Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज – छत्रपती संभाजी नगर पोलिसातून निलंबित असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले यांना १८ एप्रिल २०२५ रोजी अखेर पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांनी ही कारवाई केली आहे. सध्या कासले एका ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या ताब्यात असून, शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना अटक केली असून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड जिल्हा पोलीस दलातील सायबर विभागात कार्यरत असताना, एका गुन्ह्याच्या तपासासाठी गुजरातला गेलेल्या कासले यांनी पैशांच्या बदल्यात आरोपीला सोडले होते, या संबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यासोबतच, नागरिकांना सायबर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.…
केंद्राच्या नव्या शैक्षणिक धोरणातील हिंदी भाषा सक्तीने महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यातील महत्वाच्या प्रश्नांच्या सोडवण्यातील अडचणींना तोंड देता देता युती सरकारने विद्यार्थ्यांवर हिंदी सक्तीची तलवार उगारली आहे. राज्यातील सगळ्याच शाळांना पहिलीपासून सक्तीने हिंदी शिकवावी लागणार आहे. राष्ट्रभाषा म्हणून हिंदी स्वीकारावीच लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केल्याने यातील गुंतागुंत वाढली आहे. केंद्राने कोणताही निर्णय घेतला की त्या निर्णयाचा अंमल करण्यासाठी देशातील काही ठराविक राज्यांवर समर्थनाची सक्ती असते. त्यात महाराष्ट्र येतं. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार अशा राज्यांनी निर्णयाचा अंमल आधी करायचा. या राज्यांना केंद्राने घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्याचा अधिकार भाजप शासनप्रक्रियेने केव्हाच गुंडाळला आहे. निर्णय काहीही असो त्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी अखेर १७ दिवसानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अलंकार पोलीस ठाण्यात रुग्णालयातील प्रमुख स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयाच्या पुनर्तपासणी अहवालात डॉ. घैसास यांच्या वैद्यकीय निष्काळजीपणाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. याच अहवालाच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ससून प्रशासनाला विचारलेल्या चार प्रश्नांचा अहवाल आज प्राप्त झाला. या अहवालात डॉक्टरांनी वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचे नमूद आहे, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र ॲप तयार करावे. टँकर सुरू असलेल्या गावात पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करावे, जेणेकरून ग्रामस्थांना टँकरची वाट पाहावी लागणार नाही. तालुका पातळीवर पाणी पुरवठ्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीसाठी आमदार काशिनाथ दाते, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उप वनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या अवैध धंद्यांविरोधात जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. शनिवारी (१९एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध व्यवसायांवर कारवाईबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा पाढाच वाचला. ते म्हणाले, “अंमली…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यातील आगामी पाच वर्षांसाठी म्हणजेच सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीच्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षणाची विशेष सोडत येत्या २३ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही महत्त्वाची प्रक्रिया संगमनेरच्या नवीन नगर रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. तर २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महिला सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत होणार आहे. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, संगमनेर यांच्या कार्यालयाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या संबंधीचे प्रकटन माध्यमांना न देता समाज माध्यमात व्हायरल होताना दिसत आहे. या महत्त्वपूर्ण सोडतीच्या वेळी जिल्ह्यातील सर्व संबंधित ग्रामपंचायत सदस्य,…
महाराष्ट्र संवाद न्यूज दागिने चोरांनी मोठा उच्छाद मांडला असून या दागिने चोरांचा शोध घेण्यास पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. पोलिसांना दागिने चोरांचा शोध लागत नाही की पोलीस चोरांचा शोध घेत नाहीत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. नाशिकच्या जेलरोड परिसरात एका वृद्ध महिलेची तोतया पोलिसांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या भामट्यांनी महिलेला धमकावून तिच्याकडील सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने काढून घेतले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय तक्रारदार महिला नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता शिवमंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत होती. नारायणबापूरोडने पायी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे हडपसर येथे एका तरुणाने पत्नीचे अनैतिक संबंध आणि व्याजाच्या पैशांसाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि सावकाराला अटक केली आहे. गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री हडपसरमधील सिद्धिविनायक विहारातील एका इमारतीत ही घटना घडली. सचिन सतीश गिरी (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी कोमल सचिन गिरी (वय ३०) आणि रवींद्र मारुती मेमाणे (वय ४५) यांना पोलिसांनी अटक केली आहे. सचिनची बहीण सविता संतोष भारती (वय ३९) यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि कोमल यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. कोमलचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी खात्यातील महत्त्वाच्या बदल्यांचे अधिकार कृषीमंत्र्यांकडून काढून स्वतःकडे घेतल्याने त्यांचा कल एकाधिकारशाहीकडे असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून फडणवीस यांनी ठळक असे काही केले नसले, तरी एकाधिकारशाही मात्र मजबूत केली आहे. मंत्र्यांचे, विशेषतः मित्रपक्षांच्या खात्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवण्यासाठी शक्य त्या उपाययोजना मुख्यमंत्र्यांकडून केल्या जात आहेत. मित्रपक्षांना आपल्या एकाधिकारशाहीच्या धाकात ठेवण्याचे भाजपचे मनसुबे आता महाराष्ट्राला कळाले आहेत, असेही पवार म्हणाले. रोहित पवार यांनी ट्वीट करत कृषी खात्यातील बदल्यांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, “ज्याप्रमाणे बदल्यांचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे घेतला, त्याचप्रमाणे राज्यभरातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई, १८ एप्रिल आता अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने आणि विनाखर्चिक उपचार मिळणे अधिक सुलभ होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यानुसार अपघातग्रस्तांना अंगीकृत आणि अन्य तातडीच्या रुग्णालयांमध्ये एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत सक्त सूचना जारी केल्या आहेत. रुग्णालये, आरोग्य सोसायटीचे अधिकारी आणि योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी याबाबत कोणतीही हयगय करू नये, तसेच गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज (शुक्रवारी) मंत्रालयात राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्यालयात कामकाजाचा आढावा घेतला.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून २० एप्रिलपासून पाणी सोडले जाणार आहे. तालुक्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, निळवंडे कालव्याच्या आवर्तनाच्या काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले. पाणीटंचाई आढावा बैठकीत शेतकऱ्यांनी वीज पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी आमदार खताळ यांच्याकडे मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महावितरण कार्यालयात आमदार खताळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, उपअभियंता धनंजय खैरनार, प्रेमकुमार पाटील, सुनील अहिरे यांच्यासह तालुक्यातील वीज उपकेंद्रांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आमदार खताळ म्हणाले…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून संगमनेरमधील अविष्कार नरेश राणे याने मोठे यश मिळविले आहे. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्याची युनियन बँक ऑफ इंडियामध्ये वर्ग १ या पदावर बँक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. जिद्द, चिकाटी आणि सातत्याने अभ्यासाच्या बळावर यश मिळविणाऱ्या अविष्कार याच्या वडिलांचा संगमनेरमध्ये प्रिंटिंग प्रेसचा छोटासा व्यवसाय असून आई गृहिणी आहे तर, संगमनेरमधील सराफ विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत राणे व सुनील राणे यांचा आविष्कार हा पुतण्या आहे. एमएससी (मॅथ) करत असताना अविष्कार याने दुसरीकडे स्पर्धा परीक्षांची देखील तयारी सुरू केली होती. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात आता महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अपील प्रकरणांवर ई-सुनावणी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या शुभारंभामुळे जमीन व मालमत्तेशी संबंधित वाद, हक्क नोंदणी, फेरफार, उताऱ्यावरील दुरुस्ती आणि मालकी हक्काच्या प्रकरणांची सुनावणी आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सुविधेमुळे महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. शासनाकडून संपूर्ण महसूल व्यवस्था डिजिटल करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ‘पेपरलेस व पारदर्शक प्रशासन’ देण्यावर भर दिला जात आहे. ई-सुनावणी ही संकल्पना सामान्य नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यामुळे महसूल प्रकरणांवरील निर्णय लवकर होतील आणि कामकाजात अधिक सुसूत्रता येईल. लवकरच तालुका कार्यालयांमध्येही ही…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर शहरातील हनुमान जयंती मिरवणुकीतील हिंदुत्ववादी युवकांवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या, शहरात बोकाळलेले अवैध मटका, जुगार आणि दारूचे अड्डे तातडीने बंद करा, मारहाणीच्या बळी ठरलेल्या ललित परदेशी यांच्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हेगारांना अटक करा अन्यथा, येत्या मंगळवारी (२२ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता संगमनेरचे युवक रस्त्यावर उतरून महामोर्चा काढतील! असा थेट आणि कडक इशारा काल गुरुवारी शहरातील संतप्त नागरिक आणि युवकांनी पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, संगमनेरात सध्या कायद्याचे राज्य संपले आहे. खुलेआम गुटखा विक्री, मटका, लोटो गेम, पत्त्याचे क्लब आणि अवैध देशी-विदेशी दारू विक्री तसेच बेकायदेशीर वाळू…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप आणि खळबळजनक दावे करणारे बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले अखेर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. बीड पोलिसांनी आज (शुक्रवार) पहाटे पुण्यातील स्वारगेट परिसरातून त्यांना अटक केली. कासले काल दिल्लीहून पुण्यात आले होते आणि स्वारगेटमधील एका हॉटेलमध्ये मुक्काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काल सायंकाळी आपण पोलिसांना शरण येणार असल्याचा व्हिडीओ कासले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र, त्यापूर्वीच बीड पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. रणजित कासले यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अनेक गंभीर आरोप केले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – राहाता राहाता तालुक्यातील गणेशनगर येथून एका १९ वर्षीय युवकाचे अपहरण करून, लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करत त्याचा खून करण्यात आला. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात स्कोडा गाडीच्या डिकीत टाकून दिला. या घृणास्पद कृत्याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत युवकाचे नाव प्रतीक वसंत सदाफळ (वय १९) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १२) रात्री सुमारे ११ वाजता गणेशनगर येथील निर्मळ रुग्णालयासमोरून त्याचे अपहरण झाले. संशयितांनी त्याला सिल्व्हर रंगाच्या स्कोडा गाडीच्या डिकीत टाकले आणि अज्ञात स्थळी नेऊन लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर | प्रतिनिधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी, शहरातील नामांकित डॉक्टर अमोल कर्पे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपलेली गुरुवारी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रविवारी (६ एप्रिल) संगमनेरमध्ये रामनवमी उत्सवाची धामधूम सुरू असताना हा संतापजनक प्रकार समोर आला होता. डॉ. कर्पे याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीला पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या टेरेसवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. व कोणाला काही सांगू नको, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी गेल्याचे पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील तलाठी अक्षय ढोबळे आणि खासगी व्यक्ती पत्रकार रमजान नजीर शेख हे ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. या प्रकाराने संगमनेरमध्ये खळबळ उडाली असून एसीबीच्या जाळ्यात सापडलेला शेख नेमका कशाचा पत्रकार आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. खडी वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराच्या गाड्यांवर कारवाई न करण्यासाठी आणि ती सुरळीत चालू ठेवण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७अ व १२ प्रमाणे घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या नाशिक युनिटने आणि घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर-अकोले तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना जमीन व गृह तारण कर्ज योजनेअंतर्गत कर्ज देण्याचे आमिष दाखवून मंजूर कर्जापैकी अल्प रक्कम कर्जदारांना देत उर्वरित रक्कम संस्थेचे व्यवस्थापक व संचालक मंडळाने कर्जदारांच्या खात्यातून परस्पर इतरांच्या नावे वर्ग केल्याचा आरोप करत संगमनेर शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला या बेकायदेशीर कर्ज प्रकरणांसंदर्भात कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी संस्थेने काय माहिती दिली हे अद्याप समजू शकले नाही. प्राप्त माहितीनुसार, कर्जदारांनी संस्थेने नियमबाह्य कर्ज व्यवहार करून गैरप्रकार केल्याचा आरोप केला असून, याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा आणि अन्य शासकीय न्यायिक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर परिसरातील उद्योग आणि व्यवसायासाठी आधारस्तंभ ठरलेल्या संगमनेर मर्चंट बँकेने आपल्या हीरक महोत्सवी वर्षामध्ये एक हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असल्याचे उद्योजक राजेश मालपाणी यांनी म्हटले आहे. बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा एकदा पाचव्यांदा राजेश मालपाणी यांची एकमताने निवड झाली आहे, तर व्हाईस चेअरमन म्हणून मधुसूदन नावंदर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक संतोष कोरे आणि सहकार अधिकारी राजेंद्र वाकचौरे यांच्या देखरेखेखाली बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात बुधवारी (१६ एप्रिल) चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी अनुक्रमे राजेश मालपाणी आणि मधुसूदन नावंदर यांचेच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात…
