Author: Annant Ppangarkar

सोमवार ३० डिसेंबर नवी दिल्ली : राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर मोठ्या बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपमध्ये लवकरच संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होणार असून, महाराष्ट्रासह सात राज्यांचे भाजप अध्यक्ष बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात बदल – मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार आहेत. मात्र, भाजपच्या घटनेनुसार या फेरबदलांपूर्वी पक्षाला ५० टक्के राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत. राज्यात विद्यमान प्रदेशाध्यक्ष मंत्री – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले…

Read More

रविवार, २९ डिसेंबर  मुंबई – बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे. या प्रकरणात थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांचे नाव समोर आल्याने राज्यभर खळबळ उडाली असतानाच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा केल्याने आता बीड पोलिसांनी त्यांना नोटीस पाठविली आहे. दमानिया यांनी आरोपींच्या मृत्यू संदर्भात जो दावा केला त्याचे अधिकचे स्पष्टीकरण देण्याची मागणी या नोटीसद्वारे बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी दिलेल्या नोटीसद्वारे केली आहे. ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आलेत, तो मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे…

Read More

बीडच्या मस्साजोगचे सरपंच सुभाष देशमुख यांच्या निघृण हत्येच्या घटनेने महाराष्ट्राची लक्तरं गेल्या पंधरा दिवसांपासून सार्‍या देशभर निघत आहेत. सुसंस्कृत महाराष्ट्रात असं होऊ शकतं, याची खात्रीच देशमुख यांच्या हत्येने देशाला करून दिली आहे. या प्रकरणातला तपास ज्या गतीने सुरू आहे ते पहाता महाराष्ट्राला वळणावर आणण्याच्या आणाभाका देणार्‍या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे राज्य सावरता येईल, असं वाटत नाही. एका सरपंचाचा खून होतो, लोकं रस्त्यावर उतरतात, सरपंचांची लहान मुलगी न्यायासाठी सरकारकडे याचना करत असतानाही गेल्या पंधरा दिवसांपासून खुनी सापडत नाही, हे कसं शक्य आहे? एक काळ होता दाऊद आणि गवळी गँगने दिवसाढवळ्या खून खराबा करत मुंबईची अवस्था बिकट करून ठेवली होती. सरकारने…

Read More

शनिवार, २८ डिसेंबर  संगमनेर – गुजरातच्या दोघा व्यापाऱ्यांनी संगमनेरमधील शेतमाल विक्रेत्याची पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील शेतमाल व्यापारी प्रशांत प्रताप नेहे रा. समनापुर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मनोज भारवाड व सुरेश भारती या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते गेल्या पंधरा वर्षांपासून फ्लॉवर व टोमॅटो विक्रीचा व्यवसाय करत गेल्या पाच वर्षांपासून पांडुरंग माधव चांडे (रा. समनापुर) हे त्यांचे भागीदार असून दोघेही आपला शेतमाल बाहेरील राज्यात विक्रीसाठी पाठवीत असतात. फिर्यादी व्यापारानिमित्त अहमदाबाद येथे गेले असताना त्यांची दोन वर्षांपूर्वी मनोज भारवाड व सुरेश…

Read More

शनिवार, २८ डिसेंबर संगमनेर – हल्ली संगमनेरमध्ये दुचाकी, दागिने चोऱ्या वाढल्या असतानाच आता अज्ञात चोरट्याने चक्क दारूचे दुकान फोडून पाऊण लाखाची दारू लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. नासिक-पुणे मार्गावर सातत्याने असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे गुन्हेगारांवरील नियंत्रण सुटलेल्या संगमनेर पोलिसांना दारूचे दुकान फोडत गुन्हेगारांनी नवे आव्हान दिले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात हॉटेल व्यवस्थापकाने दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध ७१ हजार ६६० रुपयांची विविध कंपनीची दारू चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असलेल्या अरगडे गल्लीतील डिद्दी यांच्या मालकीचे हॉटेल वाईन स्पॉट हे हॉटेल बुधवारी (२५ डिसेंबर) रात्री…

Read More

शुक्रवार २७ डिसेंबर विशेष प्रतिनिधी / मुंबई मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात वाल्मिकी कराड यांचे समर्थक समजल्या जाणारे फडणवीस सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी बीडमध्ये प्रचंड मोर्चा काढला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे या मोर्चात सहभागी होणार असल्याने प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि हत्येतील मास्टर माईंडची माहिती त्यांना दिली. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत त्यांनी…

