Author: Annant Ppangarkar
सोमवार, २८ ऑक्टोंबर अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा पैकी दहा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले असून महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार जाहीर झाले आहे. महायुतीचा नेवासे आणि संगमनेर या दोन जागांवरील तिढा अद्याप कायम आहे. भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला पाच आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पाच जागा मिळाल्या असून या जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. यात अनुक्रमे तीन आणि चार विद्यमान आमदारांचा समावेश आहे. श्रीरामपूरच्या जागेसाठी महायुतीकडून रामदास आठवले यांचे समर्थक कार्यकर्ते इच्छुक होते. आठवले गटाने या जागेवर दावा सांगितला होता. मात्र जागा वाटपात ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसने येथून काँग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या…
सोमवार, २८ ऑक्टोबर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता मंगळाच्या अखेरचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तासांचा अवधी उरला असल्याने अद्यापही संगमनेर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांच्या विरोधातील महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. शेवटच्या क्षणी थोरात यांच्या विरोधातील उमेदवार विरोधकांकडून जाहीर केला जात असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विरोधी उमेदवाराची मोठी दमछाक होत असते. या उलट वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार जाहीर केले आहे.गेल्या चार दशकांपासून बाळासाहेब थोरात या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहे. त्यांच्या विरोधात विरोधकांनी अनेकदा आग पाखड करत मैदानात शड्डू ठोकले मात्र निवडणूक जिंकण्यात त्यांना अपयश आले आहे. निवडणूक लागली की विरोधकांकडून एक चेहरा निश्चित न होता…
सोमवार, २८ ऑक्टोबर २०२४ मेष – नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही, खर्च वाढेल. जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. वृषभ- आज तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून मोठा फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना फायदा होईल. विवाह निश्चित होईल, प्रवासाची शक्यता आहे, परंतु वाहन काळजीपूर्वक चालवा. मिथुन- आज तुमचे कुटुंबियांशी मतभेद होतील, रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात अडथळे येतील. तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि खर्चही वाढू शकतात. गाडी नीट चालवा. कर्क-आज तुमचे विरोधक तुमचे नुकसान करू शकतात, महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. बॉसशी वाद होईल, मुलांच्या भविष्याची चिंता राहील. संयमाने निर्णय घ्या. सिंह- आज तुम्हाला भागीदारीतून फायदा होईल, आर्थिक संकट…
रविवार, २७ ऑक्टोंबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी रात्री उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे माजी मंत्री सलग चार दशके आमदार राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संगमनेर मधून योगेश सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा या यादीत करण्यात आली आहे. संगमनेरमधून सूर्यवंशी, राहुरीतून ज्ञानेश्वर गाडे (माऊली) आणि अहमदनगर शहरमध्ये सचिन डफळ यांचा जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये समावेश आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मनसेने जाहीर केलेल्या या यादीत राज्यभरातून ३२ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत मनसेने ११० विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची…
डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखला अटक, एलसीबीने पुण्यात पकडले!
रविवार, २७ ऑक्टोबर विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात सर्वत्र राजकीय वातावरण तापले असताना संगमनेरमध्ये मात्र पारंपारिक विरोधक थोरात-विखे यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. या संघर्षाला कारणीभूत ठरलेल्या आणि डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून फरार झालेल्या वसंत देशमुखला अहिल्यानगर एलसीबीच्या पुण्यात पकडले आहे.नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प मेळाव्यात वसंत देशमुख याने अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. महिलेविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे राज्यात संतापाची लाट निर्माण झाली.शनिवारी (दि.२६) वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार होते. देशमुख यास अटक करण्यात यावी…
रविवार, २७ ऑक्टोबर शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप रविवारी आठ महिन्यानंतर पुन्हा स्वगृही परतले आहे. घोलप यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत पुन्हा एकदा शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे.घोलप यांनी आठ महिन्यांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना सदस्य पदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी देवळाली प्रवरा मतदार संघ ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने या मतदारसंघातून ठाकरे गटाने घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांना उमेदवारी दिली आहे. बबनराव घोलप यांनी शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर देखील योगेश घोलप शिवसेनेसोबत होते. योगेश घोलप यांना उमेदवारी दिल्यानंतर बबनराव घोलप यांनी पुन्हा सह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या मध्यस्थीने प्रवेशाची शिष्टाई…
