Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये जय राजकारण झाले आहे ते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहमतीनेच झालं असल्याचा दावा अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. खासदार विखे पाटील सध्या दिल्लीमध्ये असून तेथे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. विखे म्हणाले, ज्यावेळी विधान परिषदेचे राजकारण सुरू होते त्याचवेळी गौण खनिजाच्या प्रश्नावरून संगमनेर मध्ये काही ठेकेदारांचा मोर्चा प्रांताधिकारी कचेरीवर काढण्यात आला होता. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी या मोर्चाला मोबाईल वरून संबोधित केले होते. मग आज नेमकं असं काय झालं की, विधान परिषदेच्या घडणाऱ्या राजकारणावर ते बोलू शकले नाहीत. जर डॉक्टरांनी त्यांना आरामाचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेसचे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्येचे ट्विटरवर फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. या संदर्भात थोरात यांनीच आपल्या ट्विटर अकाउंट वरून या संदर्भात माहिती दिली असून पोलिसांकडे तक्रार केली असल्याचे म्हटले आहे. थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने ट्विटरवर हे खोटे (फेक) अकाउंट तयार केले आहे. या फेक अकाउंट वरून नियमितपणे ट्विट देखील केले जात होते. त्यामुळे काँग्रेस नेते बंटी पाटलांसह अनेकांनी हे ट्विट अकाउंट फॉलो केले आहे.ट्विटर वरील हे बनावट खाते तयार करताना आरोपींनी थोरात यांच्या कन्या शरय देशमुख यांच्या फोटोचा वापर केला असून डीपीवर शरयू देशमुख…
संगमनेर काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून काहींनी गैरसमज पसरवत विनाकारण भाजपपर्यंत नेऊन पोहोचवले. अगदी उमेदवारीही वाटून टाकली. हे अत्यंत दुर्दैवी असून काँग्रेसच्या विचारावरच आपली वाटचाल झाली असून या पुढील काळातही याच विचारांवर वाटचाल सुरू राहणार आहे, असे स्पष्ट सांगताना मागील महिन्यात विधान परिषदेच्या निमीत्ताने झालेले राजकारण व्यतीथ करणारे असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्यावतीने जाणता राजा मैदानावर ‘शिंदेशाही बाणा’ या कार्यक्रमानिमित्त ऑनलाइन पद्धतीने तालुक्यातील जनतेशी संवाद साधताना विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, २६ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या अपघातामुळे खांद्याचे ऑपरेशन झाले असून त्यामुळे संगमनेरला येता आले नाही. एक महिनाभर…
संगमनेर एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्याला देणारे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात सहभाग घेतला असून तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले आहे. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त झालेल्या शिंदेशाही बाणा कार्यक्रमात विक्रमी गर्दीत नागरिकांनी धमाल केली. जाणता राजा मैदान येथे नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्यावतीने आयोजित शिंदे शाहीबाणा हा कार्यक्रम प्रख्यात गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे व उत्कर्ष शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, नाशिक पदवीधरचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, जिल्हा परिषद सदस्य रामहरी…
१८८५ साली स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला त्याग आणि बलिदानाची मोठी परंपरा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या राष्ट्रीय नेत्यांप्रमाणे महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख या नेतृत्वाची मोठी समृद्ध परंपरा या पक्षाला लाभली आहे. या समृद्ध परंपरेचा विचार जोपासत अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षाची धुरा यशस्वीपणे सांभाळत या पक्षाला सन्मानजनक विजय मिळवून देत महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभाग मिळवून देण्यात यशस्वी ठरलेले काँग्रेसचे बाजीप्रभू माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षासाठी यशस्वी प्रदेशाध्यक्ष ठरले आहेत. १९८५ मध्ये समाजकारणातून राजकारणात आलेल्या बाळासाहेब थोरात यांची आमदारकी चढत्या क्रमाने वाढत गेली तसे मंत्रीपदही चढत्या क्रमाने वाढत गेले. १९९९ मध्ये राज्यमंत्री, २००४ मध्ये कॅबिनेट, कृषी व जलसंधारण…
