Author: Annant Ppangarkar
संगमनेर – ऐतिहासिक जैन मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांच्या कथित धोक्याविरोधात राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्र या काँग्रेस समर्थक संघटनेने स्तुत्य निर्णय घेतला आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज, मंगळवारी (२८ ऑक्टोंबर) संगमनेरच्या तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर करून या पवित्र आणि वारसा स्थळांच्या तात्काळ संरक्षणाची मागणी केली आहे. यासाठी आवश्यक ती प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याची विनंती त्यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. धार्मिक स्थळांच्या संरक्षणाची मागणी थेट राजकीय पक्षाच्या समर्थक संघटनेने आक्रमकपणे केल्यामुळे, आता संगमनेर प्रशासन यावर कोणती तातडीची भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जैन मंदिर हे केवळ एक पूजास्थान नसून ते जैन समाजाच्या…
मेष (Aries) – आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा चांगली राहील, ज्यामुळे तुम्ही घेतलेले काही निर्णय आश्चर्यकारक आणि फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि व्यापारी वर्गाला मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे पुढे सरकतील. आर्थिक बाजूस काही पैसे अडकलेले असल्यास ते मिळण्याची शक्यता आहे, परंतु खर्चावर संतुलन ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबाचे उत्कृष्ट सहकार्य मिळेल. अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवणे टाळा आणि आळस करू नका. वृषभ (Taurus) – आज दिवसाच्या पहिल्या भागात आपली महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण ग्रहमान अनुकूल आहे. करिअरशी संबंधित कामे मार्गी लागतील आणि प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यावर भर द्याल. गुंतवणुकीचा…
संगमनेर – ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार वाई (सातारा) येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत कोंडीराम लक्ष्मण आवळे मास्तर यांना जाहीर झाला आहे. आमदार अमोल खताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुरस्काराचे वितरण २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये होणार आहे. या सोहळ्याला उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अध्यक्षस्थानी असतील. आ. खताळ यांनी सांगितले की, कवी अनंत फंदी, स्व. पवळा भालेराव, स्व. गुलाबबाई संगमनेरकर, लोकशाहीर विठ्ठल उमप आणि स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने दरवर्षी राज्यातील कलावंतांना सन्मानित करण्याचा…
संगमनेर – गाईंची दूध उत्पादकता अधिक वाढवणे गरजेचे असून खाजगी संस्था नफा कमवण्यासाठी कार्यरत असतात, तर सहकार हे सर्वसामान्यांच्या समृद्धीचे व्रत आहे, असे सांगत काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकारी चळवळीचे महत्त्व स्पष्ट केले. संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्यावतीने आयोजित प्राथमिक संस्था बळकटीकरण व सहकारातून समृद्धी या कार्यशाळेत थोरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन रणजीतसिंह देशमुख होते. बाळासाहेब थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दूध व्यवसायामुळे तालुक्याच्या समृद्धीमध्ये मोठी वाढ झाली. सहकारामुळे खाजगी संघांवर वचक राहतो, कारण खाजगी संस्थांचा उद्देश केवळ नफेखोरी असतो आणि त्यांच्या उत्पादनांमध्ये गुणवत्ता किंवा चांगला भाव…
संगमनेर – संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी सर्व १५ प्रभागांतील मतदार यादीवर घेतलेल्या हरकतींवर मंगळवारी (दि. २८) प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली. विशेष म्हणजे, या सुनावणीसाठी एक हजार नागरिकांना नोटीस बजावूनही केवळ १०० नागरिकच उपस्थित होते. आता अंतिम मतदार यादी शुक्रवारी (दि. ३१) प्रसिद्ध होणार आहे. संगमनेर नगरपालिकेने मतदार यादी प्रसिद्ध करताच अनेक नागरिकांनी यावर हरकती घेतल्या होत्या. दुसऱ्या प्रभागात नावे, एकाच कुटुंबातील नावे वेगळ्या प्रभागात तर अनेकांनी स्वतः दुसऱ्या प्रभागात नावे समाविष्ट केल्याने यावर इच्छुक नगरसेवक आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हरकती घेतल्या होत्या. स्वतः मतदारांनी आणि इच्छुक नगरसेवकांनी मिळून एकूण १७३० हरकती घेतल्या होत्या. या हरकती ‘अ’ (मतदारांनी स्वतः…
