Author: Annant Ppangarkar

गुरुवार, दि. १६ मे बँक अपहार प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी करून मालमत्ता जप्त करण्याची भीती दाखवत तक्रारदार आणि साक्षीदाराकडे तब्बल एक कोटी रुपयांची आर्थिक गुन्हे शाखेचा तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदाराने लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधून समोर आला आहे. पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहाय्यक फौजदार रवीभूषण जाधवर आणि व्यापारी कुशाल प्रवीण जैन अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. बीड येथील जिजामाता मल्टीस्टेट प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून पोलीस अधिकाऱ्याने एक कोटी रुपयांची लाच मागितली तडजोडीअंती ठरलेल्या लाचेचा पहिला हप्ता व्यापाऱ्याकडे देण्यास सांगितले. व्यापाऱ्याने लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. कुशाल प्रवीण जैन…

Read More

बुधवार, दि. १५ मे शाळा बंद असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी आणि शाळेची आरटीई मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिल्याच्या बदल्यात पन्नास हजार रुपयांची लाच घेणारा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) बुधवारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. सतीश सुरेश चौधरी (वय ५२ वर्ष, रा. शांतीनगर, नंदुरबार) असे लाचखोर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याचे नाव असून ते नंदुरबार येथे कार्यरत आहे तक्रारदार यांना नवापूर शहर नगरपालिका हद्दीत मालमत्ता क्रमांक ८२६, सिटी सर्वे क्रमांक ६२४, पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे नम्रता हॉटेल सुरू करावयाचे असल्याने सदर परिसरात ७५ मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने FL३ परवाना देण्यास हरकत घेतली होती. परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण…

Read More

बुधवार, दि. १५ मे बांधकाम कार्यारंभ आदेश देण्यापूर्वीच १५ टक्क्यांप्रमाणे १ लाख ८२ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मुख्याधिकारीपदाचा पदभार असलेल्या नायब तहसीलदारासह नगराध्यक्ष, बांधकाम समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविकाचा पती आणि एका व्यापाऱ्यावर लाचलुचपत विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या यांचा आहे समावेश… गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी नगरपंचायतीमध्ये लाचखोरीचा हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगरपंचायतीची कामे घेणाऱ्या ठेकेदाराच्या वडिलांनी गोंदिया लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तेजराम किसन मडावी (वय ६६ वर्ष, नगराध्यक्ष), सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार असलेले नायब तहसीलदार शरद विठ्ठल हलमारे (वय ५६ वर्ष), नगरपंचायतीच्या बांधकाम समितीचे सभापती आश्लेष मनोहर अंबादे (वय ३५…

Read More

मंगळवार, दि. १४ मे  घाटकोपरमध्ये मोठे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत १४ लोक ठार तर ८० लोक जखमी झाले असून ही काही साधी घटना नाही. घाटकोपर दुर्घटनेची राज्य सरकारने सखोल चौकशी करुन या घटनेला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी राजावाडी हॉस्पिटला भेट देऊन घाटकोपर दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली व डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले, घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार व मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. दोन वर्षांपासून महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत…

Read More

मंगळवार, दि. १४ मे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पुण्यातील मतदान संपताच मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेत मोठी फूट पडली असून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील निवडणूक पार पडताच पुणे शहर शिवसेना शिंदे गटातील धुसफुस समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला आहे. पुण्यात महायुतीकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसापासून आहे. निवडणुकी दरम्यानही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत नाराजी होती. मात्र निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये वेगळा मेसेज…

Read More

मंगळवार, दि. १४ मे शिक्षक मतदार संघातील दोन आणि पदवीधर मतदारसंघातील दोन अशा चार जागांवर निवडणूक आयोगाकडून १० जूनला निवडणुक घेतली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता या निर्णयात बदल करण्यात आला असून नाशिकसह चारही मतदार संघाच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहे. ७ जुलै २०२४ रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर भिकाजी दराडे, मुंबई विभाग शिक्षक मतदार संघातील आमदार कपिल पाटील यांच्यासह विधान परिषदेतील मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचा कार्यकाल संपत असल्याने या चारही मतदारसंघात निवडणुकीचा निवडणूक आयोगाने ८ मे रोजी कार्यक्रम जाहीर केला होता. त्याचबरोबर…

