Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज कांद्याच्या दराने शेतकऱ्यांना रडविले असताना आता कांद्याचा प्रश्न पेटला असल्याचे दिसत आहे. अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर कांदे फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. कमी कांद्याच्या उत्पादनामुळे जगातील अनेक देशांना रडवत असलेला कांदा आता मात्र आपल्या राज्यात भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना रडवत असल्याचे दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि पारनेरमध्ये आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंदोलन झाले असतानाच आता राज्यात कांदा प्रश्नी शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होताना दिसू लागला आहे. एकीकडे विरोधकांनी या प्रश्नी सभागृहात आवाज उठवताना आता आंदोलने देखील सुरू केले आहे. अशातच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज लोकशाही देशांमध्ये दर पाच वर्षाने जनतेच्या सेवेकरांची संख्या अचानक वाढत असते. सेवेची बाधा झालेले हे लोक घरोघरी जात सेवेची संधी देण्याची मागणी करतात मात्र, त्यानंतर महिनाभरात ही साथ ओसरते आणि हे सेवेकरी जातात कुठे? असा प्रश्न उपस्थित करत याचे उत्तर पाच वर्षांनी मिळत असते, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवानिधी संस्थेच्यावतीने ‘सेवा भवन’ प्रकल्पाच्या इमारतीचे पुण्यामध्ये शनिवारी डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गांधी लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक समस्या नसतील तर तिथे जीवनच नाही. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात. काही समस्या मार्गी लागतात तर काहींवर उपाय नसतो. अशा समस्या सोडवल्या जाऊ शकत नाहीत. अशा समस्यांचा सामना करण्यासाठी भावनिक आधार महत्वाचा आहे. समस्या कितीही असुद्या त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. संघर्ष असल्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. नाती जपली पाहिजेत, मित्र जपले पाहिजेत, असा उपदेश प्रसिद्ध लाइफ कोच गौर गोपालदास यांनी केला. एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या शैक्षणिक संकूलात ‘एसएमबीटी फेस्ट २०२३’ या वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, एसएमबीटीचे मुख्य विश्वस्त…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी त्यांचे चुलत भाऊ चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. घटना घडली तेव्हा शिवराज पाटील चाकूरकर हे दिल्ली होते. चंद्रशेखर पाटील हे 80 वर्षांचे होते, ते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातुर येथील घराच्याजवळ राहत होते. दररोज वृत्तपत्र वाचण्यासाठी आणि सहज फेरफटका मारण्यासाठी चाकूरकर यांच्या घरी ते यायचे. आजही ते सहजपणे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या ‘देवघर’ या निवासस्थानी आले होते. तिथे त्यांनी स्वतः सोबत आणलेल्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून घेतली. फायरचा आवाज झाल्यानंतर चाकूरकर यांचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ○ अनंत पांगारकर संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यान असलेला म्हाळुंगी नदीवरील पूल गेल्या काही महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद आहे. खचलेल्या या पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी संघर्ष सामाजिक संस्थेने केली आहे. अन्यथा यासाठी संस्थेच्या वतीने संघर्षाचा इशारा देण्यात आला आहे. स्वामी समर्थ मंदिरालगत असलेल्या या पुलावरून साई मंदिर, प्रवरा नदी, गंगामाई घाट, पंपिंग स्टेशन, कासारवाडी, साईनगर, घोडेकर मळा, दिगंबर गणेश सराफ विद्यालय, देवेंद्र ओहरा महाविद्यालय, मालपाणी हेल्थ क्लब आदी ठिकाणी ये-जा करता येते. साधारणत: ऑक्टोंबरमध्ये या भागाला जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल मानवनिर्मित चुकांमुळे कसला आहे. जवळपास सहा महिन्याहून अधिक काळ हा…

Read More

रविवार विशेष ○ प्रवीण पुरो कायदे मंडळाची दोन सभागृहे खोटं बोलण्याची व्यासपीठ होऊ नयेत, असं कितीही म्हटलं तरी आता या सभागृहांचा वापर रेटून खोटं बोलण्यासाठी केला जातो, हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे. आपल्यावरील आक्षेप ढकलून देण्यासाठी सत्ताधारी खुलेआम खोटेपणा करतात आणि हा खोटेपणा बहुमताच्या जोरावर टाळ्यांच्या गजरात खपवून घेतात. असे एक ना अनेक प्रसंग विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आताही घडतात आणि यापूर्वीही घडून गेलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आणण्यात आलेल्या हक्कभंग प्रकरणानंतरही त्यांनी घेतलेली कोलांटउडी हा याच पठडीतील विषय ठरला आहे. कितीही खोटं बोललं तरी जिथे काहीच बिघडत नाही, असं हे ठिकाण बनलंय. आपण शहाण्यासारखं वागलं पाहिजे याचं भान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील अडीच लाख रुपयांचे लूट करणारे, पंचर दुकानदारावर हल्ला करून त्याचे मोटरसायकल लांबविणारे तीन गुन्हेगार नगरच्या स्थानिक पुणे शाखेला पकडण्यात यश आले. पेट्रोल पंपावरील लुटी सोबतच नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खून प्रकरणाचाही उलगडा या आरोपींकडून करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या रविवारी (ता. २६ फेब्रुवारी) संगमनेरच्या पठार भागात साकुर मांडवे रस्त्यावरील भगवान पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर तिघा सशस्त्र चोरट्यांनी आपल्याकडील दोन्ही दुचाकीमध्ये पेट्रोल भरत पेट्रोल पंपावरील केबिनमध्ये घुसून तेथील कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अडीच लाखाची लूट केली होती. तत्पूर्वी याच आरोपींनी