Author: Annant Ppangarkar
मुख्यमंत्र्यांसह सर्वांशी चांगले संबंध, त्यामुळे कोणतीही विकासकामे थांबणार नाहीत: आमदार सत्यजित तांबे महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: भारताची खरी ओळख एकता आणि विविधतेमध्ये आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात, आणि तिरंगा ध्वज, देश, आणि संविधान हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी भगवा, हिरवा किंवा निळा ध्वज घेऊन समाजात जातीभेद निर्माण करत आहेत. अशा शक्तींना रोखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. राजकारण हे नेहमीच तत्त्व आणि विकासावर आधारित असावे, असेही ते म्हणाले. आज (रविवारी) संगमनेर खुर्द येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर देवस्थान, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, लोकशाहीर…
सत्ताधारी केवळ मोदी आणि शहा यांचीच लाळ घोटत होते. तथापि हल्ल्याची जबाबदारी ही सर्वार्थाने मोदी-शहा यांच्यावरच असल्याने या दोघांना मर्यादा पडल्या होत्या. त्यात दिल्लीत संसदेचं अधिवेशन असताना पंतप्रधान देश सोडून जातो, आणि संसदभवनात असताना सभागृहात अनुपस्थित राहतो हे मोदींनीच देशाला दाखवून दिलंय. पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत पार पडत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाने सरकारची कधी नव्हे इतकी बेईज्जत झाली. इभ्रत जावी अशा प्रकारे हल्ल्यावर हल्ले सोसण्याची आफत सरकारवर आली. गेल्या 11 वर्षात मोदी सरकारची संसदेत इतकी फजिती प्रथमच झाली. मोदी.. मोदी…च्या घोषणा देणारे मौनी बनले होते. विरोधकांच्या भाषणात अडथळे आणणार्यांना आता कळून चुकलं होतं. या चर्चेत सत्तेपुढे विरोधकच सरस ठरले. नको…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, पुणे: हडपसर परिसरात मित्राच्या खुनाची खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीदरम्यान, त्यानेच रागाच्या भरात आपल्या मित्राचा खून केल्याची कबुली दिली. आज पहाटे किसन राजमंगल सहा (वय २०, मूळचा बिहार) याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की, त्याच्या मित्राला, रविकुमार शिवशंकर यादव (वय ३३), तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. हडपसर येथील उंड्री-हांडेवाडी भागात ही घटना घडली असून, रविकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. या माहितीनंतर तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी रविकुमारला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेची माहिती देणाऱ्या किसनकडे अधिक चौकशी केली. सुरुवातीला त्याने…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: जे लोक स्वतः काहीही काम करत नाहीत, तेच चांगल्या कामांना विरोध करून जनतेची दिशाभूल करत आहेत, त्यांनी किती झाडे लावली अशी टीका करत सोशल मीडियाचा वापर करून इतरांबद्दल खोट्या गोष्टी पसरवून स्वतःची स्तुती केली जात आहे. देशभर काही पक्षांकडून असाच कार्यक्रम राबवला जात असल्याचे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. मालदाड (संगमनेर) मायंबा डोंगर येथील श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिर परिसरात जयहिंद लोकचळवळ आणि अमृत उद्योग समूहातर्फे आयोजित २० व्या ‘दंडकारण्य अभियाना’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सरपंच गोरख नवले, अजय फटांगरे, रामहरी कातोरे,…
मुंबई, विशेष प्रतिनिधी: मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या अभय योजनेच्या अंमलबजावणीत निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणींबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शुक्रवारी घेतलेल्या या भेटीत त्यांनी योजनेचा लाभ राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना वेळेत मिळत नसल्याचे त्यांनी शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले आणि प्रणालीतील तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर करण्याची मागणी केली. योजनेच्या अंमलबजावणीत नेमके काय अडथळे? राज्य सरकारने 50% शास्ती माफीसाठी अनेक नगरपरिषदांना परवानगी दिली आहे. संगमनेर नगरपरिषदेला 28 जुलै 2025 रोजी परवानगी मिळाल्यानंतरही IWBP सॉफ्टवेअर प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे ही योजना प्रभावीपणे लागू करता येत नाहीये. या अडचणींमुळे नागरिकांमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील निमोण येथील भूमिपुत्र आणि सध्या येवला येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप पुंजा मंडलिक यांना त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी तिसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्या हस्ते त्यांना हे प्रतिष्ठित पदक प्रदान करण्यात आले. पोलीस निरीक्षक मंडलिक यांनी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. २०१३ ते २०२४ या काळात ते गडचिरोली