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील विविध गावांसह तीर्थस्थळांच्या पर्यटन विकासासाठी व सुशोभीकरणासाठी मिळालेला मोठा निधी हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्याचे फलित आहे, असे स्पष्ट मत युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सांगळे यांनी व्यक्त केले आहे. प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाचा निधी सातत्याने तालुक्याला मिळाला आहे. मागील वर्षी ऑक्टोबर 2024 पूर्वी आमदार सत्यजित तांबे यांनी विविध गावांकरता निधीची मागणी केली होती. उदाहरणार्थ, देवकौठे येथील जगदंबा माता परिसर सुशोभीकरण व घाट यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी आमदार तांबे यांनी 8 ऑगस्ट 2024 रोजी तत्कालीन पर्यटन मंत्री गिरीश महाजन…
संगमनेर – फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या कथित हत्या प्रकरणातील दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पोलीस अधिकारी आणि राजकीय व्यक्तींकडून होणारा दबाव व महिलांवरील अत्याचाराविरोधात प्रशासकीय सुधारणा करावी, अशा मागण्यांचे निवेदन ‘राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्र’ यांच्यावतीने काल (मंगळवार २८ ऑक्टोंबर) संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना देण्यात आले. डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्यावर बलात्कार केल्याचा, तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. महिलांविरोधातील गुन्हे रोखण्याची आणि महिलांना कायदेशीर संरक्षण देण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांवरच…
संगमनेर – शांत, सुसंस्कृत आणि वैभवशाली ओळख असलेल्या संगमनेर शहरात मागील एका वर्षापासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आणि अस्वस्थता वाढली आहे. त्यातच, दादागिरी, दहशत आणि अमली पदार्थांची तस्करी या गंभीर विषयांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. राज्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि यांनी या परिस्थितीबद्दल यापूर्वीच तीव्र चिंता व्यक्त केली होती, आणि आता अमली पदार्थांच्या तस्करीवर मोठी कारवाई झाल्याने त्यांची चिंता खरी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना लोकनेते थोरात यांनी संगमनेर तालुक्याला परिवार म्हणून जपल्याचे आणि सातत्याने विकास योजना राबवल्याचे सांगितले होते. शिक्षण, सहकार, ग्रामीण विकास आणि शेतीमधून तालुक्याला फुलवले. मात्र, सध्या…
मेष: आज तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे आणि दैनंदिन कामे मार्गी लागतील. नोकरीत बढती मिळेल तसेच व्यापार-व्यवसायात लाभ होईल. घर, कुटुंब आणि संतती संबंधी आनंद व संतोषाची भावना राहील. कामाच्या व्यापामुळे थोडा थकवा जाणवेल. वृषभ: आज एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काही लोक धार्मिक कार्यात सहभागी होतील. व्यापार्यांसाठी दिवस शुभ आहे आणि नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ होतील. दूरच्या प्रवासाची शक्यता आहे, पण कामाचा व्याप थकवा आणू शकतो. मिथुन: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आणि काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल, त्यामुळे जास्त ताण घेणे टाळा. करिअर-व्यवसायाच्या संधींमध्ये वाढ होईल आणि व्यवस्थापन सुधारेल. नवीन कामे करण्यापूर्वी संपूर्ण योजनेचा आढावा घ्या. कर्क: भागीदारी व्यवसायात…
संगमनेर – महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने संगमनेर तालुक्यातील विविध देवस्थाने व धार्मिक पर्यटन स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी एकूण २ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असून, यामुळे ग्रामीण व आध्यात्मिक पर्यटनाला नवी ऊर्जा मिळणार असल्याची माहिती खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या निधीतून देवकौठे येथील जगदंबा माता मंदिरासाठी ५० लाख, तर तळेगाव, गुंजाळवाडी, सोनोशी, काकडवाडी, संगमनेर बु. (खंडोबा मंदिर), लोहारे, निमज, आणि धांदरफळ खुर्द येथील धार्मिक स्थळांसाठी उर्वरित निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत परिसरातील सुविधा उभारणी, पायाभूत रचना सुदृढ करणे, स्वच्छता व्यवस्था, व प्रवेशमार्ग…
