Author: Annant Ppangarkar

अहिल्यानगर,  जिल्ह्याचे नवे एसपी सोमनाथ घार्गे यांनी जिल्हा पोलीस दलात फेरबदल केले असून सात पोलीस निरीक्षकांसह तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचीदेखील बदली करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना पाठविण्यात आले आहे. एसपी घार्गे यांनी काढलेल्या आदेशामुळे आता जिल्ह्यातील शेवगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर पोलीस ठाण्यांना पोलीस निरीक्षक मिळणार आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांच्या देखील बदलीचे आदेश काढण्यात…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी शौचालयासाठी शेतात जाण्यावरून झालेल्या वादानंतर संगमनेर तालुक्यातील कर्जुलेपठार येथे एका महिलेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मयत महिलेची नणंदही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुपाली ज्ञानदेव वाघ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून मोनिका वाघ असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कर्जुलेपठार येथील रहिवासी अजित दादाभाऊ वाघ (वय २५) यांनी संदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराजवळच मुरलीधर रामकृष्ण पडवळ यांचे कुटुंब राहते. घरात शौचालय नसल्याने वाघ कुटुंबीय अनेकदा मुरलीधर पडवळ…

Read More

संगमनेर, ११ जून २०२५  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेने संगमनेरमधील काही रिक्त पदांवर नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनी ही माहिती दिली. यापूर्वीची कार्यकारिणी कायम ठेवत, पक्षाच्या वरिष्ठांच्या निर्देशानुसार रिक्त झालेल्या जागांवर या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ज्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्यात पंकज पडवळ (युवा सेना उपजिल्हाधिकारी, ग्रामीण), लक्ष्मण सोन्नर (युवा सेना पठार भाग तालुका अधिकारी) आणि सागर भागवत (युवा सेना तालुका अधिकारी, तळेगाव भाग) यांचा समावेश आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावर अमृतवाहिनी कॉलेजजवळ आयशर टेम्पो आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतवाहिनी कॉलेज जवळ गुंजाळ शॉपीसमोर २३ मे रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. या संदर्भात मंगळवारी अवधुत धोंडीबुवा भारती (वय ३५, रा. जाधववाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. हिप्परगा, पोस्ट हाडोली बी.एस., ता. कंधार, जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २३ मे रोजी पहाटे ४ वाजता आपला आयशर टेम्पो (क्र. एमएच ०५ डीके १६२५) घेऊन नाशिक-पुणे…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी  अकोले व संगमनेर तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी. या दोन्ही तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी सिंचन प्रकल्प व योजनांच्या कामांचे सर्वेक्षण करून याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकोले मतदारसंघातील जलसंपदा विभागातील विकास कामे आणि संगमनेर तालुक्यातील साकुर व पठार भागातील जलनियोजन संदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता तथा सहसचिव संजीव टाटू आदी उपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी विशेष गुण असतात या गुणांचा उपयोग करून महिलांनी स्वतःला सक्षम करावे आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करावं, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी करीत महिला बचत गटांच्या माध्यमातून सर्वच महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारून आत्मनिर्भर व्हावे, अस आवाहन केलं. संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात, वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित ‘उत्सव माझ्या कुंकवाचा वटसावित्री पौर्णिमेचा’ या विशेष महिला कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत संगमनेर तालुक्यात यंदाच्या वटसावित्री पौर्णिमेला तालुक्यातील १७१ गावे, २५८ वाड्या आणि विविध वस्त्यांवरील महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात २५२५ वटवृक्षांचे रोपण आणि पूजन केले. या उपक्रमातून त्यांनी केवळ वटपौर्णिमा साजरी केली नाही, तर वृक्षसंवर्धनाचा एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, दंडकारण्य अभियान समिती आणि अमृत उद्योग समूह यांच्या सहकार्याने हे अभियान एका लोकचळवळीत रूपांतरित झाले आहे. प्रकल्पप्रमुख दुर्गाताई तांबे आणि कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली, यावर्षी महिलांनी लावलेल्या या वटवृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यात जिल्हा आणि सत्र न्यायालयातील मान्यवर न्यायाधीश, सरकारी वकील आणि वकील संघाचे पदाधिकारी तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या आदर्शांना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश दिलीपराव घुमरे आणि जिल्हा न्यायाधीश नेर्लेकर यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि दूरदृष्टीचे महत्त्व विषद केले. त्यांनी महाराजांचे न्याय आणि सुशासनाचे आदर्श अधोरेखित केले. यावेळी सहाय्यक सरकारी अभियोक्ता मच्छिंद्र गवते, संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष जगन्नाथ वामन, ज्येष्ठ वकील…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर शहरात गोवंश हत्या सातत्याने सुरू असून, वेळोवेळी हे प्रकार उघडकीस येत असतानाही यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने सलग दोन दिवस बेकायदेशीर कत्तलखान्यांवर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांनी १७ गुन्हे दाखल करत ७३ गोवंश जनावरांना कत्तलीपासून वाचवल्याचे सांगितले. कसायांवर केवळ कागदोपत्री गुन्हे दाखल होत असल्याने व ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आली आहे. या गंभीर विषयावर यापूर्वी आक्रमक भूमिका घेणारे हिंदुत्ववादी नेते आणि संघटना तसेच सुरुवातीला कत्तलखान्यांविरोधात संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी थेट भूमिका घेतल्यानंतर काही कसायांचे वाडे पाडण्यात आले मात्र, त्यानंतर देखील हा व्यवसाय पूर्ववत सुरू…

