Author: अनंत पांगारकर
मेष (Aries): आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. खर्च आणि मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील कामांचा ताण जाणवेल, परंतु महत्त्वाच्या कामांमध्ये धैर्य ठेवल्यास यश मिळेल. अचानक येणारे धोके आणि घाईने घेतलेल्या निर्णयापासून दूर राहा. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus): आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. आत्मविश्वास, वाढ आणि फायद्याचे योग आहेत, विशेषतः व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत. नवीन गुंतवणूक संधी मिळू शकतात. जुनी कामे पूर्ण होतील. भावना व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस आहे. मिथुन (Gemini): कार्यक्षेत्रातील गोष्टी तुमच्या बाजूने राहतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. छोट्या व्यापाऱ्यांसाठी चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.…
संगमनेर: पोलीस ठाण्यातच बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घालणे, पोलीस अंमलदाराच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि त्यांना अश्लील शिवीगाळ करणे, या गंभीर आरोपांखाली संगमनेर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी सहा निष्पन्न आरोपींसह एकूण १२ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश लक्ष्मण हासे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्या सहा आरोपींमध्ये सागर बागे, सुरज बागे, ऋषी आव्हाड, सागर पगारे, मनोज पगारे आणि सनी धारणकर यांचा समावेश आहे. या सहा आरोपींव्यतिरिक्त अन्य ०६ अनोळखी व्यक्तींवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बुधवारी (२२ ऑक्टोबर) रात्री ८.०० वाजेपासून ते…
संगमनेर – संगमनेर शहराचा सर्वांगीण विकास गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत असून, शहराने आज स्वच्छता, नियोजन आणि आधुनिकतेच्या बाबतीत एक आदर्श स्थान मिळवले आहे. नगरपरिषदेला मिळालेली विविध पारितोषिके हे या यशाचे उत्तम उदाहरण आहे. शहरात वाढत्या नागरिकांच्या वर्दळीचा आणि त्यांच्या सोयींचा विचार करून आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहरातील ई-टॉयलेट्ससाठी फेब्रुवारी २०२५ मध्ये एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असलेल्या प्रवरानदीवरील केशवतीर्थ घाटावर, दहाव्याच्या विधीच्या वेळी महिला व पुरुषांना कपडे बदलण्यासाठी योग्य सुविधा मिळत नव्हत्या. नागरिकांची ही मोठी अडचण लक्षात घेऊन आमदार तांबे यांनी पुढाकार घेतला आहे. काल (गुरुवार, २३ ऑक्टोंबर) आमदार…
संगमनेर – संगमनेर पोलिसांना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी प्राणघातक हत्यार व साहित्यानिशी पकडण्यात मोठे यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघा सराईत गुन्हेगारांना पकडले असून एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या टोळीतील आरोपींच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी (23 ऑक्टोंबर) मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. निखील विजय वाल्हेकर (वय 24 वर्षे, रा. वेल्हाळे, संगमनेर), अनिकेत गजानन मंडलिक (वय 23 वर्षे, रा. माळीवाडा, संगमनेर), मोहन विजय खरात (वय 19 वर्षे, रा. घुलेवाडी, संगमनेर) व आदित्य संजय शिंदे (वय 19 वर्षे, रा. अकोले नाका, संगमनेर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे असून साई शरद सुर्यवंशी (रा.…
मुंबई: राज्य सरकारकडून मंत्र्यांचे ‘ऑडिट’ केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सरकारच्या भूमिकेचे स्वागत करतानाच, मंत्र्यांच्या ‘पराक्रमां’कडे लक्ष वेधून अनेक गंभीर आणि थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या टिप्पणीत म्हटले आहे की, राज्य सरकार मंत्र्यांचं ऑडिट करणार असल्याची बातमी वाचायला मिळाली… मंत्र्यांचं ऑडिट होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. पवार यांनी पुढे म्हटले आहे की, पण मंत्र्यांचे सिडको, रॅपिडो, पत्ते, डान्सबार, हनी ट्रॅप, गुंडांसोबतची सलगी, बिल्डर आणि ठेकेदारांसोबतचे असलेले निकटचे संबंध आदी ‘पराक्रम’ बघितले तर या ऑडिटमध्ये अनेक…