अहिल्यानगर – येथील सराफ बाजारातून तब्बल दोन किलोपेक्षा अधिक सोन्याचे दागिने आणि चोख सोने घेऊन सहा कारागीर बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चोरी गेलेल्या सोन्याची किंमत सुमारे १ कोटी १ लाख ५ हजार रुपये इतकी आहे. सोनार कृष्णा जगदीश देडगावकर (वय ३२) यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून दिपनकर माजी, सोमीन बेरा ऊर्फ कार्तिक, सोमनाथ सामंता, आन्मेश दुलोई, सत्तु बेरा, आणि स्नेहा बेरा या सहा संशयित कारागीरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (२६ ऑक्टोबर) सायंकाळी देडगावकर यांच्या दुकानात काम करणारा कारागीर दिपनकर माजी जागेवर नसल्याचे आढळले. तो लवकरच येतो असे म्हणाला, पण बराच…
संगमनेर – राज्यातील सहकार क्षेत्रासाठी नेहमीच दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी (३० ऑक्टोबर) सकाळी ९.०० वाजता होणार आहे. कारखान्याचे चेअरमन, लोकनेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि कांचनताई थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडेल, अशी माहिती व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे, आणि डॉ. जयश्री थोरात हे देखील उपस्थित राहणार आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना केवळ सभासदच नव्हे, तर कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचाही मोठा विश्वास संपादन करत आहे. व्हा. चेअरमन पांडुरंग…
संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्याच्या वाढत्या गुन्हेगारी आणि ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत आमदार सत्यजीत तांबे यांनी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना एक सविस्तर पत्र लिहिले असून यात त्यांनी ‘अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणून प्रतिष्ठा प्रस्थापित करण्याची मागणी केली आहे. अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना आमदार तांबे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नुकतेच जिल्ह्याला देण्यात आले आहे. अहिल्यादेवींचे उत्तम प्रशासनाचे कार्य देशाला दिशादर्शक ठरले आहे, परंतु त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात आता गुंडगिरी, महिलांवरील अत्याचार, चोऱ्या, दरोडे, अवैध धंदे आणि अमली पदार्थांची तस्करी वाढल्याने सामान्य नागरिक अस्वस्थ झाले आहेत. ड्रग्सचा वाढता…
संगमनेर – संगमनेर शहरातील अवैध धंद्यांमध्ये आता थेट नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची ‘ड्रग्स’ अर्थात अमली पदार्थांची भर पडल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत चर्चा सुरू असलेल्या या व्यवसायासंदर्भात आता पोलीस कारवाईमुळे शिक्कामोर्तब झाले आहे. शहरातील एका नामांकित चौकातील ‘सप्लिमेंट शॉप’मध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय तरुणाईला नशेसाठी लागणारे ड्रग्स (इंजेक्शन) विनापरवाना विकले जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. संगमनेरमधील तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मोठा राजकीय हस्तक्षेप झाला, त्यामुळे साडेतीन वाजता घडलेल्या या घटनेत तब्बल सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर रात्री उशिरा सव्वानऊ वाजता गुन्ह्याची नोंद झाली. संगमनेर…
संगमनेर – संगमनेर शहर पोलिसांच्या नाकासमोर सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने मंगळवारी पहाटेच्या वेळी छापेमारी केली आहे. शहरातील मदिना नगरमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत तीन लाख रुपये किमतीचे तब्बल दीड हजार किलो गोमांस पोलिसांनी हस्तगत केले आहे. संगमनेर मधील कत्तलखाने बंद असल्याचे भासविले जात असले तरी ते सुरूच आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना मंगळवारी पहाटे ०३.१० वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की, संगमनेर शहरातील मदिनानगर या ठिकाणी सालीम साटम कुरेशी आणि गुलाम फरीद साबिर कुरेशी (दोघे रा. बुध्दविहार शेजारी, संगमनेर) हे पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश कत्तल करत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे, उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांनी आपल्या पथकातील…
