Author: Annant Ppangarkar

अहिल्यानगर – गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा विभाजनासंदर्भात जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजना संदर्भात कोणताही प्रस्ताव नाही. एवढेच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव सरकार समोर नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर शहरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा प्रश्नच नाही. आपण महसूल मंत्री असताना जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव आला नव्हता. जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उडवतात हेच कळत नाही. जिल्हा बँकेचा कारभार पारदर्शक आणि भरती प्रक्रियेचे समर्थन – जिल्हा सहकारी बँकेच्या कारभार पारदर्शक असून, देशपातळीवर बँकेचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे. बँकेची भरती…

Read More

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पक्ष मुख्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यातील भाषणाने प्रस्थापितांचा चांगलाच तिळपापड झाला आहे. देशाची सत्ता ही आपला सर्वाधिकार असल्याचा समज झालेले सत्ताधारी भाजपचे पुढारी आणि संघाचे धुरीण विरोधी पक्ष नेत्यांच्या भाषणाचं कधीच कौतुक करू शकत नाहीत. सत्तेची गुलामी करणार्‍या माध्यमांनी तर आपली लाज गेल्या दहा वर्षांपासून खुंटीला टांगून ठेवल्याने राहुल यांच्या भाषणावर आग ओकण्याचे उद्योग यथासांग सुरू ठेवलेत. सरकारविरोधी चार शब्द बोललं की बुडाला आग लागावी असं चित्र माध्यमांचं आहे. काँग्रेस मुख्यालयाच्या उद्घाटनाच्या भाषणानिमित्त त्यांनी ती हौस भागवण्याचा प्रयत्न चालवला आहे. भाजपच्या सत्तेविषयी आणि त्यांच्या निर्णयांविषयी चांगलं काही बोलता येत नसलं की विरोधी पक्ष नेत्याला झोडा, त्याच्या…

Read More

मुंबई – दीर्घकाळ रखडलेली पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यास राज्य सरकारला अखेर मुहूर्त लाभला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मुंबई शहराचे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुचर्चित असलेल्या बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर व अमरावती या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद असेल. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्र्यांमध्ये वादग्रस्त ठरलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बहुचर्चित असलेल्या भरत गोगावले, योगेश कदम आणि इतर तिघा मंत्र्यांना डच्चू देण्यात आला असून अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याशिवाय काही जिल्ह्यांना सह पालकमंत्री देण्यात आले…

Read More

संगमनेर – दुचाकीवरून नाशिक पुणे मार्गाने संगमनेरकडे येणारे दोघेजण रस्त्यात आडव्या असलेल्या पतंगीच्या मांज्याला अडकून जखमी झाले आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. जखमींवर संगमनेर मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटने संदर्भात शनिवारी सायंकाळपर्यंत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.अनिकेत संजय कटारनवरे (वय २२ वर्ष रा. सिन्नर, जि. नाशिक) व प्रफुल्ल घुसळे (वय २८ वर्ष रा. संगमनेर) अशी दोघा जखमींची नावे असून अनिकेत कटारनवरे याची प्रकृती चिंताजनक असून मांजामुळे त्याच्या गळ्याला मोठी जखम झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी नासिक-पुणे महामार्गावर संगमनेरच्या बाह्यवळण रस्त्यावर…

Read More

संगमनेर – जय मल्हार क्रांती संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महासचिवपदी संगमनेरचे नंदकुमार बोऱ्हाडे यांची निवड करण्यात आली. सांगोला (सोलापूर) येथे पार पडलेल्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीत संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे राज्यातील पदाधिकारी निवडण्यात आले. या बैठकीत संघटनेच्या जिल्हास्तरीय कामाचा आढावा घेण्यात आला. संघटनेचे राष्ट्रीय नेते म्हणून दौलत नाना शितोळे यांची निवड करण्यात आली तर संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी अंकुश जाधव यांची निवड करण्यात आली. राज्यस्तरीय पदाधिकारी, विविध आघाडी आणि समित्यांच्या निवडी देखील यावेळी पार पडल्या. यावेळी संघटनेचे राज्यातील पदाधिकारी, अठरापगड संघटनेचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. राज्य अध्यक्षपदी अंकुश जाधव, युवक अध्यक्षपदी सुधीर नाईक, राज्य…

Read More

नागपूर – राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होऊन देखील अद्यापपर्यंत पालकमंत्र्यांचा पेच सुटू शकलेला नाही. २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन समोर असताना देखील अद्यापही पालकमंत्री निवडीस मुहूर्त लागू शकलेला नाही. पालकमंत्री निवडीवरून महायुतीत मतभेद असल्याचे बोलले जात आहे, या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे भाष्य करत २६ जानेवारी पूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे नाव जाहीर झालेले असेल असं म्हटले आहे. शुक्रवारी नागपुरात मंत्री बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पालकमंत्री नियुक्तीचा कोणताही पेच नाही. महायुतीचे सरकार असल्याने घटक पक्षांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागतो. येत्या २६ जानेवारीपूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे नाव जाहीर झालेले असेल. यापूर्वी बावनकुळे यांनी १५…