Read More

मुंबई:  रविवारी सकाळी एका ६० वर्षीय पतीने पत्नीची गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. राजमनोहर नम्पेली (६०) आणि त्यांची पत्नी लता नम्पेली (५५) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना वरळीतील सिद्धार्थनगर परिसरात घडली. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना हे वृद्ध दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजमनोहर यांनी पहाटे साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान झोपेत असलेल्या पत्नी लता यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून घेतली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेवेळी…

Read More

मुंबई, दि. ९:  गेल्या दोन आठवड्यांपासून प्रतीक्षेत असलेला मान्सून अजूनही रुसला असून, किमान १५ जूनपर्यंत तरी महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावण्याची शक्यता नाही. त्यामुळे १४ जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टीचा अपवाद वगळता उर्वरित राज्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात उष्णतेची लाट! – या काळात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः पूर्व विदर्भात पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये तो ४० अंशांवरच राहील. मराठवाडा आणि खानदेशातही अनेक ठिकाणी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तुरळक पावसाची शक्यता, पण मान्सून नाही- १४ जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक मान्सूनचा…

Read More

पुणे –  पुणे महानगरपालिकेतील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला मानसिक त्रास देऊन सातत्याने छळ केल्याच्या आरोपानंतर भारतीय जनता पार्टी (भाजप) कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार कदम आणि त्यांचे सहकारी अक्षय कांबळे यांना पुणे महापालिकेत प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत, ज्यामुळे हे प्रकरण राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याने केलेल्या आरोपानुसार, गेल्या पाच महिन्यांपासून ओंकार कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून तिला सातत्याने त्रास दिला जात होता. यामध्ये जबरदस्तीने तिच्या दालनात प्रवेश करून छायाचित्रण करणे, दरवाजा बंद करून दमदाटी करणे, आणि अपमानास्पद भाषा वापरणे अशा घटनांचा समावेश आहे. विशेष…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना धमकावून त्यांच्याकडून २८ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ही घटना बोपदेव घाटात ६ जून रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांची तक्रार आहे की, पुण्याच्या कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई विक्रम वडतीले आणि त्याचा मित्र केदार जाधव यांनी त्यांना थांबवले. या दोघांनी विद्यार्थ्यांची बँग तपासली आणि हुक्क्याचे साहित्य त्यांच्याजवळ आढळल्याचे सांगितले. या प्रकरणी, गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वडतीले आणि जाधव यांनी विद्यार्थ्यांकडून ३० हजार रुपयांची खंडणी मागितली. अखेर, मध्यस्थीनंतर, केदार जाधव याच्या गुगल पेवर २८ हजार…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – राज्यात गोवंश हत्या बंदी असतानाही सर्रासपणे गोवंश कत्तलखाने सुरु असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. संगमनेर शहर पोलिसांनी बेकायदेशीर कत्तलखान्यांवर धडक कारवाई करत ७३ गोवंश जनावरांची कत्तलीतून सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या सतरा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बकरी ईद सणाचे औचित्य साधून अवैध गोमांसाची खरेदी-विक्री व कत्तलीच्या घटना वाढण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कत्तलखान्यांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक…

