Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: श्रीराम नवमी निमित्ताने संगमनेरमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिनी मातृशक्ती आयोजित “भव्य दिव्य शोभायात्रा” गुरुवारी (३० मार्च) सायंकाळी पाच वाजता संगमनेर येथील अभिनव नगरमधील श्रीराम मंदिर येथून निघणार आहे. श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव गुरुवारी दुपारी बारा वाजता संगमनेर तालुक्यातील सर्व प्रमुख मंदिरे, श्रीराम मंदिरे व हनुमान मंदिरात जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेने आयोजित केले आहे. सायंकाळी निघणाऱ्या शोभायात्रेत भव्य दिव्य धार्मिक देखावे, भव्य श्रीरामचंद्र मूर्ती, प्रमुख आकर्षण “महाबली हनुमान”, श्रीराम रथ, श्रीराम पंचायत, भजनी मंडळ, सनई- चौघडे, घोडे, पारंपारिक वाद्य, आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी अशी भव्य- दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रा अभिनव नगर येथून…
महाराष्ट्र संवाद न्यूज खरंतर एखाद्या गोष्टीत वादाला प्रतिवादाने उत्तर द्यायला हवे. जेथे वाद निर्माण होतो तेथे प्रतिवादाने उत्तर द्यायला पाहिजे मात्र सावरकर प्रश्नी भारतीय जनता पक्ष प्रतिवाद करण्यास तयार नाही, अशी टीका माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात संगमनेरमध्ये माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रत्येक पक्षामध्ये मत-मतांतर विचारधारा वेगवेगळी असू शकते. मात्र आम्ही किमान समान कार्यक्रमावर आधारित काम करीत होतो. यापुढेही करीत राहू. काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांनी अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय? हा प्रश्न उपस्थित केला असता, याला भाजपने उत्तर द्यायला हवे होते. मात्र उत्तर न…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: लोणी – नांदूर शिंगोटे रस्त्यावर तळेगाव नजीक दुधाचा टँकर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रवींद्र बाळासाहेब पवार (वय 32 वर्ष, रा. तळेगाव दिघे, संगमनेर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अधिक माहिती अशी, रवींद्र बाळासाहेब पवार हा सोमवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पिंपळे येथील रवी चकोर यांच्या खडी क्रेशर वरील काम आटोपून घरी तळेगाव दिघेकडे मोटार सायकलवरून नांदूर शिंगोटे – लोणी रस्त्याने परतत असताना समोरून भरधाव वेगाने नाशिकच्या दिशेने प्रभात डेअरीचा दूध टँकर येत होता. लोणी – नांदूर शिंगोटे मार्गावर हॉटेल कमलेश समोर दूध टॅंकरने पवार यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज डंपर चालक डंपर रिव्हर्स (मागे) घेत असताना डंपर खाली सापडून चार वर्षे वयाच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी संगमनेर तालुक्यात घडली. या प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे ही दुर्दैवी घटना घडली असून माही आजीज पठाण (वय चार वर्षे) असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये डंपर चालक राजेंद्र भागवत बडे याच्या विरोधात विविध कलमांतर्गत या बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. डंपर चालक राजेंद्र बडे हा सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माळवाडी वस्ती मेंढवन येथे त्याच्या ताब्यातील डंपर हयगयीने व अविचाराने डंपर मालकाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज सुरतच्या न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर गुजरात मधील नवसारी न्यायालयाचा आणखी एक निकाल समोर आला आहे या न्यायालयाने काँग्रेस आमदार अनंत पटेल यांना शिक्षा सुनावली आहे. आमदार पटेल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो फाडला म्हणून 99 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास त्यांना सात दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. आमदार अनंत पटेल यांच्यासह आणखी काही विद्यार्थ्यांनी 2017 मध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नवसारी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयात घुसून गैरवर्तन आणि कुलगुरूंच्या टेबलावर ठेवलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो फाडल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आमदार पटेल यांच्यासह युवक काँग्रेसच्या सदस्यांसह इतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज उद्धव ठाकरे नेहमी माझ्या कुळाचा उल्लेख करतात. आमचा बावनकुळे कूळ हिंदुत्ववादी आहे. पण तुम्ही तुमचा कूळ बुडविला आहे. एकदा तरी ठाकरेपणा दाखवा. काँग्रेस पक्षाची साथ सोडा. राहुल गांधी रोज सावरकरांचा अपमान करतात. एकदा तरी ठाकरेपणा दाखवा आणि बाहेर पडा. फक्त सभेतूनच वल्गना करू नका, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बावनकुळे यांच्या आडनावावरून उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत रविवारी टीका केली. ५२ काय १५२ कुळे खाली उतरली तरी शिवसेना बुडवू शकणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाच्या ज्या कुळाला उंची दिली होती. तो तुम्ही बुडविला…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : “कॉल मी” या ॲपचा वापर करत पुण्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरत व्यावसायिकाला तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. हा सगळा प्रकार बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यावसायिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पिरगोंडा पाटील आणि शेखर गजानन ताकवणे असे खंडणी मागणाऱ्या दोघा आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांनी त्यांच्या मोबाईलवर कॉल मी नावाचे ॲप डाऊनलोड केले होते ॲप डाऊनलोड करताना त्यात पुण्याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल…