Read More

मंगळवार, दि. १४ मे मुंबई : कांदिवली येथे व्यावसायिकाची पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. दोन अज्ञात आरोपींनी ६० लाख रुपयांची खंडणीची रक्कम स्वीकारल्यानंतर व्यावसायिकाची सुटका केली. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी व्यावसायिकाच्या चालकासह तिघांना अटक केली. तक्रारदार बोरिवली येथील रहिवासी असून त्यांचे अंधेरी येथे कार्यालय आहे. बुधवारी ८ मे रोजी काम संपवून मित्रांसह कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. कांदिवली येथे त्यांचा मित्र मोटरगाडीतून उतरला. गाडीचे दरवाजे बंद करण्यापूर्वीच दोन तरुण आले व ते जबरदस्ती गाडीमध्ये बसले. त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून मोटरगाडी दहिसरच्या दिशेने घेऊन जाण्यास सांगितले. तेथे व्यावसायिकाला मारहाण करून पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली. अखेर व्यावसायिकाने…

Read More

सोमवार, दि. १३ मे  सोमवारी राज्यात अकरा लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. यात प्रामुख्याने अहमदनगरमध्ये ६१% तर शिर्डीमध्ये ६२% टक्के सरासरी मतदान झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान अहमदनगर येथे किरकोळ वादातून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मतदाराने ईव्हीएमवरील मतदानाचे चित्रीकरण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला तर राहाता तालुक्यातील कोल्हार येथे निळया रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकी दरम्यान अशा किरकोळ घटना वगळता अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा…

Read More

माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राम शिंदे, उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.४% मतदान अहमदनगर लोकसभेसाठी ५.६८% मतदान सोमवार, दि. १३ मे  लोकसभा निवडणुकीसाठी १० राज्यातील ९६ मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. यात राज्यातील महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ११ जागांचा समावेश आहे. अहमदनगर, शिर्डी, बीड, पुणे, शिरूर, मावळ, छत्रपती संभाजी नगर, जालना, धुळे, रावेर आणि नंदुरबार या राज्यातील पंधरा जागांचा आज होत असलेल्या मतदानात समावेश आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने या जागांवरून मातब्बरांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल.…

Read More

निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संवाद साधत दिल्या शुभेच्छा शिर्डी, रविवार दि. १२ मे  निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. १३ मे) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. १ हजार ७०८ केंद्रांवर होणाऱ्या या मतदान प्रक्रियेसाठी मतदान पथके पोलीस बंदोबस्तात रवाना झाली. मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथकांशी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मनावर कोणतेही दडपण न घेता आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना केल्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः संवाद साधल्याने आपल्या मनावरील दडपण कमी झाले असून आता अधिक उत्साहाने…

Read More

रविवार, दि. १२ मे दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा चार किलोमीटरपर्यंत चक्क वडाची २८४ झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवल, आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय. थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेत घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण “थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन” असं केलंय. प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्कासारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण…

Read More

रविवार, दि. १२ मे संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुखपदी पक्षीय पातळीवर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांची भारतीय जनता पक्षाने निवड केली आहे. शिर्डी येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. लगोलग भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खताळ यांना निवडीचे नियुक्तीपत्र दिले. शिर्डी येथे झालेल्या बैठकीवेळी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराजे देसाई, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशिष देशमुख, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, धनराज विसपुते, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गोंदकर, सरचिटणीस नितिन दिनकर, नितीन कापसे, जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे यांच्यासह उत्तर…

Read More

सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याच मतदान जवळ येईल, तस तसं देशात काहीही घडू शकतं. वारं फिरलं आहे, रात्र वैर्‍याची आहे. सत्ताधारी भाजप काहीही करू शकतं, कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकतं. लोकशाही वाचवणार्‍या प्रत्येकासाठी हे आव्हान होय. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना केलेलं हे आवाहन पुरतं बोलकं आहे. अनुभवाचे बोल हे असेच आहेत. कोणत्याही निवडणुकीच्या तोंडावर असंच काहीबाही होत आलंय. २०१४ ला पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये झालेल्या दंगली भाजपने पथ्यावर पाडून घेतल्या. पुढे पुलवामात सैनिकांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा फायदा त्या पक्षाने घेतला. वातावरण विरोधात असताना भाजप तीनशे पार गेला. वातावरण विरोधात गेलं की ऐनवेळी भाजप काहीही करू शकतं, हा…

Read More

शनिवार, दि. ११ मे  नोकरी लावून देण्याचे आम्हीच दाखवत पाच जणांनी नऊ लोकांना ४१ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय लक्ष्मण कारखानीस, तुषार धनंजय कारखानीस, रोहित धनंजय कारखानीस यांच्यासह आणखी दोघांचा आरोपींमध्ये समावेश असून त्यांच्याविरुद्ध पुण्याच्या खडकी पोलीस ठाण्यात संदीप बबन इंदलकर (वय ४१ वर्ष, रघुकुल नगरी, औंध रोड, खडकी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असून रोहित कारखानीस याला नोकरी लावण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याचे सांगत धनंजय कारखानीस आणि तुषार कारखानीस फिर्यादीकडून १ लाख ८७ हजार रुपये घेतले होते. मात्र…

