Author: Annant Ppangarkar

सोमवार १६ डिसेंबर  अहिल्यानगर – जिल्ह्यात १९ ते २४ डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताहांतर्गत ‘प्रशासन गाव की ओर’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आदी उपस्थित होते. तर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सालीमठ म्हणाले, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करावे. विविध महामंडळांनी लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा. नाविन्यपूर्ण कल्पना वापरून नागरिकांना विविध सेवा सुलभपणे उपलब्ध करून द्याव्यात. गाव कचरामुक्त किंवा…

Read More

सोमवार १६ डिसेंबर  नागपूर – बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्तावादरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

बीड व परभणीच्या घटनांवर राज्यातील जनतेत तीव्र संताप, सरकारने उत्तर द्यावे… माजी मंत्री रविंद्र चव्हाणांच्या बंगल्यावर ९ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी तरुणाला किडनॅप करून अत्याचार. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधीपक्ष आक्रमक, ईव्हीएम व बीड, परभणीतील मुद्द्यांवर विधानभवनच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी. सोमवार १६ डिसेंबर नागपूर – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी व बीडमधील घटनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संविधानाची विटंबना व सरपंचाची निघृण हत्या या दोन्ही घटना भाजपा सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी व राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे. सरकारने या मुद्द्यांवर उत्तर द्यायची तयारी दाखवावी, अशी मागणी महाराष्ट्र…

Read More

सोमवार १६ डिसेंबर  रविवारी संध्याकाळी महायुतीच्या सरकारमधील ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मंत्रीपद न मिळाल्याने नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुरुवातीलाच मंत्रिपदावरून आमदारांमधील खदखद बाहेर आली आहे. भोंडेकर म्हणाले, मला भाजपातील पक्षप्रवेशासाठी नक्कीच देवेंद्र फडणवीसांचा आग्रह होता. मलाही ते नेते म्हणून आवडतात. परंतु माझ्यावर पक्षांतराचा डाग लागू नये म्हणून मी जुन्या शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पश्चातापाची वेळ आल्यासारखे वाटतं. इथं शिवसेना काहीच नाही, आम्ही आमच्या ताकदीवर आहोत. एवढे मोठे पद असताना अशी परिस्थिती येते तेव्हा नक्कीच मनात तसं वाटतं. मागच्या अडीच वर्षापूर्वी १० अपक्ष…

Read More

सोमवार १६ डिसेंबर संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात सन २०२४-२५ या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या १,८०,९११ साखर पोत्यांचे पूजन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी बोलताना थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करताना तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे. भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर साखर कारखान्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व सहकारी संस्थांची वाटचाल सुरू आहे. उच्चांकी भाव देण्याची परंपरा कारखान्याने कायम जपली असून चालू हंगामातही १० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त…

Read More

सोमवार १६ डिसेंबर – नागपूर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत काँग्रेसवर हल्लाबोल करताना घराणेशाही मोडून काढण्याचा संकल्प केला होता. दुसरीकडे राज्यात काँग्रेसची वाताहात करणाऱ्या महायुतीने आपल्या मंत्रिमंडळावर घराणेशाहीचा ठसा उमटविला असल्याचे दिसत आहे. ३९ मंत्र्यांच्या यादीत बहुतांश मंत्री घराणेशाहीतून आले असल्याचे दिसते. रविवारी नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात ३९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह ही संख्या ४२ वर गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारमध्ये चेहऱ्यांना संधी दिली असली तरी मंत्रिमंडळात या मंत्रिमंडळात आपल्याच पंतप्रधान मोदींच्या संकल्पाला तडा देत मंत्रिमंडळात घराणेशाहीतील मंत्र्यांची वर्णी लावली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत…

Read More

सोमवार १६ डिसेंबर सासऱ्याला निवृत्तीनंतर मिळालेले पैसे आपल्या नावावर करावे तसेच एक एकर जमीन आपल्या नावावर करावी, या मागणीसाठी सुनेने आणि तिच्या नातेवाईकांनी खोटा गुन्हा दाखल करत दिलेल्या त्रासाला वैतागून नैराश्य आलेल्या सासऱ्याने विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा दुर्दैवी प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. भाऊसाहेब ब्राम्हणे असे दुर्दैवी सासऱ्याचे नाव आहे. याबाबत भाऊसाहेब ब्राम्हणे यांची पत्नी लताबाई ब्राम्हणे (रा. चिंचोलीफाटा, ता. राहुरी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपले पती हे ए.डी.सी.सी. बँकेत नोकरीला होते. २०१६ साली ते सेवानिवृत्त झाले. मुलगा विशाल याचा विवाह १३ वर्षांपूर्वी चंद्रकांत ओहोळ (रा. फत्याबाद, ता. श्रीरामपूर) यांची मुलगी वर्षा…

