Author: Annant Ppangarkar

संगमनेर – विधानसभा निवडणुकीत संगमनेरात सत्ता बदल झाल्यानंतर येथील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. लोकविकास आघाडीच्या माध्यमातून तिसरा पर्याय उभा राहत असून होऊ घातलेल्या नगरपरिषद जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविली जाणार असून या संदर्भातील कृती कार्यक्रमाची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे रजत अवसक व दत्ता ढगे यांनी दिली. स्वातंत्र्य सैनिक साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठानमध्ये लोकशाही समाजवादी विचारांच्या नागरिकांची व्यापक बैठक पार पडली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्ञानज्योती फातिमामाई शेख यांना अभिवादन करून बैठकीची सुरुवात झाली होती. बैठकीत भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या लोकशाही समाजवादी विचारांचे राजकीय सामाजिक व सांस्कृतिक काम उभे करण्याचा निर्धार करण्यात आला तसेच लोकविकास आघाडीच्या…

Read More

संगमनेर – संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू तालुक्यातील समनापुर येथील सुरू असलेल्या पोक्सो संदर्भातील विशेष खटल्यात न्यायालयाने ६ महिलांसह ३ पुरुष आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. अवघ्या दोन वर्षात निकाली निघालेल्या या खटल्याकडे लक्ष लागले होते. समनापुर (संगमनेर) येथे फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या जमिनीवरून चुलत भाऊ व भावांसोबत न्यायालयात वाद सुरू होते. २ जुलै २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घराचा पाया खोदण्याचे काम सुरू होते. त्यावेळी संगणमताने आलेल्या आरोपींनी फिर्यादीला पाया खोदण्यास मनाई केली. फिर्यादी व तिच्या बहिणींना शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी आरोपीपैकी एकाने जवळच पडलेली व बांधकामासाठी आणलेली वीट उचलून फिर्यादीच्या पाठीत फेकून मारली. तर…

Read More

संगमनेर – शहरातील दिल्ली नाका येथे झालेल्या हाणामारी प्रकरणी अखेर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. अखेरीस गुन्हा दाखल झाल्याने आता या गुन्ह्याच्या तपासाकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमी विकास दीपक गायकवाड (रा. निळवंडे, संगमनेर) याच्या जबाबावरून भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११९(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(१) नुसार लकी पान स्टॉल दुकानातील इसम व अनोळखी १५ ते २० जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी त्यांच्या दोन मित्रांसोबत पान…

Read More

मुंबई – ०५ जानेवारी शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या पत्‍नी मेघनाताईं यांचे रविवारी !दिनांक ५ जानेवारी) अल्‍पश: आजाराने दु:खद निधन झाले. शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी मेघनाताईंच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन अंत्यदर्शन घेतले. यावेळी डॉ.गोर्हे यांनी गजानन कीर्तिकर, अमोल, गौरी, हर्षदा, सुप्रिया यांचे सांत्वन केले.

Read More

रविवार, ०५ जानेवारी  संगमनेर – परस्पर विरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याने अंतर्गत मतभेद आता पोलिसांपर्यंत पोहोचले असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या दौऱ्यावेळी घडलेल्या प्रकारामुळे हा दौरा वादग्रस्त ठरला आहे. रविवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सुयोग पंढरीनाथ गुंजाळ (रा. गुंजाळवाडी, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक भगत व साहेबराव वलवे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५, ३५२, ३५२(२) प्रमाणे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. परस्पर विरोधी तक्रारीमुळे पोलिस आता याप्रकरणी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान नववर्षाच्या प्रारंभी २ जानेवारीला शनिशिंगणापूर येथून त्रंबकेश्वर येथे जात असताना काही काळ संगमनेरमध्ये…

Read More

कफल्लक देशाला वळणावर आणणारे पंतप्रधान म्हणून ज्यांचा सर्वदूर उल्लेख होतो त्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या दु:खद निधनाच्या कळा प्रामाणिक देशभक्तांसाठी आजही कष्टप्रद आहेत. डॉ. सिंग यांनी देशाला घालून दिलेली अर्थव्यवस्थेची घडी नादान सत्तेमुळे आता पुरती विस्कटून गेली आहे. देशभक्तीचं स्तोम माजवणार्‍या आजच्या सत्ताधार्‍यांनी डॉ. सिंग यांच्या दु:खद निधनाचं राजकारण करून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. धार्मिक अधिष्ठानात मनुष्य प्राण्याला मरणांती परमेश्‍वराचं रूप दिलं आहे. मनमोहन हे तर देशासाठी अशाच परमेश्‍वराचं रूप असताना त्यांच्या वाट्याला मात्र या सत्ताधार्‍यांनी राजकारण आणलं आणि महान व्यक्तीच्या मृत्यूचंही भांडवल करत आपण किती नालायक आहोत, हे जगाला दाखवून दिलं. संकटात देशाला आणि देशवासीयांना जगण्याचा मार्ग ज्या महान…

