Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त – पुणे: दारूचे व्यसन सोडण्यास नकार देणाऱ्या पतीसोबत नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील लोहगाव परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी पती प्रेम जाधव (वय २७) याला अटक करण्यात आली आहे. ममता जाधव (वय २१) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी रेश्मा राठोड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ममता जाधव आणि आरोपी प्रेम जाधव यांचा विवाह २०२० मध्ये झाला होता. प्रेम जाधव याला दारूचे व्यसन होते. ममता वारंवार दारू सोडण्याची विनंती करत होती, परंतु प्रेम दारू सोडत नव्हता. याच…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त राहुरी: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन शेतकरी भवन व उपहारगृहाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार काशीनाथ दाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या नफ्यात व काटकसरीने चालवण्यावर भर दिला. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे उत्पादन वाढवण्याचे, फळबाग…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला मोठा धक्का बसला आहे. तब्बल २ कोटी ५२ लाख लाभार्थ्यांपैकी २६ लाख ३४ हजार लाभार्थी विविध कारणांमुळे अपात्र ठरले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या योजनेचा लाभ १४ हजार २९८ पुरुषांनीही घेतल्याचे उघड झाले आहे. या अपात्र लाभार्थ्यांमुळे गेल्या वर्षभरात राज्याचे सुमारे ४ हजार ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी (२७ जुलै) समाजमाध्यमांवर स्वतः अपात्र लाभार्थ्यांची आकडेवारी जाहीर केली. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर या योजनेतील अर्जांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात…
संगमनेर, प्रतिनिधी: शांतता, समृद्धी आणि सुसंस्कृतपणाचे प्रतीक असलेल्या संगमनेर तालुक्यात गेल्या आठ महिन्यांपासून अशांततेचे आणि तेढ निर्माण करणाऱ्या घटनांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप होत आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा शुभेच्छा फलक फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, समाजात अशांतता पसरवणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. वडगाव पान येथील टोलनाक्याजवळ असलेल्या महादेव मंदिरापाशी श्रावण मासानिमित्त बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या शुभेच्छांचा फ्लेक्स लावण्यात आला होता. मात्र, श्रावणाच्या दुसऱ्याच दिवशी काही समाजकंटकांनी या फ्लेक्सची छेडछाड केल्याचा प्रकार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त पुणे: पुणे शहरानजीकच्या खराडी भागात सुरू असलेल्या एका हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत तिचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. डॉ. खेवलकर हे राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती असल्याने या अटकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ‘हाऊस पार्टी’च्या नावाखाली सुरू असलेल्या या पार्टीवर गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केला आहे. या प्रकरणी दोन महिला आणि पाच पुरुष अशा एकूण सात जणांना अटक करण्यात आली…
हिंदी सक्तीच्या मुद्यावर सातत्याने पळ काढणार्या राज्यातल्या युती सरकारच्या मौनी भूमिकेचा परप्रांतीय कसा फायदा घेतात हे सातत्याने समोर येत असताना महाराष्ट्राविषयी आग ओकणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाडूकला खासदार निशिकांत दुबे याला भर संसदेच्या लॉबीत खडेबोल सुनावणार्या काँग्रेस पक्षाच्या महिला खासदार रणरागिणींचं करावं तितकं कौतुक कमीच. या खासदारांनी महाराष्ट्राची मान ताठ केलीच नाही तर तमाम मराठी माणसाला त्याच्या स्वत्वाचीही जाणीव करून दिली. इनमीन तीन महिला खासदारांच्या या अवतारामुळे सत्तेचा माज चढलेल्या निशिकांतला या महिलांच्या गराड्यातून पाय काढता घेणंही अवघड झालं आणि ‘आप हमारी बहेन है’, असं सांगत त्याला पळ काढावी लागली. मराठीबाणा काय असतो, हे दाखवणार्या धारावीच्या वर्षा गायकवाड, धुळ्याच्या शोभा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त अहिल्यानगर/संगमनेर: एक महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी समोर येत आहे. संततधार पावसामुळे भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून, धरणांमधून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना विशेषतः प्रवरा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी नदीपात्रात न उतरण्याचे आणि आपल्या मालमत्तेची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भंडारदरा धरणातून विसर्ग