लोणी शासकीय कार्यालयांमधून आवश्यक असलेल्या सर्व योजनांसाठीचे कागदपत्र, दाखले नागरीकांना सहज सोप्या पध्दतीने उपलब्ध व्हावेत म्हणून सर्व तालुक्यांमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु करण्यात येणार असून, या माध्यमातून जनतेच्या समस्याही जाणून घेण्याच्या सुचना महसूल विभागातील आधिका-यांना दिल्या असल्याची माहीती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. महसूल विभागातून आवश्यक असलेले दाखले मिळण्यास बहुतांशी वेळा विलंब होतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागपत्रांमध्ये त्रृटीही असतात. त्यामुळे सामान्य माणसाला योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. शाळा, महाविद्यालयांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांकरीता विद्यार्थ्यांना निर्माण होणा-या अडचणी प्रवेशापुर्वी दूर व्हाव्यात, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्र नागरीकांना सहज उपलब्ध…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारा मध्यप्रदेशात आयोजित केलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्र संघाने धमाका केला. मुला-मुलींच्या स्वतंत्र गटात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्या योगासनपटूंनी पश्चिम बंगाल, हरयाणा, तामीळनाडू व मध्यप्रदेशच्या संघांशी एकतर्फी लढत देत उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर ही स्पर्धा गाजवली. या संपूर्ण स्पर्धेत योगासनांमध्ये वर्चस्व राखणार्या महाराष्ट्र संघाने पुन्हा एकदा दोन्ही गटाच्या अजिंक्यपदाचा किताबही पटकाविला. उज्जैन येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या पारंपरिक प्रकारात महाराष्ट्राच्या सुमित बंडाळे याने सुवर्ण तर स्वराज फिस्के याने कांस्य पदक मिळवले. याच प्रकारात मुलींच्या गटात निरल वाडेकरने रौप्य पदक प्राप्त केले. कलात्मक प्रकारात स्वराज फिस्केने सुवर्ण…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ऊस तोडणी मजुराच्या नऊ वर्षाच्या मुलाचा प्रवरा डावा कालव्यामध्ये पाय घसरून पडल्याने कालव्याच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे रविवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. रितेश संदीप राठोड (रा. जळगाव) असे कालव्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. प्रवरा नगरच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडणी सध्या सुरू आहे. ऊस तोडणी साठी या कारखान्याकडे जळगाव जिल्ह्यातील करगाव येथून काही ऊस तोडणी मजूर आलेले आहेत. ते आश्वी बुद्रुक येथील प्रवरा डाव्या कालव्याजवळील महादेव पुलाजवळ शेळके वस्तीवर हे मजूर कोप्या टाकून राहत आहे. रविवारी यातील संदीप राठोड आणि त्यांची पत्नी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तब्बल 32 आरोपींनी संगणमत करून बँकेचा विश्वासघात करत सुमारे 69 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेच्या गोल्ड व्हॅल्युवरसह 32 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरातील नामांकित बँकेमधील गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. संगमनेर, अकोले, राहता येथील तब्बल 32 जणांचा आरोपी मध्ये समावेश असल्याने बँकिंग क्षेत्रात व ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सोनेतारण करताना आरोपींनी बनावट सोने गहाण ठेवत त्या बदल्यात तब्बल 68 लाख 94 हजार रुपयांचे कर्ज उचलले आहे. बँकेच्या लेखापरीक्षणामध्ये बनावट सोनेतारण प्रकरणाची काही पाकिटे सापडल्याने ही खाती बनावट…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महावितरण कंपनीने ग्राहकांच्या माथी दरवाढ लादण्याचा प्रयत्न चालविला आहे. असे झाल्यास मोठ्या प्रमाणात ग्राहकांना वीज वापराबद्दल भुर्दंड बसेल. याचा विरोध करण्यासाठी ग्राहकांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी संभाव्य वीज दरवाढी संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पत्र पाठवत हरकत नोंदवण्याचे आवाहन शिर्डी काँग्रेसचे नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी केले आहे. संभाव्य दरवाढी संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने १५ फेब्रुवारीपर्यंत वीज ग्राहकांकडून हरकती मागविल्या आहेत. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना पगारे म्हणाले, सध्या विजेचा दर प्रति युनिट ३.३६ रुपये असून येत्या दोन वर्षात तो ४.५० ते ५.१० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सदर दरवाढ झाल्यास याचा वीज ग्राहकांना मोठा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क २० लाख रुपयांनी तोट्यात असलेला व्यवसाय वार्षिक १०० कोटींचा होतो. आपत्ती आली तरी आपण सकारात्मक वृत्तीने सामोरे गेल्यास ही प्रगती होते. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहा, भावना जपून व्यवसाय करण्याऐवजी बुध्दी चातुर्याने करा, प्रत्येक संधीचा लाभ घ्या, आपला इगो शून्य करा, पैशांसाठी व्यवसाय करण्यापेक्षा उद्दिष्टांसाठी व्यवसाय करा असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य व साई ऍक्युम्युलेटर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड संगमनेरचे व्यवस्थापकीय संचालक निलेश चव्हाण यांनी केले. सिन्नर येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भिकुसा हायस्कूल येथे करियर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत ‘ उद्योजक आपल्या भेटीला ‘ या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील खंडोबा देवस्थानच्या परीसर विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रतिजेजूरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील देवगड येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानचा यात्रा उत्सव माघी पोर्णीमेला सुरू झाला. यात्रेच्या पहील्याच दिवशी मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते श्री खंडोबाची महाआरती करण्यात आली. देवस्थानच्यावतीने स्मृतिचिन्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धर्मदाय आयुक्त उषा पाटील, संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख, देवस्थानचे अध्यक्ष सगाजी पावसे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, गुलाबराव सांगळे, काशिनाथ पावसे, भिमराज चत्तर, जावेद…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिकलेल्या पदवीधर आणि राज्यातील शिक्षकांनी कोणाला निवडून दिले हे आपण निकालातून बघितले आहे. शिकलेल्या मतदाराने दिलेला कौल कशा प्रकारचा आहे हे आपण बघितले पाहिजे. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांच्या बाबतीत आमची चूक झाली त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. पवार शनिवारी रात्री बारामती येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. सभेतच पवारांनी तांबे यांच्या बद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करत त्यांच्या पाठीशी असल्याचे सुचित केले. शुक्रवारी सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी…
रविवार विशेष | प्रवीण पुरो काही लोकांच्या जिभेलाच हाड नसतं, असं म्हणतात. स्वत:चं महत्व वाढवण्याकरता समाजासाठी काही करण्याऐवजी ते दुसर्याला कमी लेखण्यात आणि दोष देण्यात धन्यता मानतात. राज्य भाजपचे प्रदेश प्रमुख झाल्यापासून चंद्रशेखर बावनकुळे असंच काही बाही बडबडू लागले आहेत. प्रदेश प्रमुख झालं की असंच बोलावं लागतं अशी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची बोली बनली आहे. याआधी कोल्हापूरचे चंद्रकांत पाटीलही असंच काही बोलायचे. त्यांच्याही जिभेला टेकू नव्हता. त्यात राष्ट्रवादीवर टीका केली की पक्षात बक्षिसी मिळते आणि पवारांवर टीका केली की प्रमोशन. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे भाजपच्या नेत्यांसाठी सोपं टार्गेट असतं. केवळ जीभ आहे म्हणून अशिष शेलार, नितेश राणेंसारखे नेतेही पवारांवर टीका…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या आरोपांना उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ज्यांच्या व्हाट्सअपचे स्क्रीन शॉट माध्यमांना पत्रकार परिषदेत दाखविले त्या सचिन गुंजाळ यांनी आपली भूमिका एका पत्राद्वारे ट्विटरवर व्यक्त केली आहे. ‘महाराष्ट्र संवाद’च्या वाचकांसाठी या पत्राचा तपशील आणि अधिक माहिती देत आहोत. सन्माननीय अतुल लोंढेजी, आपण प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आहात. आपण माहिती घेऊन बोलले