Author: Annant Ppangarkar
संगमनेर, दि. २१ फेब्रुवारी – संगमनेरमधील साहित्यिक व संगमनेर महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक मा. रा. लामखडे यांना यंदाचा विद्रोही जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण शनिवारी (२२ फेब्रुवारी) छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या विद्रोही साहित्य संमेलनात केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्रामीण साहित्य चळवळीतील बहुमोल योगदानाबद्दल लामखडे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लामखडे हे सुरुवातीपासूनच ग्रामीण साहित्याच्या चळवळीत सहभागी राहिले आहेत. विद्यापीठ पातळीवर ग्रामीण साहित्याचा अभ्यास सुरू व्हावा म्हणून त्यांनी आग्रह धरला. त्यांच्या पुढाकारानेच पहिले ग्रामीण साहित्य संमेलन संगमनेर तालुक्यातील बोटा या गावी १९७९ मध्ये भरविले गेले होते. दलित…
संगमनेर – अनाधिकृतपणे सुरू असलेल्या संगमनेर शहरातील कत्तलखान्यांना पालिकेने नोटीसा बजावल्या होत्या. मात्र याकडे दुर्लक्ष करत हे कत्तलखाने सुरूच असल्याने अखेर गुरुवारी सकाळी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत पाच अवैध कत्तलखाने जमिनदोस्त केले. पालिकेने पाच कत्तलखाने जमीनदोस्त केल्याचे वृत्त समाधानकारक असले तरी मुख्य कत्तलखान्यांचे काय असा प्रश्न अद्यापही कायम आहे. कारण शहरात अधिक कत्तलखाने असून काही ठराविक कत्तलखान्यांवरच कारवाई झाल्याचे दिसते. कारवाईदरम्यान अनुचित प्रकार घडू यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या कत्तलखाने सुरू असून याची माहीती पोलीस व पालिका प्रशानला होती. यातील बहुतांशी कत्तलखान्यांवर पोलिसांनी वारंवार छापे देखील मारून कारवाया केल्या…
संगमनेर, दि. २१ फेब्रुवारी – बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद तस्करीच्या रूपाने बाहेरच्या देशातून कुरियर कंपनीच्या माध्यमातून भारतात आला असून तो संगमनेरमध्ये देखील आल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच पुण्याच्या डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात बनावट नोटा बाजारात येण्यापूर्वीच थांबविण्यात यश आले आहे. संगमनेरमधील रजनीकांत राजेंद्र राहणे (रा. राहणे मळा गुंजाळवाडी) हा त्याच्या राहत्या घरी भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवत असल्याची खात्रीशीर माहिती समोर आल्यानंतर पथकाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंजाळवाडी शिवारामध्ये गुरुवारी सकाळी ही कारवाई केली. कारवाईदरम्यान रजनीकांत राहणे याला पकडण्यात आले. राहणे याने हाय सेक्युरिटी थ्रेड असलेली रंगीत पट्टी असलेले पेपरचा वापर…
संगमनेर, दि. २० फेब्रुवारी – गेल्या काही दिवसांपासून संगमनेर महसूल प्रशासनाने कोणालाही विश्वासात न घेता परस्पर आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविल्यानंतर नव्याने होऊ घातलेल्या अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील गावावरून संगमनेर तालुक्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान याप्रकरणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि कृती समित्यांच्या आक्रमकतेनंतर सत्ताधारी नरमले असून तालुक्यातील महसूल मंडळाचे जनतेच्या दबावानंतर फेररचना होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणत्याही परिस्थितीत संगमनेर तालुक्याचे मोडतोड होऊ दिली जाणार नसल्याचा इशारा प्रशासनारा दिला होता. तर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील यासाठी मंत्रालयात पाठपुरावा केला. नव्या तहसील कार्यालयाच्या…
संगमनेर, दि. २० – प्रतिनिधी महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय आश्वी येथील अप्पर तहसिल कार्यालयाचा प्रस्ताव मंजूर करू नका अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महसूल विभागाच्या अप्पर सचिवांकडे केली असून, तशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या असल्याचे खताळ यांच्याकडून पाठविण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव संगमनेर तहसिल कार्यालयाने वरिष्ठांना सादर केला होता. अप्पर तहसिल कार्यालयाचा प्रस्ताव पाठविण्यापुर्वी महसूल मंडळाची फेररचना होणे अत्यंत गरजेचे होते. मात्र याबाबत संगमनेर तहसिल कार्यालयाने लोकप्रतिनीधीशी कोणतीही चर्चा न करता व संबधित गावातील लोकांच्या…
संगमनेर दि. २० फेब्रुवारी – अनंत पांगारकर मृत्यूनंतर माणसाचा शेवटचा प्रवास किमान सुखकर व्हावा अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते. मात्र मृत्यूनंतर त्याचे क्रिया कर्म करण्यासाठी जाणाऱ्यांना देखील मोठी कसरत करावे लागत असल्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला आहे. परिसरातील नागरिकांना दशक्रिया विधीसाठी प्रवरा संगमावर असलेल्या शांती घाटावर जाण्यासाठी गटारगंगा ओलांडून जावे लागत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रवरा आणि म्हाळुंगी नदीच्या संगमावर संगमनेर नगर परिषदेने दशक्रिया विधीसाठी शांती घाट बांधला आहे. शहरालगतच्या सुकेवाडी, पावबाकी, पोखरी हवेली, खांजापूर, समनापुर आदी ग्रामीण भागातून येथे नागरिक मोठ्या प्रमाणात दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी येत असतात. नगरपरिषदेने बांधलेल्या शांती घाटावर दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही…
