Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले तालुक्यातील आंभोळ गावचे सुपुत्र असलेल्या विजय चौधरी यांना राज्याच्या नगर विकास मंत्रालयातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अभियंता पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईत प्रदान करण्यात आला. मुंबईत नरिमन पॉईंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत असलेले विजय चौधरी यांनी नागरी जमीन कमाल धारणा कायदा निरसिद्ध झाल्यानंतर शासन देय क्षेत्रापोटी सन २०१९ ते २०२३ या कालावधीत योजना धारकांकडून सुमारे अकराशे कोटींचा महसूल राज्य शासनाला मिळवून देण्यामध्ये मोलाचे योगदान दिले. संचालक नगर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंधराव्या वित्त आयोग योजनेअंतर्गत तब्बल 91 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार थोरात यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. 171 गावे आणि अडीचशेच्यावर वाडीवस्ती असलेल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आमदार थोरात यांच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सिमेंट बंधारे, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या आदी विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहे. सहकाराच्या माध्यमातून समृद्धी निर्माण झालेला हा तालुका राज्यात विकसित असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये गणला जातो. अहमदनगर जिल्हा परिषद सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पालक हे मुलांचे प्रथम शिक्षक तर शिक्षक मुलांचे दुसरे पालक असतात. नीती मूल्यांची नैतिक शिकवण देत परिपूर्ण विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते, असे प्रतिपादन देवगड विद्यालयाचे मावळते मुख्याध्यापक रमेश पावसे यांनी केले. 33 वर्षाच्या शैक्षणिक सेवेनंतर मुख्याध्यापक पावसे सेवानिवृत्त झाले. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयामध्ये आयोजित सेवापूर्ती समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव कढणे होते. पुण्याच्या जलजीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे यावेळी उपस्थित होते. पावसे यांनी केलेल्या शैक्षणिक सेवेची दखल घेत संस्थेतर्फे त्यांना स्मृतिचिन्ह सन्मानचिन्ह देण्यात आले. राजेंद्र रहाणे म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ शालेय अभ्यासक्रमाचे धडे न देता त्यांच्यात मूल्यांची, चांगल्या विचारांची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आजी-माजी महसूल मंत्री थोरात-विखे समर्थकांमध्ये निवडणूक रंगणार आहे. 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून एकही जागा होऊ शकलेली नाही. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून कृषी पतसंस्था मतदारसंघातून सर्वसाधारण गटात 18, महिला राखीव गटात 4, इतर मागास प्रवर्ग गटामध्ये 2, विमुक्त जाती भटक्या जमाती गटामध्ये 2, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण जागेवर 6, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून 2, दुर्बल घटक प्रवर्गातून 2, व्यापारी अडते मतदार संघातून 6 व हमाल मापारी मतदारसंघातून 3 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरात आर्थिक फसवणुकीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. जमीन विकत घेणाऱ्या शेतकऱ्याकडून पंधरा लाख रुपये घेतल्यानंतरदेखील खरेदी दस्त नोंदणीवेळीच पळवून नेल्याचा प्रकार संगमनेरमध्ये घडला. पीडित शेतकऱ्याने या संदर्भात संगमनेर शहर पोलीस स्टेशन, पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली पण उपयोग झाला नाही. त्यामुळे शेवटी न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन भास्कर गीते (रा. पिंपरीलौकी, अजमपुर ता. संगमनेर) यांनी संगमनेर न्यायालयाकडे केलेल्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून अमोल रामदास गीते आणि रामदास लक्ष्मण गीते (रा. बोल्हेगाव रोड, एमआयडीसी, मोनालिसा नगर, नागापूर, अहमदनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज वारंवार टाकलेल्या छापल्यानंतर देखील संगमनेरातील बहुचर्चित कत्तलखाने सुरूच आहेत. कोणत्याही प्रकारच्या कारवाईला न घाबरणाऱ्या कसायांनी वेगवेगळ्या युक्त्या लढवत आपले धंदे सुरूच ठेवले आहे. गुरुवारी पहाटे पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयातील पथकाने केलेल्या एका कारवाईत तब्बल १७०० किलो गोमांस आणि दोन चार चाकी वाहने असा सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. संगमनेर शहरातील मोगलपुरा येथे आयुब तांबोळी यांच्या चाळेच्या दोन नंबरच्या खोलीमध्ये सोन्या कुरेशी व त्याचा साथीदार सलीम कुरेशी हे दोघे गोवंश जनावराची कत्तल करत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षकांना मिळाली होती. उपाधीक्षक संजय सातव यांनी आपल्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, अमृत आढाव…