पाहिजे. अगदीच पत्रकार परिषद घेण्या अगोदर आपण माझ्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला असता, तरीही मी वास्तविकता सांगितली असती. आपण चुकीची माहिती देऊ नये ही अपेक्षा आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ एबी फॉर्म वाटपासंदर्भात जे घडले ते आपणास सांगतो. सर्वात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले जलजीवन मिशन हे एक क्रांतीकारी पाऊल असून तालुक्यात या योजनेसाठी ७५१ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. जलजीवन मिशन अंतर्गत आश्वी बुद्रुक येथील सुमारे १ कोटी ९९ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कैलास तांबे, भगवानराव इलग, पोपटराव वाणी, दिनकर गायकवाड, मच्छिंद्र थेटे, रोहीणी निघुते, कांचन मांढरे, गुलाबराव…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज सत्यजित तांबेंची बंडखोरी, तांबे भाजपच्या वाटेवर आदी प्रकारच्या अनेक बातम्यांनी गेल्या महिनाभरातील वातावरण ढवळून निघाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी शनिवारी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत वादाचा माध्यमांनी फुगवलेला फुगा अखेरीस फुटला आहे. पत्रकार परिषदेत तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षातील नेत्यांवर टीका करत थोरात तांबे परिवारा विरोधात पक्षातूनच षडयंत्र रचल्याचे सांगत आपण अपक्ष म्हणून यापुढे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी अखेरीस शनिवारी सर्वच राजकीय घडामोडींवर शनिवारी आपली भूमिका स्पष्ट करत सर्वच वादांवर पडदा टाकला आहे. तांबे यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे ते भाजप…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर निवडणुकीत निवडून आलेल्या सत्यजित तांबे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शुभांगी पाटील यांनी शनिवारी अधिकृतरित्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याचबरोबर त्यांनी आपला धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केल्यानंतर शिवसेनेने पाटील यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला. तांबे यांच्या विरोधात कडवे झुंज देताना पाटील यांनी या मतदारसंघात सुमारे 40 हजार मते मिळविली. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या पाटील यांना भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी मातोश्रीचे दरवाजे ठोठावत शिवसेनेचा पाठिंबा मिळविला होता. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरमध्ये गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून चोऱ्या, घरफोड्या, हाणामाऱ्या ही नित्याची बाब झाली आहे. गुन्हेगारीचा बिमोड करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे संगमनेर व्यापारी असोसिएशनने पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. संगमनेरचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांना या पार्श्वभूमीवर निवेदन देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात स्थानिक पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला असून गुन्हेगारांनी संगमनेरात आपले हातपाय पसरले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या खून प्रकरणाचा आणि त्या पाठोपाठ शहरात व परिसरात झालेल्या दरोडेच्या घटना चोऱ्या यांची उकल करण्यात पोलीस अयशस्वी ठरले आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे हैराण झालेल्या संगमनेरकरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रात्रीच्या वेळी घराच्या पडवीमध्ये जेवण करत असताना घराचे छत अंगावर पडल्याने चुलत्याचा व पुतणीचा मृत्यू झाला आहे. याशिवाय वृद्ध महिला गंभीर जखमी झाले असून तिच्यावर रुग्णालयात उच्चार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. लक्ष्मण चंद्रभान सोनवणे (वय 42 वर्ष) व सानिका एकनाथ सोनवणे (वय 8 वर्ष) असे मृत झालेल्या चुलत्या-पुतणीचे नाव आहे. तर मृत लक्ष्मण सोनवणे यांची आई वैजयंतीबाई चंद्रकांत सोनवणे (वय 65 वर्ष) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.वेल्हाळे येथे शुक्रवारी रात्री सोनवणे कुटुंबीय आपल्या बंगल्याशेजारी असलेल्या पत्र्याच्या पडवीमध्ये रात्री जेवण…
