Author: Annant Ppangarkar

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. भावंडांच्या मदतीने महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, मात्र घाईघाईत निर्णय घेणे टाळा. वृषभ: आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस फायदेशीर आहे. तुमची वाणी प्रभावी राहील, ज्यामुळे कठीण कामेही सुलभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि संध्याकाळी एखाद्या समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल. मिथुन: चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आज तुमची कल्पनाशक्ती विस्तारलेली असेल. नवीन विचार आणि योजना अंमलात आणाल. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही इतरांना प्रभावीत कराल. स्वतःच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे लक्ष द्या. कर्क: आज थोडा धावपळीचा आणि खर्चाचा दिवस असू शकतो. विनाकारण चिंता वाटण्याची शक्यता आहे, त्यामुळे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित आणि वैभवशाली’ शहर म्हणून ओळख असलेल्या संगमनेरला गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. शहरातील वाढती अमली पदार्थांची तस्करी, दहशत आणि चोऱ्यांच्या घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, ही गुन्हेगारी तातडीने थांबवावी, या मागणीसाठी शहरातील महिला पदाधिकारी कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात आज नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला तीव्र भावनांचे निवेदन देण्यात आले. शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात महिलांनी शहरातील विदारक परिस्थिती मांडली आहे. पोलीस निरीक्षक बारवकर यांनी महिलांच्या भावना जाणून घेत, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस पावले उचलण्याचे…

Read More

संगमनेर, अनंत पांगारकर-  गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या राजकीय वर्तुळात अत्यंत चर्चेचा आणि दोन्ही आमदारांच्या ‘पत्रक युद्धा’चा विषय ठरलेली मालमत्ता करावरील शास्ती माफी अखेर प्रत्यक्षात उतरली आहे. संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीतील थकबाकीदार मिळकतधारकांसाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘अभय योजना’ लागू करण्यात आली असून, यामुळे शहरातील हजारो मालमत्ताधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील थकीत व्याजात (शास्ती) तब्बल ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली असून, प्रशासकीय पातळीवर झालेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी पदभार हाती घेताच त्यांच्या कार्यकाळातील अंमलबजावणी होणारा हा पहिलाच मोठा निर्णय ठरला आहे. गेली अनेक वर्ष संगमनेरकरांना अपेक्षित असलेला निर्णय तांबे यांच्या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  शुद्धता आणि गुणवत्तेसाठी महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेल्या राजहंस दूध संघाने आता बेकरी उद्योगात आपले पाऊल टाकले आहे. ‘राजहंस मिल्क अँड बेक्स’ अंतर्गत उत्पादित करण्यात आलेल्या विविध दर्जेदार बेकरी पदार्थांचा भव्य शुभारंभ माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयात आयोजित ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शना’च्या उद्घाटन सोहळ्यात या नवीन उपपदार्थांचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले. याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार उभा असून दूध व्यवसायामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. संगमनेरची ओळख आता ‘दुधाचा तालुका’ म्हणून सर्वदूर पोहोचली असून राजहंसने नेहमीच आपल्या उत्पादनांची…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – थोर स्वातंत्र्यसेनानी आणि अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, ज्यांना सहकारातील संत मानले जाते, त्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती येत्या सोमवारी, १२ जानेवारी २०२६ रोजी ‘प्रेरणा दिन’ म्हणून संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील गावोगावी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अमृत उद्योग समूहाच्या वतीने मुख्य अभिवादन कार्यक्रम सकाळी ९ वाजता अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे होणार आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली असून, यावेळी माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ…

Read More

आश्वी, प्रतिनिधी-  आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत आश्वी खुर्द येथील दोन महिलांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे. महांकाळेश्वर मंदिर परिसरात सापडलेली ३० हजार रुपये किमतीची सोन्याची वस्तू मूळ मालकिणीला परत करून त्यांनी माणुसकी जपली आहे. २७ डिसेंबर रोजी महांकाळेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या उज्वला भंडारे यांना सोन्याची एक मौल्यवान वस्तू सापडली. त्यांनी ही माहिती पती मनोज भंडारे यांना दिली. त्यानंतर पत्रकार संजय गायकवाड यांच्या मदतीने सोशल मीडियावर याबद्दल संदेश प्रसारित करण्यात आला. दरम्यान, १२ वीत शिकणाऱ्या श्रावणी जगताप या विद्यार्थिनीलाही त्याच वस्तूचा उर्वरित भाग सापडला होता. तिनेही या संदेशाला प्रतिसाद देत संपर्क साधला. योग्य चौकशीअंती सदर सोने कांताबाई दत्तात्रय मांढरे यांचे…