येथे कार्यरत असताना, त्यांनी खोब्रामेंढा गावाजवळच्या घनदाट जंगलात झालेल्या एका मोठ्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भंडारदरा धरणाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे मुख्य सचिव, तसेच जलसंपदा आणि वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीचा मुख्य उद्देश शताब्दी महोत्सवाचे नियोजन करणे, धरणाच्या संवर्धनासाठी उपाययोजना सुचवणे, आणि परिसरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधणे हा आहे. भंडारदरा धरण, ज्याला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय असेही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त नाशिक: नाशिकमधील एसएमबीटी हॉस्पिटलने आयोजित केलेल्या ‘आरोग्यसाधना’ शिबिराचा नुकताच यशस्वी समारोप झाला आहे. गेल्या १० वर्षांपासून ग्रामीण भागातील लोकांसाठी हे शिबिर आयोजित केले जाते. यावर्षीच्या शिबिराने अनेक विक्रम मोडत यशाची नवीन उंची गाठली आहे. शिबिराची लक्षवेधी आकडेवारी गेल्या ३० दिवसांच्या कालावधीत, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्यातील १४ जिल्ह्यांतील ३० हजारांहून अधिक रुग्णांना या शिबिराचा लाभ झाला आहे. दररोज सरासरी १००० रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे फक्त आकडे नाहीत, तर हजारो रुग्णांना मिळालेल्या उपचारांचे आणि आशेचे हे प्रतीक आहे, असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. अत्याधुनिक उपचार आणि सेवा या शिबिरात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना (MJPJAY), प्रधानमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त पुणे: पुणे शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी ‘कोकेन’ म्हणून जप्त केलेला पदार्थ प्रत्यक्षात कोकेन नव्हता. या दाव्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेमकं प्रकरण काय? 27 जुलै रोजी पहाटे खराडी येथील ‘स्टे बर्ड अझुर सूट’ हॉटेलमध्ये पुणे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 5 पुरुष आणि 2 महिलांना अटक केली. अटकेत असलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, अहिल्यानगर: अहिल्यानगर तालुका पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ८८ लाख २० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये बनावट नोटा, त्यांना तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशिनरी आणि एक वाहन यांचा समावेश आहे. या प्रकरणी अहिल्यानगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते आपल्या पथकासह हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना आंबिलवाडी शिवारात दोन संशयित व्यक्ती काळ्या रंगाच्या महिंद्रा थार गाडीतून फिरत असून, ते पान टपरीवर ५०० रुपयांच्या बनावट नोटा देऊन सिगारेट…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्याची जोरदार मागणी केली. तसेच, राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करत सर्वांनी एकत्रित येऊन याविरोधात आवाज उठवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त संगमनेर बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात थोरात बोलत होते. यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनाही अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या संतांना आणि समाजसुधारकांना त्रास देणारी धर्मांध शक्ती आजही समाजात कार्यरत आहे. याच शक्तींनी महात्मा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, शिर्डी: महसूल विभागाने अधिक संवेदनशीलतेने काम करत सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. राहाता येथे ‘महसूल सप्ताह – २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, तहसीलदार अमोल मोरे, राहाता नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी त्यांच्या महसूल मंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही उपक्रमांची आठवण करून दिली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. या योजनेचा लाभ सरकारी सेवानिवृत्त महिलांसह हजारो पुरुषांनी घेतल्याचं उघड झालं आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेत सुमारे ४ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावरून विरोधक सरकारवर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेवर सविस्तर चर्चा झाली. ज्या पुरुषांनी योजनेचा चुकीचा फायदा घेतला आहे, त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून पैसे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, जळगाव: एका महिला तलाठ्याला 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील जुन्या नोंदी कमी करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही कारवाई केली असून, या प्रकरणी तलाठ्यासह एका रोजगार सेवक आणि एका मध्यस्थालाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या