Read More

सोमवार १६ डिसेंबर न्यूयॉर्क – जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांची वयाच्या ७३ व्या वर्षी कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये उपचार सुरू असतानाच रविवारी रात्री प्राणज्योत मालवली. त्यामुळे अखेरीस आता तबला अबोल झाला आहे. रविवारी सकाळी त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराशी संबंधित आजारामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्री त्यांची तब्येत आणखीन बिघडली आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला. पद्मविभूषण, ग्रॅमीसह विविध पुरस्कारांनी सन्मानित … उस्ताद झाकीर हुसेन यांना १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते. उस्ताद झाकीर…

Read More

रविवार १५ डिसेंबर  नागपूर – सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर मध्ये प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी नव्या मंत्र्यांची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नव्याने कॅबिनेट व राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले नवे मंत्री उपस्थित होते. या बैठकीच्या प्रारंभी राज्याचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसा शोक प्रस्ताव मंत्रिपरिषदेने मंजूर केला. शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना राज्य सरकार विरोधकांना देखील सोबत घेऊन काम करेन, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

Read More

रविवार, १५ डिसेंबर  संगमनेर – परभणी येथील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पोलिसांनी बेकायदेशीर कोंबिंग ऑपरेशन करत अनेक दलित कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले आहे. त्यातच वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला जामीन मंजूर होऊन देखील त्याचा मृत्यू कोठडीत झाल्याने पोलिसांनी त्याचा खून केल्याचा दलित समाजातील कार्यकर्त्यांचा समज झाला असल्याने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी (१६ डिसेंबर) महाराष्ट्र बंदची हाक दिली असून संगमनेर बंदचेही आवाहन करण्यात आले आहे. आरपीआयचे कैलास कासार, राम सुरळकर, बापू रणधीर, राम दारोळे, रवी दिवे, आशिष शेळके, विशाल वैराळ, वंचित बहुजन आघाडीचे अजितभाई व्होरा आधी विविध संघटनांच्यावतीने प्रांत अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज…

Read More

रविवार १५ डिसेंबर नागपूर – अखेर रविवारी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. नव्या सरकारमध्ये मुंडे बंधू-भगिनीला मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मंत्रिमंडळात मंत्र्यांचा अडीच अडीच वर्षाचा फॉर्मुला राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यपालांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली. नागपूर मध्ये ३३  वर्षानंतर दुसऱ्यांदा शपथविधी समारंभ पार पडत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा संधी मिळाली आहे. विखे यांना कोणते खाते मिळते याची आता जिल्ह्यात उत्सुकता लागली आहे. महायुती सरकारमध्ये जिल्ह्यातून विखे एकमेव मंत्री आहेत. आज झालेल्या ३९ मंत्र्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या १९, शिवसेनेच्या ११…

Read More

रविवार, १५ डिसेंबर संगमनेर – अपघाताच्या ठिकाणी समजावून सांगण्यासाठी गेलेल्या दोघांना सात जणांकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अभियंत्यासह दोघेजण जखमी झाले आहेत. मारहाण करणाऱ्या आरोपींवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. संगमनेर शहरातील तीन बत्ती चौकाजवळील पेट्रोल पंपासमोर शनिवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातावेळी मिलिंद बबन घुगे आणि अविनाश रोहिदास गुंजाळ हे दोघे समोरच्यांना समजावून सांगण्यासाठी गेले असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले आहे. मारहाणीत आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदार यांना टनक वस्तूने, बेल्टने मारहाण केल्याचे समोर आले आहे. तसेच फिर्यादीचा मोबाईल फोडून…

Read More

रविवार, १५ डिसेंबर संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी १ जानेवारी २०२५ पासून संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व गावांमध्ये महाआरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी असणाऱ्या या शिबिराअंतर्गत विविध आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जाणार आहे. या शिबिरात आढळणाऱ्या रुग्णांना पुढील उपचारासाठी एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत आणि अल्पदरात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी दिली. या आरोग्यशिबिराबाबत अधिक माहिती देताना डॉ. तांबे म्हणाले, एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्यावतीने राज्यातील २७ जिल्ह्यासह संगमनेर…

Read More

रोज टीव्ही पाहून त्याला कंटाळा आला होता . तशी इतक्या दिवसांच्या सुट्टीची सवय नव्हती त्याला.. आज त्याने ठरवलं मौन व्रत करायचं.. कुणाशी बोलायचं नाही आणि काहीच करायच नाही.. घरात सगळ्यांना तस सांगूनही टाकल… त्याच्या बायकोला तसा आनंद झाला.. तसही चांगल बोलण ह्यांना माहीतच नाही.. निदान आज कंप्लेंट तरी ऐकायला मिळणार नाहीत असा मनात विचार करून ती मनोमन सुखावली. आज तिने नास्ताला सकाळी डोसा केला मुद्दाम. ह्यांना डोसा आवडत नाही पण आज बोलणार नाहीत ठरवलं आहे, मग काय निदान रागाराग तरी करणार नाहीत. मुलांनी आवडीने डोसा खाल्ला त्यांची आवडती डिश. त्याने ही गुपचूप खायला सुरवात केली. खाताना त्याच्या लक्षात आले. किती…