Read More

अहमदनगर – शिर्डी अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशांनुसार अहमदनगर – शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या संकल्पनेतून मोबाईलला डीपी, स्टेटस व रिंगटोन लावण्याच्या “डीपी बोले तो… डेमोक्रेसी पार्टिसिपेशन” या उपक्रमाचे विमोचन जिल्हा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आले. यांची उपस्थिती… यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदी उपस्थित होते. असा आहे उपक्रम… मोबाईलचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर केला जातो. डीपी ठेवणे, स्टेटस बदलणे व विविध रिंगटोन लावणे या सामान्य माणसाच्या…

Read More

शुक्रवार, दि. १० मे महिलेला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करणाऱ्या सुरेश लहानू नाईक आणि विशाल कृष्णा म्हात्रे या दोघांना जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी १० वर्ष कैद आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अलिबाग तालुक्यातील तळाशेत गावच्या हद्दीत वडवली रस्त्यावर नेटको कंपनीच्या टेकडीवर रविवारी १९ डिसेंबर २०२० रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. पीडित महिला तिच्या मुलीकडे तळाशेत वाडीवर गेली असता ती एकटी असल्याचा फायदा घेत सुरेश लहानू नाईक आणि विशाल कृष्णा म्हात्रे यांनी तिला पाठीमागून पकडून झाडाझुडपात खेचत नेले. तेथे तिला जबरदस्तीने दारू पाजून दोघांनी तिचे कपडे काढून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता.…

Read More

शुक्रवार, दि. १० मे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी पुण्याच्या विशेष कोर्टाने पाच आरोपींपैकी दोघांना दोषी ठरवत सश्रम जन्मठेपेची शिक्षा दिली. तर उर्वरित तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल ११ वर्षानंतर त्या प्रकरणाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी डॉ. दाभोळकरांची हत्या केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना दोषी ठरवत सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर डॉ. वीरेंद्र तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता केली. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणी पाच आरोपीविरोधात पुण्याच्या सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू…

Read More

गुरुवार, दि. ९ मे  शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या महिला उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर अकोले तालुक्यात दगडफेक करत हल्ल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता संगमनेर तालुक्यातील पठार भागात त्यांचे प्रचाराचे बॅनर अज्ञाताने फाडल्याचे समोर आले आहे. शिर्डीत लोकसभा निवडणुकीमध्ये सदाशिव लोखंडे व भाऊसाहेब वाकचौरे या आजी-माजी खासदारांसह उत्कर्षा रुपवते निवडणूक लढवत असून सुरुवातीला सरळ आणि दुरंगी वाटणारी निवडणूक रुपवतेंमुळे तिरंगी बनली आहे. त्यामुळे लाटेवर आपलाच विजय निश्चित असं मानणाऱ्या आजी-माजी खासदारांना धडकी भरली असल्याचे दिसते. रूपवते यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर मतदार संघात त्यांच्या सहानुभूतीत वाढ झाली आहे. असे असतानाच तगडे आव्हान निर्माण करणाऱ्या रूपवते यांचे निवडणूक बॅनर फाडले जात…

Read More

गुरुवार, दि. ९ मे रस्त्याने जाणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस शाळेत सोडतो असे सांगून तिचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळच्या गोंधेवाडी येथील रवींद्र वसंत गोंधे (वय २७ वर्ष) याला संगमनेरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी २० वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. घारगाव परिसरातील या खटल्याकडे पठार भागातील संगमनेरकरांचे लक्ष लागले होते. १२ डिसेंबर २०१८ रोजी पीडित मुलगी कच्च्या रस्त्याने शाळेत जात असताना तेथे मोटरसायकलवर आलेल्या रवींद्र गोंधे याने असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला माझ्यासोबत घारगावला चल, तुला शाळेत सोडतो. असे सांगून आपल्या मोटरसायकलवर बसवून घारगावच्या दिशेने नेले. मात्र शाळेकडे…

Read More

गुरुवार, दिनांक ९ मे अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा वकिलावर प्राणघातक हल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजता जुन्या कोर्टाजवळ लोणी हवेली (ता. पारनेर) येथील वकील अशोक कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा राबवत गुन्हा दाखल करण्यापूर्वीच हल्लेखोरास पकडण्यात यश मिळविले असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली आहे. अधिक माहिती अशी, ॲड. मयूर अशोक कोल्हे हे आपल्या वकील असलेल्या वडिलांसह न्यायालयीन कामकाजानिमित्त लोणी हवेली (ता. पारनेर) येथून अहमदनगरला आले होते. ॲड. अशोक कोल्हे अहमदनगरमधील जुन्या न्यायालयाजवळ असताना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास काही एक कारण नसताना त्यांचा पक्षकार अनिल गायकवाड यांने…

Read More