सात भावंडांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर काही जुन्या नोंदी होत्या. त्या कमी करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी अर्ज केला होता. तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहिम हिने अर्ज स्वीकारला, मात्र पोचपावती दिली नाही. नंतर पाठपुरावा केला असता, तिने कामासाठी 25 हजार रुपयांची मागणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: चारित्र्याच्या संशयातून एका 65 वर्षीय पतीने आपल्या 60 वर्षीय पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव चंद्रकला दगडू खंदारे (वय 60) असून, आरोपी पती दगडू लक्ष्मण खंदारे (वय 65) याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली. घारगाव येथे राहणारे दगडू खंदारे हे शेती व्यवसाय करतात. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या कुटुंबाने नेहमीप्रमाणे एकत्र जेवण केले. जेवणाच्या वेळी दगडू खंदारे यांनी पत्नी चंद्रकला यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्यासोबत वाद घातला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: भोजापूर चारीचे पाणी वडझरी गावातील बंधारे भरण्यासाठी न सोडल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी येत्या ३ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षासह ग्रामस्थांनी यासंदर्भात पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले असून, ग्रामपंचायतीनेही याबाबत ठराव केला आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, वडझरी गावातील शेतकरी गेल्या ४० वर्षांपासून निळवंडे व भोजापूरच्या पाण्यापासून वंचित आहेत. भोजापूर चारीचे पाणी नियमानुसार टेलपासून म्हणजे वडझरी गावातील बंधारे भरण्यासाठी अपेक्षित असताना, जलसंपदा विभागाची यंत्रणा काही विशिष्ट लोकांच्या दबावाखाली चुकीचे काम करत आहे. हे पाणी आडमार्गे इतरत्र वळवले जात असल्याचा आरोप…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानाचा १९ वा शुभारंभ शनिवारी, (२ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता मालदाड येथील कानिफनाथ मंदिर डोंगर येथे होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली २००६ पासून अमृत उद्योग समूह आणि विविध सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे पर्यावरण संवर्धनाचे दंडकारण्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: कर्जदाराकडून कोरा धनादेश घेऊन तो कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा करून धनादेशाचा अवमान झाला या कारणासाठी न्यायालयात कर्जदार महिलेविरुद्ध वसुली दावा दाखल करणाऱ्या संस्थेला संगमनेर न्यायालयाने दिलासा न देता कर्जदार महिलेची आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. शारदा बाळू जगधने यांनी सन 2019 मध्ये मुंबईस्थित सर्वग्राम फिनकेअर प्रा. ली. या कंपनीच्या संगमनेरमधील कार्यालयाकडून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची थकबाकी 2,35,241/- रुपये झाली होती. हे कर्ज फेडण्यासाठी आरोपी कर्जदार महिलेने संस्थेला सदरचा धनादेश दिल्याचे तसेच या खटल्यासाठी संबंधित कंपनीने व्यवस्थापकाला प्राधिकार पत्र दिल्याचे सांगत न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: राज्यातील २०११ पर्यंतची सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे सुमारे ३० लाख अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा मिळेल. या विशेष मोहिमेअंतर्गत ५०० चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणे विनामूल्य नियमित केली जातील, तर उर्वरित अतिक्रमणांवर बाजारमूल्यानुसार दंड आकारून ती नियमित केली जातील. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी ही घोषणा केली. पंतप्रधान आवास योजनेला गती आणि मालकी हक्काचे स्वप्न पूर्ण- या निर्णयामागे पंतप्रधान आवास योजनेतील ३० लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मुख्य हेतू आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी घराची मालकी असणे बंधनकारक आहे. अतिक्रमणे नियमित झाल्याने संबंधित व्यक्तींच्या नावावर जमीन होईल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील इंजिनिअरिंग कॉलेज गेटसमोरील हॉटेल स्टेटसजवळील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ३८ कोटी रुपये निधीतून साकारत असलेला हा उड्डाणपूल परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून अपघातांना आळा घालणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. माझे घर सोसायटी परिसरातील नागरिकांसाठी हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या ठिकाणी होणारे अपघात लक्षात घेता, थोरात यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रकल्पासाठी निधी मिळवला होता. सुरुवातीला एका बाजूचे काम पूर्ण झाले असले, तरी दुसऱ्या बाजूचे काम काही…