Read More

संगमनेर – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान संगमनेर मार्गे त्रंबकेश्वरकडे जात असताना येथील शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. चौहान यांच्या दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत यांना आमदार समर्थक असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला होता. मारहाणीत जखमी झालेल्या भगत यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आमदार खताळ समर्थक असलेल्या सुयोग गुंजाळ आणि राहुल भोईर या दोघांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ हे शासकीय विश्रामगहावर उपस्थित असताना भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला खताळ समर्थकांनी धक्काबुक्की…

Read More

शनिवार, ०४ जानेवारी संगमनेर – गेल्या काही दिवसांपासून संगमनेर मध्ये सातत्याने धार्मिक वादाच्या घटना घडत आहे. शनिवारी सायंकाळी अशीच घटना पुन्हा एकदा घडल्याने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील संवेदनशील असलेल्या दिल्ली नाका परिसरात एका पान स्टॉलवर पान घेण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती समजताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्री थोरात यांनी रुग्णालयात जाऊन जखमी तरुणांची भेट घेतली. यावेळी तरुणांच्या नातेवाईकांनी मारहाण करणाऱ्या विरुद्ध मोठा संताप व्यक्त केला. शांतता असलेल्या संगमनेरमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल असे वर्तन कोणीही करू नये, मारहाण करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर…

Read More

खा. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत १२ जानेवारीला पुरस्कार वितरण शनिवार, ०४ जानेवारी  संगमनेर – ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात व कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराची घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या नावाने दिला जाणारा स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ. रावसाहेब कसबे यांना देण्यात येणार आहे. तर अण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने दिला जाणारा स्मृती पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला व सहकारातील आदर्श नेतृत्वाचा पुरस्कार राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांना जाहीर करण्यात आला आहे. यांनी केली घोषणा – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे व युवक काँग्रेस अध्यक्ष…

Read More

शनिवार, ०४ जानेवारी मुंबई – मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राज्य सरकारी कर्मचारी व अधिकारी यांना खाते उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मंजुरी देण्यात आली. याआधी प्रवीण दरेकर यांना सायन येथील कोट्यवधी रुपयांची जमीन नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजुरी देण्यात आली होती, त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्यावर राज्य सरकारची कृपादृष्टी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात दरेकर यांच्या बँकेत शासकीय कर्मचाऱ्यांना खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधीच्या…

Read More

अहिल्यानगर दि.४ – शेतकऱ्यांना अखंडित वीज उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सौर प्रकल्पासाठी प्रशासनाने जमीन उपलब्ध करून दिली असून प्रकल्पांच्या कामांना संबंधित संस्थेने गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्ह्यातील सौर प्रकल्पांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक राकेश ओला (दूरदृश्यप्रणालीद्वारे), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महावितरण आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सालीमठ म्हणाले, जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथे दोन ते तीन दिवसात काम सुरू करावे. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेचा विषय सातत्याने लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. करुणा मुंडे यांच्या कारमध्ये पिस्तूल ठेवणारी व्यक्ती पोलीस दलातील आहे. त्या व्यक्तीचं नाव मला माहित आहे, असा खळबळजनक दावा धस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. करुणा शर्मा-मुंडे ५ सप्टेंबर २०२१ रोजी परळीत गेल्या होत्या. त्या आधी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते. त्यातून बराच संघर्ष उफाळला. करुणा मुंडे परळीत असताना त्यांच्या कारमध्ये पिस्तूल आढळून आलं होतं. त्या प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याच प्रकरणाचा धागा पकडत…

Read More

शुक्रवार ३ जानेवारी  संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी शुक्रवारी पत्नी डॉ. मैथिली यांच्यासह स्वामी समर्थ सेवा केंद्रात जात आरती करत जनतेच्या सुख समृद्धी आणि निरामय आरोग्यासाठी प्रार्थना केली. या आरती मागील कारण स्वतः तांबे यांनी समाज माध्यमावर सांगितले आहे. आमदार तांबे म्हणाले, संगमनेर शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेला आलो असताना या केंद्राच्या आवारात वीज वितरण कंपनीची डीपी आहे आणि या डीपीतून सातत्याने शॉर्ट सर्किट होत असल्याने केंद्रात येणारे सेवेकरी भयभीत आहेत, ही बाब निदर्शनास आली. याबाबत तातडीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तिथली डीपी हलवली. याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी, केंद्राच्या…

