Author: Annant Ppangarkar
संगमनेर-अकोले (प्रतिनिधी) जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करलेले अकोले तालुक्याचे सुपुत्र, शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर यांच्या कुटुंबीयांचे राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी (२९ मे २०२५) सांत्वन केले. यावेळी त्यांनी या सुपुत्राचा संपूर्ण महाराष्ट्राला सदैव अभिमान राहील, असे गौरवोद्गार काढले. ब्राह्मणवाडा येथे शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी बाळासाहेब थोरात उपस्थित होते. याप्रसंगी वीरपत्नी रूपाली गायकर, शहीद जवान संदीप यांचे वडील पांडुरंग गायकर, तसेच विक्रम नवले, सुरेश गडाख, ॲड. आर. बी. हांडे, शिवाजी नेहे, सुभाष गायकर, भारत आरोटे, संदीप वाघमारे, रजनीकांत भांगरे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जम्मू-काश्मीरमधील तिसवाड सेक्टरमध्ये…
संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन आरोपींना गावठी पिस्तूल आणि मोबाईलसह अटक केली. ही कारवाई महात्मा फुले शाळेजवळून घुलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. आरोपींकडून एकूण ६१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, यात ५०,००० रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, १०,००० रुपये किमतीचा वन प्लस नोड सी ई २ मोबाईल, आणि १,००० रुपयांचा एक बंद पडलेला मोबाईल फोन यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख मुजम्मील शेख मजिद (वय २२, रा. वाणी मुस्लमान बौध्द वाडा, जमुना, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि जमीरखान नजीरखान (वय ४०, रा. मिलन कॉलनी, ता. खामगाव, जि. बुलढाणा) अशी आहेत. संगमनेर शहर पोलिसांनी…
संगमनेर – प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्याच्या नवीन युवा धोरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण, २०१२’ या धोरणाच्या आधारे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी एक नवीन समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे. विधान परिषदेचे तीन आणि विधानसभेचे तीन अशा सहा आमदारांपैकी तयारी पक्षाचे पाच आमदार या समितीमध्ये असून सत्यजित तांबे या एकमेव अपक्ष आमदाराचा अपवाद वगळता विरोधी पक्षातील एकाही आमदाराला या समितीमध्ये संधी मिळू शकली नाही. या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तांबे यांच्यावरील विशेष प्रेम समोर आले असल्याचे राजकीय…
संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील साईनगरकडे जाणारा पूल रखडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये आलेल्या पुरामुळे हा पूल खचला होता. काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात आणि युवा आमदार सत्यजित तांबे यांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती. मात्र, स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी या कामाचे राजकारण करून ते जाणीवपूर्वक रखडवले असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक शैलेश कलंत्री यांनी केला आहे. कलंत्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, म्हाळुंगी नदीवरील पूल खचल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात आणि नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तात्काळ पाहणी करून नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी पुलाची व्यवस्था केली होती. तसेच, ३० नोव्हेंबर २०२२…
संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील नवीन पुलाचे उर्वरित अपूर्ण काम १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित ठेकेदारास दिले आहेत. हा पूल स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर दरम्यान असून, आमदार खताळ यांनी गुरुवारी सकाळी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे नेते श्रीराम गणपुले, ज्ञानेश्वर कर्पे, कैलास वाकचौरे, शिरीष मुळे, कैलास लोणारी, अविनाश थोरात, दगाबाई धात्रक, अल्पना तांबे, शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, आरपीआय (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष कैलास कासार, सागर भोईर, प्रशांत वाडेकर, निलेश कोंतम, लखन घोरपडे, विकास डमाळे, दिलीप अनाप, राहुल भोईर, शशांक नामन, सौरभ…
संगमनेर – प्रतिनिधी जनसुरक्षा विधायक कायद्याच्या विरोधात संगमनेरमधील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आज (गुरुवारी २९ मे २०२५) प्रांताधिकार्यांना निवेदन दिले. हा कायदा जनतेच्या सुरक्षेऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा असून, तो रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जनसुरक्षा विधायक कायद्याचे नाव जरी जनतेच्या सुरक्षेचे असले तरी, प्रत्यक्षात या कायद्यात जनतेच्या सुरक्षेसाठी काय आहे हे त्यात स्पष्ट केलेले नाही. विशेषतः, ‘शहरी नक्षलवाद’ या संकल्पनेची व्याख्याच या विधेयकात स्पष्ट करण्यात आलेली नाही. माओवाद आणि नक्षलवाद यावर हा कायदा लागू करणे ठीक असले तरी, ‘शहरी नक्षलवाद’ या अस्पष्ट संकल्पनेखाली संपूर्ण राज्यात हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले…
