Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संभाजी भिडे ह्या विकृत व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अतिशय चुकीचे व बेताल वक्तव्य केले आहे. या अगोदरही महात्मा फुले व अनेक महापुरुषांबद्दल जाणूनबुजून सातत्याने वक्तव्य केले असल्याने भिडेंना तात्काळ अटक करावी अशी मागणी छात्र भारती विद्यार्थी संघटनेने गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ज्या महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.अश्या राष्ट्रपिताबद्दल हा माणूस बेताल वक्तव्य करत आहे. हा देशाचा अपमान आहे. समाजात अशा वक्तव्याद्वारे चुकीची माहिती पसरविली जात असून असे निंदनीय प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ भिडेंवर अटकेची कारवाई करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांकडील मागणीचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कोरोना रुग्णाला मेडिक्लेम नाकारणाऱ्या स्टार हेल्थ कंपनीला विमा लोकपालचे अध्यक्ष तथा न्यायाधीश यांनी रुग्णाला पॉलिसी क्लेमची रक्कम एक महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले. कंपनीने एक महिन्यात जर रक्कम दिली नाही तर, केस दाखल केल्यापासून दोन टक्के व्याजासहित तक्रारदाराला कंपनीला रक्कम द्यावी लागणार आहे. काय घडले होते: संगमनेर तालुक्यात 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात कोविड 19 चे संक्रमण झाले होते. या काळात तालुक्यात रुग्णसंख्या मोठी असल्याने रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नव्हते. त्यामुळे कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वाधिकार असलेल्या संगमनेरचे तत्कालीन तहसीलदार अमोल निकम यांनी चंदनापुरी गावातील मुळगंगा रुग्णालयाचे डॉ. विशाल सातपुते यांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो सत्ताधारी विचारांच्या लोकांची मानसिकता सत्तेची दहा वर्षं पूर्ण होत असतानाही बदलायचं नाव घेत नाहीए. ऐरागैरा कोणीही कशावरही बोलत असतो. कधी कंगनासारखी अभिनेत्री स्वातंत्र्य 2014 ला मिळाल्याचं वक्तव्यं करते तर कधी कोणी देशाला गांडू लोकांचा देश संबोधतो. कोणी जवाहरलाल नेहरूंच्या नावाने शिविगाळ करतो तर कोणी महात्माजींच्या नावाला दोष लावतो. या दोन व्यक्तींना नाव ठेवलं की त्या व्यक्तीचं सत्ताधारी मंडळी पुनर्वसन करत असतात अशी एक प्रतिमा केंद्रातल्या मोदी सरकारची आणि राज्यातल्या महायुती सरकारची झालेली आहे. या सरकारांचे पाठीराखे असलेले मनोहर कुलकर्णी नामक भिडे गुरुजींनी तोडलेले तारे लक्षात घेता त्यांना आता कशाचीच भीती उरलेली नाही…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – “लोकाभिमुख कामांचा करूनी निपटारा, चला करूया महसूल सप्ताह साजरा” या ब्रीदवाक्याने महसूल सप्ताहाचा शुभारंभ केला जाणार असून महसूल खात्याशी संबंधित सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि अर्जासंदर्भात काल मर्यादेत निपटारा व्हावा, जनतेला दर्जेदार व चांगली सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 1ऑगस्टच्या महसूल दिनापासून राज्यात महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक: दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महसूल सप्ताहाच्या नियोजनासाठी मंत्री विखे पाटील यांनी घेतलेल्या बैठकीला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त, प्रांताधिकारी उपस्थित होते. बैठकीत त्यांनी नियोजनाचा आढावा घेतला. विखे…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – बदली झालेल्या ठिकाणी हजर न होणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर आता कारवाई करून त्यांची सेवा खंडीत करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. बदलीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागाने घेतली दखल: स्थानिक प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले, महसूल विभागातील बदल्यांची प्रक्रिया केव्हाच संपली आहे. त्यामुळे बदली झालेल्या ठिकाणी अनेक अधिकारी अद्याप हजर होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याची गंभीर दखल आता महसूल विभागाने घेतली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील ७० टक्के जागा यापूर्वी रिक्त होत्या, त्या सर्व जागांवर आता अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांना दिल्या निलंबनाच्या नोटीस: परंतू काही ठिकाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमधील उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांना गुरुवारी (ता.27 जुलै) नवी दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. कडलग संगमनेर तालुक्यातील धांदरफळच्या देशमुख मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त झालेल्या ‘भारताला जी २० चे अध्यक्षपद कसे मिळाले आणि त्याचे सुवर्ण नियम काय असतील’ या विषयावरील राष्ट्रीय कॉन्क्लेव्हमध्ये सामजिक न्याय मंत्री खा. रामदास आठवले, दिल्लीच्या महापौर शैलजा ओबेरॉय, खा. मोहम्मद इम्रान हुसेन, खा. रामनिवास गोयल, मोहम्मद झाकीर, डॉ. शमीम खान यांच्या उपस्थितीत त्यांना अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज अमरनाथवरुन परतणारी भाविकांची बस आणि नागपूरवरुन नाशिकला जाणाऱ्या खासगी बसची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही बसचा चुराडा झाला. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून तब्बल 25 प्रवासी जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावर मलकापूर हायवे क्रमांक सहावर लक्ष्मी नगर जवळील उड्डाण पुलावर घडली. या दोन्ही खासगी प्रवासी बस असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. भीषण अपघातात सहा प्रवासी ठार : हिंगोलीच्या दिशेने जाणारी एम एच 08. 9458 ही ट्रॅव्हल्स बस अमरनाथ येथून तीर्थयात्रा करून परत येत होती. या ट्रॅव्हल्स बसमध्ये 35 ते 40 भाविक होते. तर नागपूरवरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या गाडी…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात पुढे म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो?…
कृषी सेवकांचे मानधन देखील सहा हजार रुपयांवरून 16 हजार रुपये महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ एवढ्या पुरते आमच्या सरकार काम करत नसून आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत, आमचे वर्क फ्रॉम होम नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये इर्शाळवाडी येथील घटने संदर्भात माहिती देताना सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. शिंदे म्हणाले, इर्शाळवाडी दरडग्रस्तांची कंटेनरमध्ये व्यवस्था केली आहे. भूखंड बघितला असून त्यांची कायम सोय करण्यात येणार आहे सिडकोद्वारे त्यांना आम्ही घर बांधून देणार आहोत.…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्ताने शुक्रवारी (ता. 28 जुलै) तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आम्ही हिवरगावकर मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण व वृक्ष वाटप करण्यात आले. “झाडे लावा, झाडे जगवा” वृक्षारोपणाचे महत्त्व, पर्यावरणाचा समतोल याबाबत जनजागृती करून गावात वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्षांचे वाटप करण्यात आले. वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रमावेळी आम्ही हिवरगावकर मित्र मंडळाचे पदाधिकारी सहदेव कोळगे, माधवराव ठुबे, ज्येष्ठ नागरिक राजाराम बोंबले, संदीप वाकचौरे, ज्ञानेश्वर रेवगडे, अंकुश वाकचौरे, गोरख कदम, शौकत शेख, शैलेश रेवगडे, दत्ता रेवगडे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगावचे मुख्याध्यापक विजय आंबरे, बंडू वाकचौरे, अस्मिता ठुबे, मीनल बिडवे, शेख मॅडम…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी उपस्थित राहणे हा एक संकेत आहे मात्र सध्याच्या सरकारकडून हा संकेत पाळला जात नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या सभागृहातील अनुपस्थितीवरून बाळासाहेब थोरातांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्याला अद्याप विरोधी पक्ष नेता मिळालेला नाही. त्यातच विरोधी पक्षनेते विना विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात विरोधी पक्षाचा आवाज बुलंद करण्याचे काम राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात करत असल्याचे दिसते. थोरात दररोज सभागृहात सत्ताधारी पक्षाची कोंडी करताना दिसत आहे. मुख्यमंत्री मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधिमंडळात बोलताना थोरात म्हणाले, प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणे हा या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये जनसेवा कॅम्पच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या विविध प्रकारचे कार्ड लाभार्थ्यांना काढून देण्यात आले. याशिवाय शिवसेना आणि पक्षप्रमुख ठाकरे यांची भूमिका मुलाखतीच्या माध्यमातून विषद करणाऱ्या ‘दैनिक सामना’च्या अंकाचेही यावेळी वाटप करण्यात आले. संगमनेर शिवसेनेच्यावतीने वाढदिवसाचे औचित्य साधून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना कार्यालयात घेण्यात आलेल्या या जनसेवा कॅम्पमध्ये लाभार्थ्यांना आभा कार्ड, आधार कार्ड, नवीन पॅन कार्ड, पॅन कार्ड अपडेट करणे, लहान मुलांचे आधार कार्ड हाताचे ठसे, ई श्रम कार्ड असे विविध कार्ड व शासनाच्या योजनांचा लाभ मोफत मिळवून देण्यात आला. लाभाच्या योजनांचे…
रायगडच्या पेणमध्ये झालेल्या दुर्घटनेचे विधानसभेत पडसाद प्रगत म्हणून घेण्याचा आपल्याला खरंच अधिकार आहे का? महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : पेण मधील बारा वर्षीय सारा ठाकूर या मुलीचा सर्पदंशामुळे झालेला दुर्दैवी अंत हा सरकारी अनास्थेचा बळी आहे, सर्पदंशावरील औषध उपजिल्हा रुग्णालयात सक्तीचे असतानाही, पेनच्या रूग्णालयात ते उपलब्ध का नव्हते याची चौकशी करून सरकार जबाबदारी निश्चित करणार आहे का? दोषींवर कठोर कारवाई करणार आहे का? राज्यभर या औषधांचा काळाबाजार कुणाच्या आशिर्वादाने सुरु आहे? असे सवाल उपस्थित करून आ. थोरात यांनी सरकारला धारेवर धरले. थोरात म्हणाले, पेणमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. या घटनेचा थेट संबंध शासन व शासकीय यंत्रणेशी आहे. आपण