रविवार, २७ ऑक्टोबर अहिल्यानगर – विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. संपूर्ण निवडणूक प्रक्रीया पारदर्शक राहील याकडेही लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. विधानसभा निवडणुकीबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे शनिवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वयक अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, संपूर्ण निवडणुक कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी यादृष्टीने पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा. निवडणूक विषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, यात कुणालाही सूट देवू नये. कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवावे. आनंददायी…
रविवार, २७ ऑक्टोबर संगमनेर पोलीस ठाण्यात काँग्रेस नेत्या डॉक्टर जयश्री थोरात, वंचितच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांच्यासह काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या सभेला संबोधित करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे नाव पोलिसांनी दाखल केलेल्या ‘एफआयआर’मध्ये कुठे दिसल नाही? असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी ट्विटर द्वारे उपस्थित केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे यांच्या सभेत भाजप नेते वसंत देशमुख यांनी महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील महिला वर्गात संतापाची भावना निर्माण झाली असतानाच आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलांवरच गुन्हे दाखल करण्याची…
महिला शक्ती एकवटली, हजारो महिलांनी पोलिसांना दिले निवेदन रविवार, २७ ऑक्टोबर संगमनेर – धांदरफळ येथील सुजय विखे यांच्या सभेमध्ये युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्यावर अत्यंत खालच्या पातळी टीका करणाऱ्या वसंत देशमुख व महायुतीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असताना त्यांना सोडून माझ्यावरच गुन्हे दाखल होत आहेत. हा कुठला न्याय आहे. मला अटक करा, पण आमच्या कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या. अशी मागणी करत महाराष्ट्रात मुली आणि बहिणींची अशी सुरक्षितता आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस अध्यक्ष जयश्री थोरात यांनी सरकारला विचारला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून डॉ. जयश्री थोरात व दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील हजारो महिलांनी…
रविवार, २७ ऑक्टोबर माजी खासदार सुजय विखे यांच्या सभेत वाचाळवीर वसंत देशमुख यांनी राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉक्टर जयश्री यांच्यावर आक्षेपार्ह टीका करताना महिलांची बदनामी केल्याचे प्रकरण राज्यभरात तापले असताना याच सभेत वसंत देशमुख याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर देखील आक्षेपार्ह विधान केल्याचे समोर आले आहे. यामुळे खासदार राऊत यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पठार भागातील शिवसैनिक पंकज पडवळ यांनी केली आहे. वास्तविकता या सभेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी पोलिसांकडूनच गुन्हे दाखल होणे अपेक्षित असताना देखील पोलिसांकडून दबावाखाली आरोपींची पाठराखण सुरू असल्याचे दिसते. जयश्री थोरात यांच्या बद्दल वादग्रस्त विधान करत वाचाळवीर देशमुख याने महिलांचा…
भरल्या घराला दृष्ट लागायला वेळ लागत नसते असं म्हणतात. तशी राज्यात निर्माण झालेल्या भरल्या घरच्या महाविकास आघाडीलाही अशीच दृष्ट लागली आहे. डोक्यात अहंकार गेला की जे व्हायचं ते महाविकास आघाडीच्या नेत्यांचं विशेषत: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचं झालं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज ठरू पाहत असलेली महाविकास आघाडी अहंकाराने अवदसेच्या आहारी गेली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाने हुरळून जाऊन काहीही केलं आणि कसंही वागलो तरी लोकं आपल्यालाच मतं देतील, असल्या स्वप्नात आघाडीचे नेते आहेत. त्यातल्या त्यात उध्दव ठाकरे यांच्या एकूणच दावेगिरीने महाविकास आघाडीला आलेली बरकत ते घालवायला निघालेत की काय, या शंकेला…
रविवार, २७ ऑक्टोबर २०२४ मेष: तुम्ही नवीन सहवास किंवा भागीदारीत प्रवेश करू शकता. तुम्ही व्यावसायिक प्रकल्पांबाबत उत्साही आणि आत्मविश्वासी आहात. त्यामुळे भविष्यात तुम्ही पूर्ण यश मिळवू शकाल. कोणतीही कायदेशीर बाब प्रलंबित असल्यास, न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश सूचित केले जाते. आर्थिक उपक्रम आणि गुंतवणुकीतून नफ्याचा आवाज तुम्हाला आनंदी ठेवेल. वृषभ: आज तुमच्यापैकी काहींची सर्जनशीलता शिखरावर असेल परंतु आर्थिक दबाव असू शकतो. पैशाशी संबंधित प्रकरणे शहाणपणाने हाताळावी. व्यवसायाच्या संदर्भात, आपण काही सर्जनशील कार्यासाठी आपल्या फायद्यासाठी मालमत्ता वापरू शकता. कुटुंबासह बहुप्रतिक्षित सहल पुढे ढकलावी लागेल. मिथुन: व्यवसायाच्या चांगल्या संधी तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी खूप उपयुक्त ठरतील. नवीन क्षेत्रात तुमचा ठसा उमटवण्यासाठी तुम्ही तयार…
शनिवार, २६ ऑक्टोबर मुंबई – शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या या यादीत २२ उमेदवारांचा समावेश आहे. अहिल्यानगर शहरमधून अभिषेक कळमकर यांना तर अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने जिल्ह्यात सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले असून शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर या तीन जागांवर काँग्रेस, नेवासे व श्रीगोंदा या दोन जागांवर शिवसेना व उर्वरित विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे स्पष्ट झाले. महायुतीच्या उमेदवारांचा अद्यापही घोळ सुरूच आहे. अद्याप ज्या जागांवरील उमेदवार शिल्लक आहे त्यांची यादी आज रात्री किंवा उद्या सकाळी पत्रकार…
