Author: Annant Ppangarkar
संगमनेर: प्रतिनिधी संगमनेर शहराची जीवनवाहिनी असलेल्या प्रवरा-म्हाळुंगी नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली. शांतीघाट परिसरात वाळू तस्करी सुरू असताना पथकाने छापा टाकला. यावेळी पळून जाणाऱ्या तस्करांचा थरारक पाठलाग करत दोघांना रंगेहात पकडण्यात आले, तर अन्य आठ जण उसाच्या शेतातून निसटले. या कारवाईत वाळूसह रिक्षा जप्त करण्यात आली असून १० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संगमनेरमधील शांतीघाट परिसरात रिक्षाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत तहसीलदारांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार महसूल आणि पोलीस विभागाचे…
संगमनेर, प्रतिनिधी – थेट पालकमंत्र्यांनीच वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर महसूल प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. संगमनेर तालुक्यातील रायते शिवारात प्रवरा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या विरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत सुमारे २० लाख रुपये किमतीचे पोकलंड मशीन जप्त करण्यात आले असून, शासकीय कामात अडथळा आणून पळून गेलेल्या एका आरोपीविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध गौण खनिज चोरी रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष पथकातील ग्राम महसूल अधिकारी अविष्कार विश्वनाथ थोरात हे १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पथकासह गस्तीवर होते. तहसीलदार मांजरे साहेब यांच्या आदेशानुसार हे…
संगमनेर – अनंत पांगारकर संगमनेर नगरपालिकेचा कारभार संगमनेर सेवा समितीच्या हाती गेल्यानंतर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे आणि उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांनी पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये सत्ताधारी सेवा समितीच्या नगरसेवकांना सभापती पदाची संधी देतानाच, दोन अपक्ष आणि शिवसेनेच्या महिला उमेदवारालाही समित्यांमध्ये स्थान देऊन सर्वसमावेशक कारभाराचे संकेत देण्यात आले आहेत. सोमवारी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते. या बैठकीत सर्व निवडी बिनविरोध करण्यात…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील जोर्वे-रहिमपूर रस्त्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. कोंबडी खताने भरलेला एक भरधाव आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत जाऊन कोसळला. सुदैवाने, हा टेम्पो महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला न धडकल्यामुळे एक मोठी वीज दुर्घटना टळली असून, टेम्पोमधील चौघेही जण बालंबाल बचावले आहेत. सटाणा तालुक्यातील देवळाभोर येथील आयशर टेम्पो (क्रमांक MH 41 AV 6183) कोंबडी खताच्या गोण्या घेऊन संगमनेर तालुक्यातील खांबा येथे आला होता. तेथे काही माल उतरवल्यानंतर, उर्वरित खत घेऊन टेम्पो आश्वी-रहिमपूर फाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होता. शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जोर्वे-रहिमपूर रस्त्यावरील जाधव वस्तीनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहर आणि तालुक्याच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या ‘अत्याधुनिक ट्रक टर्मिनस’चे काम सध्या प्रगतीपथावर आहे. संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल ७.५ कोटी रुपयांच्या निधीतून हे भव्य टर्मिनस साकारले जात असून, अशा प्रकारच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा असणारे हे महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्यातील पहिलेच ट्रक टर्मिनस ठरणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी दिली. आज आमदार सत्यजीत तांबे यांच्यासोबत या ट्रक टर्मिनसच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकारी, परिसरातील ग्रामस्थ, ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील नामवंत व्यावसायिक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून संगमनेरच्या व्यापार आणि दळणवळण क्षेत्राला एक नवी ओळख मिळणार आहे. यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ.…
संगमनेर, प्रतिनिधी – गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ३७ वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी प्रवरा नदीपात्रात आढळून आल्याने संगमनेर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अभिजीत बाळासाहेब पाटील असे या मृत व्यक्तीचे नाव असून, ते एका खासगी एनजीओ संस्थेत प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. या घटनेत मृताची स्कुटी एका ठिकाणी आणि मृतदेह दुसऱ्या ठिकाणी आढळल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रकार घातपात आहे की आत्महत्या, अशा दोन्ही बाजूंनी संगमनेर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत पाटील हे गुरुवारी (दि. १५) नेहमीप्रमाणे आपल्या ज्युपीटर स्कुटीवरून (क्र. एम.एच. १८. बी.वाय. ०७७६) कामावर गेले होते. मात्र, दुपारी जेवणासाठी ते घरी परतले…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील पठार भागातील शेळकेवाडी-अकलापूर परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री तब्बल सहा शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पंपांच्या केबल चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी घारगाव पोलिसांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात दीपक प्रताप भोर (वय ४८, रा. शेळकेवाडी अकलापूर) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोर हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या गट नंबर २३ मधील विहिरीवर सहा वर्षांपूर्वी त्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी पानबुडी इलेक्ट्रिक मोटार बसवली होती. गुरुवारी १५ तारखेला त्यांनी मोटार चालवून संध्याकाळी बंद केली होती. मात्र,…