पुरोगामी…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या (BJP) वाट्याला 6, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) 3 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) 3 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा फॉर्म्युला ठरला असला तरी प्रत्येकाच्या ठरलेल्या कोठ्यातून कोणाला संधी द्यायची याचा निर्णय अधिवेशनानंतर होणार आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची चर्चा झाल्यानंतर संभाव्य आमदारांची यादी राज्यपालांना पाठविली जाईल. तत्कालीन मविआ सरकारच्या कार्यकाळात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ‘कीस करायचा आहे, माझ्यासोबत हॉटेलवर चल’ म्हणत विकृताने 23 वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना संगमनेर शहरात बसस्थानकावर घडली आहे. मुळच्या मनमाड येथील व हल्ली नाशिक येथे राहत असलेल्या पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बुधवारी लोणी येथील किरण किसन आहेर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुकून हाय केल्या गेलेल्या व्हाट्सअप मेसेजचा गैरफायदा घेत दररोज हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड नाईट करत आरोपीने पिडितेशी संपर्क वाढवला. पीडित महिलेने देखील आरोपीकडे लोणी गावामध्ये असलेल्या कॉलेजवर नोकरी भेटेल का अशी विचारणा केली असता आरोपी किरण आहेर याने पीडित महिलेला संगमनेरमध्ये माझे डॉक्टर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – येथील संगमनेर महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक, स्वरसंगम संगीत प्रसारक संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रा. डॉ. डी. एम. देशमुख यांच्या पत्नी सौ. सुरेखा (वय ८२) यांचे नासिक येथे वृद्धापकाळाने निधन झाले. संगमनेर शहरातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा सक्रीय पुढाकार असायचा. त्यांच्या पश्चात नासिक येथील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद देशमुख, अमेरिका स्थित कन्या माधवी मराठे आणि पती प्रा. डॉ. डी. एम. देशमुख असा परिवार आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत पुढील दोन महिने जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी हा निर्णय घेतला आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनोचा देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. भंडारदरा निळवंडे मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अपवाद वगळता जिल्ह्यात पावसाने सर्वत्र पाठ फिरविली आहे. कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. गतवर्षीच्या पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात 1 एप्रिल 2023…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : विधानसभेचे सभागृह अत्यंत महत्त्वाचे असून या सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर विवाद होत असतो. अनेक समस्या सोडवल्या जातात. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करून ते ४ ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालवावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. सभागृहात सुरू असलेल्या चर्चेच्या दरम्यान बोलत असताना थोरात म्हणाले, विधिमंडळाचे हे सभागृह अत्यंत महत्त्वाचे आहे, धोरणात्मक बाबी सोबतच अनेक आमदार आपल्या मतदारसंघाचे प्रश्न घेऊन सभागृहात बोलत असतात. सभागृह चालल्याने त्यांना संधी मिळते. उशिरापर्यंत सभागृह चालवले जाते. त्याबद्दल विधानसभा अध्यक्षांचे आभार व्यक्त करत चर्चा अधिक विस्ताराने होण्याच्या दृष्टीने आणि मतदारसंघातील प्रश्नांना अधिक न्याय मिळण्याच्या हेतूने अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करण्यात यावा.…
मणिपूरमधील घटना मानवतेला काळीमा- सौ दुर्गाताई तांबे महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेर शहरात नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांनी काळ्या साड्या व काळे ड्रेस परिधान करत मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून यामुळे जगात देशाची नाचक्की झाली असल्याचा तीव्र संताप नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केला आहे. जयहिंद महिला मंच व संगमनेरमधील विविध महिला संघटनांच्यावतीने संगमनेर बस स्थानक ते नवीन नगर रोड- मेन रोड- चावडी मार्गे शहरात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, मणिपूरची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. देशात महिला असुरक्षित झाल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा याची कायदेशीर लढाई आता सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह आहेत. गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. विशेषत: राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर या घडामोडींनी गेल्या वर्षभरात मोठा वेग घेतला. वर्षभरापूर्वी शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्या हाती आली. त्या पाठोपाठ महिन्याच्या प्रारंभी महाविकास आघाडी सरकार मध्ये असलेले तत्कालीन उपमुख्यमंत्री राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार…
