Author: Annant Ppangarkar

संगमनेर, प्रतिनिधी-  डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या वतीने आयोजित दोन दिवसीय मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिरात परिसरातील सुमारे १५० रुग्णांची तज्ज्ञांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४७ अत्यंत गरजवंत रुग्णांवर विविध प्रकारच्या प्लास्टिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. सुचित गांधी व राणीप्रसाद मुंदडा यांनी दिली. हे शिबीर दि. ११ व १२ जानेवारी २०२६ या कालावधीत धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये पार पडले. गेल्या २६ वर्षांपासून लायन्स क्लब सातत्याने या उपक्रमाचे आयोजन करत आहे. शारीरिक व्यंगामुळे, विशेषतः फाटलेले ओठ, टाळूवरील छिद्रे, तिरळेपणा, चेहऱ्यावरील डाग, गाठी आणि हाता-पायांच्या जन्मजात दोषांमुळे अनेक व्यक्ती न्यूनगंडाने ग्रासलेल्या असतात. अशा व्यक्तींना आत्मविश्वासाने…

Read More

नामदेव कहांडळ भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. या युवा पिढीसमोर आज रोजगारापासून ते बदलत्या जीवनशैलीपर्यंत अनेक आव्हाने उभी आहेत. अशा काळात युवकांना केवळ भाषणे ठोकणारा नेता नको, तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारा आणि त्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारा मार्गदर्शक हवा असतो. नेमकी हीच भूमिका बजावत जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी समाजकारण, आरोग्य, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात आपल्या अभ्यासू वृत्तीने स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज ते उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर जनसामान्यांचे ‘हक्काचे मित्र’ म्हणून ओळखले जातात. डॉ. सुधीर तांबे यांचा प्रवास एका निष्णांत सर्जनपासून…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक ठरेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ: आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस मध्यम राहील. व्यवसायात गुंतवणूक करताना सावध राहा. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनावरचा ताण हलका होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मिथुन: रखडलेली कामे आज पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. प्रवासाचे योग आहेत, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कर्क: आज तुम्हाला नवीन संधी प्राप्त होऊ शकतात, त्यामुळे सतर्क राहा. पैशांचे नियोजन करणे गरजेचे आहे कारण अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला अपेक्षित…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – ग्रामीण भागातील कलागुणांना वाव मिळावा आणि सामाजिक प्रश्नांची सोडवणूक व्हावी या उदात्त उद्देशाने धांदरफळ बुद्रुक येथे आयोजित ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ व ‘स्वदेश कला उत्सव २०२६’ उत्साहात पार पडला. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाची सांगता माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या उत्सवाचे उद्घाटन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सांगता समारंभाप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, धांदरफळ बुद्रुक गावाने ग्रामविकासाची वेगळी दिशा दर्शविली असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकोपयोगी उपक्रम राबवून या गावाने प्रगतीची घोडदौड सुरू ठेवली आहे. श्री…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल हाती येत असतानाच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीला मिळणारे यश आणि विरोधकांना बसलेला फटका या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी एक सूचक ट्विट करत राज्यातील ‘युवा नेत्यांचे’ कान टोचले आहेत. “केवळ आपल्या मनासारखा निकाल लागला नाही म्हणून निवडणूक प्रक्रियेवर संशय घेणे हे लोकशाहीसाठी घातक आहे,” अशा शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. आमदार तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांवर विशेष भर दिला आहे. ते म्हणतात की, महापालिका निवडणुकीचे निकाल समोर येत असताना अनेक पक्षांमधील ‘युवा नेते’ आपल्या अपयशाचे खापर…

Read More

​मेष – उद्याचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खुश होतील. मात्र, घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, पण आरोग्याबाबत थोडी जागरुकता बाळगणे आवश्यक आहे. ​वृषभ – आर्थिक दृष्टीकोनातून उद्याचा दिवस लाभदायक ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. नवीन व्यावसायिक संबंध जोडले जातील, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. ​मिथुन – तुमच्या बोलण्याच्या चातुर्यामुळे उद्या तुम्ही कठीण कामेही सहज पूर्ण कराल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. मित्रमंडळींसोबत वेळ मजेत जाईल. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्यांना काही…

Read More

संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव आणि संगमनेर या तीनही तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून त्यांचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रूपांतर करण्यास शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे.  आरोग्य मंत्री आणि शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ​जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, या तीनही तालुक्यांतील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची…

