Author: Annant Ppangarkar
मंगळवार १२ नोव्हेंबर संगमनेर – भरदिवसा दीड वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील साकुरच्या गजबजलेल्या बस स्थानक चौकातील कान्हा ज्वेलर्सवर गावठी कट्टाचा भाग दाखवून तसेच हवेत फायर करून दुकानात दरोडा टाकत पन्नास लाखाहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन फरार झालेल्या पाचपैकी दोघा दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. दरोडा प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय बाळासाहेब वावरे, (वय 24 वर्षे, रा. माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे) व स्वप्नील किशोर येळे, (वय 22 वर्षे, रा. माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे…
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील १ हजार २४२ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण मंगळवार, १२ नोव्हेंबर संगमनेर – मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी केले. वसंत लॉन्स येथे संगमनेर विधानसभा मतदार संघातील १ हजार २४२ मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज मांजरे उपस्थित होते. हिंगे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. निवडणूक प्रक्रिया व कार्यपद्धतीची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला असणे गरजेचे आहे. यावेळी मतदान यंत्राची जोडणी, मतदान यंत्र हाताळणी, घोषणापत्र व फॉर्म अचूक…
मंगळवार, १२ नोव्हेंबर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्याजवळ सोमवारी रात्री काढली. जखमी पोलीस उपनिरीक्षकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रकाश अभिमान नेमाणे असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून पोलीस उपनिरीक्षकावरच हल्ल्याचा प्रकार घडल्याने या घटनेमुळे नाशिकच्या पंचवटी परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात नेमाणे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पंचवटी परिसरात दुसऱ्यांदा पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आले असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहे. अशी घडली घटना……
मंगळवार, १२ नोव्हेंबर सर्वधर्म समभावाचे आणि शांतता असलेल्या संगमनेरमध्ये हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदत असताना काही राजकीय शक्ती फक्त राजकारणासाठी विनाकारण दोन समाजात वाद पेटवत आहे. सोमवारी मारहाण झालेल्या घटनेतील साधू आणि मारहाण करणारे दोन्ही हिंदू समाजाचे असून केवळ बुद्धिभेद करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. ज्यांनी साधूना मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. कतारी यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यभर निवडणुकीचे वातावरण आहे. संगमनेर शहर हे शांतता प्रिय आहे. परंतु काही शक्ती संगमनेर शहरात तणाव निर्माण करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करून आपली…
संगमनेर – मोहसीन शेख सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा कळवळा असल्याचे भासविणाऱ्या महायुती आणि महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात महागाईचा उच्चांक गाठला आहे. महायुतीच्या काळात उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात पळविले जात हाताला काम नसल्याने सामान्य माणसाचे जीवनमान अवघड बनत चालले आहे. या पार्श्वभूमीवर सामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पक्ष असून तोच आश्वासनपूर्ती करेल, यासाठी राज्यातील मतदार, संगमनेरकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संगमनेर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांनी केले आहे. कोणतीही मोठी आर्थिक ताकद पाठीशी नसताना वैयक्तिक गाठीभेटीवर भर देत उमेदवार अजीज वोहरा यांनी तालुक्यातील मतदारांचे संपर्क करत आपली भूमिका…
मंगळवार १२ नोव्हेंबर अहिल्यानगर – अहिल्या नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये २४ नोव्हेंबर २०२४ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणूक सुरू आहे. राज्यभरातील…
सोमवार, ११ नोव्हेंबर संगमनेर – शहरातील नवीन नगर रस्त्यालगत असलेल्या जठार हॉस्पिटल पाठीमागे सोमवारी दुपारी चार साधूंना दोन जणांनी मारहाण करण्याची घटना घडली. मारहाणीत जखमी झालेल्या साधूंवर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (११ नोव्हेंबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साधू वेश्यातील चार लोक जठार हॉस्पिटल पाठीमागून नवीन नगर रस्त्याकडे जात असताना दोन अनोळखी तरुणांनी त्यांना रस्त्यात आढळून मारहाण केली. मारहानीनंतर आरोपी…
सोमवार, ११ नोव्हेंबर बटेंगे तो कटेंगे म्हणविणाऱ्यांनी महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार काटला आहे. महायुतीचा निवडणूक जाहीरनामा नुकताच अमित शहा यांनी जाहीर केला आहे. पंधरा लाख रुपये हा निवडणूक जुमला होता, असे सांगणारे हेच ते अमित शहा आहे. त्यामुळे महायुतीचा हा जाहीरनामा म्हणजे नवा जुमला असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. महाविकास आघाडीचे संगमनेरमधील उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ खासदार कोल्हे यांच्या उपस्थितीत संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे रविवारी महाविकास आघाडीच्या वतीने भव्य युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. युवकांच्या या मेळाव्यात खासदार कोल्हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख, नगर दक्षिणचे खासदार…