Read More

सुरत : महाराष्ट्र संवाद न्यूज मानहानी संदर्भातील याचिका सुरतच्या सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे खासदारकी रद्द झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे बोलले जाते. सुरतच्या सत्र न्यायालयाने याचिका फेटाळल्याने तूर्तास गांधी यांना खासदारकी देखील मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच खासदार गांधी यांची शिक्षा कायम राहणार आहे. सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा सुनावली असल्याने गांधी यांनी या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. खासदार गांधी यांना न्यायालयात आज झालेल्या सुनावणी मध्ये दिलासा मिळू शकला नाही. याचिका फेटाळल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांचे सुपुत्र डॉ. सिद्धार्थ शिंदे यांनी ऑर्थोडोंटिक्स दंतरोग चिकित्सा विभागात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज ब्रेट ली यांच्या हस्ते ‘इंडिया ब्रँड आयकॉन अवॉर्ड 2022-23’ मिळाला आहे. मुंबई येथे टाईम सायबर मीडियाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा इंडिया ब्रँड आयकॉन अवॉर्ड 2022-23 देऊन एका शानदार कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज ब्रेट ली याच्यासह विविध क्रिकेटपटू व सिने क्षेत्रातील कलावंतांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. डॉ. सिद्धार्थ शिंदे हे मागील 11 वर्षापासून पुणे येथे दंत सर्जन व विशेष सेवा म्हणून कार्यरत आहेत. ऑर्थोडोंटिस्ट म्हणून काम करताना त्यांनी…

Read More

मुंबई : महाराष्ट्र संवाद न्यूज नगर विकास मंत्रालयातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अभियंता पुरस्कार अकोले तालुक्यातील सुपुत्र विजय कारभारी चौधरी यांना जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (20 एप्रिल) मुंबईत नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती शासनाचे अप्पर सचिव अजयसिंग पाटील यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम अकोले तालुक्यातील आंभोळ या छोट्याशा दुष्काळी गावाचे रहिवासी असलेले विजय चौधरी नगर विकास मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत आहे. चौधरी यांनी नागरी जमीन कमाल धारणा कायदा निरसिद्ध झाल्यानंतर शासन देयक्षेत्रापोटी सन 2019 ते 2023 या कालावधीत योजना धारकांकडून सुमारे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पळशी वनकुटे ता. पारनेर येथील एका मेंढपाळाच्या अल्पवयीन पंधरा वर्षीय मुलीस काहीतरी अमिष दाखवत फुस लावून तिला पळवून नेल्याप्रकरणी नांदुरी दुमाला येथील शुभम प्रकाश कवडे यांच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (१८ एप्रिल) सकाळी नऊ वाजता संगमनेर तालुक्यातील कवठे धांदरफळ येथील पतंग बाबा मंदिराशेजारी असलेल्या शेतात हा प्रकार घडला असल्याचे पन्नास वर्षीय तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, लालू नन्हू घुले (वय ५० वर्षे, धंदा – मेंढपाळ, रा. पळशी वनकुटे, ता. पारनेर) हे हल्ली संगमनेर तालुक्यातील कवठे धांदरफळ येथे राहावयास आहेत. फिर्यादीच्या पंधरा वर्ष तीन महिन्यांची अल्पवयीन मुलीस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या लोखंडी स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या दोघा व्यवसायिकांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाल्याने मुंबईच्या एका व्यापाऱ्याने संगमनेर येथील एका स्क्रॅप (लोखंडी भंगार) व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री समनापुर येथील व्यापारी अश्फाक मुक्तार मलिक यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीवरून साबान अत्तर अली उर्फ बाबू (रा. तुर्भे, नवी मुंबई) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती की, अश्फाक मलिक यांचा समनापुर येथे मलिक स्टील नावाने लोखंडाचा व्यवसाय आहे. तसेच त्यांचा मोठा भाऊ मोबीन मुक्तार मलिक उर्फ सज्जू यांचा भंगार स्क्रॅपचा व्यवसाय आहे. त्यामुळे मोबीन मलिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर महाविद्यालयाच्या संस्कृत संशोधन केंद्रातील विद्यार्थिनी आणि आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनच्या पर्यवेक्षिका माधुरी सातपुते यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळाली आहे. महाविद्यालयाच्या माजी संस्कृत विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ. रूपाली कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना हे यश मिळाले. त्यांचा महाविद्यालयाच्यावतीने गौरव करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. रवींद्र तासीलदार, मार्गदर्शिका डॉ. रूपाली कापरे, संस्कृत विभागप्रमुख डॉ. अनिरुद्ध मंडलिक, महाविद्यालयाचे कुलसचिव संतोष फापाळे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. अरुण गायकवाड म्हणाले, सातपुते ह्या लोणी खुर्द येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर मध्ये 25 वर्षापासून संस्कृत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. ऑगस्ट 2021 पासून…