Read More

​संगमनेर | प्रतिनिधी: प्रवरा नदीपात्रातून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत महसूल आणि पोलीस प्रशासनाने आता अत्यंत कठोर भूमिका घ्यावी. अवैध वाळू उपसा करणारी व्यक्ती किंवा कार्यकर्ता कोणाचाही असो, त्याला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी न घालता थेट कायदेशीर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. ​लोणी येथे गुरुवारी आयोजित ‘जनता दरबार’ उपक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यभरातून व जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जनता दरबारात प्रवरा नदीपात्रातून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी महसूल…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि प्रवाशांच्या मनाला प्रसन्नता देणारा इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक हा ‘हॅपी हायवे’ सध्या विविधरंगी फुलांनी सजला आहे. राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कल्पकतेतून साकारलेला हा ९ किलोमीटरचा चौपदरी रस्ता केवळ मजबूत बांधकामासाठीच नाही, तर उत्कृष्ट सौंदर्यीकरणासाठी राज्याचा ‘ट्रेडमार्क’ ठरला आहे. ​या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांवर गुलाबी, पिवळा, सफेद आणि लाल अशा विविधरंगी फुलांची आकर्षक झाडे लावण्यात आली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या पादचारी मार्गावरील दाट वृक्षवल्लीमुळे संपूर्ण परिसराला निसर्गरम्य स्वरूप प्राप्त झाले असून, हा रस्ता प्रवाशांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर अनेक नामांकित महाविद्यालये असल्याने…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. निवडणुकीचा निकाल लागूनही अद्याप आपल्या खर्चाचा अधिकृत हिशोब न देणाऱ्या १२ उमेदवारांना प्रशासनाने आता अखेरचा इशारा दिला आहे. येत्या २० जानेवारी २०२६ पर्यंत खर्चाचा तपशील सादर न केल्यास, या उमेदवारांवर निवडणूक आयोगाचा बडगा उगारला जाणार असून त्यांना कायमचे अपात्र ठरवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ​निवडणूक आयोगाच्या कडक नियमांनुसार, प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत झालेला पै-पैचा हिशोब विहित मुदतीत देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, संगमनेरमधील १२ उमेदवारांनी या नियमाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या बेजबाबदारपणामुळे संतप्त झालेल्या निवडणूक विभागाने आता शेवटची मुदत जाहीर केली आहे. संबंधित उमेदवारांनी आपला…

Read More

अहिल्यानगर – अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज बनावट ओळखपत्रांच्या एका मोठ्या प्रकरणाने गालबोट लागले. प्रभाग क्रमांक ३ मधील आनंद विद्यालय मतदान केंद्र परिसरात बनावट निवडणूक ओळखपत्रे आणि आधार कार्डांचा मोठा साठा बाळगणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. ​मिळालेल्या माहितीनुसार, आनंद विद्यालय केंद्रावर मतदान सुरू असताना दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. काही उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी सतर्कता दाखवत या व्यक्तींची झडती घेतली असता, त्यांच्याकडे वेगवेगळ्या नावांची शेकडो बनावट निवडणूक ओळखपत्रे आणि आधार कार्ड आढळून आली. एकाच व्यक्तीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात ओळखपत्रे सापडल्याने उपस्थित…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरदिवसा चोरीची एक धक्कादायक घटना घडली आहे. निमगावजाळी ते संगमनेर रस्त्यावरील वडगावपान फाटा येथे दोन अज्ञात चोरट्यांनी एका ६१ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबडून नेले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ​जिजाबाई बाळासाहेब सातपुते (वय ६१, रा. पावबाकी रोड, संगमनेर) या १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास आपल्या मोपेड गाडीवरून प्रवास करत होत्या. त्या वडगावपान फाट्याजवळ आल्या असता, एका मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम तिथे आले. मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने जिजाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अत्यंत वेगाने ओरबडले आणि दोघेही आरोपी तिथून पसार झाले. ​या चोरीमध्ये एकूण…

Read More

संगमनेर: आपसातील सर्व हेवेदावे, मतभेद आणि मनभेद आता कायमचे बाजूला ठेवा. आता वेळ आली आहे ती फक्त भगव्यासाठी आणि शिवसेनेसाठी मैदानात उतरण्याची! आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी होणारे फेरबदल पक्षासाठी फायदेशीर ठरणार असून, त्या जोरावर सत्तेवर भगवा झेंडा निश्चितपणे रोवला जाईल, असा जोरदार विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ​आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संगमनेर तालुक्यात आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला आहे. माजी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब गुंजाळ यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत शिवसैनिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.…

