प्रकारच्या वादात पडणे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. मिथुन मिथुन राशीच्या…

Read More

सिन्नर: नाशिक-पुणे महामार्गावरील मनेगाव शिवारामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्य टोळीचा सिन्नर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी) मध्यरात्री करण्यात आलेल्या या धाडसी कारवाईत केरळ राज्यातील दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे महामार्गावर सक्रिय असलेल्या एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास मनेगाव शिवारातील ‘सिन्नर गेस्ट हाऊस’ या हॉटेलमध्ये काही संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, कृष्णा कोकाटे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. पोलिसांनी…

Read More

अहिल्यानगर –  अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मिरजगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत २५ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने ही धडक कारवाई केली. यामध्ये १३२ किलो गांजासह दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तस्करीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, कर्जत येथून पाथर्डीच्या दिशेने एका स्कॉर्पिओ गाडीतून (MH 14 GH 2330) दोन व्यक्ती गांजाची मोठी खेप घेऊन जात आहेत. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, पोलीस निरीक्षक कबाडी यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर बसस्थानकासमोर महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरच उभारला जाणार असून येत्या वर्षभरात या पुतळ्याचे काम पूर्ण करून पुढच्या वर्षीची जयंती याच ठिकाणी साजरी केली जाईल. यासोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा, संविधान स्मारक आणि १०० फूट उंचीचा भव्य तिरंगा उभारून बसस्थानक परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले. शिवजयंती निमित्त शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. ढोल-ताशांचा गजर, पारंपारिक वेशभूषा आणि मर्दानी खेळांच्या सादरीकरणाने संपूर्ण शहर शिवमय झाले होते. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार सत्यजित तांबे यांनी ही महत्त्वपूर्ण…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज संगमनेर शहरात अत्यंत उत्साही वातावरणात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार व फुले अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. महापुरुषांच्या कार्याचा आदर्श समाजासमोर ठेवत त्यांच्या विचारांचे स्मरण याप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, त्यांचे स्वराज्य स्थापनेतील अतुलनीय योगदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्याय व समतेसाठी केलेले कार्य यावर प्रकाश टाकला. या दोन्ही महापुरुषांचे विचार आजही समाजाला प्रगतीची दिशा दाखवणारे आहेत, असा सूर याप्रसंगी उमटला. या सोहळ्याला विहिंप प्रांत सहमंत्री…

Read More

श्रीरामपूर, प्रतिनिधी –  शिवजयंती आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागातील १७ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११ ते पहाटे २ वाजेपर्यंत चाललेल्या या धडक मोहिमेमुळे संपूर्ण जिल्ह्यात गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत वॉरंट बजावणी, अवैध धंदे, शस्त्रसाठा आणि अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत पोलिसांनी न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवणाऱ्या आरोपींविरुद्ध विशेष मोहीम राबवली. यामध्ये ६१२ समन्स बजावण्यात आले असून, २१२ जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली. विशेष म्हणजे, न्यायालयासमोर हजर न राहिलेल्या १०० आरोपींपैकी ३१…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  सहकार क्षेत्राचा वारसा सांगणाऱ्या संगमनेर तालुक्यात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, कर्ज देण्याच्या बहाण्याने एका अनुसूचित जातीच्या कुटुंबाची जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील झोळे येथील ‘कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या’ संस्थापक अध्यक्षाने आपल्या पदाचा गैरवापर करून चक्क बनावट कागदपत्रांद्वारे ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पतसंस्थेच्या संस्थापकासह एकूण १४ जणांविरोधात भारतीय दंड विधान आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे ही फसवणूक एका दिवसात झालेली नसून, २० फेब्रुवारी २००५ पासून ते १७ फेब्रुवारी २०२६ या तब्बल २०…

Read More

अकोले: अकोले नगरपंचायतीचा अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, प्रशासकीय कारभार आणि पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून चक्क सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीच आपल्या नेत्यांविरुद्ध बंडाचे हत्यार उपसले आहे. विशेष म्हणजे, या वादात सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी विरोधी गटाशी हातमिळवणी करत नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केल्याने संपूर्ण शहरात राजकीय खळबळ माजली आहे. माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले नगरपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता असली, तरी सध्या पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी टोकाला पोहोचली आहे. नगरसेवकांनी आरोप केला आहे की, नगरपंचायतीच्या कारभारावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. कर्मचारी आणि अधिकारी आपल्या मनमानी पद्धतीने कारभार हाकत असून, नगरसेवकांनी सुचवलेल्या विकासकामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. अनेक…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज (१९ फेब्रुवारी २०२६) संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरात भव्य ‘शिवजन्मोत्सव रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिवरायांच्या विचारांचा जागर’ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत संगमनेरमधील सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ही भव्य रॅली सकाळी ठीक ८:३० वाजता संगमनेर नगरपरिषद कार्यालयापासून उत्साहात सुरू होत आहे. नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली सत्यजीत तांबे, उपनगराध्यक्ष तथा सभापती नियोजन आणि विकास समिती नूर मोहम्मद शेख आणि मुख्याधिकारी दयानंद दादासाहेब गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. रॅलीच्या मार्गाबाबत माहिती देताना…

Read More