Read More

मोठा गाजावाजा करत नागपूर ते इगतपुरी दरम्यानच्या समृध्दी महामार्गाचं तिसरं उद्घाटन पार पडलं. महामार्गाचा हा अंतिम टप्पा असल्याने या उद्घाटनाला महत्व प्राप्त होणं स्वाभाविक होतं. हा महामार्ग हाती का घेण्यात आला याविषयी आजही कुतुहल आहे. महामार्ग झाला की असंख्य उद्योग विदर्भ आणि मराठवाडा सारख्या मागास भागात येतील, परिणामी शेतकर्‍यांच्या मुलांना उद्योग आणि नोकर्‍या उपलब्ध होतील, असा गुळाचा खडा सरकारने तिथल्या जनतेच्या हाताला चिकटवला होता. महामार्गाचा पहिला टप्पा शिर्डीपर्यंत सुरू करण्यात येऊन दीड वर्षांचा अवधी पुढे गेला. ज्या कारणासाठी महामार्गाची उभारणी करण्यात आली त्या विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योग वाढीला चालना मिळालीच नाही. मागास भागाचा विकास होत असेल तर अशा महामार्गाला विरोध…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी पठार भागातील पाण्याची दीर्घकाळ चाललेली समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. येत्या बुधवारी मंत्रालयात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मोरवाडी धरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. वरवंडी येथे आमदार खताळ यांच्या पेढेतुला कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार खताळ म्हणाले की, पठार भागासाठी मोरवाडी धरण व्हावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या धरणासाठी पूर्वी जागाही संपादित करण्यात आली होती. मात्र, नंतर मुळा नदीवर राहुरी तालुक्यात मुळा धरण बांधले गेले. सद्यस्थितीत मुळा नदीवर आंबीत व पिंपळगाव खांड ही दोन धरणे आहेत. दुर्दैवाने, पिंपळगाव खांड धरणाच्या…

Read More

मुंबई । प्रतिनिधी शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी १०० अथवा ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांकडून स्टॅम्पपेपरची मागणी करण्यात येऊ नये, अशी सक्त ताकीद बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिली आहे. बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात विद्यार्थी, पालक, पक्षकार तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन महिन्यापूर्वी जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच न्यायालयासमोर दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर रद्द करण्यात आले आहेत.…

Read More

संगमनेर / छत्रपती संभाजीनगर – श्रीमंत घरच्या मुलांची ‘स्थळं’ शोधून त्यांना लग्न करून देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला बीडच्या वडवणी पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणी संगमनेरच्या तीन महिलांसह कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एक बनावट नवरी असून, त्यांच्याकडून एक चारचाकी वाहन आणि एकाच नावाचे विविध आधारकार्ड जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वैभवी शेटे (बनावट नवरी), मनीषा ननावरे (नवरीची मैत्रीण), रणजीत अहिरे (कारचालक, तिघेही रा. संगमनेर) आणि यमुनाबाई (मध्यस्थी) यांचा समावेश आहे. या टोळीच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली. लग्नासाठी मुली मिळत नसलेल्या अनेक गरीब,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर शहरातील राहाणेमळा परिसरात असलेल्या हॉटेल सुरजच्या व्यवस्थापकाला चॉपरचा धाक दाखवून गल्ल्यातील सुमारे साडेअकरा हजाराची रोख रक्कम लांबविण्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला आहे. मद्यधुंद अवस्थेतील तीन तरुणांनी हा प्रकार केला असून त्यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये गुन्हेगारी वाढीस लागले असल्याने वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक भयभीत झाल्याचे दिसत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील श्रीरामनगर येथील रहिवासी असलेले धीरज राजेंद्र पावडे, अक्षय रामा भुजबळ आणि शुभम दिवे या तिघांनी मद्यधुंद अवस्थेत गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास राहाणे मळा येथील हॉटेल सूरजमध्ये प्रवेश केला. पावडे याने हॉटेलचे व्यवस्थापक हरीश थोरात यांना…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी निळवंडे धरण हे आपल्या जीवनातील ध्यासपर्व मानून आपण सातत्याने काम केले. मंत्रिमंडळात विविध मंत्रिपदाच्या माध्यमातून धरण व कालव्यांच्या कामासाठी निधी मिळवला व काम सुरू ठेवले. आता उजव्या व डाव्या कालव्यातून आलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचल्याने स्वप्नपूर्ती झाली असून कालव्यांच्या वरील भागातील जे शेतकरी आहेत त्यांनाही पाणी देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरणासह कालव्यांचे निर्माते राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. घुलेवाडी येथे जलपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच निर्मला राऊत, भाऊसाहेब पानसरे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब पानसरे, भास्कर पानसरे आदीसह ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ कार्यकर्ते व युवक कार्यकर्ते तसेच घुलेवाडी विविध कार्यकारी…

Read More