Read More

शुक्रवार, २७ डिसेंबर विशेष प्रतिनिधी / मुंबई देशाचे यशस्वी पंतप्रधान मनमोहन सिंग याचे सरकार उलथवून टाकण्यासाठी दिल्लीत आंदोलनाची हाक देणारे समाजसेवक अण्णा हजारे यांना उपरती झाली आहे. मोदींच्या भ्रष्ट सरकारवर एका शब्दात टीका न करणारे अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. ‘आर्थिक सुधारणांचे जनक’ अशा शब्दात हजारे यांनी सिंग यांना आदरांजली वाहिली. समाज माध्यमामध्ये या स्तुतीवर जोरदार टीका होत आहे. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल, गुरुवारी रात्री निधन झाले. सिंग यांच्या निधनाबद्दल देशभरातील आणि परदेशातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. यूपीए सरकारच्या काळात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही डॉ. मनमोहन सिंग…

Read More

शुक्रवार, २७ डिसेंबर  दुसऱ्या मजल्यावरील घरात गळफास घेत माय-लेकीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्या नववर्षाच्या मुलीसह आईने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मायलेकीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एका वहीमध्ये सुसाईड नोट आढळून आली आहे. सपना माळी (वय- ३३) व केतकी माळी (वय- ९) असे आत्महत्या करणाऱ्या माय लेकीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (२६ डिसेंबर) दुपारी तीनच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमधील जहांगीरपुरा परिसरामध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सपना माळी यांचा आठ वर्षापुर्वी पतीसोबत घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर त्या आपल्या माहेरी मुलीसह एरंडोलमधील महादेव मंदिर परिसरात राहत होत्या. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या वेळी सपना यांचा भाऊ घरी आल्यानंतर त्याला दोघी माय-लेकींनी…

Read More

शुक्रवार, २७ डिसेंबर सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने एकावर खुनी हल्ला केला मात्र, राजकीय बड्या नेत्याने पोलिसांवर दबाव टाकल्याने या गुन्ह्यातून सराईत आरोपीचे नाव वगळण्यात आले. सराईत आरोपीचे नाव वगळणे संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकाराची माहिती मिळतात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी संबंधित आरोपीला तात्काळ बेड्या ठोकण्याची आदेश देत पोलीस उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन केले आहे. रविवारी (२२ डिसेंबर) काळेवाडी येथे दोन गटात हाणामारी झाली यामध्ये आरोपींकडून एका व्यक्तीवर खुनी हल्ला करण्यात आला होता. एका सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा हल्ला केला. त्यानंतर एका बड्या राजकीय नेत्याने पोलिसांवर दबाव टाकत या सराईत गुन्हेगाराचे नाव आरोपीच्या यादीतून…

Read More

शुक्रवार २७ डिसेंबर संगमनेर – भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशी वेगवेगळी पदे अत्यंत कार्यक्षमपणे भूषवताना डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिक मंदीतून देशाला बाहेर काढले. खुली अर्थव्यवस्था, उदारीकरण स्वीकारून देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारे डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक पातळीचे अर्थतज्ञ होते. त्यांच्या निधनाने देशाचे महान व्यक्तिमत्व हरपले असल्याची भावना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. थोरात यांच्या यशोधन या जनसंपर्क कार्यालय त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात,…

Read More

शुक्रवार, २७ डिसेंबर नवी दिल्ली – भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री नवी दिल्लीमधील ‘एम्स’ रुग्णायामध्ये वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मनोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी म्हणजेच २८ डिसेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून आज सकाळी ११ वाजता मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल. सात दिवसांचा शासकीय दुखवटा… मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच आज (२७ डिसेंबर) रोजी कर्नाटक सरकारने सुट्टी…

Read More

गुरुवार २६ डिसेंबर  विशेष प्रतिनिधी / मुंबई गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील हत्यासत्र ज्या गतीने सुरु आहे ते पाहता राज्यात कायद्याचं राज्य राहिलं नसल्याचं काँग्रेसचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. सध्या राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या हत्या सत्रांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशामध्ये काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून जाग येण्यासाठी आणखी किती वाट पाहणार आहात? असा सवाल त्यांनी यावेळी राज्य सरकारला केला आहे. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पुण्यामध्येही दोन बहिणींची हत्या करण्यात आली. तर, पुणे…

Read More

गुरुवार २६ डिसेंबर  एका पाच वर्षाच्या चिमुरडीला चॉकलेटचे अमिष दाखवून पोलिसाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रक्षकच भक्षक बनल्याने पोलीस दल हादरले आहे. दरम्यान संबंधित पोलिसाला अटक करण्यात आली आहे. सचिन वसंत सस्ते असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. सस्ते याने बंदोबस्तावर असताना विसापूर किल्ला परिसरात आई-वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी (२५ डिसेंबर) घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित पोलीस आरोपीला अटक केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात…