संगमनेर – दिवाळीच्या तोंडावर संगमनेर बाजारपेठेत काही राजकीय कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्य किरकोळ दुकानदारांच्या दुकानांवर भगवे झेंडे लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कृतीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख अमर कतारी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, राजकीय पोळी भाजण्यासाठी गोरगरीब व्यापाऱ्यांचे नुकसान करू नका, असे आवाहन केले आहे. भगवा झेंडा आपल्या प्रत्येकाच्या घरावर असावा याला आपला निश्चितच विरोध नाही. परंतु, काही राजकीय मंडळी स्वतःला ‘कडवट’ हिंदुत्ववादी दाखवण्यासाठी किंवा आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हिंदू-मुस्लिम वादाला जन्म देत आहेत. छोट्या व्यावसायिकाला कोणत्याही पक्षाशी किंवा राजकारणाशी देणेघेणे नसते, तो फक्त आपल्या व्यवसायाची वाट पाहत असतो. जर आज हिंदू लोकांनी ‘जात बघून’ खरेदीचा विचार केला, तर…
मेष (Aries): करिअरच्या क्षेत्रात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. अचानक आर्थिक लाभाची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात सक्रियता वाढेल. परोपकाराच्या कामात पुढे असाल. कोणत्याही कामात घाईगडबडीत निर्णय घेणे टाळावे. वृषभ (Taurus): तुमचा कल भागीदारीच्या कामांवर आणि व्यवसायावर राहील. औद्योगिक विषयांना गती मिळेल आणि संबंध समजून घेण्यावर व सुधारण्यावर तुमचे लक्ष असेल. जमीन-इमारतीच्या कामांमध्ये प्रभावी राहाल आणि महत्त्वाची कामे पूर्ण कराल. प्रेम जीवन मधुर राहील. मिथुन (Gemini): तुमच्या कलागुणांमुळे तुम्ही लोकांचे मन जिंकू शकता. नवीन प्रकल्पांवर काम सुरू करण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात रोमांस भरलेला दिवस असेल. अविवाहित लोकांसाठी नवीन नात्यांची शक्यता आहे. कर्क (Cancer): कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव चांगला राहील. यश…
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात ऐन सणासुदीच्या काळात एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना घडली आहे. जिल्ह्यातील सोनई येथे मातंग समाजाच्या संजय वैरागर या तरुणाला गावातील १५ ते २० गावगुंडांनी अमानुष मारहाण केली. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी फोनद्वारे पीडित तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आहे. नेमकी घटना काय? – सोनई येथील रहिवासी असलेल्या संजय वैरागर या मातंग समाजाच्या तरुणाला त्याच गावातील १५ ते २० गुंडांनी गावातून उचलून अज्ञात स्थळी नेले. तिथे त्याला अमानुष मारहाण करण्यात आली. या गुंडांनी क्रूरतेची हद्द ओलांडत तरुणाच्या हात-पायांवरून मोटारसायकल चालवून हात-पाय मोडले. इतकेच नव्हे तर ‘फायटर’ नावाच्या शस्त्राने…
अहिल्यानगर: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (राष्ट्रवादी शरद पवार गट) युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची शिर्डी येथे भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांतील भांगरे आणि विखे-पाटील यांच्यातील ही दुसरी भेट असल्याने अमित भांगरे ‘तुतारी’ सोडून ‘कमळ’ हाती घेणार का, याबद्दल तर्क-वितर्कांना जोर आला आहे. भांगरे यांनी त्यांच्या आई सुनीता भांगरे यांच्यासह विखे-पाटील यांच्याशी शासकीय विश्रामगृह येथे बंद दाराआड चर्चा केली. या बैठकीला भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांचीही उपस्थिती होती. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे आगामी अध्यक्षपद अनुसूचित…
आजचा दिवस संमिश्र फळे देणारा आहे. चंद्र आज रात्रीपर्यंत तूळ राशीत राहील. आज भाऊबीजचा सण आहे, ज्यामुळे भावनिक संबंध आणि नातेसंबंधांवर विशेष लक्ष असेल. मेष – घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. धार्मिक यात्रा यशस्वी होईल आणि समाधान मिळेल. काही मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता असल्याने सावध राहा. वृषभ – कामाच्या ठिकाणी मालमत्ता खरेदीवर लक्ष केंद्रित केले जाईल. कर्जाच्या बाबी अनुकूल राहतील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता. मिथुन – काही काळापासून चाललेला तणाव दूर होऊन मनःशांती अनुभवाल. उत्पन्न आणि खर्चात योग्य समन्वय राहील. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. पोटाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. कर्क – आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा…