अहिल्यानगर: शेवगाव तालुक्यातील ढाकणेवस्ती येथे चाकूचा धाक दाखवून करण्यात आलेल्या धाडसी दरोड्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या दोन दिवसांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह चार जणांना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील तब्बल १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. विशेष म्हणजे, पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण कोठेवाडी येथील गाजलेल्या खून प्रकरणातील शिक्षा भोगून आलेला गुन्हेगार आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास शेवगाव येथील ढाकणेवस्तीत राहणाऱ्या विमल बबन ढाकणे यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी हल्ला केला होता. चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील महिलांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जावान ठरेल. नोकरीमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. रखडलेले प्रकल्प आज गतीने पुढे सरकतील. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस मध्यम असून डोळ्यांची जळजळ किंवा थकवा जाणवू शकतो. आर्थिक नियोजनासाठी आजचा काळ योग्य आहे. वृषभ: आर्थिक प्रगतीसाठी आजचा दिवस उत्तम राहील. व्यवसायात नवीन संधी चालून येतील आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील आणि जोडीदाराशी असलेले जुने मतभेद संपुष्टात येतील. नवीन वाहन किंवा वास्तू खरेदीचे विचार आज प्रबळ होतील. मिथुन: आज तुम्हाला बोलताना सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा शब्दांमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढल्यामुळे मानसिक…
संगमनेर, प्रतिनिधी – रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द या रस्त्याच्या चौपदरीकरणासह विद्युतीकरण आणि पादचारी मार्गाचे काम माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंजूर झाले आहे. ७ फेब्रुवारी २०२३ रोजीच या कामासाठी २ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असताना, नवीन लोकप्रतिनिधी मात्र खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, असा घणाघाती आरोप संगमनेर खुर्दचे उपसरपंच गणेश शिंदे यांनी केला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गणेश शिंदे यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी ९ किलोमीटरचा बायपास आणि इंजिनिअरिंग कॉलेज ते रायतेवाडी फाटा या ‘हॅपी हायवे’चे काम मंजूर करून घेतले. यातील बस स्थानकापर्यंतचे आणि…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर नगरपरिषदेने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा नवा टप्पा गाठला असून, शहरातील भूमिगत गटारी आणि ड्रेनेजच्या स्वच्छतेसाठी राज्यात प्रथमच एका अत्याधुनिक जेटिंग मशीनचे लोकार्पण करण्यात आले आहे. संगमनेर नगरपरिषदेचे हे कार्य संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत ठरेल, असा विश्वास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात ५ हजार लिटर क्षमतेच्या या अत्याधुनिक मशीनचे लोकार्पण माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद गोरे यांच्यासह पालिकेचे विविध पदाधिकारी आणि…
संगमनेर, प्रतिनिधी – शहरातील मालपाणी लॉन्स येथे सध्या ‘सफायर बिझनेस एक्स्पो’चा उत्साह शिगेला पोहोचला असून, या प्रदर्शनात कडलग इन्व्हेस्टमेंटच्या स्टॉलने संगमनेरकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. ‘एसआयपीची सवय भारी, जीवनात येईल संपत्ती न्यारी’ आणि ‘एफडी की स्वॅप? काय आहे फायद्याचं? उत्तर आहे फक्त स्वॅपच्या दुहेरी नफ्याचं!’ या दोन प्रभावी संदेशांमुळे गुंतवणुकीबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. १५ ते २२ जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये मनोरंजनासोबतच आपल्या आर्थिक भविष्याची तरतूद करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने स्टॉल क्रमांक १० ला भेट देत आहेत. आजच्या काळात वाढती महागाई आणि बँक मुदत ठेवींचे (FD) घटते व्याजदर यामुळे सामान्य गुंतवणूकदार चिंतेत आहे. त्यातच जिल्हाभरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – लग्नाचे आमिष दाखवून एका २० वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. लग्नास नकार दिल्यावर आरोपीने तरुणीला जीवे मारण्याची आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी (वय २०, रा. यवतमाळ) हिची ओळख आरोपी नितीन ज्ञानेश्वर पायगव्हाण (वय २४, रा. राजणगाव, ता. गंगापूर) याच्याशी झाली होती. आरोपीने पीडितेशी जवळीक साधून तिला लग्नाचे आमिष दाखवले. डिसेंबर २०२३ पासून ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत राजणगाव येथील शिवनेरी कॉलनी भागात आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले.…