‘महापशुधन एक्सपो २०२३’ चा समारोप व बक्षिस वितरण, ‘महापशुधन एक्स्पो’ला तीन दिवसांत ८ लाख लोकांनी दिली भेट महाराष्ट्र संवाद न्यूज शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून हे सरकार काम करीत आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नसल्याची ग्वाही देत शिर्डीमध्ये ‘थीम पार्क’ उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नगर विकास विभागाच्या माध्यमातून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्यावतीने शिर्डी येथे आयोजित तीन दिवसीय ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चा समारोप व बक्षिस वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महसूल, पशुसंवर्धन,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर ‘हिंदूंच्या मुलींना घेऊन बसतो का’ या कारणावरून दहा ते पंधरा जणांनी दोघा तरुणांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी संगमनेर शहरात आणि शहरालगतच्या खांजापूर जवळील विठ्ठलकडा येथे घडली. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकरणाला लव्ह जिहादचा संशय निर्माण झाल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह पोलिसांनी सतर्कता दाखविल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली. शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आठ जणांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. दोन तरुण एका तरुणीसोबत मालदाड रोडवरील डी.ई. लाईट कॅफे हाऊसमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: टोल नाक्यावर टोल भरण्यास नकार देत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना छोटा हत्ती पिकअपमधून आलेल्या अज्ञात ५-६ जणांनी दमदाटी शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शहरा नजीकच्या हिवरगाव पावसा टोल नाक्यावर घडला. यात टोल नाक्यावरील एका कर्मचाऱ्यांचा हात मोडला आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात जखमी योगेश सुभाष काळे याने फिर्याद दिली आहे. टोल नाक्यावर फिर्यादी काळे हा टोल कलेक्शन करत असताना छोटा हत्ती पीकअपमधून पाच ते सहा जण टोल नाक्यावर आले होते. फिर्यादीने त्यांच्याकडे टोलची रक्कम मागितले असता त्यांनी तोंड न देता फिर्यादी सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे टोल नाक्यावरील सुपरवायझर विलास…
महाराष्ट्र संवाद न्यूज शहरातील अनेक बँकांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासणाऱ्या आणि त्या माध्यमातून सोनेतारण करणाऱ्या कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याच्या माध्यमातून आणखी एका बँकेचे तब्बल 83 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यामुळे येत्या काही दिवसात आणखी काही बँकांमधील घोटाळे समोर येण्याची शक्यता बळावली आहे. या घोटाळ्यांमुळे या बँकांची विश्वासार्हतादेखील धोक्यात आली आहे. मुंबई येथील प्रतिष्ठित असलेल्या जी. एस. महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेची संगमनेरमध्ये शाखा आहे. या बँकेत खोट्या सोन्याचा माध्यमातून २३ कर्जदारांनी बँकेची ८२ लाख ५७ हजार ८३४ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी गोल्ड व्हॅल्यूअर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022 – 23 या गळीत हंगामाचा सांगता समारंभ व सेवानिवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा गुरुवारी (30 मार्च) सकाळी 9 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात यांच्या उपस्थितीत व चेअरमन बाबा ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी कारखान्याने 15 लाख 53 हजार मेट्रिक टनाचे उच्चांकची गाळप केले होते. तर या हंगामात 10 लाख मेट्रिक टनाच्यावर गाळप झाले आहे. सभासद, शेतकरी, कामगार ऊस उत्पादक या सर्वांच्या हिताचे निर्णय घेत…
रविवार विशेष ◇ प्रवीण पुरो सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा देशभर सुरू असलेला राज्यकारभार लक्षात घेता हा पक्ष आता कोणत्याही थराला जाऊ शकतो, याची खात्री पटू लागली आहे. देशात भाजप सत्तापर्व सुरू झाल्यापासून गौतम आदानी आणि मुकेश अंबानी यांच्या उद्योगांसाठी ज्या प्रकारे ग्रीन कार्पेट आंथरण्यात आले ते पाहाता त्या पक्षाला आणि केंद्रातल्या सत्तेला देशाहून या उद्योगपतींची चिंता आहे, हे स्पष्ट झालं. खोटेपणाचे असंख्य इमले उभे केलेल्या अदानी समुहाने जागतिक स्तरावर निर्माण केलेला बोलबाला केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेमाचं प्रतिक होय. सामान्य भारतीयांचे हजारो कोटी रुपये ज्या जीवनविमा आणि स्टेट बँकेतून अदानींसाठी खुले करून देण्यात आले त्या सामान्यांनी करायचं काय,…
