Author: अनंत पांगारकर

मुंबई – ०५ जानेवारी शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या पत्‍नी मेघनाताईं यांचे रविवारी !दिनांक ५ जानेवारी) अल्‍पश: आजाराने दु:खद निधन झाले. शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी मेघनाताईंच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन अंत्यदर्शन घेतले. यावेळी डॉ.गोर्हे यांनी गजानन कीर्तिकर, अमोल, गौरी, हर्षदा, सुप्रिया यांचे सांत्वन केले.

Read More

रविवार, ०५ जानेवारी  संगमनेर – परस्पर विरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याने अंतर्गत मतभेद आता पोलिसांपर्यंत पोहोचले असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या दौऱ्यावेळी घडलेल्या प्रकारामुळे हा दौरा वादग्रस्त ठरला आहे. रविवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सुयोग पंढरीनाथ गुंजाळ (रा. गुंजाळवाडी, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक भगत व साहेबराव वलवे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५, ३५२, ३५२(२) प्रमाणे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. परस्पर विरोधी तक्रारीमुळे पोलिस आता याप्रकरणी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान नववर्षाच्या प्रारंभी २ जानेवारीला शनिशिंगणापूर येथून त्रंबकेश्वर येथे जात असताना काही काळ संगमनेरमध्ये…

Read More

कफल्लक देशाला वळणावर आणणारे पंतप्रधान म्हणून ज्यांचा सर्वदूर उल्लेख होतो त्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या दु:खद निधनाच्या कळा प्रामाणिक देशभक्तांसाठी आजही कष्टप्रद आहेत. डॉ. सिंग यांनी देशाला घालून दिलेली अर्थव्यवस्थेची घडी नादान सत्तेमुळे आता पुरती विस्कटून गेली आहे. देशभक्तीचं स्तोम माजवणार्‍या आजच्या सत्ताधार्‍यांनी डॉ. सिंग यांच्या दु:खद निधनाचं राजकारण करून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. धार्मिक अधिष्ठानात मनुष्य प्राण्याला मरणांती परमेश्‍वराचं रूप दिलं आहे. मनमोहन हे तर देशासाठी अशाच परमेश्‍वराचं रूप असताना त्यांच्या वाट्याला मात्र या सत्ताधार्‍यांनी राजकारण आणलं आणि महान व्यक्तीच्या मृत्यूचंही भांडवल करत आपण किती नालायक आहोत, हे जगाला दाखवून दिलं. संकटात देशाला आणि देशवासीयांना जगण्याचा मार्ग ज्या महान…

Read More

संगमनेर – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान संगमनेर मार्गे त्रंबकेश्वरकडे जात असताना येथील शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. चौहान यांच्या दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत यांना आमदार समर्थक असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला होता. मारहाणीत जखमी झालेल्या भगत यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आमदार खताळ समर्थक असलेल्या सुयोग गुंजाळ आणि राहुल भोईर या दोघांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ हे शासकीय विश्रामगहावर उपस्थित असताना भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला खताळ समर्थकांनी धक्काबुक्की…

Read More

शनिवार, ०४ जानेवारी संगमनेर – गेल्या काही दिवसांपासून संगमनेर मध्ये सातत्याने धार्मिक वादाच्या घटना घडत आहे. शनिवारी सायंकाळी अशीच घटना पुन्हा एकदा घडल्याने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील संवेदनशील असलेल्या दिल्ली नाका परिसरात एका पान स्टॉलवर पान घेण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती समजताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्री थोरात यांनी रुग्णालयात जाऊन जखमी तरुणांची भेट घेतली. यावेळी तरुणांच्या नातेवाईकांनी मारहाण करणाऱ्या विरुद्ध मोठा संताप व्यक्त केला. शांतता असलेल्या संगमनेरमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल असे वर्तन कोणीही करू नये, मारहाण करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर…

Read More

खा. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत १२ जानेवारीला पुरस्कार वितरण शनिवार, ०४ जानेवारी  संगमनेर – ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात व कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराची घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या नावाने दिला जाणारा स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ. रावसाहेब कसबे यांना देण्यात येणार आहे. तर अण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने दिला जाणारा स्मृती पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला व सहकारातील आदर्श नेतृत्वाचा पुरस्कार राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांना जाहीर करण्यात आला आहे. यांनी केली घोषणा – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे व युवक काँग्रेस अध्यक्ष…

Read More

शनिवार, ०४ जानेवारी मुंबई – मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राज्य सरकारी कर्मचारी व अधिकारी यांना खाते उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मंजुरी देण्यात आली. याआधी प्रवीण दरेकर यांना सायन येथील कोट्यवधी रुपयांची जमीन नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजुरी देण्यात आली होती, त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्यावर राज्य सरकारची कृपादृष्टी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात दरेकर यांच्या बँकेत शासकीय कर्मचाऱ्यांना खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधीच्या…

Read More

अहिल्यानगर दि.४ – शेतकऱ्यांना अखंडित वीज उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सौर प्रकल्पासाठी प्रशासनाने जमीन उपलब्ध करून दिली असून प्रकल्पांच्या कामांना संबंधित संस्थेने गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्ह्यातील सौर प्रकल्पांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक राकेश ओला (दूरदृश्यप्रणालीद्वारे), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महावितरण आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सालीमठ म्हणाले, जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथे दोन ते तीन दिवसात काम सुरू करावे. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेचा विषय सातत्याने लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. करुणा मुंडे यांच्या कारमध्ये पिस्तूल ठेवणारी व्यक्ती पोलीस दलातील आहे. त्या व्यक्तीचं नाव मला माहित आहे, असा खळबळजनक दावा धस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. करुणा शर्मा-मुंडे ५ सप्टेंबर २०२१ रोजी परळीत गेल्या होत्या. त्या आधी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते. त्यातून बराच संघर्ष उफाळला. करुणा मुंडे परळीत असताना त्यांच्या कारमध्ये पिस्तूल आढळून आलं होतं. त्या प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याच प्रकरणाचा धागा पकडत…

Read More

शुक्रवार ३ जानेवारी  संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी शुक्रवारी पत्नी डॉ. मैथिली यांच्यासह स्वामी समर्थ सेवा केंद्रात जात आरती करत जनतेच्या सुख समृद्धी आणि निरामय आरोग्यासाठी प्रार्थना केली. या आरती मागील कारण स्वतः तांबे यांनी समाज माध्यमावर सांगितले आहे. आमदार तांबे म्हणाले, संगमनेर शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेला आलो असताना या केंद्राच्या आवारात वीज वितरण कंपनीची डीपी आहे आणि या डीपीतून सातत्याने शॉर्ट सर्किट होत असल्याने केंद्रात येणारे सेवेकरी भयभीत आहेत, ही बाब निदर्शनास आली. याबाबत तातडीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तिथली डीपी हलवली. याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी, केंद्राच्या…

Read More