माहूली गावच्या शिवारात एका पंचर दुकानदाराला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत त्याच्यावर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्व पिकांचे भाव पडले आहेत. कांदा उत्पादनासाठी खर्च मोठा येत असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळेस सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मात्र मेट्रो आणि स्मार्ट सिटीकडे लक्ष देणाऱ्या या सरकारचे शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष आहे. सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा व कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करू नये, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर गीता परिवाराच्या संगमनेर शाखाध्यक्षपदी संजय कर्पे, उपाध्यक्षपदी शोभा बाहेती आणि सचिवपदी अभिजीत गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ बालसंस्कार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या गीता परिवाराच्या संगमनेर शाखेतील पदाधिकार्‍यांच्या निवडी गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली गीता परिवाराच्या संस्कार बालभवन येथे झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आल्या. कोषाध्यक्षपदी अमित चांडक, संगमनेर केंद्र पालक व जिल्हा विस्तारक पदासाठी गणेशलाल बाहेती, केंद्र विस्तार प्रमुख पदावर कुंदन जेधे, सतीष इटप, अर्जुन युवा मंच प्रमुखपदावर पूजा दिक्षीत, परिवार संपर्क समितीच्या प्रमुखपदी  सरोज आसावा, परिवार संपर्क समिती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या बारा वर्षापासून विविध समाज उपयोगी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिवजयंती उत्सव युवक समितीच्यावतीने यावर्षीदेखील महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी १०३७ शिवभक्त रक्तदात्यांनी रक्तदान केल्यानंतर आता यावर्षी ११११ रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. या महा रक्तदान संकल्पमध्ये संगमनेरकरांनी सहभाग घेण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. एका तपाची वाटचाल पूर्ण करणाऱ्या उत्सव समितीने यापूर्वी कोरोनासारख्या भयंकर आजारातदेखील गोरगरिबांना अन्नदान केले होते. सांगली, सातारा सारख्या भागात पूरग्रस्त नागरिकांना किराणा व संसार उपयोगी वस्तूचे वाटप केले. गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. वैद्यकीय मदतीसाठी पुढाकार घेतला जातो. शिवरायांचे विचार मनामनात रुजवण्यासाठी व्याख्याने तसेच विद्यार्थ्यांसाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबईः मी आता ७० वर्षांचा झालो आहे. मी १४ वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षा भोगली आहे. त्यामुळे आता माझी मुदतपूर्व सुटका करा, अशी मागणी करणारी याचिका डॉन अरुण गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर केली आहे. या याचिकेवर १५ मार्चला सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. गवळी सध्या नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. कैद्यांच्या मुदतपूर्व सुटके संदर्भात २००६ साली राज्य शासनाने परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाचा आधार घेत गवळीने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे अशा गौरवशाली दिवसांचे औचित्य साधून कैद्यांचे मुदतपूर्व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई :  नोकरीसाठी इच्छुक असलेल्या करिता शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने या संदर्भातील आदेश देखील काढला आहे. कोरोना संकटामुळे दोन वर्ष नोकर भरतीची जाहिरात निघाली नाही. त्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना नोकर भरतीसाठी अर्ज करता येत नव्हता. या नोकर भरतीसाठी वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांनी दोन वर्ष वाढवून देण्याची मागणी केलेली विद्यार्थ्यांची ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या सभागृहातील पहिल्याच भाषणात या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. सरळ सेवेत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत आता सरकारकडून दोन वर्ष वाढवून देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यांची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यातील पतसंस्थांमध्ये गैरव्यवहाराचे प्रकरणे सातत्याने समोर येत आहे. तसेच यामुळे ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास अडचणी येत आहे. या पार्श्वभूमीवर पतसंस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. यासाठी सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती येत्या पंधरा दिवसात स्थापन केली जाणार असल्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले. सहकार मंत्री सावे म्हणाले, गैरव्यवहारामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी ही समिती काम करेल. राज्यातील पतसंस्थांसाठी असणाऱ्या विविध मानकांचे नियमितपणे देखरेख करण्यासाठी वार्षिक आणि मासिक माहिती व्यवस्थापन प्रणाली सहकार आयुक्तांच्या 23 ऑगस्ट 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार लागू केली आहे. याशिवाय महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतूदींनुसार स्थिरीकरण व तरलता निधी 11 सप्टेंबर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज एसटीच्या मोडक्या, तुटक्या बसवर राज्यशासनाच्या जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला…’ असा प्रकार असल्याची टीका करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबंधीत कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. मोडक्या तुटक्या एसटी बसेस वर जाहिरात केल्याच प्रकरण