महाराष्ट्र संवाद न्यूज विधानभवन परिसरात राहुल गांधी यांच्या बॅनरवरील फोटोला चपला, जोड्यांनी मारहाण करण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला. अशा प्रकराचे विकृत प्रकार होणे पुर्णपणे चुकीचे, निंदनीय व लोकशाहीस मारक आहे. अशा प्रकारचे गैरवर्तन आपल्या कार्यकाळात झाले असून विधानसभा अध्यक्षांसाठीही हे योग्य नाही. या घटनेबाबत दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभेच्या परिसरात राहुल गांधींच्या बॅनरबाबत जी विकृत घटना घडली ती विधानसभेच्या इतिहासातील एक निंदनीय व दुर्दैवी घटना आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. मात्र हे लक्षात ठेवावे की, आज आमच्या वरीष्ठ नेत्यांबाबत…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: आपली संस्कृती पुढे नेताना रुबिक क्यूब सारख्या साहित्याच्या माध्यमातून तयार केलेली देशातील सर्वात भव्य साई प्रतिमा शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल. साईतीर्थ हे संस्कारांची शिकवण देणारे आधुनिक तीर्थक्षेत्र असल्याचे प्रतिपादन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. साई तीर्थ थीम पार्कमध्ये चिन्मय प्रभू या तरुणाने तयार केलेल्या देशातील सर्वात मोठ्या रुबिक क्यूब साई प्रतिमेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी उपस्थित होते. रामगिरी महाराज म्हणाले, आजची तरुण पिढी भारतीय संस्कृती आणि परंपरांपासून दूर चालली आहे, अशा पिढीला आधुनिक तंत्रज्ञांचा वापर करून भारतीय संस्कृती आणि आपल्या समृद्ध वारशाची…
महाराष्ट्र संवाद न्यूज आश्वी: संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रहिवासी व सध्या कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास असलेल्या प्रतिक राजेंद्र रातडीया याची जगप्रसिद्ध अमेरीकेतील नासा या संस्थेत संशोधक म्हणून निवड झाली आहे. जगप्रसिद्ध अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये (NASA) संशोधक म्हणून नुकतीचं प्रतिक रातडीया यांची निवड झाली असल्याची माहिती मिळाल्याने सुखद धक्का बसल्याची प्रतिक्रिया नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थानी दिली आहे. प्रतिक रातडीया पुढील तीन महिन्यांसाठी कृत्रिम बुद्धिमतेचा (artificial intelligence) वापर करून नासाच्या मंगळ ग्रहावर गेलेल्या यानांमध्ये विसंगती शोधण्याच्या पद्धती विकसित करण्यावर संशोधन करणार आहे. या प्रकल्पासाठी प्रतिकची अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबमध्ये विद्यार्थी संशोधक…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: संगमनेरच्या ध्रुव अॅकॅडमी संस्थेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘रामायण’ महानाट्य शिर्डीच्या महापशुधन एक्सपोमध्ये सर्वांचीच दाद मिळवून गेले. रामायणातील प्रत्येक प्रसंगाला उपस्थितांच्या ‘जय श्रीराम’ या घोषणेच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे सांस्कृतीक कार्यक्रमाचे वातावरण पुर्णपणे राममय होऊन गेले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने पशुसवंर्धन विभागाच्यावतीने ३ दिवसांचे भव्य महाप्रदर्शन शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. देशासह राज्यातील शेतकरी, पशुपालक आणि शेतीपुरक व्यवसाय करणारे तरुण शेतकरी या महाप्रदर्शनात सहभागी झाले आहेत. राज्यातील विविध भागातून शेतकरी हे प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत. येणाऱ्या प्रत्येकासाठी श्रीक्षेत्र शिर्डी हे साईबाबांचे समाधी स्थळ मुख्य आकर्षण आहेच परंतू या प्रदर्शनातही सांस्कृतीक कार्यक्रमांची पर्वणी सहभागी शेतकऱ्यांना मिळावी म्हणून खासदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: मद्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या व्यक्तीने ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ धक्काबुक्की करत कार्यालयात कोंडून घेतले नंतर पुन्हा येत ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या केबिनचे नुकसान करत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे घडली आहे. या संदर्भात ग्रामविकास अधिकारी अरुण गोविंद जेजुरकर (वय ५० वर्षे, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल संजय गायकवाड याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, आरोपी विशाल गायकवाड हा शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंभोरे ग्रामपंचायत कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत आला होता. त्याने गाय गोठा यादी दाखविण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी जेजुरकर यांच्याकडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. कर्नाटकमधील २०१९ च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले असून खासदारकी रद्द करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निर्णय हा लोकशाहीचा खून आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी प्रमाणे राहुल गांधी सुद्धा भाजपचा पराभव करून पंतप्रधान होतील, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे समजताच त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. महाविकास आघाडीने या घटनेचा…
शिर्डी: शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्य सरकार अतिशय संवेदनशीलपणे निर्णय घेत आहे. गो आयोग स्थापन करण्यात आल्याने गोसंवर्धना बरोबरच दूग्ध व्यवसायाला संरक्षण आणि रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शेतीपुरक व्यवसायातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याचे सरकारचे उदिष्ठ असून, लम्पि संकटातही पशुधन वाचविण्यासाठी देशात पशुपालकांना मदत करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. राज्यशासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्यावतीने शिर्डी येथे आयोजित तीन दिवसीय ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे पशुसंवर्धन मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री…