संगमनेर – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांची सखोल पडताळणी (Systematic Inspection of Rolls – SIR) मोहीम राबवावी, या मागणीसाठी ‘राहुल गांधी समर्थक संघ’ आक्रमक झाला आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (मंगळवारी 28 ऑक्टोबर) संगमनेरच्या तहसीलदारांना याबाबत लेखी निवेदन देऊन तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी वारंवार विविध माध्यमांतून समोर आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी या याद्यांची SIR द्वारे सखोल पडताळणी होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यव्यापी संघटनेने निवेदनात केरळ राज्याच्या परिस्थितीचा दाखला दिला आहे. पुढच्या महिन्यात केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, तेथे सध्या मतदार याद्यांची सखोल पडताळणी…
मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा असेल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीचा वाद कोर्टात असल्यास विजय मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अनुभवाचा फायदा होईल. कोणत्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि वादग्रस्त परिस्थितीत शांत राहा. वृषभ (Taurus): आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही कामावर लक्ष केंद्रित कराल. व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी मोठा निर्णय घेऊ शकता. मोठे निर्णय घेण्यासाठी हा दिवस चांगला आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. मिथुन (Gemini): व्यवसाय करणाऱ्यांनी आज संधींचा फायदा घ्यावा. घरात धार्मिक यात्रेशी संबंधित योजना आखली जाऊ शकते. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवल्याने आराम आणि आनंद मिळेल. खर्चात वाढ झाल्यामुळे थोडा तणाव…
संगमनेर – आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेरमधील कष्टकरी आणि बेघर कुटुंबांना आता स्वतःचे हक्काचे घर मिळण्याच्या प्रशासकीय कामांना मोठा वेग आला आहे. आज (सोमवारी, २७ ऑक्टोबर) आमदार तांबे यांनी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन या गृहनिर्माण प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. बेघरांना त्वरित घर देण्यासाठी शासकीय पातळीवर तातडीने कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती या बैठकीत मिळाली आहे. बैठकीसाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, संगमनेर नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार यांच्यासह महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन साळुंखे आणि मोठ्या संख्येने गरजू महिला उपस्थित होत्या. प्रशासकीय पातळीवर सर्व संबंधित प्रलंबित कामांची माहिती…
संगमनेर: एकेकाळी ‘सुरक्षित, सुसंस्कृत आणि वैभवशाली’ अशी ओळख असलेल्या संगमनेर शहरात सध्या प्रशासकीय पातळीवर वाढलेली अस्वच्छता, अनियमित पाणी-वीज पुरवठा, अवैध फ्लेक्सबाजी आणि मोकाट जनावरांच्या त्रासाला नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत. या गंभीर समस्यांकडे नगर परिषदेचे होत असलेले दुर्लक्ष पाहून संगमनेरकरांनी आज सोमवारी नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढून ‘हल्लाबोल’ केला. येत्या आठ दिवसांत या समस्यांवर प्रभावी उपाययोजना न झाल्यास शहरवासीय भव्य ‘चक्का जाम’ आंदोलन करतील, असा आक्रमक इशारा आंदोलकांनी दिला आहे. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सोमेश्वर दिवटे, गजेंद्र अभंग, शैलेश कलंत्री, डॉ. दानिश रईस खान, शुभम परदेशी, बादल जेधे, सिद्राम दिड्डी, निखिल पापडेजा, हैदरअली सय्यद, संदीप लोहे, बाजीराव शेरमाळे, नाना वाघ, सतीश…
संगमनेर – निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले; मात्र याचे श्रेय दुसरेच घेत आहेत. भोजापूर चारी कामासाठी पाठपुरावा करून या भागातील गावांकरिता सुरू केलेल्या उपसा जलसिंचन योजना विद्यमान सत्ताधाऱ्यांनी रद्द केल्या असून, या योजनांवरील स्थगिती तातडीने उठवून पाणी द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा जगाला मानवतेचा संदेश देणारा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. काकडवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरण व सेवा सोसायटीच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. व्यासपीठावर बी. आर. चकोर, शिवसेनेचे अमर कतारी, संपतराव गोडगे, सुभाष…
