Author: Annant Ppangarkar
पोलिसांनी दाखवली तत्परता, महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह संगमनेर: अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नदीपात्रालगत ‘घिरट्या’ मारण्यात व्यस्त असताना, संगमनेर शहर पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागाने या गंभीर घटनेवर अद्यापही कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही, ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कोल्हेवाडी रोड परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक लोखंडे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवर तात्काळ विश्वास ठेवून,…
अहिल्यानगर – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी आणलेली चार गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली आहेत. या कारवाईत जनावरे आणि वाहतुकीसाठी वापरलेले पिकअप वाहन असा एकूण ६,६०,०००/- (सहा लाख साठ हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, तसेच पोलीस अंमलदार दिपक घाटकर, शामसुंदर गुजर, बिरप्पा करमल, सोमनाथ झांबरे, राहुल डोके, विशाल तनपुरे, महादेव भांड यांच्या पथकाने सोनई पोलीस…
संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर यशस्वी वाटचाल करणाऱ्या थोरात सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या दिवाळीनिमित्त शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार आणि सभासदांसाठी आनंदाची मोठी घोषणा केली आहे. कारखान्याचे विद्यमान चेअरमन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली, यामुळे या सर्व घटकांची दिवाळी गोड होणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. संगमनेर शहरातील बाजारपेठ भरलेली आहे. अमृत उद्योग समूहातून विविध संस्थांमधून सुमारे १०० कोटी रुपये बाजारात येत असल्याने संगमनेरकरांची दिवाळी ही आनंदाची होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीनिमित्त सन २०२४-२५ या गाळप हंगामात गाळपास आलेल्या उसास कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना २०० रुपये प्रति…
मुंबई – भारताच्या मुख्य न्यायमूर्तीवर सोमवारी (६ ऑक्टोबर) वकील राकेश किशोर यांनी केलेल्या कथित शारीरिक हल्ल्याच्या घटनेने महाराष्ट्रातील संपूर्ण न्यायवृंद हादरला आहे. या अत्यंत धक्कादायक, दुर्दैवी व निषेधार्ह घटनेबद्दल महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेने आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त करत तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असलेला निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. राज्य न्यायाधीश संघटनेने स्पष्ट केले की, ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून भारतीय न्यायव्यवस्थेच्या गौरव, स्वातंत्र्य आणि पवित्रतेवर थेट आघात आहे. संविधानिक लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवर प्रहार करणारी अशी कृत्ये कोणत्याही सभ्य समाजात असह्य आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहेत. संघटनेचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सचिन सूर्यकांत पाटील यांनी…
संगमनेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्ष व शांततेत पार पडाव्यात यासाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमधील स्थानिक रहिवासी (होमटाऊन रेसिडेंट) पोलीस कर्मचाऱ्यांची, विशेषतः एका वादग्रस्त कॉन्स्टेबलची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे करण्यात आली आहे. सोमवारी (६ ऑक्टोबर) शिवसेना पक्षाचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात प्रभाग रचना अंतिम झाली असून नगराध्यक्षपदाच्या सोडतीही पार पडल्या आहेत. लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करणे गरजेचे असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनात…
संगमनेर – सोमवारी संगमनेर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर आता लक्ष बुधवारी होत असलेल्या प्रभागनिहाय आरक्षणाकडे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी साडेदहा वाजता पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण निश्चित केले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे २०१६ नंतर पुन्हा एकदा पालिका निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे. आरक्षण निश्चित होताच इच्छुकांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात होईल. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रभागातून इच्छुकांची मोठी संख्या समोर येत…
आज अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा आहे आणि रेवती नक्षत्राचा प्रभाव राहील. आजचा दिवस सर्व राशींसाठी संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. मेष: आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील आणि तुम्ही तुमची कामे अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. कामावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे आणि व्यवसायात नफा मिळेल, परंतु भागीदारीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. आर्थिक व्यवहारात मात्र संयम ठेवावा लागेल. सकारात्मक विचारांमध्ये आणि आध्यात्मिक कामांमध्ये वेळ घालवा. वृषभ: आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. सकारात्मक विचारांच्या व्यक्तीसोबत विचारांची देवाणघेवाण झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील.…
मुंबई – २४७ नगरपरिषद, १४७ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत मंत्रालयात मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवारी) काढण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आता त्या त्या प्रवर्गातील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ३१ जानेवारी अखेर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्यानंतर निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला आहे. नगरपरिषद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ही सोडत काढण्यात आली.