Read More

अहिल्यानगर – अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेच्या काळात अकार्यकारी पदावर बदली केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) अशा २० अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या आहेत. शुक्रवारी ओला यांनी या बदल्यांचे आदेश काढले. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संगमनेर पोलीस उपअधीक्षकांचे वाचक असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांची घारगाव (संगमनेर) पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. याशिवाय कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारूती मुळुक यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांना अर्ज शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे टीएमसीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.…

Read More

मुंबई, दि. १८ : एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. शुक्रवारी परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, नवीन बस खरेदीचा करताना पुढील पाच वर्षात स्क्रॅपिंग (प्रवासी सेवेतून बाद होणाऱ्या) होणाऱ्या बसेसचा विचार करण्यात यावा. याबाबत सर्वांगीण अभ्यास करून…

Read More

माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा लौकिक देशपातळीवर! संगमनेर – संगमनेरमधील सहकारमहर्षी चषकातून आयपीएलसह देशपातळीवरचे अनेक खेळाडू तयार होतील, असा विश्वास स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांनी व्यक्त केला. राज्यातील क्रिकेट स्पर्धांमध्ये सर्वात गौरवशाली ठरलेल्या सहकार महर्षी T-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या एस आर एस संघाने 277 धावांचे मोठे आव्हान उभे करून पुण्याच्या पुनीत बालन संघाचा 37 धावांनी पराभव करून मानाचा सहकार महर्षी चषक पटकावला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या 25 व्या वर्षातील क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी…

Read More

२० जानेवारीपासून दुकानासमोर बानोबी शेख करणार उपोषण संगमनेर – संगमनेर नगर परिषदेच्या मालकीच्या मिळकतीवर अवैधरित्या सुरू असलेले दारू विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी करण्यात आली असून यासंदर्भात पालिका व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील दखल घेतली जात नसल्याने येत्या सोमवारपासून (२० जानेवारी) दुकान समोरील रस्त्यावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असून या उपोषणात सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक सहभागी होणार आहे, अशी माहिती तक्रारकर्त्या बानोबी शेख यांनी दिली आहे. दरम्यान या विषयावरून दोन दिवसांपूर्वी संगमनेर नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी या परिसरातील नागरिक, माजी नगरसेवकांनी मुख्याधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला घेराव घालत संबंधित दुकानावर कारवाई करण्याची मागणी केली…

Read More

अहिल्यानगर ता. १७ – ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळून गावकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या स्वामित्व योजनेंतर्गत ५० लाख मालमत्ता पत्रकाचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात येणार आहे. शनिवारी (१८ जानेवारी) रोजी दुपारी १२-३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा (गोदावरी व कृष्‍णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या योजनेअंतर्गत भूमी अभिलेख विभागामार्फत आतापर्यंत ३ लाख १७ हजार गावांमधून ड्रोनद्वारे सर्व्हेचे काम पूर्ण करण्यात आले असुन १ लाख १९ हजार गावांमधून २ कोटी १९ लाख मालमत्ता पत्रक तयार करण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  नाशिक-पुणे महामार्गावर शुक्रवारी (१७ जानेवारी) सकाळी झालेल्या तीन वाहनांच्या भीषण अपघातामध्ये नऊ जणांचा करुण अंत झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमधील दुर्दैवी घटनेत आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला. आता त्या पाठोपाठ नारायणगाव जवळ झालेल्या या अपघातामुळे महाराष्ट्र हळहळला आहे. एसटी बस, ट्रक आणि मॅक्झिमो व्हॅनमध्ये हा मोठा अपघात झाला. देबुबाई दामू टाकळकर (वय ६५ वर्ष, रा. वैशखखेडे ता. जुन्नर जि. पुणे), विनोद केरूभाऊ रोकडे (वय ५० वर्ष, रा. कांदळी ता. जुन्नर जि. पुणे), युवराज महादेव वाव्हळ (वय २३ वर्ष, रा. १४ नंबर कांदळी ता. जुन्नर…

Read More

संगमनेर – १२ गायी आणि २ वासरांची संगमनेरच्या बेकायदेशीर कत्तलखान्यात कत्तल होण्यापूर्वीच पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी या गोवंश जनावरांना जीवदान दिले आहे. संगमनेर शहरातील मदिना नगर येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हा प्रकार समोर आला. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना मदिनानगरमधील एका काटवणामध्ये कत्तलीसाठी जिवंत गोवंश जनावरे बांधून ठेवले असल्याची माहिती मिळाली होती. सोनवणे यांनी यासंदर्भात आपल्या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस उपाधीक्षकांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे व पोलीस नाईक राहुल डोके यांचे घटनास्थळी जात मिळालेल्या माहितीच्या आधारे मदिनानगरमध्ये जात पाहणी केली असता पथकाला चौदा…

