Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी:  “काँग्रेसचा विचार हा जनकल्याणाचा शाश्वत विचार असून, संगमनेर तालुक्याची सुसंस्कृत राजकीय परंपरा टिकवण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे. तालुक्यात काही लोक दांडगाई करू पाहत आहेत, त्यांना वेळीच रोखले पाहिजे आणि चुकीच्या गोष्टींना येणाऱ्या काळात सडेतोड उत्तर द्यावेच लागेल,” असे कणखर प्रतिपादन काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे काँग्रेसचे नूतन तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्या सत्कार समारंभात शुक्रवारी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले, इंद्रजीत थोरात, मावळते अध्यक्ष मिलिंद कानवडे, डॉ. जयश्री थोरात, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, अर्चना बालोडे, संपतराव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज, ५ जुलै –  नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात भूखंड अदलाबदलीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी उपविभागीय अधिकारी (SDO) उदय किसवे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (४ जुलै २०२५) विधानसभेत ही घोषणा केली. मौजे संगमेश्वर आणि गुगळगाव येथील जमिनींच्या अदलाबदलीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप किसवे यांच्यावर आहे. त्यांनी संगमेश्वरची जमीन गुगळगावला आणि गुगळगावची जमीन संगमेश्वरला बेकायदेशीरपणे अदलाबदल केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महसूल मंत्री बावनकुळे यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. किसवे यांच्या निलंबनासोबतच, या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या आठ मुद्रांक अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, स्टॅम्पवेंडर जाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर:  अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १९,९०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, संदीप दरंदले, रणजीत जाधव, आकाश काळे आणि रमीजराजा आत्तार यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुरुवारी (३ जुलै) पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून दोन व्यक्ती ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून वाळू उपसा करून तिची…

Read More

अकोले, प्रतिनिधी:  भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रसिद्ध रंधा धबधबा प्रवाहित झाला असून पर्यटकांसाठी हे एक आकर्षक ठिकाण बनले आहे. भंडारदरा धरणातील पाणीसाठा आज ७४४१ दशलक्ष घनफूट (६७.४१%) झाला आहे. जलाशय परिचालन सूचीनुसार पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, भंडारदरा धरणातून विद्युतगृहामार्फत ८४५ क्युसेक तर सांडव्याच्या (स्पील वे) गेटमधून १०५८ क्युसेक, असे एकूण १९०३ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक कमी-जास्त झाल्यास विसर्ग कमी-जास्त केला जाईल, असे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितले. येत्या १५ जुलैपर्यंत धरणाची पाणीपातळी ६५% राखण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा चांगला…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील आनंदवाडीजवळ आज सकाळी (शुक्रवार, ४ जुलै) शालेय विद्यार्थ्यांची स्कूल बस पलटी होऊन चार विद्यार्थी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी, नीलम खताळ यांनी डॉ. गुंजाळ हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. साकूर पठार भागातील अनेक विद्यार्थी चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयात शिक्षणासाठी दररोज स्कूल बसने येतात. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास, चंदनेश्वर विद्यालयाची बस (क्र. MH 14 BA 8932) ३५ विद्यार्थ्यांना घेऊन चंदनापुरी घाटातून आनंदवाडीमार्गे विद्यालयाकडे जात होती. आनंदवाडी शिवारातील एका वळणावर एका वाहनचालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसचालकाला हुलकावणी दिली. बसचालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला घेतली असता, ती साईड…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  आज (शुक्रवारी) सकाळी चंदनेश्वर विद्यालयाची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन येत असताना चंदनापुरी घाटात एकेरी वाहतुकीमुळे साईड गटारात पलटली. या अपघातात चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले. ही बातमी मिळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने आपल्या यंत्रणा व कार्यकर्त्यांना मदतीसाठी सूचना दिल्या. यानंतर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी तातडीने घटनास्थळी आणि नंतर रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. चंदनापुरी घाटातील डॉ. गुंजाळ हॉस्पिटलमध्ये जखमी विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले आहे. इंद्रजीत थोरात यांच्यासोबत विजय राहणे, इंद्रजीत खेमनर, सरपंच भाऊराव रहाणे, बाळासाहेब सागर, किरण राहणे, बालमशेठ सरोदे, आनंदराव कढणे, बाळू सरोदे, संदीप सरोदे, दिनकर भालेराव यांच्यासह चंदनापुरी येथील विविध…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहरात, पोलिसांनी सुगंधित गुटखा आणि पान मसाल्याची अवैध विक्री आणि साठवणूक करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मालाचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे ४४५८४/- रुपये इतकी आहे. गुरुवारी, ३ जुलै २०२५ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संगमनेर खुर्द येथील आरोपी आहद रऊफ शेख (वय ३५, धंदा फेरी व्यापारी) याच्या राहत्या घरातून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल संतोष बाचकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम २६(२)(४)(५)(e) अंतर्गत गुन्हा क्रमांक ६१३/२०२५…

Read More

संगमनेर, ४ जुलै २०२५:  संगमनेर शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गोवंश कत्तलखान्यांवर पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धडक कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. वेगवेगळ्या छाप्यांमध्ये पोलिसांनी गोमांस, कत्तलीसाठी आणलेली जनावरे आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने बेकायदेशीर सुरू असलेल्या कत्तलखान्यावर महत्त्वपूर्ण छापा टाकला. या छाप्यामध्ये मदिनानगर येथून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील तिघांना अटक करण्यात आली असून तिघेजण फरार झाल्याची माहिती मिळाली. मदिनानगर…

Read More

संगमनेर, ४ जुलै- प्रतिनिधी:  पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आज (शुक्रवारी) सकाळी चंदनेश्वर विद्यालयाच्या स्कूल बसला भीषण अपघात होऊन चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने, या अपघातात कोणतीही गंभीर जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंदनेश्वर विद्यालयाची एम.एच. १४ बी.ए. ८९३२ क्रमांकाची बस साकुर आणि आसपासच्या भागातून सुमारे ३५ हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन चंदनापुरी घाटातून शाळेकडे येत होती. पुणे-नाशिक महामार्गावर सध्या सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. याच दरम्यान, समोरून येणाऱ्या एका वाहनाने हुल दिल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या साईट गटारात पलटी झाली. अपघाताची…

Read More

मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेचा गैरवापर करत पात्र नसतानाही लाभ घेणाऱ्या २,२८९ सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेली रक्कम वसूल केली जाणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यातील गरजू महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र, काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. यामुळे सरकारला मोठा आर्थिक फटका बसला असून, आता या महिलांकडून घेतलेली रक्कम परत घेतली जाणार आहे. अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं की,…

Read More