Author: Annant Ppangarkar

शिर्डी, दि. २ एप्रिल –  शिर्डीत शनिवारपासून (दि. ५) ते सोमवार (दि. ७) या काळात श्री साईबाबा संस्थानतर्फे ११४ वा श्रीरामनवमी उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, १ लाख ७३ हजार भक्तमंडळ सभासदांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या उत्सवात मुंबईच्या व्दारकामाई मंडळाने श्री गजमुख गणपतीचा देखावा सादर केला असून, मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सौदी अरेबियातील एका साईभक्ताने फुलांची सजावट केली आहे. उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उत्सवात विविध ठिकाणच्या ८७ पालख्या सहभागी होणार आहेत.…

Read More

संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी राजहंस दूध संघाच्या ‘मिशन ५० लिटर’ उपक्रमाअंतर्गत कालवड संगोपन कार्यशाळेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी दूध संघाची स्थापना केली, आज तालुक्यात ९ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. कमी गाईंमध्ये जास्त दूध उत्पादन होण्यासाठी राजहंस दूध संघाचा ५० लिटर दूध उत्पादन करणाऱ्या गाई निर्माण करण्याचा उपक्रम दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी ५० लिटर दूध निर्मिती करणाऱ्या नवीन कालवडी आणि गाईंचे प्रदर्शन झाले. मिशन ५० लिटर अंतर्गत कालवड संगोपन योजना कार्यशाळेत थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन रणजीतसिंह देशमुख होते.…

Read More

संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी  सहकाराचे मोठे वलय लाभलेल्या संगमनेर तालुक्यात पतसंस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात भक्कमपणे विणले गेले आहे. या पतसंस्थांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल तालुक्यात होत असते. घुलेवाडी येथील स्वातंत्र्य सैनिक भास्करराव दुर्वे नाना ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने मावळत्या आर्थिक वर्षात मोठे यश मिळविले आहे. संस्थेने आर्थिक वर्षांमध्ये १३ कोटी १२ लाख ६२५ रुपयांची उलाढाल करत ९ लाख ११ हजार रुपयांचा नफा मिळवला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मावळत्या आर्थिक वर्ष अखेर पतसंस्थेकडे १० कोटी ४८ लाख ४० हजार ३०३ रुपयांच्या ठेवी असून, ८ कोटी २३ लाख ५८ हजार ७०० रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच…

Read More

संगमनेर, दि. १ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेरमधील टोमॅटो व्यापारी भाऊसाहेब शंकर मेहेत्रे यांची राजस्थानमधील ललित रामचंद्र चंदावनी या टोमॅटो व्यापाऱ्याने सुमारे १९ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी चंदावनी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब मेहेत्रे यांनी संगमनेरमधून टोमॅटो खरेदी करून ते राजस्थानमधील राम ट्रेडिंग कंपनीला (मालक: ललित रामचंद्र चंदावनी, रा. जोधपूर, राजस्थान) वेळोवेळी पुरवले. मात्र, चंदावनीने या टोमॅटोचे पैसे मेहेत्रे यांना दिले नाहीत. त्यामुळे मेहेत्रे यांचे १९ लाख २२ हजार ४३३ रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी भाऊसाहेब मेहेत्रे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ललित रामचंद्र चंदावनी यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर…

Read More

संगमनेर, दि. १ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम पुण्याच्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. विधानसभेपाठोपाठ आता संगमनेरमध्ये कारखान्यासाठीच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संगमनेरमध्ये निवडणूक ज्वर बघावयास मिळेल. निवडणूक कार्यक्रमानुसार ११ मे २०२५ रोजी मतदान होणार असून १२ मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात ३ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळतील व स्वीकारण्यात येतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ११ एप्रिल रोजी सकाळी ११…

Read More

संगमनेर, दि. १ एप्रिल – प्रतिनिधी गोवत्स परमपूज्य श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या अमृतवाणीतून संगमनेर येथे ९ दिवस श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेच्या निमित्ताने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मंगळवारी सकाळी निघालेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि सनई चौघड्याच्या सुरांनी संगमनेर शहर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेले होते. शेकडो संगमनेरकर महिला पुरुषांसह या शोभायात्रेत माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या डॉ. जयश्री थोरात यांच्यासह आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम यादेखील सहभागी झाल्या होत्या. संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे १ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या शुभारंभानिमित्त संगमनेरमधील चंद्रशेखर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  मंगळवार, दि. १ एप्रिल  येवला तालुक्यातील सावखेडा येथे दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, ३१ मार्च रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास सावखेडा येथील समाधान गोरे यांच्या शेततळ्यात शुभम शांताराम गोरे आणि साई संदीप कुमावत (वय १२) ही दोन मुले अंघोळीसाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही शेततळ्यात बुडाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. येवला तालुका पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृत मुलांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, मतदारसंघात पुन्हा…