सोमवार, ११ नोव्हेंबर संगमनेर – राजकारणाच्या हल्लीच्या बजबजपुरीतील नेत्यांची ओळख टक्केवारीमुळे होत आहे. मात्र संगमनेरच्या नेतृत्वाची ओळख राज्यभरात कर्तुत्वाने होत आहे. राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वच्छ प्रतिमा आणि निष्कलंक नेतृत्व असलेल्या आमदार थोरात यांनी सततच्या विकास कामातून तालुक्याचा कायापालट केला आहे. सुसंस्कृत नेत्यांची परंपरा जपणारे हे नेतृत्व असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री अमित देशमुख यांनी केले. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे रविवारी काँग्रेस, महाविकास आघाडीच्या वतीने देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या युवक निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ.…
संगमनेर हादरले, सुभाष लोळगे यांच्या कान्हा ज्वेलर्सवर दरोडा दुचाकीवरून आले पाच दरोडेखोर… सोमवार, ११ नोव्हेंबर संगमनेर – संगमनेरच्या साकुरमधून खळबळ माजविणारी घटना समोर आली आहे. हवेत गोळीबार करत दरोडेखोरांनी ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकत दागिन्यांची लूट केली आहे. साकुर मधील सुभाष लोळगे यांच्या कान्हा ज्वेलर्स या दुकानात दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. साकुर बस स्थानकाजवळ गजबजलेल्या परिसरात निखिल सुभाष लोळगे यांचे ‘कान्हा ज्वेलर्स’ नावाने सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दुकानातील कामगार जेवण करण्यासाठी गेले असता दुकानात एक कामगार असल्याचे संधी साधून पल्सर दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी दुकानासमोर हवेत…
सोमवार, ११ नोव्हेंबर संगमनेर – मोहसीन शेख राज्यात विविध समाज त्यांच्या हक्कासाठी वाटत असताना मुस्लिम समाजाने देखील निवडणूक आपल्या स्वाभिमानाची असल्याची जाणीव ठेवत वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभे राहण्याची आवश्यकता आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्याचे ताकद वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात आहे. त्यांची ताकद वाढविण्यासाठी संगमनेर मधून मुस्लिम समाजाने वंचितला मतदान करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांनी केले. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख उमेदवारांच्या प्रचाराने वेग पकडला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात प्रस्थापिताविरोधात वंचित बहुजन आघाडीने अब्दुल अजीज वोहरा यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सुरुवातीलाच वोहरा यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी मोठा अवधी मिळाला.…
सोमवार, ११ नोव्हेंबर मुंबई – विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या राज्यातील २१ जणांवर काँग्रेस पक्षाने ६ वर्षांसाठी निलंबनाची मोठी कारवाई केली आहे. निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यामध्ये अहमदनगर शहरमधून मंगल विलास भुजबळ यांचा देखील समावेश आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत १६ मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी झाले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या सर्व बंडखोरांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली. या बंडखोर उमेदवारांवर झाली निलंबनाची कारवाई… (कंसात मतदार संघ) आनंदराव गेडाम,…
रविवार, १० नोव्हेंबर संगमनेर – प्रतिनिधी निंबाळे येथील घटने संदर्भात पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदरची घटनाही वाहनांचा कट लागल्याच्या कारणावरून घडली आहे. सद्यस्थितीत शांतता असून कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये, तसेच कोणत्याही व्यक्तीने कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास अथवा घटनेबाबत कोणती अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संगमनेरकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी केले आहे. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विश्वनाथ सुखदेव शिंदे (रा. वाघापूर, ता. संगमनेर) हे एम.एच. १७ ए.ए. ८८५ या वाहनातून त्यांच्या मुलीस संगमनेर बस स्टैंडवर सोडण्यात…
रविवार, १० नोव्हेंबर संगमनेर – संगमनेरलगत असलेल्या एका गावामध्ये तीस वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहर पोलीस ठाण्यात पीडीत महिलेच्या सासूने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. बलात्काराची ही घटना ६ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता घडली असून या संदर्भात पीडित महिलेच्या सासूने ८ नोव्हेंबरला दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी नामदेव मच्छिंद्र चव्हाण (रा. महादेव वस्ती, सुकेवाडी, संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला शौचासाठी घराच्या पाठीमागे असलेल्या शेतामध्ये गेली असताना तेथे आलेल्या नामदेव चव्हाण यांनी या महिलेवर बलात्कार केला. तसेच झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे…