Read More

मेष – ​आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते. जोडीदारासोबतचे जुने मतभेद मिटून संबंधांमध्ये सुधारणा होईल, मात्र आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध राहा, विशेषतः डोळ्यांच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे. ​वृषभ – ​आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस फायदेशीर ठरेल आणि जुनी रखडलेली येणी वसूल होतील. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तरीही, रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण तुमच्या शब्दांमुळे विनाकारण वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ​मिथुन – ​आज तुम्हाला करिअरमध्ये नवीन आणि चांगल्या संधी प्राप्त होतील. तुमची बऱ्याच…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात प्रवाशांना गाठून लुटण्याची घटना घडली असून, एका शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवून ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याचे समोर आले आहे. महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ही लूटमार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४), (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​पिंपळगाव देपा (ता. संगमनेर) येथील शेतकरी नितीन बाळासाहेब फटांगरे (वय ४६) हे १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री १:३० वाजेच्या सुमारास नाशिक ते पुणे महामार्गावरून जात असताना ही घटना घडली. चंदनापुरी घाटातील खिंडीच्या वळणाजवळ पाठीमागून विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या होंडा युनिकॉन मोटारसायकलवरून दोन…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – ​संगमनेर तालुक्यातील खळी येथे शेतीच्या वादातून एका कुटुंबाने दुसऱ्याच्या उभ्या मका पिकात ट्रॅक्टर घालून पिकाचे मोठे नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​​फिर्यादी किशोर दादू वाघमारे (रा. खळी) यांचे त्यांच्याच कुटुंबातील काही सदस्यांशी शेतीच्या वाटणीवरून गेल्या काही काळापासून न्यायालयात वाद सुरू आहेत. ९ जानेवारी २०२६ रोजी किशोर वाघमारे हे त्यांच्या आजारी आईला भेटण्यासाठी लोणी येथील रुग्णालयात गेले होते. हीच संधी साधून आरोपींनी मुंबईहून थेट खळी येथे येत शेत गट क्र. १५ व १६ मध्ये ट्रॅक्टर चालवून उभ्या मका पिकाची नांगरणी केली. ​पिकाचे नुकसान होत असल्याचे पाहून…

Read More

संगमनेर | अनंत पांगारकर प्रशासकीय राजवटीच्या प्रदीर्घ काळानंतर संगमनेर नगरपरिषदेचे राजकारण पुन्हा एकदा लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात परतले आहे. तब्बल चार-साडेचार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पालिकेच्या ऐतिहासिक रामकृष्ण सभागृहाचे दरवाजे नवनिर्वाचित सदस्यांसाठी उघडण्यात आले. निमित्त होते उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीचे. या निवडीच्या निमित्ताने अनुभवी नगरसेवकांसह अनेक नवीन चेहऱ्यांनी प्रथमच सभागृहात पाऊल ठेवले, तर नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांची देखील या सभागृहात पहिलीच ‘एन्ट्री’ झाली. नगराध्यक्षांच्या आसनावर विराजमान होत तांबे यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड करत पहिलीच विशेष सभा यशस्वीपणे पार पाडली. ​तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह सर्व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली होती. या साडेचार वर्षांच्या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- येथील प्रतिष्ठित व्यापारी शैलेश पारख यांची कन्या कुमारी हर्षा पारख हिने संसारातील भौतिक सुखांचा त्याग करून संयम, तप आणि साधनेचा मार्ग स्वीकारण्याचा दृढ निर्णय घेतला आहे. येत्या २५ जानेवारी २०२६ रोजी संगमनेर येथे तिचा भव्य व ऐतिहासिक जैन भागवती दीक्षा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. ​या पावन प्रसंगी जैन श्रमण संघाचे अर्हम विज्जा प्रणेते उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषी महाराज हे चतुर्विध संघाच्या साक्षीने हर्षा पारख यांना भागवती दीक्षा प्रदान करणार आहेत. या सोहळ्यासाठी जैन धर्मातील प्रख्यात संत वाणीचे जादूगर रमणिक मुनीजी महाराज, मधुर कंठी तीर्थेश ऋषीजी महाराज, सरलमना अचल ऋषीजी महाराज आणि कैवल्यधाम प्रेरक कैवल्य रत्नाश्री महाराज…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर शहराच्या विकासाचा नवा रोडमॅप असलेल्या ‘संगमनेर २.०’ या जाहीरनाम्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आता प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देण्यासाठी मंगळवारी संगमनेर नगरपरिषद कार्यालयात आमदार सत्यजित तांबे आणि नूतन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या उपस्थितीत सर्व विभाग प्रमुखांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून आमदार तांबे यांनी थेट ‘ॲक्शन मोड’मध्ये येत आगामी १०० दिवसांतील कामांचे नियोजन करण्यासोबतच प्रशासनाला कामाचा दर्जा आणि पारदर्शकता राखण्याचे कडक निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ​या बैठकीत आमदार सत्यजित तांबे यांनी ‘संगमनेर २.०’ मधील आश्वासनांची पूर्तता करण्यावर विशेष भर दिला. प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदारीच्या क्षेत्रात…

Read More

​संगमनेर, प्रतिनिधी – सभागृहात प्रशासनाला प्रश्न विचारणे किंवा राजकीय चर्चा होणे स्वाभाविक असले, तरी सर्वांचे अंतिम ध्येय हे संगमनेरचा विकास हेच असले पाहिजे, राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित असावे आणि सभागृहाच्या आत शिरताना ते उंबरठ्यावरच सोडून केवळ शहराच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि संगमनेर सेवा समितीचे प्रमुख आमदार सत्यजित तांबे यांनी केले. संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर, नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची पहिली विशेष सभा पालिकेच्या ऐतिहासिक रामकृष्ण सभागृहात उत्साहात पार पडली. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी नवनियुक्त नगरसेवकांना मार्गदर्शन करताना अत्यंत मोलाचा सल्ला दिला. ​आमदार तांबे यांनी नगरसेवकांना सुरुवातीलाच संगमनेर नगरपालिकेच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली…

Read More