शनिवार, २६ ऑक्टोबर संगमनेर – सुसंस्कृत राजकारणाची राज्याला दिशा देणाऱ्या संगमनेर तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुजय विखे यांनी सभा घेऊन भडक वक्तव्य केली. यातूनच काही लोकांना प्रोत्साहन मिळाल्याने युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्यासह महिला भगिनींविरुद्ध अत्यंत गलिच्छ भाषेत वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख व सुजय विखे यांना तातडीने अटक करा या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले याचबरोबर सुजय विखे यांना संगमनेर तालुका प्रवेश बंदी करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. महिलांचा अपमान करणारे वसंत देशमुख व सुजय विखे यांना तातडीने अटक करा, या मागणीसाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याबाहेर मोठे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी…
शनिवार, २६ ऑक्टोबर माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या धांदरफळ खुर्द येथील युवा संकल्प मेळाव्यात बोलताना वसंत देशमुख यांनी काँग्रेस नेत्या जयश्री थोरात यांच्याविषयी खालच्या पातळीवर आक्षेपार्ह विधान करून वाद ओढवून घेतला. ही संगमनेरच्या राजकारणाची संस्कृती नसून या घटनेचा निषेध करत असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे संगमनेर शहर प्रमुख कैलास कासार यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना कैलास कासार म्हणाले, निवडणूक अथवा कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्याचा, कामांबद्दल प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार राज्यघटनेने सर्वच नागरिकांना दिला आहे. मात्र ही टीकाटिप्पणी करताना कुठल्याही महिला संदर्भात बोलताना शब्दांचा संयम बाळगणे गरजेचे आहे. माइक हातात आला म्हणून…
शनिवार, २६ ऑक्टोबर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता काही तासांचा अवधी उरला असताना काँग्रेसने आपली २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापले असून श्रीरामपूरमधून आता हेमंत उगले काँग्रेसचे उमेदवार असतील. काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून तर काँग्रेसवासी झालेल्या प्रभावती घोगरे यांना शिर्डीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दुसऱ्या यादीत आता श्रीरामपूरमधून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत महाविकास आघाडी जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा मिळाल्या आहेत. गेला काही दिवसापासून श्रीरामपूरमधून कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता होती.…
शनिवार, २६ ऑक्टोबर संगमनेर – भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील सभेत अध्यक्ष स्थानी असलेल्या वसंत गुंजाळ याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात संतप्त वातावरण निर्माण झाले असून विजय विखे पाटील आणि वसंत देशमुख यांच्या अटकेसाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांना रात्रभर ठिय्या दिला असून शनिवारी दुपारपर्यंत कार्यकर्ते भाषणातून आपला रोष व्यक्त करत होते. दरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील मध्यरात्री आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत या घटनेचा…
शनिवार, २६ ऑक्टोबर २०२४ मेष – रोजची दैनंदिन कामे लवकर पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढल्यामुळे आपल्या महत्वाच्या कामांना वेळ देऊ शकाल. व्यवसायात काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. वृषभ – नोकरीमध्ये हाताखालील लोकांचे तसेच वरिष्ठांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. केलेल्या नियोजनात काही बदल करावे लागतील. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे जरुरीचे. मिथुन – कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाहमधील अडथळे दूर होतील. तसेच संततीचे असलेले प्रश्न मार्गी लागतील. आप्तेष्ट व नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. हितशत्रूवर विजय मिळवाल. कर्क – नियोजनाद्वारे हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. परंतु त्यासाठी कार्यमग्न राहणे आवश्यक ठरेल. तसेच कोणाबरोबरही वाद- विवाद करू नयेत. कलहसदृश्य घटनांपासून…
सभा आटोपती घ्यावी लागली, महिलांसह ग्रामस्थांचा सभास्थानी ठिय्या.. सुजय विखेंनी राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली, वसंत देशमुखला भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे अशा नीच लोकांना त्यांची जागा दाखविण्याची – आमदार सत्यजित तांबे शुक्रवार, २६ ऑक्टोबर संगमनेर – सुसंस्कृत तालुका अशी ओळख असलेल्या संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीला गालबोट लागले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने थेट खालच्या पातळीवर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संगमनेरमध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या युवा संकल्प मेळाव्यात महिलांचा संताप दिसून आला. विखे-थोरात वाद विकोपाला गेला असून वाहनाची देखील जाळपोळ, तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर येत…
शुक्रवार, २६ ऑक्टोबर संगमनेर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी आणखी पाच इच्छुक उमेदवारांनी १० उमेदवारी अर्ज नेले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ३१ इच्छुकांनी ६३ उमेदवारी अर्ज नेले असून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. शनिवार, रविवारची सुट्टी वगळता शेवटच्या दोन दिवसात प्रमुख उमेदवारांचे अर्ज नेले जाणार असून लगेचच त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर झाली असून अद्याप त्यांनी देखील उमेदवारी अर्ज नेलेला नाही. तर महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळालेल्या अजिज व्होरा यांनी देखील अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. व्होरा आज उमेदवारी अर्ज…