संगमनेर – अनेकदा राजकीय भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीवर टीका करणाऱ्या त्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाचा धागा पकडत योग्य व्यासपीठावर योग्य मुद्दा मांडल्याचे स्पष्ट करत त्यांचे कौतुक केले. थोरात यांच्या या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह बहुतांश मंत्री रविवारी अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी साखर कारखानदारीवर मोठे भाष्य केले. फडणवीस यांच्या या वक्तव्याची चर्चा राज्यभरात सुरु आहे. थोरात सोमवारी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गाळप…
संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 3200 रुपये भाव देणार आहे. विक्रमी ऊस भावाची घोषणा करतानाच राज्य सरकारचे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधत यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी, राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत, त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी. याचबरोबर, पंजाब सरकारप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 2025-26 च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ आज (सोमवारी, ६…
संगमनेर: आगामी संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भावी नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, आज (सोमवार, ०६ ऑक्टोबर) होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण संगमनेरकरांचे तसेच इच्छुक उमेदवारांचे आणि राजकीय पक्षांच्या धुरिणांचे लक्ष लागले आहे. आजच्या सोडतीत नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होणार, यावर आता निवडणुकीची पुढील दिशा ठरणार आहे. नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून विविध राजकीय आडाखे बांधले जात होते. मात्र, आजच्या सोडतीमुळे हे सर्व आडाखे संपुष्टात येणार आहेत. ज्या प्रवर्गासाठी हे पद आरक्षित होईल, त्या प्रवर्गातील इच्छुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणीला आणि प्रयत्नांना तात्काळ वेग येईल. राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १२७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण आज निश्चित केले जाणार आहे. ही सोडत मुंबईतील…
मेष रास: आजचा दिवस परोपकारात व्यतीत होईल. जुन्या प्रकल्पांची कामे पूर्ण होतील आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. कार्यक्षेत्रात काही बदल तुमच्या बाजूने होतील, ज्यामुळे सहकारी थोडे हताश होऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या समजुतीने वातावरण सामान्य कराल. आर्थिक खर्चावर लक्ष द्या. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वृषभ रास: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. तुमच्या व्यवहारात संयम बाळगावा लागेल. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे आणि नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यापार व नोकरीत नवीन करारांमुळे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. पैशांची आवक चांगली राहील. मिथुन रास: आज तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. सर्जनशील कामांमध्ये यश मिळेल आणि सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. कोणालातरी दिलेले पैसे आज परत…
संगमनेर – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल संपूर्ण युवकांना मोठे आकर्षण आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत काही युवक भरकटले आहेत. यापुढे जातिभेद निर्माण करणाऱ्या शक्तींना ताकद देऊ नका. उमाजी नाईक यांचा वारसा आपल्याला आहे, त्यामुळे एकजुटीने काम करून संगमनेरचा नावलौकिक वाढवावा. रामोशी समाजाने नेहमीच प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहावे, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थारा देऊ नये, असे आवाहन ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सुरज चव्हाण यांनी केले. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रॅलीत ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सुरज चव्हाण यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विकासकामांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात,…
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या अनेक वस्तू काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. त्यातीलच एक म्हणजे ‘सार्वजनिक फळा’. काळानुसार लोकांची गरज संपते आणि ही ठिकाणे किंवा वस्तू दुर्लक्षित होतात. पण एक काळ असा होता, जेव्हा सार्वजनिक फळा केवळ एक लाकडी बोर्ड नव्हता, तर लोकांच्या भावनांना व्यक्त करणारा आणि जनमत तयार करण्याचे एक महत्त्वाचे साधन होते. हा सार्वजनिक फळा आठवण्याचे कारण म्हणजे काल-परवा घडलेला एक प्रसंग. माळी पंचांच्या मारुती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला एक खूप जुना सार्वजनिक फळा होता, ज्याला आम्ही हल्ली ‘मरण वार्ता देणारा फळा’ म्हणायचो. मंदिराच्या सुशोभीकरणासाठी नवीन कारभाऱ्यांनी तो काढून टाकला. या घटनेने साठीच्या पुढे गेलेल्या आमच्या पिढीला एक गोष्ट स्पष्ट झाली: आम्ही,…