Read More

गुरुवार २६ डिसेंबर अल्पवयीन मुलीस तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सातत्याने अत्याचार करणाऱ्या आरोपीस कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश के. एस. होरे यांनी २० वर्षांचा कारावास आणि २ लाख ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संगम संभाजी डुबल (२८) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती येथील सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी दिली. अल्पवयीन मुलीची सोशल मीडियावर संगम डुबल याच्याशी ओळख झाली होती. अल्पवयीन मुलीस तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत संगम संभाजी डुबल याने मुलीवर सातत्याने अत्याचार केला होता. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात…

Read More

गुरुवार, २६ डिसेंबर एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या पती-पत्नीला अटक केली आहे. अटक केलेल्या पती-पत्नीला कल्याणच्या न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण पूर्व येथे ही घटना घडली. विशाल गवळी असे यातील मुख्य आरोपीचे नाव असून त्याला बुलढाणा येथून अटक करण्यात आली. तर पतीच्या दुष्कृत्यावर पडदा टाकत पत्नीने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी कल्याण पूर्व येथील नागरिकांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली निषेध मोर्चा काढत विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. कल्याण पूर्व येथील एका अल्पवयीन मुलीचे २३ तारखेला संध्याकाळी…

Read More

गुरुवार, २६ डिसेंबर मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कचाट्यात सापडलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत डिसेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. ७० लाखांहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया मंगळवारपासून पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या १२,८७,५०३ पात्र महिलांना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी…

Read More

गुरुवार, २६ डिसेंबर राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर, खेड्यांमध्ये मूळ गावठाणात वाडवडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्यांना आता त्यांच्या जमिनीची मालकी अर्थात स्वामित्व मिळणार आहे. देशातील नागरिकांच्या मालमत्तांना अधिकृत चेहरा देणाऱ्या केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी ‘स्वामित्व’ योजनेचा शुभारंभ शुक्रवारी (२७ डिसेंबर) राज्यात ३० जिल्ह्यांत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्वपूर्ण ‘स्वामित्व’ योजना जाहीर केली असून, या योजनेच्या माध्यमातून ३० हजार ५१५ गावांतील मालमत्ताधारकांना ‘डिजिटल प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक पत सुधारण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळाल्याने शेतकऱ्यांना मालमत्ता कर सुलभरीत्या भरता येणार असून,…

Read More

गुरुवार, २६ डिसेंबर मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची समाज माध्यमातून पोस्ट व व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्या १२ प्रोफाइल विरोधात राज्याच्या सायबर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया संदर्भात गंभीर पावलं – सोशल मीडिया संदर्भात सरकारने उचलली गंभीर पावलं – समाज माध्यमाचा चुकीच्या पद्धतीने होत असलेला वापर लक्षात घेत राज्य सरकारने आता सायबर गुन्ह्यांसंदर्भात गंभीर पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाबरोबरच गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. काय आहे प्रकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्या भाषणांमध्ये छेडछाड करून ती समाज माध्यमात पोस्ट करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपच्यावतीने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली…

Read More

बुधवार, २५ डिसेंबर संगमनेर नगर परिषदेने अखेर मोठी कारवाई केली आहे. शहरातील दोघा प्लास्टिक विक्रेत्यांवर छापे टाकत पालिकेच्या पथकाने दीड टन प्लास्टिक जप्त केले. यात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांसह प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश आहे. संगमनेर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर मुख्याधिकारी म्हणून रामदास कोकरे यांनी पदभार घेतला होता. कोकरे यांनी पदभार घेतल्यानंतर पालिकेच्या पथकाला बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पालिकेच्या पथकाकडून सातत्याने शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडून प्लास्टिक जप्तीची कारवाई केली जात होती. एकीकडे किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई सुरू…

Read More

बुधवार, २५ डिसेंबर  संगमनेर – डॉ. जयश्री थोरात यांनी सावरगाव तळ येथील रामनाथ गुरकुले यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. मयत गुरुकुले कुटुंबाच्या पाठीशी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे सदैव उभे असल्याचे सांगत या कुटुंबीयांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे. चंदनापुरी शिवारात ढग्या डोंगराजवळ वनविभागाच्या मालकीच्या जंगलावर रामनाथ गुरुकुले (वय ३४ वर्ष रा. सावरगाव तळ, संगमनेर) यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता. बिबट्याच्या हल्ल्यात यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. थोरात म्हणाल्या, बिबट्यांचे मानवी वस्तीतील हल्ले दिवसेंदिवस वाढले आहे. यामुळे या परिसरात भीतीदायक वातावरण आहे. यापूर्वीही तीन मृत्यू या हल्ल्यातून झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी…

Read More