विधिमंडळात अजित पवार यांनी गुरुवारी उघडकीस आणले होते. त्यानंतर प्रशासनाकडून तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या संदर्भात पवार म्हणाले, राज्य शासनाने जाहिरातींवर पैसे उधळण्यापेक्षा तो पैसा एसटीच्या दुरुस्ती, देखभाल आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी वापरावा. विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाला विरोध करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज कोरोनाच्या संकट काळात राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविकांनी अत्यंत चांगले काम केले आहे. त्या तुटपुंज्या मानधनावर काम करत असून त्यांची मानधन वाढ तात्काळ करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचे प्रश्न मांडताना ते म्हणाले, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविका ह्या ग्रामीण व दुर्गम भागात अत्यंत चांगले काम करत आहे. कोरोनाच्या संकट काळात या सर्वांनी चांगले काम केले. हे सर्व राज्याने आणि देशाने पाहिले आहे. त्यांच्या मानधनवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. मानधन वाढीबाबत सर्व विधानसभेतील सदस्य अनुकूल आहेत. या…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अंगावर स्विफ्ट कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत वकिलाला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी वकिलाला गुप्तीचा धाक दाखवत बोटातील सोन्याची अंगठी लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी संगमनेर न्यायालयाच्या परिसरात घडला. यासंदर्भात संगमनेर न्यायालयातील वकील ॲड. प्रसाद कडलग यांच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अनिल पांडुरंग गुंजाळ, प्रवीण (पूर्ण नाव माहिती नाही) सह आणखी चार जणांवर दरोडा, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग तीन दिवसाच्या वादाची परिणती जिवे मारण्याचा प्रयत्न आणि मारहाणीत झाल्याने संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, ॲड. प्रसाद कडलग हे संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात वकिली करत असून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे येथे झालेल्या नवव्या राजस्तरीय स्पोर्टस डान्स अजिंक्यपद स्पर्धेत संगमनेरच्या गीता परिवार संचालित संस्कार बालभवनच्या विद्यार्थ्यांनी ७ सुवर्ण आणि ५ रौप्य अशा १२ पदकांची कमाई केली आहे. याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर उपविजेतेपदही पटकाविले आहे. सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनिअर गटातील विद्यार्थ्यांसाठी ही राज्यस्तरीय स्पोर्टस डान्स अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. २१ वर्षांखालील मुलींच्या शास्त्रीय नृत्य प्रकारात ‘दशावतार’ हे शास्त्रीय नृत्य सादर करून संस्कार बालभवनच्या समूहाने सुवर्णपदक मिळविले. या समुहात मिताली भडांगे, आदिश्री झंवर, रिया साकी, मनसा कालडा, आर्या भालेराव, भक्ती रत्नपारखी व अनुष्का जाधव यांचा समावेश होता. याच वयोगटातील मुलींच्या शास्त्रीय लोकनृत्य प्रकारात ‘झूम झूम’ हे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीत आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे तब्बल 44 हजार मते घेत आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पराभवास कारणीभूत ठरले आहे या मतदारसंघातून पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप निवडून आल्या असल्या तरी राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त झाले. या मतदारसंघात पराभूत झालेले काटे यांनाच फक्त आपले डिपॉझिट वाचविता आले असून तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या कलाटे यांच्यासह 28 पैकी 26 जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग बंद झाल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते मिळणे आवश्यक असते. मात्र काल झालेल्या मतमोजणीमध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई आपल्या पहिल्याच भाषणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि युवकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर बोट ठेवले. चांगल्या गोष्टींचे कौतुक करताना त्यांनी काही त्रुटी दाखवून देत त्या दूर करण्याची सरकारला विनंती केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेताना तांबे म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ७५ हजार पदांसाठीच्या नोकरभरतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र ती कधी होणार, कशी होणार, किती वेळात होणार याबद्दल कुठेही उल्लेख नव्हता. ‘शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होताना दिसत नाही. २ लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त आहे. मात्र ७५ हजार जागांच्या भरतीने किती युवकांना न्याय मिळणार आहे? सरकारला विनंती आहे की कोविड काळात विद्यार्थी परीक्षा देऊ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीन, कापूस, भाजीपाला उत्पादकांसह कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. ज्या-ज्या वेळेस शेतकरी अडचणी आला त्या-त्या वेळेस सरकारने मदत करण्याची परंपरा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीबाबतचे स्पष्ट धोरण सरकारने त्वरित जाहीर करावे, अशी आग्रही मागणी माजी मंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बोलताना आमदार थोरात म्हणाले, भाजीपाला, कापूस, सोयाबीनसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. नाशिकसह इतर तालुक्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. कांदा पिकासाठी उत्पादनासाठी खर्च ही मोठा आहे. यामुळे सध्या मातीमोल परिस्थिती निर्माण झाली…

Read More