सुरू- अहिल्यानगर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, २६ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता भंडारदरा धरणातील एकूण पाणीसाठा ९१६५ दशलक्ष घनफूट (दलघफु) इतका झाला होता. धरणाच्या जलाशय परिचालन सूची (ROS)…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त रत्नागिरी: संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील कोसुंब रेवाळेवाडी येथे सासऱ्याने घरातील कामे सांगितल्याच्या रागातून सुनेने जेवणात विषारी द्रव्य मिसळून त्यांना जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पतीलाही विषबाधा झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. देवरूख पोलिसांनी संबंधित सुनेला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जगन्नाथ सोलकर (वय ३४) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव स्वप्नाली सचिन सोलकर (वय ३२) असे आहे. सचिन आणि स्वप्नाली यांचा विवाह याच वर्षी १३ एप्रिल २०२५ रोजी झाला होता. स्वप्नालीला सासरे जगन्नाथ सोलकर हे घरातील कचरा काढणे, साफसफाई करणे आणि इतर कामे व्यवस्थित करण्यास…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त भंडारदरा, दि. २६ जुलै: भंडारदरा व निळवंडे परिसरात पर्यटनविकासातून रोजगारनिर्मिती साधण्यासाठी जलसंपदा विभागाच्या जागा अतिक्रमणमुक्त करून विकसित करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. राज्य शासनाच्या ‘हरीत महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत जलसंपदा विभागाने सक्रिय सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ भंडारदरा येथे जलसंपदा मंत्री विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, कार्यकारी अभियंता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या शुभेच्छा फलकासह शहरात लावण्यात आलेला माजी खासदार सुजय विखे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फ्लेक्स फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार खताळ यांचा खांडगाव फाट्यावरील फिक्स फाटल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्या पाठोपाठ हा दुसरा प्रकार समोर आला. अकोले नाका येथे जाजू पेट्रोल पंपासमोर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या फ्लेक्स लावण्यात आला होता या फ्लेक्स वर असलेले माजी खासदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त अहिल्यानगर: एका कांदा व्यापाऱ्याला ट्रान्सपोर्टद्वारे कांदा विक्री करूनही २६ लाख ४१ हजार ३७९ रुपये न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी २४ जुलै रोजी पाच जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल रामदास आंधळे (वय ३१, रा. पारिजात कॉर्नर, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. आंधळे यांचा केडगाव परिसरातील नेप्ती मार्केटमध्ये कांदा विक्रीचा व्यवसाय आहे. ४ जानेवारी २०२० ते ९ मार्च २०२० या कालावधीत मोहम्मद नदिम (रा. सब्जीमंडी, पिलीभित, उत्तर प्रदेश), अरिफ रजा, मोहम्मद युनूस अँड कंपनी, मोहम्मद हसीन आणि छोटे मिया अँड कंपनी (पूर्ण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त शासनाकडून भरमसाट पगार मिळत असतानाही, अतिरिक्त कमाईच्या हव्यासापोटी लाच मागणाऱ्या चार महसूल अधिकाऱ्यांसह एका मजुराला यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा मार्गावरील बागवाडी बसथांब्याजवळ गुरुवारी (२४ जुलै २०२५) ही कारवाई करण्यात आली. मुरूम वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीचा ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा असताना, मंडळ अधिकारी जितेंद्र पांडुरंग ठाकरे (५७), ग्राम महसूल अधिकारी जय गणेश सोनोने (२६), पवन तानसेन भितकर (३०) आणि नीलेश भास्कर तलवारे (३०) यांनी कारवाई न करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराकडे मुरूम वाहतुकीच्या सर्व कायदेशीर पावत्या असतानाही, या कर्मचाऱ्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या (राजहंस दूध संघ) संचालकपदी खांडगाव येथील रमेश लहानभाऊ गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. २५ जुलै २०२५ रोजी राजहंस दूध संघ येथे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर तथा अध्यासी अधिकारी संतोष कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळातील रिक्त जागेवर गुंजाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर,…
