Author: Annant Ppangarkar
मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी – सराईत गुन्हेगार असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील शाहरुख रज्जाक शेख (वय ३२, रा. खैरी, ता. श्रीरामपूर) याला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्ट्यासह पकडले आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतुस, एक टोयोटा कंपनीची फॉरच्युनर, एक मोबाईल असा एकुण १० लाख ७४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान…
अहिल्यानगर, दि. ११ फेब्रुवारी – मतदान यंत्र पडताळणी प्रक्रियेत केवळ नेवासा मतदारसंघातील शिवसेनेचे (ठाकरे गट) पराभूत उमेदवार शंकरराव गडाख यांचाच अर्ज राहिल्याने गडाख यांच्या अर्जानुसार मतदान यंत्राची पडताळणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील एक व विधानसभा निवडणुकीतील १० अशा एकूण ११ पराभूत उमेदवारांनी निवडणुकीतील मतदान यंत्र पडताळणीसाठी अर्ज केले असले तरी प्रत्यक्षात मात्र आता केवळ एकच उमेदवार पडताळणीच्या रिंगणात राहिला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अहिल्यानगर मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी तसेच विधानसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब थोरात (काँग्रेस, संगमनेर), प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी-शरद पवार), प्रभावती घोगरे (काँग्रेस, शिर्डी), अभिषेक कळमकर (अहिल्यानगर, राष्ट्रवादी-शरद पवार), संदीप वर्पे (राष्ट्रवादी-शरद पवार, कोपरगाव), राम शिंदे (भाजप,…
मुंबई, दि. ११ फेब्रुवारी – मंगळवारपासून (११ फेब्रुवारी) राज्यात बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. ११ ते १८ मार्च दरम्यान ही परीक्षा होत आहे. राज्यभरातून या परीक्षेला पंधरा लाखाहून अधिक विद्यार्थी सामोरे जात आहे. यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या एकूण संख्येपैकी ८ लाख १० हजार ३४८ मुले, तर ६ लाख ९४ हजार ६५२ मुली आहेत. याशिवाय या परीक्षेला ३७ तृतीयपंथीयांनी देखील नोंदणी केली आहे. महाराष्ट्रात एकूण १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ३ हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.…
विशेष प्रतिनिधी / मुंबई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुहेरी धक्का दिला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडील एसटी महामंडळाची जबाबदारी सनदी अधिकाऱ्याकडे देण्याचा निर्णय घेत पहिला धक्का दिला. आता राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणावरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान न देण्याचा निर्णय घेत फडणवीस यांनी या प्राधिकरणातून शिंदे यांना बाजूला केल्याची चर्चा सुरु झाली आहे. जुलै २००५ रोजी मुंबईत आलेल्या महापुराच्या धर्तीवर राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केली होती. मात्र, आता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेत काही सुधारणा करण्यात आल्यात. यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वगळ्यात आलंय. त्यामुळं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
संगमनेर, दि. १० फेब्रुवारी – तिळगुळ देणे हा सण भारतीय परंपरेत पवित्र मानला जातो. मात्र तिळगुळ या समारंभाच्या नावाखाली महिलांना एकत्र करून तमाम महिला भगिनीसमोर लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या गाण्यांवर केलेला डान्स आणि धांगडधिंगा घालून संगमनेरमधील महिला भगिनींचा अपमान करणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. संगमनेर तालुक्यात अशी असभ्य संस्कृती मान्य नसल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे. शहरातील जाणता राजा मैदानावर तिळगुळ या कार्यक्रमाच्या नावाखाली महिलांना एकत्र करण्यात आले. अत्यंत गोंधळ झालेल्या या कार्यक्रमात महिलांची कोणतीही सुविधा नव्हती. फक्त राजकीय उद्देशाने सर्व महिलांना एकत्र केले होते. बक्षिसाच्या नावाखाली महिला भगिनींना लाच देण्याचा प्रकार काहीसा यामधून दिसत होता. बेशिस्त आणि…
संगमनेर दि. १० फेब्रुवारी – जनसेवा फाउंडेशनच्यावतीने मकर संक्रांतीनिमित्त संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा-सन्मान महिलांचा’ या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘झालय झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट’ आणि ‘मै हु डॉन’ या गाण्याच्या तालावर लहान बालगोपाळांमध्ये सहभागी होऊन माजी खा. डॉ. सुजय विखे व आ. अमोल खताळ यांनी ठेका धरत नृत्य सादर केले. त्यांच्या साथीला उपस्थित असलेल्या महिलांनी सुद्धा या गाण्याच्या तालावर ठेका धरत नृत्य सादर करत एकच जल्लोष साजरा केला. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे माजी खा. डॉ. सुजय विखे आणि रणरागिनी महिला…
अहिल्यानगर दि. १० – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाच्या बळावर परीक्षेला सामोरे जावे आणि यश संपादन करावे, अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. ‘आनंददायी परीक्षा’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. बालपणापासून केलेल्या शिक्षण साधनेची ही परीक्षा असून अशा महत्त्वाच्या प्रसंगी आई-वडिल, शिक्षक आणि राज्यशासनही विद्यार्थ्यांसोबत असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात जिल्हाधिकारी म्हणतात, विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी लेखनातील मुद्देसूदपणा, एकाग्रता आणि अभ्यासातील सातत्य या त्रिसूत्रीच्या बळावर परीक्षा आनंददायी बनवावी. आवृत्ती, पाठांतर आणि अखंड स्मरणाच्या आधारे परीक्षेला सोपे करून घ्यावे. प्रत्येक विषयाच्या परीक्षेला सामारे जातांना…
