Author: Annant Ppangarkar
संगमनेर, दि. २० फेब्रुवारी – आयशर टेम्पो चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या घराची भिंत तोडून घरात घुसला. घरात घुसलेल्या टेम्पोमुळे मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेले अख्खे कुटुंबीय बचावले असले तरी गंभीर जखमी झाले आहे. जखमी कुटुंबीयांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी मध्यरात्री बारा वाजेच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर ही अपघाताची घटना घडली. मनोहर विठ्ठल थोरात (वय ९९), राजू मनोहर थोरात (वय ५८), जुली राजू थोरात (वय ४८), सायली राजू थोरात (वय १९) व सॅम्युवेल राजू थोरात (वय १७) अशी जखमींची नावे आहेत. मध्यरात्रीच्या वेळी आयशर चालक त्याच्या ताब्यातील आयशरवरील (MH 17 CV 1110)…
बुधवार, दि. १९ फेब्रुवारी मळीचा टँकर मागे घेत असताना चाकाखाली सापडून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर शहरानजीच्या रायतेवाडी शिवारात घडली. रवींद्र आबासाहेब कालेकर (वय ३७ वर्ष, रा. रांजणगाव बुद्रुक, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी टँकर चालक सुभाष पांडुरंग बोर्डे (रा. रांजणगाव बुद्रुक, ता. राहाता) यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासानंतर फिर्यादीने फिर्याद दिल्यावर टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुभाष बोर्डे हे त्यांच्या ताब्यातील…
बुधवार, दि. १९ फेब्रुवारी – लोकशाहीची मूल्य रुजवणारा आदर्श राजा, उत्तम प्रशासन, दूरदृष्टीचे नेतृत्व, शूरता आणि उत्तम व्यवस्थापन असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र हे प्रत्येकासाठी यशाचे पैलू निर्माण करून देणारे असून अपयशावर मात करण्यासाठी शिवचरित्र अभ्यासणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले आहे. मालपाणी लॉन्स येथे एकविरा फाउंडेशन व छत्रपती प्रतिष्ठान यांच्यावतीने राजे शिवछत्रपती यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, छत्रपती प्रतिष्ठानचे सचिन आहेर, गणेश मादास, तेजस गोरडे, शैलेश आहेर, ऋषी काकड,…
संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी – लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली वैभवशाली ठरलेल्या संगमनेर संगमनेर शहरात येणाऱ्या वर्षाच्या आतच प्रत्येकाची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बस स्थानकासमोर उभा करून पुढील वर्षीची जयंती येथे साजरी करू असा विश्वास नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला. बुधवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर तांबे बोलत होते. यावेळी सोमेश्वर दिवटे, किशोर पवार, सतीश आहेर, अंबादास आडेप आदीसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते. तांबे म्हणाले, लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये बस स्थानकासमोर भव्य अश्वारूढ पुतळा वर्षभराच्या आतच उभा राहणार आहे. या पुतळ्यासाठी नगरपरिषदेने…
संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी – संगमनेर शहरातील बस स्थानकाच्या परिसरात अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व अहिल्यानगरचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू होणार असून एक वर्षाच्या आत हा पुतळा बसस्थानक परिसरातच उभा राहणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरकरांना दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने लहान व मोठ्या मुला-मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवचरित्राचे अभ्यासक चंद्रशेखर कानडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष कोथमीरे, भाजपचे…
संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांनी सांगितलेला मानवता धर्म पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात आदींनी अभिवादन केले. शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगरसेवक गणेश मादास, रामहरी कातोरे, जीवन पंचारिया, धीरज टाक, डॉ. सुचित गांधी, आलोक बर्डे, खंडू सातपुते, अंबादास आडेप, सुमित पवार,…
संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संगमनेरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शिवजयंती रथाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उत्तर नगर जिल्हा सहसंयोजक अवधूत खोल्लम, संगमनेर शहर मंत्री हर्ष खोल्लम, संगमनेर शहर सहमंत्री प्रणव आसने, संगमनेर सहमंत्री मधुरा पोळ, संगमनेर कार्यालय मंत्री अक्षदा गोसावी, तंत्रनिकेतन अभियांत्रिकी प्रकल्प संयोजक वेदांत काळे, जिज्ञासा संयोजक विजय गडाख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक व देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली. या वेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा…
अहिल्यानगर, दि. १९- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, जिल्हा प्रशासन अहिल्यानगर आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहिल्यानगरतर्फे शहरात माळीवाडा बसस्टँड शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ‘जय छत्रपती शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. हलगी-संबळ वादन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जीवंत देखावे आणि पारंपरिक खेळांच्या चित्तथरारक सादरीकरणाने शिवकाळ उभा केला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेचा शुभारंभ केला. आमदार संग्राम जगताप आणि श्री. सालीमठ यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि शिव प्रतिमेला अभिषेक करून…