रविवार, १० नोव्हेंबर दुचाकीवर मुलीला घेऊन संगमनेरकडे येत असताना निंबाळे गावच्या शिवारात एका तरुणाने दुचाकीला कट मारला. त्यामुळे कट का मारला असे विचारण्यात आले असता दुचाकीला कट मारणाऱ्या तरुणाने बापलेकीला बेदम मारहाण करण्याची घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेले ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेरीस पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतल्यानंतर तणाव शांत होण्यास मदत झाली. राज्यासह संगमनेर आणि लगतच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. एकीकडे निवडणूक प्रचार शिगेला जात असताना दुसरीकडे हा प्रकार समोर आला. दोन धर्मीयात झालेल्या वादाचे परिणाम जातीय तणावात निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क…
रविवार, १० नोव्हेंबर मुंबई – शेतकऱ्यांची कर्जमाफी, २५ लाख रोजगार, महिला आणि वृद्धांना दरमहा २१०० रुपयांसह आमची बरच काही असा जाहीरनामा भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असल्याचे शहा यांनी म्हटले आहे. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईतील हॉटेल सोफिटेलमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप आहे. भाजप जे म्हणेल ते पूर्ण करते. हा महाराष्ट्राच्या पूर्व विकासाचा जाहीरनामा आहे. राज्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. २० नोव्हेंबरला राज्यातील २८८ विधानसभा जागांसाठी निवडणूक होत असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी…
रविवार, १० नोव्हेंबर जीभ घसरलेल्या भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या विधानामुळे आणि दमदाटीमुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. खासदार महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नाव लिहून घ्या आणि आम्हाला पाठवा. त्यांची व्यवस्था आम्ही करू, असं वक्तव्य केलं आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नेत्यांच्या, पुढाऱ्यांच्या सभा भाषणांनी वेग घेतला आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या भाषणांमधून अनेक नेत्यांची जीभ घसरत असल्याचे समोर येत आहे. पैसे घेतले तर आम्हालाच मते द्यावी लागतील, अशी इशारा वजा धमकी सत्ताधारी गटाचे आमदार रवी राणा यांच्यासह अनेक…
रविवार, १० नोव्हेंबर नाशिक – निवडणूक आचारसंहिता काळात नाशिक परिक्षेत्रामध्ये पोलिसांची २६४ भरारी पथके कार्यरत असून या पथकाच्या माध्यमातून आतापर्यंत ६ कोटी ५३ लाखांच्या रोकडसह एकूण ३४ कोटी रुपयांचे मौल्यवान दागिने व अन्य प्रलोभन वस्तू असा सुमारे ४९ कोटी ०७ लाखांचा एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी त्यांच्या ‘दक्षता’ कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता कालावधीत नाशिक परिक्षेत्रातील अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबारसह नाशिक जिल्ह्यांची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नाशिक परिक्षेत्रात विशेष…
राज्यात सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीचा पराभव झालाच तर त्याला युतीतील नेत्यांची विकृतीच कारणीभूत असेल, असं आता मानायला हरकत नाही. एकदा ठेच लागली की माणूस जागा होतो. पण भाजपचे नेते काही केल्या जागे होत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यावरही ज्यांच्यामुळे आपण हरलो त्यांच्याच खांद्यावर विधानसभेच्या प्रचाराची जबाबदारी टाकून भाजपने स्वत:च्याच पायावर मारून घेतलं आहे. नेते किती वाह्यात असावेत याचं प्रत्यंतर राज्यातील प्रचारात होत असलेल्या टीका-टिपण्णीवरून येतं. निवडणुकीत जय-पराजय हा ठरलेलाच असतो. त्याला कोणी पारखं राहिलेलं नाही. पण म्हणून दुसर्यावर कशीही टीका करता येत नाही. दोनच दिवसांपूर्वी जपानमधील इदोगावा शहराचे तत्कालीन आमदार प्रशांत पुराणिक यांची…
विधानसभा निवडणूक – अनंत पांगारकर शनिवार, ०९ नोव्हेंबर संगमनेर विधानसभा मतदारसंघातून नवव्यांदा निवडणूक लढविणारे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात राज्यभर उमेदवारांची प्रचार मोहीम राबवत असताना संगमनेरात मात्र कार्यकर्त्यांनी प्रचार मोहीम हाती घेतली आहे. उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे निष्ठावंत म्हणविले जाणारे अनेक जण प्रचार मोहिमेपासून दूर असताना माजी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली मात्र शिवसेनेतील एक गट प्रचारात सक्रिय झाला आहे. थोरात यांच्यासाठी पंजाचा प्रचार करत ते शहराच्या विविध भागात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहे. थोरात यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून नवव्यांदा त्यांना पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून पाठविण्यासाठी मतदार सज्ज असताना शहराच्या विविध भागातून कतारी यांनी काढलेल्या या प्रचार…