सोमवार दि. १० फेब्रुवारी – वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या नामांकित डॉक्टरच्या पत्नीने राहत्या घरात आतून दरवाजा लावून घेत छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये घडला होता. आता या प्रकरणी पोलिसांनी डॉ. सुशील कबाडी यांच्या विरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सायली सुशील कबाडी (वय ३३, रा. सिद्धिविनायक कॉलनी, शेवगाव) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर पत्नीचे नाव आहे. यासंदर्भात सायली कबाडी यांचे वडील चंद्रकांत हरिश्चंद्र परब यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून डॉ. सुशील जगन्नाथ कबाडी, सासरा व सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
सोमवार, दि. १० फेब्रुवारी – घरकुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या विटा बनविण्याकरिता गावानजीकच्या नाल्यातून माती उत्खनन करणाऱ्या तक्रारदाराच्या नातेवाईकाचा ट्रॅक्टर, मजूर आणि तक्रारदारावर वनविभागाच्या वनपालाने गुन्हा दाखल करण्याचा धाक दाखवत मातीसाठी वापरण्यात येणारा ट्रॅक्टर घेऊन गेला. प्रकरण मिटविण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाख दहा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तसेच लाचलुचपतच्या कारवाई दरम्यान प्रकरण मिटविण्यासाठी दुसऱ्या वनरक्षकाने ३५ हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तिघांवर लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी ममता नामदेव राठोड, वनपाल मारुती संभाजी गायकवाड आणि वनरक्षक गणेश उत्तम राठोड अशी कारवाई करण्यात आलेल्या तिघा लोकसेवक आरोपींची नावे आहे. एकाच वेळी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्गम…
सोमवार, दि. १० फेब्रुवारी – प्रतिनिधी या-ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत असलेल्या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नासिक-पुणे मार्गावर लुटमारीचा नवा प्रकार समोर आला आहे. ट्रक चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवत शेतीसाठी असलेल्या औषधांचे ५ लाख १२ हजार २१४ रुपयांचे १८१ बॉक्स आणि बॅग ट्रकमधून अज्ञात दोघे अनोळखी व्यक्तींनी पळविले आहेत. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील माहुली घाटामध्ये गेल्या आठवड्यात ही घटना घडली असून ट्रक चालकाच्या तोंडाला रुमाल लावून त्याला बेशुद्ध करून पिस्तूलचा वापर करीत लुटमार केल्याची घटना घडली. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीलगत पुणे जिल्ह्याचे सीमा असल्याने अहिल्यानगर पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे या परिसरात मोठी वर्दळ असते. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे या प्रकरणामुळे…
अनंत पांगारकर – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चाळीस वर्षाच्या राजकीय साम्राज्याला हादरा देत संगमनेरकरांच्या लोकप्रतिनिधीपदी आरूढ झालेले नवे आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून संगमनेर शहरात मोठा गाजावाजा करत अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. मात्र या मोहिमेला काही तास उलटत नाही तोच हटविलेली अतिक्रमणे पुन्हा जैसे थे होऊ लागली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी समाज माध्यमात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेले अमोल खताळ हेच शहराला, अधिकाऱ्यांना, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांना वठणीवर आणू शकतात, असे सांगत माजी मंत्री माजी आमदार थोरात यांच्या नावाने खडे फोडत सोशल मीडियावरील अति उत्साही समर्थकांनी रंगविलेले चित्र फक्त समाज माध्यमात चघळण्याचा विषय ठरले आहे. संगमनेर शहरात नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग,…
संगमनेर, ९ फेब्रुवारी – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त संगमनेर शहरात शिवसेना-महायुतीच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या सेवेचा वारसा पुढे न्यावा आणि पक्षाचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबवला गेला असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेतला. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदतीचा हात म्हणून शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, असा उद्देश होता. शिवसेनेचे खरे बळ म्हणजे पक्षासाठी अखंड निष्ठा…
अहिल्यानगर, दि. ०९ फेब्रुवारी दूध डेअरीची १७ लाखाची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन जात असताना फिर्यादीला लुटणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी तब्बल २ महिन्यानंतर जेरबंद करण्यात अहिल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ऋषीकेश उर्फ पप्पु अनिल कुसळकर (वय २१, रा. राजलक्ष्मी निवास, बाळकृष्ण नगर, पेठ रोड, पंचवटी नाशिक) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. पकडलेल्या आरोपीला राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास राहुरी पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आली. फिर्यादी अनिल मुरलीधर बनसोडे (वय ५१, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) हे दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी मुळा अँग्रो प्रोडक्ट लि. ब्राम्हणी, ता. राहुरी या कंपनीची १७ लाख रुपयांची…