संगमनेर, प्रतिनिधी: महाराष्ट्राचे राजकारण सध्या प्रचंड गदारोळात आहे. केवळ सत्तेच्या सिमेंटमुळे महायुती सरकार राज्यात टिकून असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे. महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू असून, जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळल्याचा ठपका ठेवला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना महायुती सरकारवर तोफ डागली. विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये देण्याची घोषणा केली, पण त्यांना काहीही दिले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही फसवणूक केली आहे, असे थोरात म्हणाले. थोरात यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांवर आणि वाढत्या भ्रष्टाचारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.…
अहिल्यानगर, दि. २५ जुलै: शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कडक पाऊल उचलले आहे. त्यांनी शालेय बस आणि इतर विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा शालेय बस सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. या महत्त्वाच्या बैठकीला महानगरपालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि चंद्रकांत खेमनर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक शालेय बस किंवा विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनामध्ये सीसीटीव्ही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्या चैतन्य नगर मधील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या घरावर मंगळवारी पहाटे काही ओळखीच्या लोकांसह १०-१२ लोकांनी सशस्त्र हल्ला करत वैष्णव मूर्तडक याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच हल्ले पोरांनी घराच्या पॅसेजमध्ये लावलेल्या दुचाकींचे नुकसान केले. या घटनेमुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांचे बंधू शिवाजी मुर्तडक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध तसेच १०-१२ अनोळखी अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग आणि विधवा महिलांना अर्थसाहाय्य यासह विविध मागण्यांसाठी आज गुरुवारी (२४ जुलै) होणाऱ्या ‘चक्काजाम’ आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पुकारलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देताना, थोरात यांनी महायुती सरकारवर विधानसभा निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, महायुती सरकारने ‘लाडक्या बहिणींना’ दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात त्यांना १५०० रुपयेही मिळत नाहीत. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीचे आश्वासनही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त अहिल्यानगर: या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत असलेल्या अहिल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तब्बल दीड कोटीचा ऑनलाईन लाच प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकासह चौघांचे पोलीस अधीक्षकांनी निलंबन केल्याच्या प्रकाराला काही तास उलटत नाही तोच आहेर यांची देखील आता तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आहेर यांच्या बदलीमागे देखील याच प्रकरणाचा वास असल्याची चर्चा पोलीस दलात रंगली आहे. दरम्यान आहेर यांच्या जागी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: १४० वर्षांपासून अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संगमनेर येथील सर डी.एम. पेटीट विद्यालयाला त्याचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी कंबर कसली आहे. उद्योजक आणि चार्टर्ड अकाउंटंट (CA) कैलास सोमाणी यांनी या प्रयत्नांचे नेतृत्व करत, माजी विद्यार्थ्यांकडून यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे. माजी विद्यार्थ्यांच्या या एकोप्याने पेटिट विद्यालयाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात, सर डी.एम. पेटीट विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना विविध शालेय वस्तूंचे वाटप माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. याप्रसंगी मंचावर प्राचार्य चौधरी, माजी प्राचार्य रामनाथ जगताप, श्रीकांत अरगडे, वनम सर, राधेश्याम राठी आदी मान्यवर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त राहाता: कर्जमाफी, सातबारा कोरा, पीक विमा आणि वीजबिल माफीसारख्या अनेक समस्यांनी त्रस्त झालेले राहाता तालुक्यातील शेतकरी आता शासनाच्या उदासीन धोरणांविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. गुरुवारी (२४ जुलै) सकाळी १० वाजता राहाता येथे भव्य शेतकरी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे करणार असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), प्रहार जनशक्ती पक्ष, तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा विरभद्र मंदिर, राहाता येथून सुरू होऊन तहसील कार्यालय, राहाता येथे पोहोचेल. तेथे शेतकरी वर्गाच्या मागण्यांवर विविध नेत्यांची भाषणे होणार आहेत आणि…