प्रवीण पुरो – देशातील जनतेला असलेल्या मतदानाच्या मौलिक अधिकाराची पायमल्ली करणार्या देशाच्या निवडणूक आयोगाची कधी झाली नाही अशी बेईज्जती जगभर झाली आहे. आयोगाच्या अधिकार्यांना लोकांपुढे तोंड दाखवायला जागा राहिली नाही. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘व्होटचोर’ मोहिमेने आयोगाची त्रेधा उडाली आहेच. पण मी नाही त्यातली, असं दाखवण्याचा केलेला प्रयत्नही आयोगाच्या आणि आयोगाचे प्रमुख ज्ञानेशकुमार गुप्ता यांच्या चांगलाच अंगलट आला. एकूणच लोकांच्या विश्वासापासूनही आयोग पुरता पारखा झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. टी. एन. शेषन यांच्या काळातील आयोग आणि ज्ञानेशकुमार यांच्या नेतृत्वातील आयोग यातला फरक आता सुस्पष्ट झाला आहे. शेषन यांच्या नेतृत्वातील आयोगाची शान आणि मान…
मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुम्हाला कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मात्र, कामाच्या ठिकाणी किंवा वैवाहिक जीवनात वादविवाद टाळणे आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ (Taurus): व्यापार-व्यवसायाच्या दृष्टीने दिवस सकारात्मक राहील. नवीन संधी प्राप्त होतील आणि भागीदारीच्या कामात यश मिळेल. मालमत्ता किंवा भूमी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. शांत आणि तणावमुक्त राहण्याचा सल्ला आहे. मिथुन (Gemini): आज तुम्हाला गुरूकृपा लाभेल आणि तुमचे मानसिक स्वास्थ्य व समाधान उत्तम राहील. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवल्यास, तुमचा मूड हलका होईल आणि…
संगमनेर: गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांवर राज्य सरकारने कोणताही तोडगा न काढल्याने शिव आर्मी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत, संघटनेने थेट नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (NH 60) रोखण्याचा इशारा दिला आहे. सरकारला स्पष्ट शब्दांत ‘अल्टीमेटम’ देण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास कोणत्याही क्षणी महामार्गावर ‘चक्का जाम’ करण्याची तयारी संघटनेने केली आहे. गोवंश हत्या बंदीच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी आज (शनिवारी ४ ऑक्टोंबर) संगमनेर येथील दुर्वे नाना हॉलमध्ये संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कायद्यातील जाचक तरतुदी दूर कराव्यात, भाकड (दूध न देणाऱ्या) जनावरांची योग्य दरात खरेदी…
संगमनेर – अहिल्यानगर एलसीबीच्या पोलीस पथकाने संगमनेरमध्ये केलेल्या कारवाईत पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. तसेच कारवाई दरम्यान पकडलेली दारू ही वेदांत वाईन्समधून घेतल्याची कबुली आरोपींनी दिली असली तरी वेदांत वाईन्समधून अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे मद्याची नियमबाह्य विक्री झालेली नसून याप्रकरणीचे दावे फेटाळताना संबंधितांनी एक-दोन बाटल्यांच्या माध्यमातून अवैध साठा करून त्याची विक्री केल्याची शक्यता वेदांत वाईन्सच्या संचालकांनी वर्तवली आहे. एलसीबीच्या कारवाईत अवैध मद्य विक्री केल्याप्रकरणी संबंधित आरोपींसह वेदांत वाईन्सच्या चालक-मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, या अनुषंगाने संबंधितांनी सर्व आरोप फेटाळून लावत यासंबंधी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खुलासा केला आहे. संबंधित प्रकार व्यापारी स्पर्धेतून बदनामीचा असल्याचे त्यांनी म्हटले…
संगमनेर – मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेवर दोघाजणांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर घारगाव संगमनेर पोलिसांनी यातील एका आरोपीला थेट राजस्थान मधून जेरबंद केले आहे. पकडलेल्या आरोपीला शनिवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सात तारखेपर्यंत पोलीस करून ठेवण्याचा आदेश दिले. दरम्यान, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अद्यापही फरारच आहे. १५ सप्टेंबरला घडलेल्या या प्रकाराला पीडित महिलेने १ ऑक्टोंबरला संगमनेरच्या घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर वाचा फुटली होती. याप्रकरणी पोलिसांनी गणपत उर्फ गणेश जैसाजी प्रजापति (वय २६ वर्ष, मूळ रा. मंडवारीया पोस्ट बरलूट, ता. जि. सिरोही, राजस्थान) आणि सैफुल्ला अबूतय्यब शेख (हल्ली रा. १४ नंबर, नारायणगाव, पुणे) या…
संगमनेर: सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या आगामी गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोमवारी (०६ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि कांचनताई थोरात यांच्या हस्ते हा समारंभ पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे असतील. तसेच, आमदार सत्यजीत तांबे, माधवराव कानवडे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले यांनी ही माहिती दिली आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने मागील गळीत हंगामात ८ लाख मॅट्रिक टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप केले होते.…