शिर्डी, रविवार दि. ०९ – सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालविल्यास सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व राज्य शासनाचा सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार काशीनाथ दाते, सहकार विभागाचे अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्ष उदय जोशी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फिडरेशन…
संगमनेर, दि. ०९ फेब्रुवारी – लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून संगमनेर तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनेकरिता सुमारे ८०० कोटी रुपये निधी मंजूर करून काम सुरू केले. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय हेतू ठेवून अनेक कामे बंद पडली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत असून चंदनापुरी, झोळे व हिवरगाव पावसा जलजीवन योजनेतील पाणीपुरवठा योजनेचे बंद असलेले काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी सरपंच भाऊराव राहणे यांनी केली असून तातडीने काम न सुरू झाल्यास आत्मदहनाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत चंदनापुरीचे सरपंच भाऊराव राहणे, यांनी ज्येष्ठ नेते आर. बी. राहणे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन प्राधिकरण व जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन…
रविवार, दि. ९ फेब्रुवारी – दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तळीरामाला पुण्याच्या शिवाजीनगर मोटर वाहन न्यायालयाने कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. ३ ऑगस्ट २०२४ रोजी कोथरुड वाहतूक विभागाने रब्बीन रमजान शेख (वय २९, रा. जनवाडी, पुणे) याच्या विरोधात दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यान्वये खटला दाखल केला होता. बुधवारी (५ फेब्रुवारी) या खटल्याचा शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयातील न्यायाधीश बिराजदार यांनी निवाडा केला. न्यायालयाने शेख याला ५ दिवसांची साधी कैद आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्याच्या मुहुर्तावर पक्ष प्रमुख राज यांनी राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ सांगून टाकला. राज हे हजरजबाबी असल्याने त्यांच्या म्हणण्याला जरूर अर्थ असतो. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात निर्माण झालेल्या सन्नाट्याने निकालाचं सार सांगून टाकलं. निकाल किती योग्य आणि किती अयोग्य, याचे पाढे वाचले गेले. ज्यांना अपेक्षा नव्हती ते केवळ निवडूनच आले असं नाही तर त्यांना मिळालेली मतं ही अनपेक्षितच होती. अशा विजयाचा सोहळा कोणी साजरा करत नसतो. यामुळेच प्रचंड विजय होऊनही भाजप आणि त्यांच्या युती सरकारमधल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मौनात सोहळा साजरा केला. यापूर्वी असं कधी झालं नाही. अगदी एक दोन अतिरिक्त जागा मिळाल्या तरी आनंदाला पारावार…
विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली दिल्ली विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल समोर आला आहे. गेल्या ३ विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला भरभरुन मतदान केलं. पण त्याच दिल्लीकरांनी आता भाजपच्या झोळीत मतांचं दान टाकलं. भाजप आणि आपमध्ये थेट निवडणूक झाली. पण या सगळ्यात खरा गेम काँग्रेसनं केला. २०१५, २०२० आणि आता २०२५, अशा सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला दिल्लीत भोपळाही फोडता आलेला नाही. पण या निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवालांच्या आपचं मोठं नुकसान केलं. दिल्ली विधानसभेत एकूण ७० जागा आहेत. पैकी ४८ जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. तर आपने २२ जागांवर विजय नोंदवत एका मतदारसंघात आघाडी राखली आहे. काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही.…
शनिवार, दि. ०८ फेब्रुवारी – सोन्याच्या कारखान्यात घडविलेले सुमारे वीस लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन दागिन्याच्या दुकानात जात असताना कर्मचाऱ्यांच्या हातातील पिशवी हिसकावत पसार झालेल्या दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, चिरंजीत अंबिका बाग हे अभिजीत दास यांच्या ‘अभिजीत गोल्ड’ या सोन्याच्या कारखान्यात कामाला आहे. कारखान्यात घडवलेले १९ लाख ९४ हजार १०० रुपये किमतीचे २५५ ग्रॅम वजनाचे दागिने एका तांबड्या रंगाच्या पिशवीत घेऊन ते गुरुवारी पुण्याच्या मोती चौकातील पीपीएमएस गोल्ड येथे पायी घेऊन जात होते. मोती चौका जवळील पुष्पम गोल्ड या दुकानासमोर फुटपाथवरून जाताना त्यांच्याजवळ आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना पत्ता विचारण्याचा बहाना केला. त्याच…
शनिवार, दि. ०८ फेब्रुवारी – संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने शिर्डी येथे आपल्या राहत्या घराच्या बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर शिर्डीच्या साईनाथ सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. गणेश वाळके असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वाळके यापूर्वी शिर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असून शिर्डीतील भन्साळी स्क्वेअर इमारतीत राहत होते. या राहत्या घराच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत वाळके यांना शिर्डीच्या श्री साईनाथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये…