Read More

मुंबई : महाराष्ट्र संवाद न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. येत्या काही दिवसात मोठा राजकीय स्फोट होणार असल्याच्या शक्यता वर्तविला जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या सोशल मीडिया प्रोफाइल वरून राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख वगळण्यात आला असून हे प्रोफाइल पूर्णतः रिकामे ठेवण्यात आले आहे. यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क सुरू झाले आहे. शिखर बँक प्रकरणाच्या आरोप पत्रातून अजित पवार यांचे नाव वगळल्याच्या बातम्या आल्यानंतर अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. अजित पवारांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर या चर्चा आणखी वाढल्या आहेत.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर वकील संघाच्या कार्यकारीणीसाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील निवडून आले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. अतुल आंधळे यांचा ३६ मतांनी पराभव केला. वकील संघाच्या कार्यकारिणी निवडण्यासाठी सोमवारी (१७ एप्रिल) संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात मतदान झाले. ३६२ वकिलांनी निवडणुकीत मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मावळते अध्यक्ष ॲड. सुहास आहेर यांनी काम बघितले. ढोमसे आणि आंधळे यांच्यात अध्यक्षपदासाठी सरळ लढत झाली. यात ढोमसे यांना १९८ तर आंधळे १६२ यांना मते मिळाली. वर्षभरासाठी असलेल्या कार्यकारिणीमध्ये यावर्षी कोणाला संधी मिळते याची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा निवडणूक निकाल आल्यानंतर संपली असून नवीन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज जनावरांचा रस्ता का अडवीला, अशी विचारणा करणाऱ्या सख्या भावाच्या डोक्यात मुलाच्या मदतीने खोऱ्याने मारत त्याचा खून करणाऱ्या बाप-लेकाला अकोले पोलिसांनी अटक केली. अकोले तालुक्यातील केळी कोतुळ येथील गोडेवाडीमध्ये ही घटना घडली. मनोहर सावळेराम लेंभे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून मयताची पत्नी सोनाबाई मनोहर लेभें (वय ४०) रा. गोडेवाडी, केळी-कोतुळ ता. अकोले यांनी या संदर्भात अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश सावळेराम लेंभे, राजाराम उर्फ राहुल सुरेश लेंभे या बाप-लेका विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी (ता. १६ एप्रिल) सायंकाळच्या वेळी शेतातील जनावरे दीर सुरेश सावळेराम लेंभे यांच्या रिकाम्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली :  दिल्लीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतःच ट्विट केलेला एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. केजरीवाल यांनी आज भर विधानसभेत आमदारांना एक गोष्ट ऐकवली. मोदींच्या डिग्री प्रकरणावरून केजरीवाल यांनी या गोष्टीद्वारे त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधल्याचं म्हटलं जातंय. केजरीवाल म्हणाले, एक चौथी पास राजा होता. त्याने एमएची खोटी डिग्री तयार केली. माहितीच्या अधिकाराखाली याची माहिती मागितली तर लोकांवर त्याने २५-२५ हजार रुपयांचा दंड ठोठवला. एक दिवस रात्री ८ वाजता राजाने सगळ्या चलनी नोटा बंद केल्या. देशात हाहाकार माजला. लोकांचे धंदे बंद पडले. लोकांकडे रोजगारही उरला नाही. त्यानंतर शेतकरी कायदे केले. मूर्खपणाने या राजाने ते तीन