गुरुवार, दि. २० फेब्रुवारी राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात नासिक जिल्हा न्यायालयाने गुरुवारी दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर मात्र अवघ्या दोन तासातच न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे मंत्रीपद आणि आमदारकीचे संकट तूर्तास तळले आहे. मंत्री कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुधीर कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून दिला जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. तर या खटल्यातील दोघांची न्यायालयाने मुक्तता केली. गुरुवारी न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर कोकाटे यांचे मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. निकालानंतर कोकाटे यांनी जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. कोकाटे…
संगमनेर, दि. २० फेब्रुवारी – संगमनेर शहरांनाजीक असलेल्या गुंजाळवाडी शिवारामध्ये बनावट नोटांची छपाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी थेट दिल्लीच्या गुप्तचर विभागाच्या आदेशाने पुणे गुप्तचर विभाग आणि संगमनेर पोलिसांनी कारवाई केली असून काही साहित्यासह एकाला ताब्यात घेतले आहे. संगमनेर मधील गुंजाळवाडी परिसरात एका घरात नोटा छापल्या जात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. यासंदर्भात दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी पुणे गुप्तचर विभागाला माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पुण्याच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर मध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात बनावट नोटा बनविण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर कागद आणि चलनातील काही बनावट नोटा ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. …
नाशिक, दि. २० फेब्रुवारी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याच्या आरोपात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तब्बल २९ वर्षांनी या खटल्यचा निकाल लागला आहे. १९९५ मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटेंच्या मंत्रीपदासह आमदारकीवर टांगती तलवार आली आहे. तर या खटल्यातील अन्य दोन आरोपींना न्यायालयाने कोणत्याही स्वरूपाची शिक्षा ठोठावली नाही. खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी १९९५ मध्ये सदनिकांच्या घोटाळ्या संबंधाने माणिकराव…
महाराष्ट्र संवादसाठी लंडनहून विशेष वृत्त | अनुराग फुटाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे प्रेरणास्थान ठरले आहे. महाराष्ट्राच्या या राज्याची जयंती साता समुद्रा पार लंडनमध्ये देखील मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. लंडनमध्ये मराठी युवकांनी साजरी केलेल्या या सोहळ्याला वेलविन हटफिल्ड बॉरो कौन्सिलचे महापौर फ्रॅंक मार्श यांनी आवर्जून उपस्थिती लावली आणि तमाम भारतीयांना शुभेच्छा दिल्या. युनिव्हरसिटी ऑफ हार्डफोर्टशायरमध्ये गर्जा महाराष्ट्र मंडळाने यासाठी पुढाकार घेतला होता. मार्श यांच्यासह हटफिल्डचे नगरसेवक कार्तिक बंकर हेही शिवजयंतीच्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. छत्रपती शिवरायांना मराठी, हिंदी, राजस्थानी, गुजराती विद्यार्थ्यांनी यावेळी अभिवादन केलं. विद्यार्थ्यांनी मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, तानाजी मालुसरे यांची रूपं रेखाटली…
संगमनेर, दि. २० फेब्रुवारी – आयशर टेम्पो चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या घराची भिंत तोडून घरात घुसला. घरात घुसलेल्या टेम्पोमुळे मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेले अख्खे कुटुंबीय बचावले असले तरी गंभीर जखमी झाले आहे. जखमी कुटुंबीयांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी मध्यरात्री बारा वाजेच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर ही अपघाताची घटना घडली. मनोहर विठ्ठल थोरात (वय ९९), राजू मनोहर थोरात (वय ५८), जुली राजू थोरात (वय ४८), सायली राजू थोरात (वय १९) व सॅम्युवेल राजू थोरात (वय १७) अशी जखमींची नावे आहेत. मध्यरात्रीच्या वेळी आयशर चालक त्याच्या ताब्यातील आयशरवरील (MH 17 CV 1110)…
बुधवार, दि. १९ फेब्रुवारी मळीचा टँकर मागे घेत असताना चाकाखाली सापडून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर शहरानजीच्या रायतेवाडी शिवारात घडली. रवींद्र आबासाहेब कालेकर (वय ३७ वर्ष, रा. रांजणगाव बुद्रुक, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी टँकर चालक सुभाष पांडुरंग बोर्डे (रा. रांजणगाव बुद्रुक, ता. राहाता) यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासानंतर फिर्यादीने फिर्याद दिल्यावर टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुभाष बोर्डे हे त्यांच्या ताब्यातील…
बुधवार, दि. १९ फेब्रुवारी – लोकशाहीची मूल्य रुजवणारा आदर्श राजा, उत्तम प्रशासन, दूरदृष्टीचे नेतृत्व, शूरता आणि उत्तम व्यवस्थापन असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र हे प्रत्येकासाठी यशाचे पैलू निर्माण करून देणारे असून अपयशावर मात करण्यासाठी शिवचरित्र अभ्यासणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले आहे. मालपाणी लॉन्स येथे एकविरा फाउंडेशन व छत्रपती प्रतिष्ठान यांच्यावतीने राजे शिवछत्रपती यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, छत्रपती प्रतिष्ठानचे सचिन आहेर, गणेश मादास, तेजस गोरडे, शैलेश आहेर, ऋषी काकड,…
संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी – लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली वैभवशाली ठरलेल्या संगमनेर संगमनेर शहरात येणाऱ्या वर्षाच्या आतच प्रत्येकाची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बस स्थानकासमोर उभा करून पुढील वर्षीची जयंती येथे साजरी करू असा विश्वास नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला. बुधवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर तांबे बोलत होते. यावेळी सोमेश्वर दिवटे, किशोर पवार, सतीश आहेर, अंबादास आडेप आदीसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते. तांबे म्हणाले, लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये बस स्थानकासमोर भव्य अश्वारूढ पुतळा वर्षभराच्या आतच उभा राहणार आहे. या पुतळ्यासाठी नगरपरिषदेने…
संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी – संगमनेर शहरातील बस स्थानकाच्या परिसरात अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व अहिल्यानगरचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू होणार असून एक वर्षाच्या आत हा पुतळा बसस्थानक परिसरातच उभा राहणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरकरांना दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने लहान व मोठ्या मुला-मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवचरित्राचे अभ्यासक चंद्रशेखर कानडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष कोथमीरे, भाजपचे…
संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांनी सांगितलेला मानवता धर्म पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात आदींनी अभिवादन केले. शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगरसेवक गणेश मादास, रामहरी कातोरे, जीवन पंचारिया, धीरज टाक, डॉ. सुचित गांधी, आलोक बर्डे, खंडू सातपुते, अंबादास आडेप, सुमित पवार,…
संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संगमनेरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शिवजयंती रथाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उत्तर नगर जिल्हा सहसंयोजक अवधूत खोल्लम, संगमनेर शहर मंत्री हर्ष खोल्लम, संगमनेर शहर सहमंत्री प्रणव आसने, संगमनेर सहमंत्री मधुरा पोळ, संगमनेर कार्यालय मंत्री अक्षदा गोसावी, तंत्रनिकेतन अभियांत्रिकी प्रकल्प संयोजक वेदांत काळे, जिज्ञासा संयोजक विजय गडाख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक व देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली. या वेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा…
अहिल्यानगर, दि. १९- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, जिल्हा प्रशासन अहिल्यानगर आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहिल्यानगरतर्फे शहरात माळीवाडा बसस्टँड शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ‘जय छत्रपती शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. हलगी-संबळ वादन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जीवंत देखावे आणि पारंपरिक खेळांच्या चित्तथरारक सादरीकरणाने शिवकाळ उभा केला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेचा शुभारंभ केला. आमदार संग्राम जगताप आणि श्री. सालीमठ यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि शिव प्रतिमेला अभिषेक करून…
अकोले, दि. १९ फेब्रुवारी – अकोले तालुक्याच्या ग्रामीण भागातून धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. ५ वर्षाच्या बालिकेला आपल्या घरी बोलावत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश संतु कासार (रा. शेरणखेल, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) याच्या विरोधात पोस्को कायदा कलम ४, ८, १२, ०९ (एम), अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(२)(व्ही) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आकाश कासार याने रविवारी (१६ फेब्रुवारी) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान पीडित पाच वर्षाच्या बालिकेला आईने घरी बोलावले आहे असे सांगून स्वतःच्या घरी नेले. तेथे त्याने या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे तक्रारीत…
संगमनेर, दि. १८ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे सुरू असलेल्या कादर शहावली संदल दरम्यान दोन गटात झालेल्या दगडफेकीत एक जण जखमी झाला असून सात जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील समनापूर येथे सुरू असलेल्या यात्रे दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास समनापुर येथील मारुती मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणात घडली. ज्यावेळी दोन्ही गटात दगडफेक करण्यात आली. यासंदर्भात शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गॅरेज व्यवसाय करणारा पंकज गोरक्षनाथ नेहे (वय ३२, रा. चांडे वस्ती, निळवंडे रोड, समनापुर ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) हा तरुण सोमवारी (१७…