Read More

शुक्रवार, ०३ जानेवारी मुंबई : वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या महिलांना, तसेच ज्यांच्या घरी चारचाकी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या काही लाडक्या बहिणी आता निवडणुकीआधी सरसकट योजनेचा लाभ देणाऱ्या सरकारसाठी ‘दोडक्या’ होणार आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही. मात्र काही अर्जांच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. कोणत्याही योजनेच्या रकमेत वाढ करायची असल्यास ती अध्येमध्ये न होता अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होते. त्यामुळे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याबाबत…

Read More

शुक्रवार, ०४ जानेवारी संगमनेर – संगमनेरमधील नासिक-पुणे मार्गावरील व्यावसायिकांच्या अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत असतानाच आता या व्यावसायिकांची रस्त्यावरील पार्किंग नागरिकांसाठी मनस्ताप ठरू लागली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी जोशी स्वीट होम समोरील दुचाकीची पार्किंग काढण्यात यावी, अशी मागणी आरपीआयचे (आठवले पक्ष) शहराध्यक्ष कैलास कासार यांनी केली आहे. प्रशासनाकडून तात्काळ हालचाल न झाल्यास या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. पोलीस स्टेशन-पडतानी कॉम्प्लेक्सकडून येणारी वाहने, मोमीनपुरा-छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून येणारी वाहने, नासिक-पुणे महामार्गावरून धावणारी वाहने जोशी स्वीट होमसमोर एकत्रित येतात. यामुळे येथे वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होत असतो. अशातच जोशी स्वीट होम या दुकानासमोर अस्ताव्यस्तपणे मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार आपल्याकडील दुचाकी पार्किंग करत…

Read More

भाजप आणि आमदार खताळ समर्थकांमधील वादाने दहशतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर संगमनेर, ०३ डिसेंबर समाज माध्यमातील पोस्ट आणि एकमेकांना टाँट मारण्यावरून भाजपच्या दोघा कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्याचे पर्यावरण थेट केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि संगमनेरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रमानंतर झालेल्या हाणामारीची चर्चा शहरात आणि समाज माध्यमात सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रमुखांसमोर हाणामारी करणारे हे पदाधिकारी कार्यकर्ते कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे कट्टर व विश्वासू समर्थक असलेल्या अमोल खताळ यांना अचानकपणे शिवसेनेकडून (शिंदे गट) उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये…

Read More

बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांशी संवाद शिर्डी, दि.३ – शेतकरी हा देशाचा प्राण आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. राहाता तालुक्यातील बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्र (पायरेन्स) येथे शेतकरी परिसंवादात चौहान यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुणे शाखेचे संचालक…

Read More

विशेष प्रतिनिधी | मुंबई  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ ला निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या वाल्मीक कराड याचे नाव समोर आले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. ही मागणी केवळ विरोधातील नेतेमंडळी किंवा आमदारांकडून होत आहे असे नाही तर महायुतीतील काही त्यांच्या सहकाऱ्यांकडून देखील होत आहे. या मागणी संदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांनी उलट प्रश्न केला आहे. मुंडे गुरुवारी (०२ जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीला उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर प्रसार…

Read More

मुंबई, ०२ जानेवारी : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांनाही (IAS) पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशाचे पत्र जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, मिलिंद म्हैसकर यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यभार देण्यात आला आहे. तर, वेणुगोपाल रेड्डी यांना उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि वन विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यातील बदल्या करण्यात आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांमध्ये दोन…

Read More

गुरुवार, ०२ जानेवारी संगमनेर – माजी नगराध्यक्ष दिवंगत भाजप नेते राधावल्लभ कासट यांच्या तीन मुलांसह त्यांच्या मित्राला नाशिक-पुणे मार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर गुंडागर्दी करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. संगमनेरकरांच्या संतापानंतर आणि मोर्चानंतर सुस्तावलेली तालुका पोलीस ठाण्याची यंत्रणा अखेर जागी झाली. वाहनाला धडक देणाऱ्या या घटनेतील पाच आरोपींना नाशिकमधून गुरुवारी पकडल्याची माहिती पत्रकाराऐवजी समाज माध्यमात प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.गेल्या आठवड्यात झालेल्या या प्रकारानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अतुल राधावल्लभ कासट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. आरोपींच्या अटकेसाठी व प्राणघातक हल्ल्याचे कलम पोलिसांनी या गुन्ह्यात वाढवावे. टोल नाका कायमस्वरूपी बंद…

Read More