Read More

मेष – मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खुश राहतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, मात्र जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ असून जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. वृषभ – आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. धावपळीच्या कामांमुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढा. व्यवसायात नवीन करार करताना कागदपत्रांची नीट पडताळणी करा. नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. घरातील थोरामोठ्यांचा सल्ला घेतल्यास कठीण प्रसंगातून मार्ग काढणे सोपे होईल. मिथुन – मिथुन राशीच्या व्यक्तींना आज वैचारिक स्पष्टता जाणवेल. नवीन…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- पिंपळे पाझर तलावातून दोन्ही गावांसाठी रब्बी हंगामाचे पाणी शुक्रवारी (९ जानेवारी) सोडण्यात आले. आमदार अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन जलसंपदा विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या, ज्याची अंमलबजावणी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव आणि पारेगाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चिंचोली गुरव व पारेगाव परिसरात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पिंपळे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र, रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिके सध्या पाणीअभावी धोक्यात आली होती. पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. ही समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  व्यावसायिक कामासाठी घेतलेली हातउसनवार रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश (चेक) बँकेत न वटल्याने संगमनेर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चं. प्र. रघुवंशी यांच्या न्यायालयाने एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. परक्राम्य संलेख अधिनियमाच्या कलम १३८ अन्वये हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादी ज्ञानेश्वर माधव वर्पे हे संगमनेर शहरात ‘वर्पे इन्श्युरन्स अँड मल्टी सर्विसेस’ नावाचा व्यवसाय करतात. आरोपी सागर भाऊसाहेब गोपाळे (वय ३८ वर्ष, रा. धांदरफळ बुद्रुक) यांचा ‘श्री स्वामी समर्थ ट्रान्सपोर्ट’ नावाचा व्यवसाय असून गाड्यांच्या विम्याच्या कामामुळे या दोघांचा परिचय झाला होता. जून २०२२ मध्ये आरोपीने आपल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी फिर्यादीकडून १ लाख २५ हजार…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  कृषी क्षेत्र हे अत्यंत व्यापक असून यामध्ये संशोधनासह आर्थिक समृद्धीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातील नवनवीन माहितीसाठी ‘कळस कृषी प्रदर्शन’ हे संपूर्ण राज्यात लोकप्रिय ठरले असून, अमृतवाहिनीतील या प्रदर्शनाच्या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्यावतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आयोजित ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाचे’ शानदार उद्घाटन थोरात यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीचा अत्यंत बेजबाबदार आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. गावाच्या स्वच्छतेसाठी शासनाकडून आलेली लाखो रुपयांची घंटागाडी गेल्या चार वर्षांपासून एका गोदामात सडत पडली असतानाच, याच गोदामात आपल्या देशाच्या महापुरुषांचे फोटो अत्यंत विदारक आणि अपमानस्पद अवस्थेत फेकल्याचे समोर आले आहे. थेट व्हिडिओ पुराव्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभाराचे वाभाडे निघाले असून संपूर्ण तालुक्यातून संतापाची लाट उसळली आहे. गावातील घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यासाठी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून शिबलापूर गावाला लाखो रुपये किमतीची घंटागाडी देण्यात आली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही गाडी नागरिकांच्या सेवेत येण्याऐवजी एका खासगी गोदामाची शोभा वाढवत आहे. गावात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असताना सरकारी मालमत्तेची…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा आणि मेहनतीचा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे, जी तुम्ही आत्मविश्वासाने पूर्ण कराल. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर जुनी देणी फेडण्यात तुम्हाला यश येईल आणि गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे सततच्या कामातून विश्रांती घेणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्याने मानसिक ताण कमी होईल. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कौटुंबिक सौख्याचा असेल. घरातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबत असलेले छोटे-मोठे मतभेद संपुष्टात येतील. व्यवसायात भागीदारीत काम करणाऱ्यांनी व्यवहारात पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात गैरसमज होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  निवडणुकीच्या काळात ‘लाडकी बहीण’ म्हणत मतांची बेगमी करणाऱ्या महायुती सरकारने आता आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली असून संगमनेर तालुक्यातील तब्बल १७,९६७ महिलांना या योजनेतून अपात्र ठरवत डच्चू दिला आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यात महायुती सरकारबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली असून, निवडणुकीपुरता बहिणींचा वापर करून आता सरकारने विश्वासघात केला आहे, अशी घणाघाती टीका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चनाताई बालोडे यांनी केली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील विकसित तालुका असलेल्या संगमनेरमध्ये, जनतेला सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालय नेहमीच अग्रेसर असते. याच भावनेतून यशोधनच्या यंत्रणेने रात्रंदिवस काम करून तालुक्यातील सुमारे ९० हजार महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेरच्या स्थानिक राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे यांनी 2.0 च्या माध्यमातून आगामी काळातील विकासाचे रणशिंग फुंकले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपालिकेच्या नव्या कारभाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अधिकृत प्रक्रियेत नगरसेविका दिपाली पंचारिया यांची संगमनेर नगरपालिका गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.  आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेमध्ये ‘संगमनेर सेवा समिती’ने मोठे यश मिळविले आहे. 30 पैकी तब्बल 27 नगरसेवक सेवा समितीचे निवडून आले आहे. तर महायुतीची केवळ एकमेव महिला विजयी झाले आहे. उर्वरित दोन अपक्ष उमेदवार सेवा समितीचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. म्हाळुंगी नदीवर वेल्हाळे गावठाण ते राजापूर रस्ता ते निमगाव भोजापूर रस्ता, गणपती मळ्याजवळ जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी नाबार्ड ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाच्या कामामुळे घुलेवाडी आणि धांदरफळ गटातील वेल्हाळे, राजापूर, निमगाव भोजापूर, गुंजाळवाडी आणि चिकणी या पंचक्रोशीतील नागरिकांचा प्रवास आता सुखकर होणार आहे.  आमदार खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे या कामासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला…