Read More

मुंबई – गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य निवडणूक आयुक्तपदाच्या उमेदवाराची शिफारस करण्याचे सर्वाधिकार देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यापूर्वी, राज्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाला राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांकडे नावाची शिफारस करण्याचे अधिकार होते, त्यानंतर मुख्यमंत्री ते नाव राज्यपालांकडे पाठवायचे. पण मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे आता मुख्यमंत्री राज्यपालांना थेट उमेदवाराची शिफारस करतील. राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक आहेत. तसेच येत्या काही महिन्यांत या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेण्यात येतात. स्थानिक स्वराज्य संस्थांवर…

Read More

मुंबई, दि. १६ : राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१६ जानेवारी) राज्य मंत्री परिषदेची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेट आणि राज्य मंत्री उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे ३४३ सेवा ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात. मात्र या सर्वच सेवा आपले…

Read More

मुंबई : महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. वेगवेगळे निर्णय घेत प्रशासनावर एकहाती अंमल बसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशातच त्यांच्या एका नवीन निर्णयामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या मंत्र्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नव्या सरकारमध्ये मंत्री आस्थापनेवर खासगी सचिव अथवा विशेष कार्य अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर खासगी व्यक्तीच्या नियुक्तीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मंत्र्यांना धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी महायुतीच्या आमदारांची शाळा घेतली. त्यावेळेस त्यांनी या सर्व आमदारांना महत्त्वाचा कानमंत्र दिला. सरकारी अधिकाऱ्यांसोबत नम्रपणे बोला, बदली आणि दलाली अशा कामापासून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील यात सहभागी असलेल्या बेरोजगार तरुणांना अद्यापही या योजनेचे मानधन मिळालेले नाही. या मानधना संदर्भात प्रांताधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शास्त्र भारतीय संघटनेच्यावतीने निवेदन पाठविण्यात आले आहे. सहभागी बेरोजगार तरुणांना मानधन न मिळाल्यास छात्र भारती संघटनेच्यावतीने राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. युवा वर्गाचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर वेळेत योग्य मार्गदर्शन आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी भांडवल उपलब्धता शासन विविध योजनांच्या माध्यमातून करून देत आहे. रोजगार इच्छुक युवक-युवती आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि युवा वर्गाला रोजगाराच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शेतात आईवडील कापुस वेचत असताना जवळच शेतात खेळत असलेल्या ९ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील कविटखेडा येथे बुधवारी (ता. १५ जानेवारी) रोजी घडली आहे. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यात खळबळ उडाली आहे. महेश सिद्धार्थ आखडे असे घटनेत मुत्यु झालेल्या शेतमजूर मुलांचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, गोरख चव्हाण यांच्या कविटखेडा शिवारातील गट क्रं १३३ मध्ये सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली. कविटखेडा शिवारात शेतातील कामे करण्यासाठी मध्यप्रदेश येथील शेतमजूर सकाळी कापूस वेचणीसाठी गेले होते. दरम्यान, त्यांचा ९ वर्षांचा मुलगा महेश हा शेतातच खेळत असताना दडी धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप…

Read More

संगमनेर – राज्यात बिबट्यांची संख्या वाढत असून त्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले चिंतेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली होती. त्यासंदर्भातील निवेदनदेखील त्यांनी सरकारला दिले होते. बिबट्यांच्या नसबंदीबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागत असल्याने तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी १४ जानेवारीला पत्रकार परिषदेत सांगितले. ऊस तोडल्यानंतर बिबट्यांचा अधिवास संपतो आणि ते मानवी वस्तीत जातात. मग मानवी वस्तीतील कुत्रे, शेतात काम करणारे शेतकरी यांच्यावर हल्ला होण्याचे प्रकार घडतात. आमदार सत्यजित तांबे यांनी चार दिवसांपूर्वी बिबट्यांच्या नसबंदीबाबत पत्र दिले आहे.…

Read More

जामखेड – शहरालगत असणाऱ्या जांबवडी रस्त्यावर बुधवारी भीषण अपघात घडला आहे. या अपघातात बोलेरो वाहन रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे नियंत्रण सुटून विहिरीत पडले. या दुर्दैवी घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. अशोक विठ्ठल शेळके (वय २९), रामहरी गंगाधर शेळके (वय ३५), किशोर मोहन पवार (वय ३०), चक्रपाणी सुनील बारस्कर (वय २५) अशी ह्या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहे. हे चौघेही अपघातग्रस्त बोलेरोमधून प्रवास करत होते. अपघातग्रस्त बोलेरो जांबवडी गावाच्या दिशेने जामखेडकडे येत असताना रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खडीवरून गेल्याने बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बोलेरो गाडी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडली. या घटनेमुळे अपघातस्थळी एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक…

Read More