संगमनेर, २९ मे २०२५ संगमनेर शहरातील लालतारा परिसरातील नागरिकांना सध्या वाढत्या अस्वच्छतेमुळे गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कचऱ्याचे ढिगारे, मृत जनावरांची कातडी आणि सर्वत्र पसरलेली घाण यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रश्नावर नगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लालतारा परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक भागांतील कचरा आणि विशेषतः मृत जनावरांची कातडी सर्रास लालतारा परिसरात आणून टाकली जाते. यामुळे या भागाला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आले असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी या समस्येबद्दल…
अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील चास तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घराजवळ साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २७ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. अमितेश बलराज बिडे (वय १०) आणि अनिकेत बलराज बिडे (वय ०६, रा. चास, ता. अहिल्यानगर) अशी मयत भावंडांची नावे आहेत. या घटनेने चास परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी अमितेश आणि अनिकेत हे दोघे भाऊ त्यांच्या घराजवळ खेळत असताना पावसाच्या पाण्यामुळे साचलेल्या एका डबक्यात पडले. ही बाब लक्षात येताच, त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ त्यांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोघेही बेशुद्ध झाले होते. त्यांचे चुलते…
मुंबई, २८ मे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथील स्मृतीस्थळाच्या जतन आणि संवर्धनासाठी ६८१ कोटी ३२ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज नियोजन विभागाने जारी केला. या आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची जबाबदारी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सातत्याने बैठका घेऊन केलेल्या पाठपुराव्यामुळे हा शासन निर्णय वेळेत जारी होऊ शकला आहे. जगातील महान स्त्री राज्यकर्त्यांपैकी एक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथील स्मृतीस्थळाचा विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार विशेष प्रयत्नशील होते. अर्थसंकल्पीय…
यशोधन कार्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी विशेष सुविधा सुरु; पालक व विद्यार्थ्यांना दिलासा
संगमनेर – प्रतिनिधी दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांच्या अडचणी लक्षात घेता, संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयाने यंदाही विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाची सुविधा सुरू केली असल्याची माहिती यशोधनचे मुख्याधिकारी डॉ. नितीन भांड यांनी दिली आहे. या दाखल्यांचा समावेश… राज्याचे माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना आता एकाच ठिकाणी उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर, डोमिसाईल, नॅशनॅलिटी, डोंगरी आणि जात प्रमाणपत्र यांसारखे आवश्यक दाखले तात्काळ मिळवता येणार आहेत. ऐतिहासिक निर्णयाची आठवण आणि सद्यस्थिती… माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकाळात राज्यभरात ‘शाळेतच दाखले’…
छत्रपती संभाजीनगर- वर्ग-२ मधील जमीन वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्यासाठी ४१ लाखांची लाच घेताना छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद गोंडुराव खिरोळकर आणि त्यांचा महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर खिरोळकर यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत तब्बल ६७ लाख ४५ हजार रुपयांचे घबाड सापडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर तालुक्यातील तिसगाव येथील ६ हजार १८ गुंठे वर्ग-२ जमीन एका व्यक्तीने नियमानुसार खरेदी केली होती. ही जमीन वर्ग-१ मध्ये करण्यासाठी खिरोळकर आणि त्रिभुवन यांनी आधीच २३ लाख रुपये घेतले होते. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि चलन देण्यासाठी त्यांनी आणखी १८ लाख रुपयांची मागणी केली. यातील ५ लाख रुपये…
अहिल्यानगर दि.२७- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी अरुण उंडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २८ मे ते १० जुन २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई राज्य सरकारने शेतसारा न भरल्यामुळे सरकारच्या ताब्यात गेलेल्या आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करणारा अध्यादेश अखेर जाहीर झाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे दीड हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, अंदाजे ५ हजार एकर जमिनींचा मार्ग मोकळा झाला आहे. निर्णयाची पार्श्वभूमी… सध्या राज्यात सुमारे ५ हजार एकर आकारीपड जमिनी आहेत, त्यापैकी एकट्या पुणे विभागात ५९७ एकर जमीन आहे. मार्च महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या जमिनी मूळ शेतकरी, मालक किंवा त्यांच्या वारसांना परत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अध्यादेश प्रसिद्ध न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळत…