Read More

मुंबई, दि. १ एप्रिल –  राज्याचे बजेट सादर झाल्यानंतर आर्थिक संकटाचे भयावह चित्र समोर आले आहे. जमा आणि खर्चाचा ताळमेळ साधणे अशक्य होत असताना, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी कठोर परिपत्रक जारी करून खर्चावर नियंत्रणाचे आदेश दिले आहेत. फुकट अनुदान योजनांना पूर्णपणे आळा घालण्याच्या सूचना दिल्याने, ‘लाडकी बहीण’ योजनेतील वाढीव २१०० रुपये मिळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय परिषदेत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना मर्यादित निधीचा सुयोग्य वापर करून अनुत्पादक अनुदान योजना बंद करण्याचे आणि उत्पादक भांडवली खर्च वाढवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने लोकप्रिय…

Read More

संगमनेर, दि. ३१ मार्च – प्रतिनिधी “भारत हा विविध धर्म, पंथ आणि जातींचा देश असला तरी, मानवता आणि भारतीयत्व या दोन गोष्टी आपल्याला एकत्र जोडतात. रमजान ईद हा पवित्र सण, एक महिन्याच्या उपवासानंतर साजरा केला जातो. जगभरातील मुस्लिम बांधव हा सण मोठ्या आनंदात आणि पवित्र भावनेने साजरा करतात, ज्यात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात. एकता ही भारतीय संस्कृतीची मुख्य बाब आहे आणि रमजान ईद हा बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देतो,” असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ईदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.…

Read More

संगमनेर, दि. ३१ मार्च – प्रतिनिधी आज रमजान ईदच्या निमित्ताने संगमनेर येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम धर्मगुरु अब्दुल रकीब अब्दुल वहाब पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांनी वक्फ बोर्डाविरोधात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून हाताला काळ्या फिती बांधून नमाज पठण केले. नमाज पठणानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि स्थानिक प्रशासनाचे आभार मानले. या सामूहिक नमाज पठणाला संगमनेर तालुक्यातील अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते. दरम्यान काळ्या फिती लावून करण्यात आलेल्या नमाज पठणाविषयी विचारणा केली असता धर्मगुरु पिरजादे म्हणाले, “केंद्र सरकारने वक्फ बोर्डाविरोधात घेतलेला कायदा मुस्लिम समाजाच्या हितासाठी धोकादायक आहे. या कायद्यामुळे मुस्लिम समाजाला नाहक…

Read More

शिर्डी, दि. ३१ मार्च –  शिर्डी एमआयडीसीमध्ये सुरू होणाऱ्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे, तसेच रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. सावळीविहीर खुर्द येथील शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये डिफेन्स क्लस्टरअंतर्गत ‘निबे ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड’ (शेल फोर्जिंग) कंपनीच्या भूमीपूजन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, निबे प्रायव्हेट लिमिटेडचे गणेश निबे, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, शिर्डी एमआयडीसीमध्ये डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून नवीन औद्योगिक पर्व सुरू होत…

Read More

अहिल्यानगर, दि. ३१ मार्च –  ‘लाडकी बहीण योजने’च्या पात्रतेचे निकष डावलून लाभ घेणाऱ्या महिलांवर राज्य सरकारने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल १५०० हून अधिक महिलांच्या नावावर चारचाकी वाहने असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपात्र लाभार्थ्यांची नावे महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवण्यात आली असून, त्यांचा ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या या कठोर भूमिकेमुळे ‘लाडकी बहीण योजने’तील अपात्र लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात १२ लाखांहून…

Read More

शिर्डी, दि. ३१ मार्च – शिर्डी विमानतळावर बहुप्रतिक्षित ‘नाईट लँडिंग’ सेवेला अखेर सुरुवात झाली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रात्रीच्या वेळी पहिल्या विमानाचे यशस्वी लँडिंग झाले. या ऐतिहासिक घटनेमुळे शिर्डी आणि आसपासच्या भागातील विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डी विमानतळावर रात्रीची विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून होत होती. या मागणीची दखल घेत महायुती सरकारने याबाबत त्वरित निर्णय घेतला. त्यानुसार, गुढीपाडव्याला रात्रीच्या पहिल्या विमानाचे शिर्डी एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी माजी खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते. त्यांनी प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सुजय विखे पाटील यांनी सांगितले…

