Author: Annant Ppangarkar
मुंबई – राज्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देत, एकत्रित ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने’ अंतर्गत नवीन २,३९९ उपचारांचा समावेश करण्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय, पाच लाखांपेक्षा अधिक खर्च असलेल्या अवयव प्रत्यारोपणासारख्या गंभीर उपचारांसाठी वेगळा ‘कॉर्पस निधी’ (Corpus Fund) निर्माण करण्याचा महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला. आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नियामक परिषदेच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व महिला व…
अहिल्यानगर – जिल्ह्यात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच, धोका असलेल्या भागांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, विखे पाटील यांनी प्रशासनाला पूर्णपणे सतर्क राहण्यास सांगितले आहे. प्रशासनाने पाच आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यातील १९ महसूल मंडळांतील गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये पारनेर (३), पाथर्डी (३), श्रीगोंदा (८) आणि कर्जत (५) या तालुक्यांतील मंडळांचा…
अहिल्यानगर – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक १६ व १७ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ७,६२७ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३,१५५ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून १०३२ क्युसेक, ओझर बंधारा ६१८ क्युसेक, मुळा धरणातून…
नवी दिल्ली – देशभरातील फिजियोथेरेपिस्ट्ससाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, आता त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ (Dr.) ही उपाधी लावता येणार आहे. आरोग्य सेवा महानिदेशालयाने (DGHS) या संदर्भात यापूर्वी काढलेला आदेश मागे घेतला आहे. हा निर्णय फिजियोथेरेपिस्ट्ससाठी एक मोठा विजय मानला जात आहे. यापूर्वी, ९ सप्टेंबर रोजी डीजीएचएसच्या संचालक डॉ. सुनीता शर्मा यांनी एक पत्र जारी केले होते. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट केले होते की, फिजियोथेरेपिस्ट्स त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी वापरू शकत नाहीत. यामागचे कारण देताना त्यांनी म्हटले होते की, यामुळे रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि बोगस डॉक्टरांच्या वाढीला चालना मिळू शकते. ‘डॉक्टर’ ही उपाधी फक्त…
संगमनेर – राज्याचे मुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाच्या सचिवालयाकडून मिळालेल्या मार्गदर्शनानंतर शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या जागेच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटणार असून, शहरातील जुनी आरक्षणे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. तांबे म्हणाले, यामुळे संगमनेर शहरातील इंदिरानगर, वकील कॉलनी, मालदाड रोड, पद्मनगर, अभंग मळा, स्टेडियम परिसर, गुंजाळ आखाडा यांसारख्या भागांतील हजारो कुटुंब आणि वसाहती या निर्णयामुळे कायदेशीर अडचणीतून बाहेर पडतील आणि त्यांना हव्या असलेल्या नागरी सुविधा मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. १९८० च्या शहर विकास आराखड्यानुसार, शहरातील काही भागांत शेतजमिनी होत्या. या जमिनींवर गार्डन, खेळाचे मैदान, शाळा अशा विविध कारणांसाठी आरक्षण टाकण्यात…
संगमनेर – सध्या काही कीर्तनकार राजकीय पक्षांचे जाहीर प्रचारक म्हणून काम करत असले, तरी पूर्वीही राजकीय पक्षांचा छुपा प्रचार अनेकदा झालेला आहे, असं मत ‘रिंगण’ मासिकाचे संपादक सचिन परब यांनी व्यक्त केलं. सकल वारकरी समाजाच्या वतीने संगमनेर येथील विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज येथे राज्यस्तरीय वारकरी चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परब बोलत होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव होते. तर ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, विचारवंत आणि कीर्तनकार डॉ. बालाजी जाधव, भारत महाराज घोगरे गुरुजी, समाधान महाराज देशमुख आणि पत्रकार-कीर्तनकार शामसुंदर महाराज…
संगमनेर – जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. सध्या अहिल्यानगर व धुळे जिल्हा परिषदेने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करून नवीन शाळांमध्ये रुजू होण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जळगाव जिल्हा परिषदेने देखील या संदर्भात कार्यवाही सुरू केली असून पुढील आठवड्यात सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातही लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आमदार तांबे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बदली प्रक्रिया पूर्ण…
मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही घेतलेल्या मेहनतीला यश मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत होईल. वृषभ- आज तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल. आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. मिथुन- आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होऊ शकतात. सामाजिक कार्यात भाग घेतल्यास मान-सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कर्क- कामात काही अडथळे येऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या संयमाने आणि प्रयत्नांनी त्यावर मात कराल. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद…
संगमनेर – महाराष्ट्रातील अनेक सहकारी संस्था वाईट अवस्थेत असताना, संगमनेरमधील सहकार मात्र उत्कर्ष करत आहे. या यशाचे श्रेय राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाला असून थोरात यांनी राजकारणापलीकडे जाऊन लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सहकाराला प्राधान्य दिले. थोरात यांनी यापुढील काळात राज्यातील सहकारी चळवळीला दिशा देण्यासाठी नेतृत्व म्हणून राज्य पातळीवर काम करावे असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तांबे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कारखान्याचे…
पुणे – मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी असलेल्या सातारा शहरात यंदा ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या शतकाच्या उंबरठ्यावरील संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीला महामंडळाच्या घटक संस्थांसह संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष पदासाठी अनेक नावांवर चर्चा झाली. मात्र, विश्वास पाटील यांच्या योगदानाचा आणि मराठी साहित्यासाठी त्यांनी केलेल्या भरीव कामाचा विचार करून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ऐतिहासिक कादंबरी लेखनात त्यांचा हातखंडा मानला जातो. त्यांची ‘पानिपत’ ही कादंबरी मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानली जाते.…
संगमनेर – वारकरी संप्रदायात पांढरे कपडे घालून काही ‘मंबाजी’ घुसले असून, तुकाराम महाराजांना त्रास देणारी ही प्रवृत्ती आजही शिल्लक आहे. अशा ढोंगी लोकांना शोधून संप्रदायाबाहेर काढले पाहिजे, असे परखड मत संगमनेर येथील राज्यस्तरीय वारकरी चिंतन परिषदेत ज्येष्ठ कीर्तनकारांनी व्यक्त केले. यासोबतच, संयोजकांनी कीर्तनकारांसाठी आचारसंहिता तयार करून तिचे पालन करणे अनिवार्य करावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. सकल वारकरी समाजाच्या वतीने संगमनेर येथील विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव होते, तर ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन केले.…
संगमनेर: ज्यांनी काहीच केलं नाही असे लोक सध्या जलदूत व्हायला निघाले आहेत, ‘वांझोटीला पोरं होईल पण निळवंडे होणार नाही’ असं म्हणत हिणवणाऱ्या विरोधकांवर राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला. संगमनेर तालुक्याचा गौरवशाली इतिहास आणि विकासाचा वारसा जपण्याची जबाबदारी नवीन पिढीची आहे, असे सांगताना या तालुक्यातील विकासाचा इतिहास देखील विसरता कामा नये असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी हे परखड मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे माजी अध्यक्ष, साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार…
प्रवीण पुरो नेपाळमध्ये सुरू असलेलं आंदोलन नक्की कशासाठी, याचा उलगडा करण्याची तयारी भारतीय माध्यमांची नाही. त्यांना वाटतं हा केवळ सोशल मिडियावरील बंदीचा मामला आहे. या आंदोलनाची डोळसपणे चिकित्सा केली तर एक लक्षात येईल, की आमचे सत्ताधारी शहाणे झाले नाही तर हे आंदोलन भारताची जागा घेऊ शकतं. भारतीय माध्यमं हे सत्ताधार्यांना सांगायच्या भानगडीत पडत नाहीत. यामुळे धृतराष्ट्राचं आंधळंपण सत्तेच्या डोळ्यावर आलं आहे. आपणच सत्यवान असल्याचा त्यांना भास झालाय. नेपाळच्या सत्तेलाही असंच वाटत होतं. नेपाळमध्ये सुरू असलेल्या धुमश्चक्रीला भ्रष्टाचारात माखलेली तिथली एकूणच व्यवस्था कारण आहे. या व्यवस्थेने डोळे उघडे ठेवून कारभार केला असता, भ्रष्ट मंत्र्यांना ताळ्यावर आणलं असतं तर उद्रेकाची ही वेळ…
मेष: आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबातील सदस्यांसोबत वाद टाळा. कामाच्या ठिकाणी नवीन योजनांवर लक्ष केंद्रित करू शकता. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी फायद्याचा आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल. कामात नवीन सहयोगी मिळतील, ज्यामुळे तुमची अनेक कामे सोपी होतील. मिथुन: आजचा दिवस थोडा कष्टदायक असू शकतो, त्यामुळे प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. कुटुंबीय आणि मुलांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. कर्क: आज तुमच्या कल्पनाशक्तीत आणि कलात्मकतेत काहीशी कमतरता जाणवेल. त्यामुळे निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकतात. सिंह: थोड्या अडचणी असूनही तुमचे प्रेमजीवन चांगले राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यात यशस्वी व्हाल. कन्या: नवीन कल्पना फलदायी ठरतील. तुमच्या आत्मविश्वासाचा उपयोग करून नवीन लोकांशी संपर्क…