संगमनेर, अनंत पांगारकर दहावी, बारावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी सध्या विद्यार्थी आणि पालकांची मोठी धावपळ सुरू आहे. उत्पन्न, जात, अधिवास, नॉन क्रिमीलेअर यांसारख्या दाखल्यांसाठी त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २०१३ मध्ये सुरू केलेल्या “शाळेतूनच दाखले वाटप” योजनेची आठवण पालकांना होत आहे. थोरातांच्या दूरदृष्टीने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा ठरला होता आणि आता तो पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. थोरातांचा ऐतिहासिक निर्णय आणि त्याचे फायदे… २०१३ मध्ये महसूल मंत्री असताना, बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक बनवण्यासाठी ‘सुवर्ण…
अहिल्यानगर – महाराष्ट्र संवाद न्यूज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार आनंद भंडारी यांनी सोमवारी स्वीकारला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात अमरावती येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेले मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना येरेकर म्हणाले, आई-वडिलांमुळे लहानपणापासूनच कष्ट करण्याची आणि गुणवत्तेची सवय लागली. गडचिरोली ते अमरावती व्हाया अहिल्यानगर हा प्रवास माझ्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. अनेक अधिकारी आणि विविध विभागांसोबत काम करताना जिल्हा परिषद या संस्थेची प्रतिष्ठा वाढवण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. येथील विविध उपक्रम आणि प्रगतीचा मला अभिमान आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये जिल्ह्याला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी संस्थांचे सतत…
महाराष्ट्र संवाद न्यूज – स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेटच्या मॅनेजरला चार लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी शेवगाव येथील शिवसेनेच्या नवप्रविष्ट महिला नेत्या विद्याताई जावेद गाडेकर आणि त्यांचे पती जावेद यासीन पठाण यांच्याविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण… अतुल नामदेव अटकळे (वय ३७, रा. जुना ठाणे शहर), रिलायन्स कॉर्पोरेटचे मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ डिसेंबर २०२० रोजी जावेद यासीन पठाणने अटकळे यांना त्यांच्या विद्यानगर येथील घरी बोलावले. त्यावेळी त्यांची पत्नी विद्या गाडेकरही उपस्थित होत्या. पठाणने त्यांना घरातील चैतन्य कानिफनाथ मढी यांच्या गादीचे दर्शन घ्यायला लावले आणि घरातील सोन्याचे दागिने दाखवून आपला सोने…
अहिल्यानगर, २६ मे: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आषाढी वारीच्या दिंडी सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यासाठी प्रशासन आणि वारकरी यांच्यात समन्वयाची ग्वाही दिली आहे. त्यांनी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आषाढी वारी नियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, ह.भ.प. अशोक सावंत आदी उपस्थित होते. मंत्री विखे यांनी सांगितले की, जिल्ह्यातून २६० दिंड्या करमाळा मार्गे सोलापूर जिल्ह्यात जातात.…
संगमनेर – नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली आणि अपघातप्रवण ठिकाणांवरील कामे मार्गी लागणार आहेत. आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कामांना तात्काळ मंजुरी देत, संबंधित विभागांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. चंदनापुरी येथील प्रमोद राहाणे, रामभाऊ राहाणे आणि अंकुश राहाणे यांनी नाशिक-पुणे महामार्गावरील अपूर्ण व अपघातप्रवण ठिकाणच्या कामांना मंजुरी मिळावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार खताळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोणी येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी आले असता, त्यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत पत्र दिले होते. त्यांच्या या मागणीला…
सिन्नर, नाशिक: मान्सूनच्या आगमनासोबतच नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले असून, सिन्नर तालुक्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. पावसामुळे राज्यात सर्वोत्कृष्ट व हायटेक गणल्या जात असलेल्या सिन्नरच्या अद्ययावत बसस्थानकाचा काही भाग तुफानी पावसामुळे कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एक शिवशाही बस आणि काही इतर वाहने ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बसस्थानकातील दुर्घटनेने खळबळ… आज राज्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मात्र, या पावसाचा सर्वाधिक फटका सिन्नर बसस्थानकाला बसला आहे. सिन्नरच्या हायटेक बसस्थानकाचा स्लॅब कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण…
संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी संगमनेर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या १५ जूनपर्यंत शहरातील सिग्नल पूर्ववत सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, बंद पडलेली वाहतूक शाखा पुन्हा सुरू करण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले. शनिवारी (२४ मे रोजी) अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील तिसवाड सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र, जवान संदीप पांडुरंग गायकर (वय ३२) यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी ते उपस्थित होते. या निमित्ताने घार्गे यांनी…