Read More

अहमदनगर, दि. ३० मार्च –  ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस.टी. महामंडळाने प्रवाशांना खासगी वाहतुकीपेक्षा अधिक दर्जेदार सुविधा द्याव्यात, असे आवाहन जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्ह्यातील विविध आगारांसाठी नव्याने मिळालेल्या ४५ एस.टी. बसेसचे लोकार्पण आणि अहमदनगर-पुणे विनावाहक बस सेवेचा शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तारकपूर बस स्थानक येथे करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, अभय आगरकर, बाबू टायरवाले, विनायकराव देशमुख, श्रीमती दानवे, आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, एस.टी. बस ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. पूर्वी गावात एस.टी. बस येणे…

Read More

कोल्हापूर, दि. ३० मार्च –  छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर सध्या चर्चेत आहे. त्याला रविवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता प्रशांत कोरटकर याने तातडीने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून यावर १ एप्रिलला सुनावणी होणार आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रशांत कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढणार असून त्यानंतर जामीन मिळणार की कोरटकर न्यायालयीन कोठडीत मुक्कामाला राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेलंगणातून झाली अटक… काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर मंगळवारी (२५ मार्च) कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली…

Read More

संगमनेर, दि. ३० मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील क्रीडापटू आणि अत्यंत हुशार विद्यार्थी साई भाऊसाहेब केरे याला शाळेत ये-जा करण्यासाठी सायकलची गरज होती. शाळेतील शिक्षक अनिल कडलग यांनी ही बाब लक्षात घेऊन व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. साई केरे हा सातवीत शिकणारा विद्यार्थी अभ्यासात हुशार असून क्रीडा क्षेत्रातही त्याने विशेष प्राविण्य मिळवले आहे. लांब उडी, उंच उडी, धावणे, गोळा फेक, थाळीफेक यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांसह कबड्डी आणि खो-खो या सांघिक क्रीडा प्रकारातही त्याने जिल्हा पातळीवर यश मिळवले आहे. मात्र, साईची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला शाळेत ये-जा करण्यासाठी अडचणी येत होत्या. शाळा आणि घर…

Read More

राज्याला मिळालेल्या युती सरकारमधल्या एकेका मंत्र्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडाळाची रया दररोज रस्त्यावर येत आहे. मंत्र्यांच्या तोंडाला आवर राहिलेला नाही. जिभेवर येईल ते बडबडण्याचा आमदार आणि मंत्र्यांचा हेका चालूच आहे. मुख्यमंत्र्यांचा धाक राहिलेला नाही. युती सरकारमधले नितेश राणे यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आता शंभूराज देसाईंपर्यंत जाऊन पोहोचली आहे. एकेक नग राज्याच्या चांगलेपणाला काळिमा फासत असूनही त्यांच्यावर कोणाचंच काही चालत नाहीे. युतीतल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी तेवढं स्वत:ला आवरलेलं दिसतं. एकनाथ शिंदेंच्या गटातील मंत्र्यांची अवस्था अगदीच वेगळी बनलीय. आपल्याविरोधी वा आपले नेते एकनाथ शिंदेंविषयी बोलणार्‍या कोणाचीच गय हे मंत्री करत नाहीत. सरकारवर झालेली टीका त्यांना सहन होत नाही. मंत्र्याच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे…

Read More

संगमनेर, दि. २९ मार्च – प्रतिनिधी  मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सौगात ए मोदी’ या उपक्रमावरून देशात सध्या राजकीय वाद सुरू आहेत. मात्र, संगमनेरमधील मुस्लिम समाजाने या उपक्रमाचे स्वागत करत पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले आहे. हे पत्र चर्चेचा विषय ठरले आहे. ‘सौगात ए मोदी’ उपक्रमांतर्गत मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त भेटवस्तू देण्यात येत आहेत. यावरून विरोधी पक्षांनी आणि काही संघटनांनी टीका केली आहे. मात्र, संगमनेरमधील मुस्लिम समाजाने या उपक्रमाचे स्वागत केले आहे. संगमनेरमधील मुस्लिम बांधवांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, “आपला भारत देश विविधतेने नटलेला असून सर्व जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. राम आणि रहीम यांची संस्कृती…

Read More

मुंबई, दि. २९ मार्च –  जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण आता ३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, असा संताप व्यक्त करत, ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. उल्हासनगर येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारात व जाहिरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच…

Read More

मुंबई, दि. २९ मार्च – विशेष प्रतिनिधी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देत दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणारे पोलीस कर्मचारी हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या वतीने तुकाराम ओंबळे यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून सातारा जिल्ह्यातील केडंबे गावात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १३.४६ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. २००८ मध्ये झालेल्या या हल्ल्यात अजमल कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कामा रुग्णालय, लिओपोल्ड कॅफे, ताज हॉटेल यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला होता. कामा रुग्णालयात हल्ला केल्यानंतर पळून जात असलेल्या अजमल…

Read More