काळे कायदे मंजूर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरच्या अर्थकारणात महत्त्वाचे योगदान असलेल्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजकुमार गांधी यांची तर उपाध्यक्षपदी आनंद दरडा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष कांतीलाल गांधी, उपाध्यक्ष प्रितेश पारख यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम उपनिबंधक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला होता. यासाठी सोमवारी सहकार अधिकारी ए. एस. शेख यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीदरम्यान अध्यक्षपदासाठी राजकुमार गांधी आणि उपाध्यक्षपदासाठी आनंद दरडा यांनी आपले अर्ज दाखल केले होते. अध्यक्षपदी राजकुमार गांधी व उपाध्यक्षपदी आनंद दरडा या दोघांच्याही निवडी बिनविरोध पार पडल्या. अध्यक्षपदासाठी राजकुमार गांधी यांचे नाव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमध्ये येत्या शनिवारी २२ एप्रिलला अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मालपाणी उद्योग समुहाच्यावतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागील २५ वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेत यंदा संगमनेर तालुक्यातील २५ जोडपी विवाहबद्ध होतील. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून जवळपास दहा हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती मालपाणी उद्योग समुहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी दिली. मालपाणी उद्योग समुहाचे अध्वर्यू स्वर्गीय ओंकारनाथ व स्वर्गीय माधवलाल मालपाणी यांनी १९९७ साली या उपक्रमाची सुरुवात केली. लोकहिताचा हा उपक्रम जनतेच्या उस्त्फुर्त प्रतिसादाने रौप्यमहोत्सवी ठरला आहे. गेल्या अडीच दशकांत या सोहळ्याच्या माध्यमातून बाराशेहून अधिक परिवार एकमेकांशी जोडले गेले. अवघ्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज वादळामुळे शेतामध्ये तुटून पडलेल्या वीजवाहक तारेचा धक्का लागल्याने कृषी व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे रविवारी (१६ एप्रिल) सकाळी घडली. विजय साहेबराव पवार (वय ४६) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विजय पवार हे रविवारी सकाळी आपल्या शेतामध्ये डाळिंब बागेला औषध मारत होते. शनिवारी झालेल्या वादळामुळे वीजवाहक तारा तुटून त्यांच्या शेतात पडलेल्या होत्या. या तारेतून वीज प्रवाह सुरू असल्याने पवार यांचा झालेला धक्का लागला. त्यामुळे जोराचा शॉक बसल्याने ते जागीच कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने संगमनेरमध्ये उपचारासाठी खासगी रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू…

Read More

संगमनेर – महाराष्ट्र संवाद न्यूज तू फिर्यादीशी लग्न केलेस काय, तू त्याच्याजवळ झोपतेस अशी विचारणा करत दोघांनी तिचा ब्लाउज फाडून विनयभंग केला तर फिर्यादी घरी परतल्यानंतर त्याला दारातच अडवून बांबू आणि कोयत्याने मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सात आरोपीं विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी कामानिमित्ताने संगमनेर येथे आलेला होता. त्याचवेळी आरोपींनी गैर कायद्याची मंडळी एकत्रित जमवत फिर्यादीच्या घरी जाखुरी येथे जात फिर्यादीकडे कामास असलेल्या महिलेस तू फिर्यादीशी लग्न केलेस काय, तू त्याचे जवळ झोपतेस, असे म्हणत दोघा आरोपींनी तिचा ब्लाउज फाडून…

Read More