Read More

श्रीरामपूर –  श्रीरामपूर विभागातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गहाळ झालेले सुमारे ६ लाख रुपये किमतीचे ५२ मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कामगिरी केली असून, जप्त केलेले सर्व मोबाईल आज त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. अहिल्यानगर उत्तर विभागातील १७ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही काळात नागरिकांचे महागडे मोबाईल गहाळ झाले होते. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल होत्या. या तक्रारींचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाने तांत्रिक तपास सुरू केला होता. या तपासामध्ये श्रीरामपूर शहर, राहुरी, अकोले, संगमनेर आणि…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज विविध अवैध धंद्यांनी वेढलेल्या संगमनेरमध्ये आता गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सांगवी गावातील ‘हॉटेल रानवारा’ येथे सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या (IG) पथकाने थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. या धडक कारवाईत १७ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याकडून ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवून झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील पोलीस प्रशासनाचे अक्षरशः ‘पितळ’ उघडे पडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे, त्या आरोपींची नावे अशी, अंकुश मधुकर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून थोरात सहकारी साखर कारखान्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मदिवस ‘प्रेरणा दिन’ म्हणून संपूर्ण संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कारखान्याच्या अतिथीगृहात अर्पण रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत १०१ बाटल्या रक्ताचे संकलन केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, विज्ञानाने आज सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली असली, तरी रक्ताची कृत्रिम निर्मिती करणे अद्याप मानवाला शक्य झालेले…

Read More

श्रीरामपूर –  पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी श्रीरामपुरातील वॉर्ड नं. १, इराणी गल्ली परिसरात आलेल्या पोलीस पथकावर हिंसक जमावाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. जमावाने दगडफेक करत आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला, तसेच एका तरुणाने लोखंडी कोयत्याने पोलिसांवर वार केले. परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी हवेत एक राऊंड गोळीबार केला. या घटनेत एक पोलीस हवालदार गंभीर जखमी झाला असून परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तळेगाव दाभाडे (पुणे) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी आयद बाबूलाल सय्यद (रा. इराणी गल्ली, श्रीरामपूर) हा पोलिसांना हवा होता. त्याचा शोध घेण्यासाठी उपनिरीक्षक मुकेश मोहरे,…

Read More

संगमनेर: प्रतिनिधी मकर संक्रांतीचा सण जवळ येत असतानाच संगमनेर शहरात नायलॉन मांजामुळे अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या चार-पाच गंभीर घटनांमुळे नागरिक संतप्त झाले असून, आता याविरोधात संगमनेर शहर भाजप आक्रमक झाली आहे. बंदी असलेल्या नायलॉन आणि चिनी मांजाची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा कार्यकर्ते स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करतील, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. शहरात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या गळ्याला, कानाजवळ नायलॉन मांजा अडकून गळा, कान कापला जाण्याचे प्रकार घडले आहेत. नायलॉन मांजावर शासनाची बंदी असूनही शहरातील काही दुकानदार छुप्या पद्धतीने याची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. या गंभीर…

Read More