संगमनेर – संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे सध्याच्या परिस्थितीत खराखोटा निवाडा करण्यासाठी वारकरी संत विचारावर चिंतन होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर भागवत वारकरी चिंतन परिषदेचे संगमनेरमध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. रविवारी (१४ सप्टेंबर) सकाळी १० वाजता रंगारगल्लीतील विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाजाच्या जनसखा समाज भवनामध्ये आयोजित या चिंतन परिषदेचे उद्घाटन जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी पंढरपूरच्या संत कैकाडी महाराजांचे उत्तर अधिकारी ह. भ. प. भारत जाधव महाराज असतील. सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी ११ वाजता वारकरी संप्रदाय काल आज आणि उद्या या विषयावर…
संगमनेर – संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी राज्यात एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेली बाजार समितीची ही संकल्पना संगमनेरमध्ये यशस्वीरित्या राबवली गेली, यामुळे ती जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणि राज्यातही सर्वात पुढे असल्याचे प्रतिपादन काँग्रेसची ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते बाजार समितीच्या 21 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. या सभेला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, पांडुरंग घुले आदी मान्यवर उपस्थित होते. थोरात म्हणाले, बाजार समितीने शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा पुरवल्या आहेत. वडगाव पान, साकुर, आंबी…
संगमनेर – पैगंबर मोहम्मद यांच्या १५०० व्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून संगमनेर शहरात ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ निमित्त ‘सर्वधर्म समभाव’ जपणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा विशेष सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन, सर्वांसाठी मानवाधिकार आणि ‘न्यूज एनएमपी मराठी’ वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार समाजात चांगले कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांच्या योगदानाबद्दल ‘सन्मानचिन्ह’ आणि ‘कृतज्ञता सन्मानपत्र’ देऊन गौरवण्यात आले. यात एनआरसीसी ग्रुप मंत्री फाउंडेशन, एकता नगर सोशल फाउंडेशन, ह्युमन रिलिफ अल्पसंख्याक फाउंडेशन, मोगलपुरा मस्जिद ट्रस्ट, गवंडीपुरा मस्जिद ट्रस्ट याचबरोबर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नारायणे (शिवकला पोहे सेंटर) आणि एस.डी.पी.आय…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जमीन विक्रीमध्ये २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोनेवाडी येथील पोलिस पाटील दगू मोहन गुडघे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेशन दुकानदार किरण सीताराम डांगे (वय ४२, रा. जोशीनगर, कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात ही फिर्याद दाखल केली आहे. पोलिस पाटलाने आधीच तीन वेगवेगळ्या व्यक्तींना विकलेली ५० गुंठे जमीन पुन्हा डांगे यांना विकण्याचा प्रयत्न केला. या व्यवहारात त्याने डांगे यांच्याकडून १५ लाख रुपये धनादेशाद्वारे आणि ५ लाख रुपये रोख असे एकूण २० लाख रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे जमिनीचा ताबा न दिल्याने आणि खरेदीची कागदपत्रे न मिळाल्याने डांगे यांना संशय आला. त्यांनी…
मेष (Aries) – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुमच्या कामात यश मिळेल आणि तुमची ऊर्जा वाढलेली असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. वृषभ (Taurus) – आज तुम्हाला संयम ठेवणे गरजेचे आहे. कामात काही अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही शांत राहून त्या सोडवू शकता. पैशांची गुंतवणूक करताना काळजी घ्या. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मिथुन (Gemini) – तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने तुम्हाला आनंद होईल. आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा. कर्क (Cancer) – आज तुम्ही भावनिकदृष्ट्या थोडे अस्थिर वाटू शकता. कामाच्या ठिकाणी काही समस्या…
दूध संघाकडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचेही संकेत संगमनेर – संगमनेर तालुक्याचा विकास शेतकरी व सहकाराच्या भक्कम पायावर उभा असून शेतकरी, उत्पादक हाच तालुक्याच्या विकासाचा पाया आहे. येथील सहकारामुळे आपली बाजारपेठ समृद्ध झाली असून, ती टिकवण्यासाठी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना थोरात यांनी, तालुक्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून तालुक्यात खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत आणि लोकांना रोज अटकपूर्व जामीन घ्यावा लागत आहे. निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले, पण आता…