Read More

रविवार, १५ डिसेंबर पुणे – बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देण्याचे अमिष दाखवत ७९ गुंतवणूकदारांची सुमारे साडेसात कोटींची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून दोघांसह अन्य दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये संगमनेरमधील एका आरोपीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. नितीन रावजी शेळके (रा. नारायणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन बाळासाहेब पोखरकर (वय ४१, रा. वारूळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), राजेंद्र सूर्यभान उपाध्याय (उपाध्ये) (वय ४२, रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांच्यासह आणखी दोघा अनोळखी व्यक्तींवर नारायणगाव पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगाव व परिसरातील सुमारे ७९ जणांची पीएलसी…

Read More

राज्यात आणि देशात सत्तेची तिसरी टर्म प्राप्त केलेला भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वाधिक घोडचुका केलेला नशिबवान पक्ष ठरला आहे. सत्तेची सत्तर वर्षं पूर्ण केलेल्या काँग्रेस पक्षाला जे जमलं नाही ते या पक्षाने लीलया करून दाखवलंय. असंख्य दोषांची मालिका भरीस असतानाही तो पक्ष सहज सत्ता मिळवतो आणि तितक्याच रुबाबात तो सत्तेची पाच वर्षं पूर्णही करतो. महाराष्ट्रात त्या पक्षाला जशी पवार कंपनी साथ देते तशी देशात कधी नितीशकुमार, चंद्राबाबू, तर कधी मेहबुबा आणि मायावती त्या पक्षाला तारतात. त्या पक्षाच्या विचारधारेपासून कोसभर दूर असलेले ‘अचानक’ मदतीला धावतात आणि सत्तेत सहभाग घेतात. २०१९ च्या महाराष्ट्रतील निवडणूक निकालानंतर मोक्याची वेळ साधत शरद पवार यांनी…

Read More

बाळासाहेब थोरात (माजीमंत्री महाराष्ट्र राज्य)  सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला अकोले तालुका हा पुरोगामी आणि डाव्या विचारांचा. संघर्ष आणि चळवळीतून तयार झालेले मधुकरराव पिचड हे अकोले तालुक्याने राज्याला दिलेले संघर्षशील नेतृत्व. विविध मंत्रिपदाच्या माध्यमातून आदिवासी समाजाकरता राज्यभर मोठे काम उभे करताना जलसिंचनाच्या माध्यमातून अकोले तालुका सुजलाम सुफलाम करण्याचे श्रेय हे तालुक्याचे आधारवड असलेल्या मधुकरराव पिचड साहेबांना जाते. अकोले आणि संगमनेर तालुका हे भाऊ-भाऊ म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी या तालुक्यांमध्ये अनेक चळवळी झाल्या आणि त्यामुळे डावी विचारसरणी इथे रुजली. सह्याद्री पर्वतांमध्ये वसलेल्या राजूर गावात मधुकरराव पिचड यांचा जन्म झाला. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी संघर्षातून नेतृत्व घडविले. सुरुवातीला अकोले तालुक्याचे सभापती आणि त्यानंतर ते…

Read More

शनिवार, १४ डिसेंबर  संगमनेर – शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच व्यवसाय पूर्व कौशल्य मिळावीत, आपली कार्य संस्कृती आणि आधुनिक व्यवसाय याविषयी माहिती तसेच स्वतःचे करिअर निवडण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी निरोगी व सुदृढ समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून संगमनेरमध्ये २१ ते २३ डिसेंबर दरम्यान भव्य कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कला महोत्सवाच्या दरम्यान ७२०० विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यवसाय पूर्व कौशल्य शिकविली जाणार आहे. महोत्सवादरम्यान २३ डिसेंबरला एकाच वेळी पाचवी ते नववी दरम्यान शिकणारे ७,२०० विद्यार्थी देशभक्तीपर गीतांचे गायन देखील करणार आहे. राज्याचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या भव्य उपक्रमाची माहिती एका पत्रकार…

Read More

शनिवार १४ डिसेंबर  मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून, आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. ‘माझ्या प्रदेशाध्यक्षपदाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून मला पदमुक्त करा’, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या १६ जागा मिळाल्याने काँग्रेसमध्ये आता या पराभवाची कारणमीमांसा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी केली आहे. प्रदेश कमिटी बरखास्त करा!… मी मागील ४ वर्षांपासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे.…

Read More

शनिवार १४ डिसेंबर  मुंबई : निवडणुका जवळ आल्या की, भाजपला हिंदुत्वाची आठवण होते. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, तेथील मंदिरे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. तरीही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प का? भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे हिंदुत्व गेले कुठे? निवडणुका जवळ आल्या की, मतांसाठी भाजपला हिंदुत्व आठवते, अशा तिखट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. हिंदुत्वावर भाजपची भूमिका काय ते आधी स्पष्ट करावे, असे खुले आव्हानही ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे. बांगलादेशातील गोरगरीब हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुंबईत दादरमधील ८० वर्षे जुने हनुमानाचे मंदिर रेल्वे प्रशासन पाडायला निघाले आहे, आता…

Read More