संगमनेर, प्रतिनिधी – देशभरात क्रीडाप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या संगमनेरच्या प्रतिष्ठेच्या ‘सहकारमहर्षी टी-२० क्रिकेट चषका’वर एनबीसीसी पुणे संघाने आपले नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात मुंबई संघाने दिलेल्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुणे संघाने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवत मानाचा चषक पटकावला. जय हिंद लोकचळवळ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या २६ व्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तब्बल १० हजार प्रेक्षकांची उपस्थिती आणि १९ रणजी व आयपीएल खेळाडूंचा सहभाग हे यंदाच्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात झालेल्या या चुरशीच्या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २०० धावांचा डोंगर उभा केला होता.…
मेष : कामात प्रगती आणि उत्साहाचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत सकारात्मक ठरेल. सकाळपासूनच तुम्हाला एक नवीन ऊर्जा जाणवेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील. संध्याकाळी मित्रांसोबत मनोरंजनाचे कार्यक्रम आखाल. आर्थिक बाजू भक्कम राहील. वृषभ : संयम आणि नियोजनाला महत्त्व द्या वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज घाईत निर्णय घेणे टाळावे. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने उभी राहू शकतात, परंतु तुमच्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही त्यावर मात कराल. रागावर नियंत्रण ठेवणे आज अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा जवळच्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. गुंतवणुकीच्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ…
संगमनेर | प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थान ते देवतळे येथील खंडोबा देवस्थान जोडणारा ऐतिहासिक शिवरस्ता अखेर खुला झाला आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेला हा रस्ता आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि महसूल विभागाच्या तत्परतेमुळे अवघ्या एका वर्षात वाहतुकीसाठी सज्ज झाला असून, आमदारांनी चंपाषष्ठीच्या निमित्ताने दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. हिवरगाव पावसा, निमगाव टेंभी आणि देवगाव या गावांमधून जाणारा हा शिवरस्ता बंद असल्याने खंडोबा भक्तांना दर्शनासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. गेल्या वर्षी चंपाषष्ठी उत्सवासाठी देवतळे येथे आले असता, रामभाऊ रहाणे, ज्ञानदेव रहाणे, किशोर रहाणे, संजय रहाणे आणि जालिंदर पावसे या भक्तांनी आमदार खताळ यांच्याकडे हा रस्ता…
घारगाव, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये १ लाख ४० हजार रुपयांच्या रोकडसह सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी अप्सरा मोहम्मद शेख (वय ५९, रा. घारगाव) या ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजल्यापासून आपले राहते घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात, अज्ञात चोरट्यांनी संधी साधत घराच्या लोखंडी दरवाजाचा कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक केली आणि लाकडी…
संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, सामान्य नागरिकांच्या मालमत्तेची आणि सुरक्षेची पुरती वाट लागली आहे. भरदिवसा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले जात असून, बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून रोकड आणि दागिने लंपास केले जात आहेत. या मालिका गुन्ह्यांमुळे संगमनेरमध्ये ‘कायद्याचे राज्य’ उरले आहे की ‘गुन्हेगारांचे वर्चस्व’ वाढले आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. पहिली घटना शहरातील गजबजलेल्या बी.एड. कॉलेज रोडवरील ईदगाह मैदानाच्या गेटजवळ घडली. अनिता संतोष पितळे (रा. सह्याद्री कॉलेजच्या मागे) या आपल्या किराणा दुकानाकडे जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जोरात हिसका मारून…
संगमनेर, प्रतिनिधी- डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या वतीने आयोजित दोन दिवसीय मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिरात परिसरातील सुमारे १५० रुग्णांची तज्ज्ञांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४७ अत्यंत गरजवंत रुग्णांवर विविध प्रकारच्या प्लास्टिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. सुचित गांधी व राणीप्रसाद मुंदडा यांनी दिली. हे शिबीर दि. ११ व १२ जानेवारी २०२६ या कालावधीत धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये पार पडले. गेल्या २६ वर्षांपासून लायन्स क्लब सातत्याने या उपक्रमाचे आयोजन करत आहे. शारीरिक व्यंगामुळे, विशेषतः फाटलेले ओठ, टाळूवरील छिद्रे, तिरळेपणा, चेहऱ्यावरील डाग, गाठी आणि हाता-पायांच्या जन्मजात दोषांमुळे अनेक व्यक्ती न्यूनगंडाने ग्रासलेल्या असतात. अशा व्यक्तींना आत्मविश्वासाने…
नामदेव कहांडळ भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. या युवा पिढीसमोर आज रोजगारापासून ते बदलत्या जीवनशैलीपर्यंत अनेक आव्हाने उभी आहेत. अशा काळात युवकांना केवळ भाषणे ठोकणारा नेता नको, तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारा आणि त्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारा मार्गदर्शक हवा असतो. नेमकी हीच भूमिका बजावत जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी समाजकारण, आरोग्य, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात आपल्या अभ्यासू वृत्तीने स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज ते उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर जनसामान्यांचे ‘हक्काचे मित्र’ म्हणून ओळखले जातात. डॉ. सुधीर तांबे यांचा प्रवास एका निष्णांत सर्जनपासून…