अकोले, दि. १९ फेब्रुवारी – अकोले तालुक्याच्या ग्रामीण भागातून धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. ५ वर्षाच्या बालिकेला आपल्या घरी बोलावत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश संतु कासार (रा. शेरणखेल, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) याच्या विरोधात पोस्को कायदा कलम ४, ८, १२, ०९ (एम), अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(२)(व्ही) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आकाश कासार याने रविवारी (१६ फेब्रुवारी) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान पीडित पाच वर्षाच्या बालिकेला आईने घरी बोलावले आहे असे सांगून स्वतःच्या घरी नेले. तेथे त्याने या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे तक्रारीत…
संगमनेर, दि. १८ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे सुरू असलेल्या कादर शहावली संदल दरम्यान दोन गटात झालेल्या दगडफेकीत एक जण जखमी झाला असून सात जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील समनापूर येथे सुरू असलेल्या यात्रे दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास समनापुर येथील मारुती मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणात घडली. ज्यावेळी दोन्ही गटात दगडफेक करण्यात आली. यासंदर्भात शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गॅरेज व्यवसाय करणारा पंकज गोरक्षनाथ नेहे (वय ३२, रा. चांडे वस्ती, निळवंडे रोड, समनापुर ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) हा तरुण सोमवारी (१७…
मुंबई, दि. १८ फेब्रुवारी – नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने मंगळवारी बदल्या केल्या. यात आहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा समावेश असून त्यांच्यावर पुण्यात आता मोठी जबाबदारी टाकण्यात आली असून ते पुण्याचे नवे साखर आयुक्त असतील. सालीमठ यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी म्हणून अद्याप नवीन नियुक्ती करण्यात आलेली नाही. राज्य सरकारने या अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या… १) डॉ. विजय सुर्यवंशी (IAS: NON-SCS:2006) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २) डॉ. राजेश देशमुख (IAS:SCS:2008) विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांना आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. ३)…
अहिल्यानगर, दि. १८ फेब्रुवारी – खांबावर जाहिरात फलक लावल्याप्रकरणी संगमनेरमधील अकॅडमी चालकाविरुद्ध अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील जाहिरात फलकांचा (फ्लेक्स) विषय चर्चेत आला आहे. अहिल्यानगर पुणे रस्त्यावर उड्डाणपुलाच्या खांबाला जाहिरातीचा फलक लावल्याप्रकरणी संगमनेर येथील आर्य अकॅडमी चे सुनील खंडेराव फटांगरे (रा. सायखिंडी, ता. संगमनेर) यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरणास प्रतिबंध अधिनियम २९९६ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अहिल्यानगर महापालिकेचे प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी अहिल्यानगर पुणे रस्त्यावरील उड्डाणपुलाखालील रस्त्यावर स्वच्छता करत होते. यावेळी…
संगमनेर, दि. १८ फेब्रुवारी – सकल मराठा समाजाच्यावतीन गेल्या दहा वर्षापासून १९ फेब्रुवारीला संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षी मात्र या उत्सवाला गालबोट लागले आहे. काही मंडळींनी दादागिरी करून हा जयंती उत्सव रद्द करण्यास सकल मराठा समाजाला भाग पाडल्याची माहिती समोर येत आहे. शिवजयंती उत्सवावरून संगमनेरमध्ये राजकारण तापलेले आहे. महायुतीच्यावतीने यावर्षी शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हा उत्सव संध्याकाळी मिरवणुकीने साजरा होणार होता. दरम्यान सकाळच्या सत्रात सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बसस्थानकाच्या दरम्यान शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार होता. यामध्ये सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, मॅरेथॉन, मर्दानी खेळ, लाईट शो, आरोग्य…
संगमनेर दि. १८ फेब्रुवारी – वेळेत आपल्या कामात सुधारणा करा नाहीतर बदल्या करून घ्या, माझ्या मतदारसंघात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देत येथून पुढे जर विजेचे रोहित्र जळाले तर ग्रामस्थांनी वर्गणी काढायची नाही तसेच तीन दिवसाच्या आत अधिकाऱ्यांनी वीज रोहित्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पठार भागातील साकुर उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या साकुर, मांडवे, कर्जुले पठार, डोळसणे, घारगाव, खांबे या महावितरणच्या उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांची आढावा बैठक खताळ यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडली. या बैठकीत ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभाराविरोधातील तक्रारींचा पाढाच आमदार खताळ यांच्यासमोर मांडला. यावेळी बाबासाहेब…
मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी – नव्या कायद्याअंतर्गत ज्ञानेश कुमार यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. ते सध्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची जागा घेतील. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या केंद्रीय निवडणूक आयोगातील कार्यकाळाला एक वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना बढती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवृत्तीनंतर त्यांना १४ मार्च २०२४ ला लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून घेण्यात आलं होतं. ज्ञानेश कुमार यांनी १४ मार्चला पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ मार्चला लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. ज्ञानेश कुमार हे १९८८ बॅचचे केरळ कॅडरचे…
संगमनेर, दि. १७ फेब्रुवारी – अनेक गावांसाठी गैरसोयीच्या ठरणाऱ्या आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालयाचा वाद चांगलाच पेटला आहे. तालुक्याचा विकास रोखण्यासाठी व तालुक्याची तोडफोड करण्यासाठी सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी कुटील डाव करत आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय नियोजित केले आहे. हा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करावा अन्यथा तालुका पेटून उठेल, असा आक्रमक इशारा कृती समितीने निवेदन देत प्रशासनाला दिला आहे. सोमवारी (१७ फेब्रुवारी) नव्याने होऊ घातलेल्या आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालयात समाविष्ट करण्यात येणाऱ्या ६२ गावांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या कार्यालयासमोर ‘जबाब दो’ म्हणत आंदोलन केले. यावेळी आर. बी. राहणे, भाऊराव रहाणे, शांताराम कढणे, सुभाष गुंजाळ, अरुण गुंजाळ, सिताराम…
अहिल्यानगर, दि. १७ – जिल्हा नियोजन समितीने डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना २०२४-२५ अंतर्गत मदरशांमध्ये मूलभूत आणि आधुनिक सुविधा पुरवण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. इच्छुक मदरशांनी २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा डॉ. झाकिर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेचे सदस्य सचिव दीपक दातीर यांनी केले आहे. मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरशांना मिळेल. एसपीक्यूईएम या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळणाऱ्या मदरशांना ही योजना लागू राहणार नाही. मदरशांमध्ये विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी व इंग्रजी इत्यादी विषयांचा अभ्यासक्रम राज्यशासनाच्या अन्य शाळांप्रमाणे राहील. तसेच, शिक्षकांचे प्रतिदिन ५ तासिका याप्रमाणे…
मुंबई, दि. १७ फेब्रुवारी – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा उद्या मंगळवारी (१८ फेब्रुवारी) मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ हे नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतील. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व कम्युनिकेशन विभागाचे चेअरमन पवन खेरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग…
संगमनेर – आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये झालेल्या “आय लव संगमनेर चळवळ” अंतर्गत युथोत्सव नोकरी मेळाव्यात जिल्हाभरातून ७२९० तरुणांनी सहभाग नोंदवला. या नोकरी मेळाव्यात सहभागी झालेल्या ९१ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून २०१९ विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड झाली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात आय लव संगमनेर लोक चळवळीच्यावतीने आयोजित युथोत्सव नोकरी मेळावा रविवारी पार पडला. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आयोजक आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, हर्ष मालपाणी, प्रज्वल भळगट, किरण रहाणे आदींसह विविध कंपन्यांचे एच आर मॅनेजर यावेळी उपस्थित होते. या नोकरी मेळाव्यात, कॅम्पस इंटरव्यू, रोजगार, व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती असे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगमनेर…
संगमनेर, दि. १६ फेब्रुवारी – प्रतिनिधी अन्न व औषध प्रशासनाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या संगमनेर मधील जोशी स्वीट होम वरील कारवाई टाळण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या युवा नेत्यामार्फत प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचे बोलले जात आहे.कच्चा आणि शिळा मिठ्ठावडा ग्राहकाला देऊन त्याच्याशी वाद घातल्याचा प्रकरणाचा व्हिडिओ मध्यंतरी समाज माध्यमात व्हायरल झाला होता. त्यानंतर संगमनेर मधील जोशी स्वीट होम चर्चेत आले होते. जोशी स्वीट होम मधील मिठाईसह अन्नपदार्थाची तपासणी अन्न व औषध प्रशासनाचा अधिकाऱ्यांनी केली होती. तपासणी दरम्यान काही नमुनेही ताब्यात घेण्यात आले होते. या तपासणीत काही गंभीर बाबी आढळून आल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यानंतर अन्न व औषध…
